
आरोग्यम धन “संपदा”
आपल्याकडे असा एक गैरसमज सर्रास झालेला दिसतो. तो म्हणजे आय टी क्षेत्रातील नोकरी म्हणजे बख्खळ पैसा आणि ऐषोआराम. कंपनी मध्ये कामाला जाण्यायेण्यासाठी कंपनी कार ची व्यवस्था करते. कंपनी मध्येच एकदम भारी लकलक चमचम करणारे कॅंटीन, त्या कॅंटीन मधील तितकीच चआमचमीत व्यंजने, पार्ट्या, मनोरंजनाचे कार्यक्रम , थोडक्यात काय तर आय टी क्षेत्रातील नोकरी म्हणजे एकदम फाईव्ह स्टार नोकरी. फाईव्ह स्टार लाईफस्टाईल, फाईव्ह स्टार सगळच.
पण हे खर नाहीये. एखाद्या आय टी क्षेत्रातील कर्मचा-या कडुन जास्तीत जास्त काम काढुन घेण्यासाठी त्याला अनेकविध सुविधा दिल्या जातात. या सा-या सुविधांचा परिणाम कामावर चांगलाच होतो. कर्मचारी खुप चांगले आणि जास्त काम करतो. त्याच वेळी या सर्व झगमगाटामध्ये आय टी क्षेत्रात नोकरी करणा-यांच्या आरोग्याचे किती हाल होतात हे इतरांना कळत नाही. इतरांनाच काय खुद्द त्या व्यक्तिला देखील हे समजत नाही किंवा जेव्हा समजते तेव्हा खुप उशिर झालेला असतो. कधी कधी हा उशिर इतका झालेला असतो की ती व्यक्ति पुन्हा पुर्ववत म्हणजे आरोग्यसंपन्न कधीच होऊ शकणार नाही असा त्यांची पक्की धारणा झालेली असते.

वजन कमी केल्यानंतर आमच्याक्लब मध्ये संपदा
संपदा ला मात्र तिच्या आरोग्याची लागलेली वाट उशिरा का होईना पण समजली. पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण झाल्यावर एका नामांकीत बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये तिला लागलीच नोकरी मिळाली. ती ज्या क्लायंट साठी काम करायचे होते ती युरोप मधील एक कंपनी. त्यामुळे साहजिकच संपदाच्या कामाच्या वेळा देखील युरोपच्या कामाच्या वेळांप्रमाणेच असत, आणि अजुनही आहे. म्हणजे भारतात दुपार झाली की झाली की तिकडे सकाळ होते. संपदा मुळातच हुशार आणि कामसु आहे. त्यामुळे तिला कामाचा ताण आणि कामाच्या वेळांचे वावडे नव्हते. आनंदाने तिने कामाचा आणि कामाच्या रोटेशनल वेळांचा आदर करीत स्वीकार केला.
संपदा एक संगणक शास्त्राची विद्यार्थीनी. या विषयात खुप अभ्यास करावा लागतो. माझे एक दोन मित्रांनी देखील हा अभ्यासक्रम केलेला आहे. आम्ही बी कॉम चे विद्यार्थी, कॉलेजमध्ये असताना महिन्यातुन एकदा तरी ट्रेकींग ला जायचो. पण माझे संगणक शास्त्र वाले मित्र कधीही ट्रेक ला येऊ शकले नाहीत. आमच्या पार्ट्या व्हायच्या, सिनेमे, मुक्त पणे फिरणे सगळे करायचो आम्ही पण बीसीएस वाल्या मित्रांना या सगळ्यासाठी कधीच वेळ मिळाला नाही. माझ्या मित्रांच्या अनुभवावरुन मी हे नक्की सांगु शकतो की संपदा ला देखील वेळ नव्हताच. तरीही संपदा कॉलेज मध्ये असताना डान्स क्लास ला न चुकता जायची. वेगवेगळ्या ग्रुप सोबत ती नृत्य सादरीकरण करायची. आणि एवढा वेळखाऊ छंद जोपासुन देखील तिने डिस्टींक्शन मिळवले शेवटच्या वर्षात. पुढे ज्या कंपनी मध्ये नोकरी मिळाली तिथे देखील तिने काम सांभाळत डान्स आणि रीक्रीयेशनच्या कार्यक्रमांमध्ये भरभरुन भाग घेतला. खालील व्हिडीयो मध्ये जी लीड डान्सर आहे ती संपदाच आहे.
व्हिडीयो पाहताना शक्य झाल्यास आवाज सुरु करा.
नोकरी मिळाली तसे वेळ जात राहीला. दोन झाल्यानंतर तिला एका गोष्टीची जाणीव झाली. ती म्हणजे, कॉलेजमध्ये, शेवटच्या वर्षात असताना जे तिचे आवडते कपडे ती घालायची, ते तिला हळु हळु बसेनासे झाले. एका मागुन एक वेगवेगळी लक्षणे तिला जाणवु लागली. १५ ते २० मिनिटे सतत नृत्य सादरीकरण करुन देखील न थकणारी संपदा ऑफीस मध्ये बसल्या जागेवर थकायची. कामाचा ताण जाणावु लागला होता. शरीरामध्ये एक प्रकारचे जडपण आल्यासारखे तिला जाणवु लागले. छोट्या छोट्य गोष्टींमुळे मित्र मैत्रिणींवर चिडणे, नाराज होणे अशा गोष्टी देखील आपोआप कधी सुरु झाल्या हे तिला कळलेच नाही. पण कपडे फिट बसताहेत हे जेव्हा पासुन समजले तेव्व्हा पासुन तिने दोन वर्षामध्ये तिच्यात झालेले बदल कसे व काय झालेत याचे अवलोकन केले. तेव्हा तिला एकेक करुन सगळे बदल स्पष्ट दिसु लागले. व या सगळ्यामध्ये सर्वात मोठा बदल होता वाढलेले वजन. व वाढलेल्या वजनामुळे तिला आरोग्या संबंधीदेखील अनेक तक्रारी जाणवु लागल्या. थोड वेळ उभे राहीले क्किंवा थोडे चालले तरी पायाचे स्नायु दुखायला सुरुवात झाली. विनाकारणच अंगदुखी देखील जाणवु लागली. व त्याही पेक्षा सर्वात धक्कादायक त्रास म्हणजे पीसीओडी. हा देखील तिला जाणवु लागला.
