Stay Fit Pune - The weight loss center

weight loss in Pune

मधुमेह म्हणजे नक्की काय?

मधुमेह म्हणजेच डायबेटीज हा सध्या भारतातील सर्वात भयावह असा आजार होत चालला आहे. सर्वसाधारणपणे 15 वर्षावरील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण 3-10 टक्क्याच्या जवळपास आढळते.. यावरुन मधुमेहचा धोका भारतीयांस किती आहे याचा अंदाजे येतो. इंटरनेट किंवा काही ऐकीव माहीतीच्या आधारे आपण मधुमेहाविषयी काही ठोकताळे आपणाशीच, आपल्याच आवडीने बनविलेले असतात. त्यातील सर्वात पहीला गैरसमज असा आहे की, मधुमेह मला होणारच नाही. होय ह्या गैरसमजाचा फुगा तेव्हा फुटतो जेव्हा, एखादे दिवशी अचानक आपले रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे रिपोर्ट समोर येतात. व तेव्हा नेमका खुप उशिर झालेला असतो.

आपण हे समजुन घेतले पाहीजे की मधुमेह म्हणजे नक्की काय? त्याची लक्षणे काय? त्याचे इलाज/पथ्ये काय आहेत हे पुढच्या लेखात समजुन घेऊ.

मधुमेह म्हणजे नक्की काय?

मधुमेहात नेमके काय बिघडते हे आता जरा समजावून घेऊ या.
आपल्या शरीरात स्वादुपिंडातील विशिष्ट बीटा पेशींमध्ये इन्सुलिन संप्रेरक तयार होते. इन्सुलिन संप्रेरक हेच शरीरातील साखरेचा बहुतेक कारभार पाहते. साखर म्हणजे शरीराचे इंधन. साखरेचे ज्वलन करून पेशींना कार्यशक्ती(उष्मांक) मिळते. यासाठी रक्तात साखरेचे ठरावीक प्रमाण असावे लागते. साखरेचा वापर होण्यासाठी इन्शुलिन संप्रेरकाची (आणि इतर काही संप्रेरके ) मदत लागते.
रक्तात इन्सुलिन कमी असले, की साखरेचा वापर नीट होत नाही. त्यामुळे रक्तातले साखरेचे प्रमाण वाढलेले राहते. साखरेचा वापर नीट होत नसल्याने पेशींना पुरेशी कार्यशक्ती मिळत नाही. त्यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवतो, लघवीतले साखरेचे प्रमाण वाढल्याने जादा साखर विरघळवण्यासाठी जादा पाणी लागते. म्हणून मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढते. लघवीचे प्रमाण वाढल्याने तहानही जास्त लागते.
रक्तात वाढलेली साखर आणि इतर काही रासायनिक दोष निर्माण झाल्याने अनेक पेशीसमूहांमध्ये हळूहळू बिघाड (गंज) होत जातात. यामुळे शरीर हळूहळू जीर्ण होते. रक्तवाहिन्या कडक आणि ठिसूळ होतात. त्यामुळे रक्तदाब वाढणे, हृदयरोग हे दोष जास्त प्रमाणावर आढळतात. नेत्रपटलातल्या बिघाडांनी दृष्टी अधू होते. मूत्रपिंडाची क्षमता कमी होते. चेतासंस्थेवर परिणाम होऊन हातापायांना मुंग्या येतात व बधिरतेचे पुढचे परिणाम (जखमा, इ.) होतात. मेंदूमध्येही हळूहळू दोष निर्माण होतात. रक्तातले वाढलेले साखरेचे प्रमाण जंतूंना फार उपयोगाचे असते. त्यामुळे अशा व्यक्तींना जंतुदोष लवकर होतो. गळवे, जखमांमध्ये पू होणे, जखमा लवकर भरून न येता चिघळणे व इतर अनेक प्रकारचे जंतुदोषाचे आजार (उदा. क्षयरोग) लवकर वाढतात. या सर्व दोषांमुळे मधुमेही व्यक्तीचे आयुर्मान कमी असते. मात्र वेळीच उपचार सुरू करून काळजी घेतली तर हे दुष्परिणाम बरेचसे टाळता येतात आणि आयुर्मान चांगले राहू शकते.

रक्तातली साखर वाढणे, रक्तातले मेद वाढणे, रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढणे, स्थूलता-वजनवाढ या सर्वांना मिळून एक्स लक्षणसमूह म्हणतात. यामुळे मधुमेह आणि अतिरक्तदाब हे घातक आजार निर्माण होतात. भारतात या एक्स लक्षणसमूहाचे प्रमाण वाढते आहे. (यामुळे हृदयविकार वाढतात.)

