Stay Fit Pune - The weight loss center

रोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय?

समजा एखादा मनुष्य मृत झाला तर आपल्या संस्कृतीमध्ये पुढच्या कमीत कमी वेळामध्ये त्या मृत शरीरास अग्नि देण्याची प्रथा आहे. याचे कारण नुसतेच धार्मिक विधी हे आहे असे आपणास वाटत असेल तर आपण आपल्या प्रथा-परंपरांविषयी अनभिज्ञ आहोत असा याचा अर्थ होतो. माणसाच्या मृत्यु नंतर तात्काळ त्या मृत शरीरावर असंख्य असे जिवाणु, विषाणु हल्ला करतात.  या हल्ल्यामुळे तात्काळ त्या मृत शरीराचे विघटन सुरु होते. हा निसर्गाचा नियमच आहे. हे विघटन बाह्य रुपात दिसते ते मृत शरीर सडण्याच्या रुपात. ते मृत शरीर काही काळ तसेच राहिले तर हे विषाणु त्या शरीराचे पुर्णपणे विघटन करतात व थोड्याच दिवसात त्या शरीरातील फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक राहितो.

जर एखाद्या जंगलामध्ये असे काही होत असेल तर काही हरकत नाही पण नागरी वस्तीमध्ये असे विघटन होऊ दिले गेले तर यामुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरतील व मनुष्यजातीच्या अस्तित्वास धोका निर्माण होईल. व त्यामुळेच आपल्याकडे मनुष्याच्या पार्थिवास अग्निसंस्कार दिला जातो.

आजचा आपला विषय आपल्या धार्मिक प्रथा परंपरा विषयी नाही. तरीही अनुषंगाने आपणास यातील शास्त्र सांगावे म्हणुन लिहिले.

मग आजचा विषय म्हणजे रोग प्रतिकारक शक्ति आणि अग्निसंस्कार यांचा काही संबंध नसताना त्या विषयी का लिहिले असे तुम्हाला वाटणे साहजिक आहे. होय अग्निसंस्काराचा जरी रोग प्रतिकारक शक्तिशी संबंध नसला तरी रोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नेमके काय हे सांगण्यासाठी मृत शरीरावरील विषाणु, जिवाणुंच्या आक्रमणाचा आणि रोग प्रतिकारक शक्तिचा अगदी जवळुन संबंध आहे म्हणुनच लेखाची सुरुवात मृत शरीराच्या सडण्याच्या प्रक्रियेने केली.

ज्या पार्थिवाच्या बाबतीत असे होत असते, तोच मनुष्य जेव्हा जिवंत असतो तेव्हा मात्र असे काही होत नाही. जिवंत माणसांचे शरीर अशाप्रकारे सडुन गेल्याचे आपल्या फारसे ऐकिवात नाही.

याचे कारण आहे आपल्यामध्ये असणारी रोग प्रतिकारक शक्ति. रोग प्रतिकारक शक्ति जिला इंग्रजी मध्ये इम्युन पावर म्हणतात ती शक्ति आपणास अहोरात्र आपल्या शरीरावर हल्ला करणा-या अशा, जीवघेण्या विषाणुंसोबत युध्द करीत असते. रोग प्रतिकारक शक्ति जर आपल्यामध्ये नसेल तर आपले शरीर एखाद्या मृत शरीरासारखेच क्षीण क्षीण होत जाऊन अंती नष्ट होते.

ज्या प्रमाणे मृत शरीरावर या विषाणुंचा हल्ला होतो त्याच प्रमाणे आपल्या जिवंत शरीरावर देखील असे हल्ले अगदी प्रत्येक क्षणाक्षणाला होत असतात. आणि या हल्ल्यापांसुन प्रत्येक क्षणाला आपणास वाचवते ती म्हणजे आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति. शरीराच्या स्वास्थ्यासाठी जे म्हणुन अपायकारक शरीरामध्ये प्रवेश करते जेव्हा जेव्हा प्रवेश करते तेव्हा तेव्हा आपली रोग प्रतिकारक शक्ति तातडीने प्रतिहल्ला करुन त्या अपायकारक जिवाणु-विषाणुंना नेस्तनाबुत करते.

