Stay Fit Pune - The weight loss center

weight loss centre in pune

द टर्निंग पॉईंट ३१ जानेवारी २०१८ – Weight loss success story from Pune

माझ्या मागील ५ वर्षाच्या ‘फिटनेस कोच’ च्या प्रवासामध्ये मला हजारो सहप्रवासी भेटत गेले. या साथीदारांना जसे माझ्याकडुन काहीतरी शिकायला मिळाले तसेच प्रत्येकाकडुनच मला बरेच काही शिकायला मिळाले. काही लोकांकडुन करीयर विषयी समर्पण शिकायला मिळाले तर काहीजणांकडुन करीयर मुळे होणारी फरफट शिकायला मिळाली. माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तिची वजन कमी करण्याची जिद्द व इच्छाशक्ति देखील बरच काही शिकवुन गेली.

या हजारो लोकांच्या यादीमध्ये एक नाव प्रकर्षाने अगदी ठळक अक्षरामध्ये माझ्या मनाच्या डायरीमध्ये लिहिले आहे ते म्हणजे रामचंद्र बनदिवेकर.

अत्यंत कमी वयात एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीचा डेप्युटी मॅनेजर होणे म्हणजे साधी गोष्ट नाही. जाता जाता, सहज साध्य होणारी गोष्ट नाहीये ही. यासाठी खुप मेहनत, सातत्य, समर्पण आणि स्वःतला नेहमी अपडेट ठेवणे गरजेचे आहे. रामचंद्र ने नेमके हेच केले व आज विविध कंपन्यामध्ये काम करीत करीत त्याने डेप्युटी मॅनेजर या पदापर्यंत झेप घेतली.

रामचंद्र मुंबई या झगमग असलेल्या मायानगरीमध्ये लहानचा मोठा झाला. शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण या सोबतच रामचंद्र मुंबईतील धावपळ देखील शिकला. सतत कार्यमग्न राहणे. सतत ध्येयाकडे लक्ष ठेवणे. स्पर्धा भयंकर आहे. करीयर आणि मुंबईची लोकल ट्रेन यामध्ये फारसा फरक नाहीये. थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी हातची ट्रेन निघुन जाते. व तुम्ही मागेच राहता. बर मागे राहिल्याने स्पर्धा कमी होते अशातल भाग अजिबात नाही. स्पर्धा अखंड, २४ बाय ७, अहोरात्र सुरुच आहे. सर्व मुंबईकर जन्मजातच लोकलमध्ये चढण्याचे कौशल्य शिकुन आलेले असतात. पण त्यातले मोजकेच असतात की जे, हेच कौशल्य करीयरसाठी वापरतात.

शालेय शिक्षणानंतर रामचंद्र ने इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्युनिकेश या क्षेत्रात एंजिनियरींग केले. एकदा का शिक्षण पुर्ण झाले की मग सुरु होते मुंबईच्या लोकल सारखीच करीयर नावाचा प्रवास. या प्रवासात देखील अनेक स्टेशन्स येतात. अनेक गाड्या बदलाव्या लागतात. सावध रहावे लागते. व ज्याला हे सगळे जमते त्याचा करीयर च्या प्रवासाचा वेग लक्षणीय असतो. ती व्यक्ति आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने मार्गक्रमण करीत असते.

रामचंद्रचा करीयरचा प्रवास दणक्यात सुरु झाला. योग्य वेळी पहिली ट्रेन सोडुन, दुसरी ट्रेन घेणे मग पुन्हा योग्य वेळ आली की ती सोडुन तिसरी पकडणे हे त्याने अत्यंत सावध पणे केले. परिणाम असा झाला की अल्काटेल सारख्या जुन २०१३ मध्येच रामचंद्र डेप्युटी मॅनेजर झाला. त्याचा हा प्रवास सुरुच होता. सध्या इन्फोसिस या जगद्विख्यात बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये रामचंद्र प्रोजेक्ट मॅनेजर या पदावर काम करतो.

मी त्याला एकेरी संबोधन वापरतो कारण तो वयाने लहान आहे माझ्यापेक्षा. पण करीयर मधील झेप खुपच मोठी आहे.

जानेवारी २०१८ मध्ये कर्मधर्म संयोगाने, रामचंद्रची आणि माझी भेट झाली. रामचंद्र सारखा यशस्वी व्यक्ति माझ्या मार्गदर्शनासाठी माझ्याकडे आला म्हंटल्यावर साहजिकच मला खुपच भारी वाटले. नेहमीप प्रमाणेच प्राथमिक प्रश्नोत्तरांमधुन रामचंद्रची जीवनशैली काय आहे हे समजुन घेण्याचा मी प्रयत्न केला. नंतर बॉडी फॅट तपासणी केली आणि आम्ही दोघेही आश्चर्यचकीत झालो. रामचंद्रचे नुसतेच वजन वाढलेले नव्हते तर तो चक्क ओव्हरवेट म्हणजे जाड झाला होता. चरबीचे प्रमाण शरीरावर खुपच जास्त वाढलेले होते.