Diabetes and weight loss in Pune

विविध संशोधने आणि अनुभव यांच्या आधारावर मधुमेहाचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला म्हणजे तरुण मधुमेह. तरुण मधुमेह म्हणजे माणसाच्या आयुष्यात खुप लवकर म्हणजे अगदी गर्भात असताना देखील त्यास ह्या प्रकारचा मधुमेह होऊ शकतो. याचे मुख्य कारण आहे अनुवांशिकता. ह्या प्रकारच्या डायबेटीजला टाळता येत नाही. तो जर एखाद्या व्यक्तिस होणार असेल तर होणारच. हो, पण असा जरी मधुमेह एखाद्यास झाला तरी देखील खचुन न जाता, व्यवस्थित नियोजन, आहार विहार आदींचे वेळापत्रक जर व्यावस्थित पाळले तर मधुमेहासहित एखादी व्यक्ति अगदी १०० वर्षे देखील जगु शकेल, यात संशय नाही. मधुमेह असताना काय काळजी घ्यायची याविषयी माझ्या पुढच्या लेखात अवश्य वाचा.

तरुण मधुमेहाच्या प्रकारात इन्शुलिन कमतरता हाच मुख्य दोष असतो. याउलट तरुणमधुमेहात इन्सुलिन देणे अनिवार्य असते.

मात्र तरुण मधुमेह फक्त 5% असून 95% रुग्ण प्रौढ मधुमेहाचे असतात.

आता दुस-या प्रकारचा मधुमेह, की भारतात सध्या सर्वात जास्त धोक्याची घंटा वाजवीत आहे, त्या विषयी आपण पाहुयात. ज्या एक्स लक्षण समुहा विषयी मी, वर लिहिले आहे, तशी लक्षणे दिसुन मधुमेह झाल्याचे निदान होणे म्हणजे प्रौढ मधुमेह. नावाप्रमाणेच, हा प्रकारचा मधुमेह, ३५ ते ४० व्या वयाच्या आसपास, रुग्णास झाल्याचे समजते. प्रौढमधुमेहात इन्सुलिन निर्मिती ठीक असते, पण शरीरात पेशींच्या पातळीवर साखरेचा विनियोग व वापर नीट होत नाही हा प्रमुख दोष असतो. म्हणजे इन्सुलिनची तौलनिक कमतरता म्हणजे निरुपाय असते. प्रौढमधुमेहात उपचारांमध्ये इन्सुलिनची गरज सहसा पडत नाही.

खरी गंमत पुढे आहे. भारतात मधुमेहींचे जे रुग्ण आहेत, त्याच्या ९७% रुग्ण ह्या दुस-या प्रकारात मोडतात. याचाच अर्थ असा की, ब-याच रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखर अगदी ४०० च्या वर गेल्याने अचानल चक्कर येऊन पडल्यानेच, थकवा आल्यानेच, मधुमेह झालेला असल्याचे समजते. तोपर्यंत प्रत्येक मधुमेहीला असेच वाटत असते की त्याला मधुमेह होणार नाही. पण जेव्हा समजते तेव्हा बराच उशिर झालेला असतो.

सामान्यपणे शरीरात ग्लुकोजचा वापर नीट होण्यासाठी इन्शुलिन संप्रेरक मदत करते. प्रौढ मधुमेहात शरीरातल्या पेशी इन्सुलिन असून देखील नीट वापरु शकत नाहीत. हा दोष असतो. याला ‘इन्सुलिन निरुपाय’ म्हणता येईल. असे होण्याचे कारण स्थूलता किंवा चरबीच्या पेशींची वाढीव संख्या, किंवा उतारवय असते. स्नायूपेशींमध्येही इन्शुलिन वापर कमी होतो. या आजारात पेशींमध्ये ग्लुकोज साखर कमी प्रमाणात शिरते म्हणून रक्तात जास्त साखर शिल्लक राहते. जास्त साखर रक्तात उरल्याने जादा इन्शुलिन रक्तात उतरवले जाते.
पोटात आणि कमरेभोवती जादा चरबी, वाढते वय, खाण्यात जास्त साखर-क्षम पदार्थ, काही प्रकारची खाद्यतेले या सर्वांमुळे ‘इन्सुलिन निरुपाय’ वाढत जातो.
प्रत्येक पेशीवर इन्शुलिनच्या Receptors असतात. प्रौढ मधुमेहात या संख्या 20-30% कमी झालेल्या असतात. याचमुळे पेशीपेशीत साखरेचा प्रवेश कमी होतो आणि ऊर्जाप्रक्रिया मंदावते.