या सगळ्याचा परीणाम काम करण्याच्या उर्जेवर झाला. भलेही काम करण्याची ऊर्जा डोळ्यांना दिसत नाही. पण वाढलेले वजनामुळे ती जी थकायची, गलितगात्र व्हायची ते मात्र सर्वांना दिसायचे. मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाणे बाहेर जाणे देखील ती टाळु लागली. व्यायाम तर तिच्या साठी खुपच लांबची गोष्ट झाली.
तिच्या वजन वाढण्याचा परिणाम नुसता तिची लठठपणाकडील वाटचालच दाखवीत नव्हता, तर ती काही प्रमाणात लठ्ठ झाली देखील होती. तशी ती दिसत देखील होती. कित्येकदा तिला तिचे मित्र मैत्रिणी म्हणत की सुल्तान सिनेमाच्या पार्ट टु मध्ये संपदाच असणार आहे. संपदा वरकरणी याला विनोद म्हणुन सोडुन देत जरी असली तरी तिच्या मनामध्ये अशा कॉमेंट्स विषयी खंत नेहमीच राहायची. इतकेच काय पण नातेवाईक देखील म्हणायचे की हे काय तुझे वय आहे का वजन वाढायचे.
अचानक तिची एकदा तिच्या मामीशी भेट झाली. मामी कडुन संपदाने वजन कमी करण्याविषयी ऐकले होते. आणि सोसायटीमधील अपर्णा जोशी ताई आणि माझे देखील वजन कमी झालेले तिने पाहिले होते. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तिने माझ्या शी वजन कमी करण्या संदर्भात संपर्क केला.
मी तिला क्लब मध्ये बोलावले. नेहमीप्रमाणे प्राथमिक आणि सविस्तर आरोग्य चाचण्या करुन मी तिच्या कामाच्या वेळा आणि एकुणच तिचे रुटीन पाहुन खास तिच्या साठी असा एक प्रोग्राम तयार केला. मी सांगितल्या प्रमाणे संपदाने सर्व काही करायची तयारी दाखवली आणि पुढे तसे केले देखील. झगमगाट असलेल्या आय टी च्या दुनियेमध्ये तिला स्वःत ला सांभाळायचे होते. विविध प्रलोभनांना बळी पडायचे नव्हते. थोडा का होईना व्यायाम रोज करायचा होता. शांत झोप गरजेची होती. हे सगळे आव्हान तिने समर्हमणे पेलले.
परिणाम असा झाला की पहिल्या दोन महिन्यांमध्ये भरपुर फॅट लॉस होऊन, तिचे वजन देखील पाच किलो ने कमी झाले. कामातील उत्साह वाढु लागला.हलके वाटु लागले. त्यामुळे व्यायाम आणखी जास्त वाढवावा असे तिला स्वःतहुनच वाटु लागले. मित्र मैत्रिणी आता तिला उलटा प्रश्न विचारु लागले की आता तुझ्या जागी कोणाला सिनेमामध्ये काम द्यायचे?
![]() वजन कमी करण्यापुर्वी संपदा |
![]() वजन कमी केल्यानंतर आमच्याक्लब मध्ये संपदा |
वजन कमी करुन दिवसभर ऊर्जा उत्साह तसाच राह्तो. थकवा येत नाही. कामामध्ये आणखी जास्त अचुकता आणि व्हॉल्युम वाढले.
तिच्या म्हणण्यानुसार आपण आपले आयुष्य मनमुराद आणि भरपुर तेव्हाच जगु शकतो जेव्हा आपले वजन आपल्या वय आणि उंचीला साजेसे असते. तंदुरुस्त असण्याची जी भावना आहे तीच मुळात खुप आनंद देणारी आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणुन की काय पण माझी ऊंची देखील १.५ सेमी ने वाढली असल्याचे ही तिला आता जाणवले.
तिच्या या यशासाठी ती माझे आणि महेश चे आभार मानते. पण खरे आभार तिने तिचेच मानले पाहिजेत असे मला वाटते. कारण आपल्याकडे आमच्या सारखे आरोग्याविषयी मार्गदर्शन करणारे इतर ही भेटतील. पण आपल्या जीवनामध्ये बदल करायची इच्छा मात्र तिच्याच मना निर्माण झाली. वाढलेल्या वजनामुळे आणि सगळ्यांच्या सल्ला कम टोमण्यांमुळे खचुन न जाता तिने पुन्हा पहिल्यासारखी संपदा व्हायचे आव्हान स्वीकारले आणि यशस्वीपणे पेलले देखील.
संपदाच्या यशाबद्दल तिचे मनःपुर्वक आभार. व तिच्या भावी आयुष्यासाठी, आरोग्य आणि करीयरसाठी आमच्या तर्फे भरभरुन शुभेच्छा !!