करीयरच्या प्रवासात एवढे पुढे पुढे जायचे म्हंटल्यावर काहीतरी किंमत मोजावी लागणार होतीच. पण ती ‘काहीतरी’ इतकी जास्त असेल त्याला कदापि वाटले नव्हते.

रामचंद्र ने लागलीच माझ्या मार्गदर्शनाखाली स्वःतचे टाईमटेबल बदलले. यात प्रामुख्याने समावेश होता तो खाण्या म्हणजे आहाराविषयी. काय खावे, किती खावे, कधी खावे, कसे खावे असे मी सांगितलेले सर्व काही तो करीयर जितक्या तन्मतयतेने केले तितक्याच तन्मयतेने त्याने वेटलॉस प्रोग्राम देखील फॉलो केला. १००% फॉलो केला.

ज्या दिवशी रामचंद्रने वजन कमी करुन निरोगी, निरामय आयुष्य जगण्याचा संकल्प करुन सुरुवात केली तो दिवस होता ३१ जाने २०१८.

पुढच्या काही आठवड्यातच रामचंद्रच्या शरीर-प्रकृतीमध्ये डोळ्यांना दिसेल इतका बदल व्हायला सुरुवात झाली. व दोन महिन्यांमध्ये त्याने चक्क १३ किलो वजन कमी केले. जुन्या पॅंट्स बसेना झाल्या, कंबर ४२ वरुन ३५ इंचावर आली.

एवढे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन करुन देखील रामचंद्र म्हणतो आत्ता कुठे या निरोगी जीवनाच्या प्रवासाला सुरुवात झालीये. पण त्या एका वळणावर, योग्य निर्णय घेतल्यामुळेच त्याच्या आयुष्यात एवढा सकारात्मक बदल झालेला आहे.

त्यामुळे त्या दिवसाला म्हणजे ३१ जाने २०१८ या दिवसाला रामचंद्र त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हणतो.

वजन कमी केल्यामुळे एनर्जी खुपच वाढलीये. कोणतेही काम करताना कंटाळा येतच नाही. काम बैठे असो नाहीतर एखादे प्रेझेंटेशन देणे असो. किंवा तासनतास एखादे फॉल्ट फाईंडींग करायचे असो आता एकाग्रता वाढली कारण आता शारीरीक थकवा दुर झाला.

फिटनेस आयकॉन मिलिंद सोमन, रामचंद्रसाठी आदर्श असणे यात काहीच नवल नाही. हेल्दी-ॲक्टीव्ह ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगण्यास सुरुवात केलेल्या रामचंद्र ने आपल्या मुळ आवडते छंद जोपासण्यास देखील सुरुवात केली. त्याला संगीतात विशेष रुची आहे. मित्रांसोबत ट्रेकींग ला जाणे, डोंगरद-या भटकणे, पावसाळ्यात घाटवाटा पालथ्या घालणे, हे पुन्हा सुरु झाले. आणि आता पुढचे टारगेट आहे परफेक्ट सिक्स पॅक्स ॲब्स. त्यासाठी वर्काआऊट देखील न चुकता तो करत असतो. वर्कआऊट म्हणजे व्यायाम करणे हा त्याच्या जीवनशैलीचा भाग झाला आहे. एखाद दिवशी वर्कआऊट नाही केले तर त्यास चुकल्या सारखे वाटते.

weight loss centre in pune

अगदी मागील वर्षीच एखाद दोन किमी चालताना ही रामचंद्र ला दम लागायचा. आता तो १० किमी मॅरेथॉन एक तासामध्ये पुर्ण करु शकतो.

रामचंद्रच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करणे हे काही नुसते आरोग्यासाठीच नाहीये. तर याचा उपयोग जीवन सर्वांगसुंदर होण्यासाठी होतोय. करीयर असेल किंवा व्यक्तिगत जीवन असेल या दोन्ही मध्ये देखील अधिक परिणामकारक आणि प्रॉडक्टिव्ह होणे यातच खर म्हणजे वजन कमी करण्याचा खरा परिपाक आहे. आणि मला त्याच्या कडुन हे अधिक चांगले शिकायला मिळाले. निरोगी आरोग्य आणि प्रगतीपथावरील करीयर या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. किंवा जीवनरथाची दोन चाके आहेत. यापैकी एक जरी बिघडले तरी देखील आपला जीवनप्रवास सुखकर होणार नाही.

त्यानंतर देखील रामचंद्रचा निरामय आरोग्याचा प्रवास सुरुच आहे. व करीयरचा प्रवास तर आता अधिक जोमाने सुरु आहे कारण आता शरीरावर अतिरिक्त, अनावश्यक वजन नाहीये.

त्याच्या एकंदरीत जीवन प्रवासासाठी आमच्या कडुन खुप खुप शुभेच्छा.

कळावे

तुमचा

महेश ठोंबरे  – 9923062525

फिटनेस कोच

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.