हा दुस-या प्रकारच्या मधुमेहाची कारणे खालील प्रमाणे आहेत.

वजन जास्त असणे, लठ्ठपणा, पोट सुटणे, कमर-पोटाभोवती चरबी वाढलेली असणे. (कमर-नितंब गुणोत्तर किंवा वजन:उंची गुणोत्तर जास्त असणे, तुमचे वजन-उंची गुणोत्तर म्हणजेच बीएमआय इथे क्लिक करुन तपासा)
• बैठी जीवनपध्दती – शारीरिक काम नसणे, सर्व काम बसून करणे हा एक मोठाच धोका आहे. आपल्या समाजातले हे साहेब-नोकर कल्चर, कष्टाबद्दल उच्च-नीच कल्पना आरोग्याला मारक आहेत. काहीजण इकडची काडी तिकडे न करता जगतात. ही जीवनपध्दती मधुमेह, अतिरक्तदाब यांना आमंत्रण देणारी आहे. अशा व्यक्तींनी निदान नियमित व्यायाम तरी केलाच पाहिजे.
• साखरपेरणी – नेहमी आहारात साखरक्षम पदार्थांची भर असणे म्हणजे आपणहून आजाराला पायघडया घालण्यासारखे असते. वारंवार गोड चहा पिणे, मिठाई खाणे, हे तर वाईट आहेच पण ज्या अन्नपदार्थांची शरीरात लवकर साखर होते ते पदार्थही मधुमेहाला मदत करतात. भात, भाकरी, बटाटा, मिठाई हे सर्व पदार्थ शरीरात रक्तात साखर सोडतात. म्हणून हे पदार्थ साखर-पेरणी करणारे (साखरक्षम) पदार्थ कमी खावेत.
• लठ्ठपणाप्रमाणे उपासमारीमुळे होणा-या कुपोषणानेही मधुमेह होतो असे सिध्द झाले आहे. लहानपणी अतिकुपोषित असणा-या मुलांना तरुणपणातच मधुमेह होण्याची शक्यता असते. हा मधुमेह 10-20 वर्षे वयोगटात सुरु होतो. याची लक्षणे तीव्र असतात आणि इन्शुलिन दिल्याशिवाय या आजारात चालत नाही. भारतातल्या कुपोषणग्रस्त विभागात हा आजार आढळून येतो. यासाठी नियमित उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावू शकतात.

वर सांगितल्या प्रमाणे, प्रकार एक म्हणजे तरुण मधुमेह सध्यातरी टाळता येत नाही.. भविष्यात कदाचित यावर अधिक संशोधन होऊन, पोलिओ सारखीच एखादी प्रतिबंधक लस तयार केली जाऊ शकते. प्रकार दोनचा, म्हणजे प्रौढ मधुमेहातील देखील उतारवयामुळे होणार मधुमेह, देखील टाळता येणे शक्य नाही,पण सुसह्य केला जाऊ शकतो. ते सर्व उपाय, काळजी पथ्य याविषयी माझ्या पुढच्या लेखात अवश्य वाचा.

 

लठ्ठपणा मुळे, पोटावरील चरबी वाढल्यामुळे, विसंगत जीवनपध्दतीमुळे होणारा मधुमेह मात्र आपण टाळु शकतो.

• मधुमेही व्यक्तींनी आपसात लग्न करू नये.
• ज्यांच्या रक्ताच्या नात्यात मधुमेह आहे अशांनी पण शक्यतो आपसात विवाह टाळावा.
• आदर्श वजन, शरीरभार (तुमचा बीएमआय तपासा ) ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे.
• यासाठी आहार, व्यायाम यांचा समतोल ठेवायला पाहिजे.
• मधुमेह लवकरात लवकर शोधण्यासाठी विशेष प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्वांनाच लक्षणांची व कारणांची नीट माहिती पाहिजे.
• पस्तीशी नंतर वर्षातुन किमान दोनदा तरी रक्तातील साखर तपासुन घ्यावी.

कळावे,

आपला निरामय आयुष्याचा सांगाती

महेश ठोंबरे – 9923062525

पल्लवी ठोंबरे – 9765702525

(टिप – लेखक व त्यांची पत्नी दोघेही वजन कमी करण्यामधील तज्ञ आहेत. निरामय, निरोगी आयुष जगण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.)

Facebook Comments

Comments
ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.