हे सर्व विषाणु आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, अगदी रोज म्हणजे आपल्या अगदी प्रत्त्येक श्वासागणिक हे विषाणु आपल्या शरीरामध्ये प्रवेश करीत असतात. या विषाणुंमधील कित्येक विषाणु आपल्या शरीरासाठी अपायकारक असतात. वर म्हंटल्याप्रमाणे आपल्यातील रोग प्रतिकारक शक्तिमुळेच आपण या रोग निर्माण करणा-या विषाणुंपासुन बचावतो.

पण कधी कधी या युध्दामध्ये या विषाणुंची ताकत वाढते. व आपली रोग प्रतिकारक शक्ति कमी पडते. या विषाणुंचा विजय होतो. याचाच परिणाम म्हणुन आपणास सर्दी-खोकला-ताप आदी आजार होतात.

ज्याला आपण हवामानातील बदलामुळे झालेले आजार म्हणतो किंवा व्हायरल इन्फेक्शन म्हणतो ते सगळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ति कमी झाल्यामुळेच होत असतात.

आपण असे आजारी पडल्यावर सात-आठ दिवसांमध्ये आपण आपोआप ठिक होणे गरजेचे असते. असे होते म्हणजे काय होते तर, आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति ने पुन्हा जोर पकडुन, ताकत एकवटवुन या बाह्य शक्तिंना पराभुत केलेले असते.

आणि जर सात-आठ दिवसांमध्ये देखील तुम्ही आजारातुन बाहेर येत नसाल तर मात्र इथे तुम्ही हे अवश्य समजा की तुमची रोग प्रतिकारका क्षमता कमालीची कमकुवत झालेली आहे. मग तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घेता. काही टॅबलेट्स घेता. एक विशिष्ट औषधांचा कोर्स करता. बरोबर ना?

हे इंजेक्शन, टॅबलेट्स नक्की काय करतात बरे? तर यांना म्हणतात ॲन्टी बायोटिक्स. प्रतिजैविके.

आपल्या शरीरावर हल्ला करणा-या, बाहेरुन आत आलेल्या या विषाणुंना पराभुत करण्यासाठी आपण बाहेरुन मदत घेतो. हे विषाणु कोणते आहेत याचा अंदाज डॉक्टरांना विविध चाचण्यांद्वारे येऊ शकतो. व नेमके तेच विषाणु मरतील असे, आपल्या शरीराला अपाय न करणारे, जिवाणु म्हणजेच जैविके आपल्या शरीरात सोडली जातात. आपली रोग प्रतिकारक शक्ति कुचकामाची ठरलेली असल्यानेच आपल्या शरीरास बाहेरुन कुमक मागवावी लागते. मग ही बाहेरुन आलेली कुमक अधिक आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति हे दोघे पुन्हा अपायकारक विषाणुंवर जोरदार प्रतिहला चढवतात व काही दिवसांमध्येच आपण आजारातुन बाहेर येतो.

मला वाटते वरील सर्व विश्लेषणाद्वारे रोग प्रतिकारक शक्ति म्हणजे नेमके काय हे तुम्हाला समजले असेलच.

पुढील लेखामध्ये मी तुम्हाला कायमचे आजारमुक्त होण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे. म्हणजेच काय तर आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति कशी वाढवायची या विषयी सविस्तर माहिती मी पुढील लेखात देईल. अवश्य वाचा व शेयर करा.

आपला

महेश व पल्लवी ठोंबरे

9923062525

Facebook Comments

Comments
  • reply
    नामदेव ज्ञानोबा देशमुख
    March 11, 2020

    खूपच अभ्यासपूर्ण लेख आहे सर
    Thanks

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.