
माझे खरे वय किती आहे?
एका सकाळी मी आमच्या क्लब मध्ये क्लब मेंबर्स सोबत अनौपचारीक गप्पा मारत होतो. नवीन जुने सगळे मेंबर्स अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हेल्द फिटनेस विषयी गप्पा मारत होते. गप्पा मारता मारता आमच्या एका नवीन मेंबर ने मला अचानक एक प्रश्न विचारला.

A marathoner – 21km finisher – २१ किमी मॅरेथॉन धावतानाचा माझा फोटो – २०१७ मधील
“तुमचे वय काय आहे?”
त्यांच्या या प्रश्नाला मी त्वरीत उत्तर दिले. “छत्तीस वर्षे”.
“महेश सर तुम्ही एक तर विनोद करताय किंवा मला इंप्रेस करण्यासाठी खोट बोलताय”, त्यांचे प्रतिउत्तर आले.
त्यांच्या या बोलण्याने मला समजले की त्यांचा विश्वास बसत नाहीये माझे वय ३६ वर्षे आहे या माझ्या म्हणण्यावर. तेच काय मित्र नातेवाईक देखील मला असा प्रश्न विचारतात. व मी उत्तर दिले की त्यांचा विश्वास बसत नाही. माझे जन्म झाल्यापासुन चे वय ३६ वर्षे आहे. जन्मापासुन ते आजतागायत मी जितका जगलोय तितकी वर्षे म्हणजे माझे वय किंवा आपण त्याला माझे “जिवीत वय” असे म्हणु शकतो, जेणे करुन पुढच्या गोष्टी समजण्यासाठी थोड्या सोप्या होतील.
त्या नवीन मेंबर ला देखील विश्वास बसला नाही हे मला समजले. मी माझ्या परीने समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला.
“मी तुम्हाला माझा कॉलेज सोडल्याचा दाखला दाखउ शकतो खात्री साठी. पणा त्यापेक्षा मी तुम्हाला माझी फेसबुकवरील टाईम लाईन दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल”
मग मी माझा लॅपटॉप सुरु करुन माझी फेसबुक टाईमलाईन त्यांना दाखवली. २०१७, २०१६, २०१५ पर्यंतचे फोटो पाहुन देखील त्यांचे समाधान होताना दिसत नव्हते. मग मी अखेरीस त्यांना २०१३, २०१२ चे माझे फोटो दाखवले. आणि जेव्हा त्यांनी माझे त्यावेळचे फोटो पाहीले तेव्हा कुठे त्यांचा माझ्या म्हणण्यावर विश्वास बसला.

२०१२ मध्ये माझ्या कुटुंबियांसोबत मी.
२०१२ सालचे माझे फोटो पाहुन त्यांनी माझ्या विश्वास ठेवला खरा पणा त्यांच्या कडे लगेच पुढचा प्रश्न तयार होताच.
“तुम्ही कसे काय स्वःतला इतके फिट केले?”
त्यांच्या या प्रश्नाचे उत्त्तर ५-१० मिनिटांत देणे शक्य नव्हते. म्हणुन मी त्यांना आमच्या कस्टमर एड्युकेशन सेशन ला येण्याचे निमंत्रण दिले, की जो दर १५ दिवसांनी होत असतो. व त्यांनी देखील येतो असे आश्वासन देऊन त्या दिवसापुरता निरोप घेतला.
आमचे हे संभाषण जरी इथेच संपले तरी या संभाषणामुळे मला स्वःतस एक प्रश्न पडला. तो असा
माझे खरे वय किती?
पुढील महत्वाची माहीती पुढच्या लेखामध्ये अवश्य वाचा !
कळावे
तुमचा निरामय निरोगी आयुष्याचा सांगाती
महेश ठोंबरे