
लग्नाचा वाढदिवस – म्हणजे मागे वळुन बघण्याचा दिवस
आपल्या वेबसाईट वरील अभ्यासपुर्ण, माहितीपुर्ण आणि फिटनेस क्षेत्रातील अनुभवातुन लिहीलेल्या विविध लेखांचा एक वाचक वर्ग तयार होतोय. महेश ला आणि मला अनेक लोक फोन, मेसेज द्वारे त्यांच्या आरोग्य विषयक विविध शंका विचारत असतात. आम्ही ही आमच्या परीने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असतोच.
गोंधळ की संकोच?
आमचे विविध लेख वाचुन आणि आमच्या क्लब मेंबर्सच्या सक्सेस स्टोरीज पाहुन, अंदाजे ४० च्या घरातील एक व्यक्ति मागच्या आठवड्यात सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आमच्या क्लब मध्ये आली. क्लब च्या बाहेर जिथे चपला बुट काढतात तिथे, पायातील बुट काढताना हा माणुस कसल्यातरी विचारात होता असे मला दिसले. कदाचित आतमध्ये प्रवेश करावा की न करावा या विषयी त्याच्या मनामध्ये निश्चय होत नसावा. मी नेहमीप्रमाणे, आमच्या इतर क्लब मेंबर्ससोबत, त्यांच्या व्यक्तिगत हेल्द गोल विषयीच्या एका सेशन मध्ये होते. माझे या दरवाजामध्ये उभ्या असणा-या माणसाकडे देखील लक्ष होतेच. अंदाजे दोन तीन मिनिटे विचार करुन झाल्यावर तो माणुस आत मध्ये आलाच. आतमध्ये आल्यावर, आमच्या सहका-यांना तो नावनोंदणी साठी आलो आहे असे म्हणाला. सहका-यांनी त्याला थोडा वेळ वाट पहायला सांगितले. माझे व्यक्तिगत हेल्द गोल रीव्ह्यु चे सेशन संपल्यावर मी त्वरीत त्याला माझ्या केबिन मध्ये बोलावले.
नक्की समस्या काय आहे?
माझ्याशी बोलायचे आहे म्हणुन देखील तो माणुस काहीसा विचारात पडला. दिसायला अतिशय सुदृढ आणि एका अर्थाने उंचीला साजेसे वजन असणारा तो माणुस मला तर दिसताक्षणी निरोगी असल्याचे जाणवले होतेच. आमची काम करायची पध्दत काय आहे असे म्हणुन त्याने बोलायला सुरुवात केली. फी किती , कालावधी किती अशा सर्व गोष्टी झाल्यावर मीच स्वतःहुन त्यांना म्हणाले की तुम्हाला तर वेट लॉस ची गरज आहे असे मला वाटत नाही, मग तुम्ही कशासाठी चौकशी करताय एवढी?
समस्येची उकल झाली एकदाची!!!

आमच्या लग्नाचा १३वा वाढदिवस नुकताच साजरा झाला
त्यावर त्यांनी, त्यांचा महागडा मोबाईल फोन खिशातुन काढला. स्क्रीन अनलॉक केली. स्क्रीन मला दिसेल अशा पध्दतीने बसुन आणि मोबाईल पकडुन त्यांनी फेसबुक ओपन केले. त्यांच्या टाईमलाईन वरील दोन दिवसापुर्वीचा फोटो त्यांनी मला दाखवला. त्या फोटोमध्ये ते स्वःत आणि त्यांची पत्नी दिसत होते. त्यांची पत्नीने भरदार पैठणी , गळ्यात लेटेस्ट ट्रेंड असलेले दागिने, कानात देखील सुंदर कारागिरी केलेली कर्णफुले नाकात नथ. एकुणच काय तर थाट एकदम भारीच होता. आकर्षक चेह-याच्या ठेवणीवर हे सर्व दागिने अगदी खुलुन दिसत होते. मी त्यांचे आणि त्यांच्या बायकोचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी मला, ११ वर्षापुर्वेचा दोघांचा आणि मग बायकोचा एकटीचा फोटो दाखवला.
त्यांच्या बायकोचा तो ११ वर्षापुर्वीचा फोटो पाहुन मला तर विश्वासच बसत नव्हता की ही तीच स्त्री आहे असे. फोटोमध्ये अंगावर दागिने तेव्हाही होतेच. पण फरक होता तो शरीरयष्टी मध्ये झालेल्या बदलांचा. त्यावेळी अगदी स्लीम आणि ट्रिम असणारी त्यांची बायको आता मात्र गलेलठ्ठ झालेली आहे. त्या फोटो मध्ये पाहिल्यावर लगेच समजत होते की कसे हाफ स्लीव्ह ब्लाऊस घालुन देखील दंडाच्या खाली चरबी हलकेच लोंबत आहे. गाल वर आले आहेत आणि मानेचा भाग देखील चरबीमुळे वाढलेला दिसतो आहे. फोटो अर्धाच असल्याने पुर्ण शरीर म्हणजे पोट दिसु शकत नव्हते. पण मला अंदाज आलाच की पोट देखील वाढलेले असणार आहे असा.
पुढे ते म्हणाले की, मी माझ्या बायकोला एक अफलातुन गिफ्ट देणार आहे. व ते गिफ्ट म्हणजे तिला ११ वर्षापुर्वीची “ती”च भेटस्वरुप द्यायची.
हे शब्द माझ्या कानावर पडले आणि भारतीय पुरुषांच्या बदलत्या मानसिकतेविषयी कौतुक आणि आश्चर्य वाटले.
पुढे मी त्यांना विचारले की फक्त तुमची बायको सुंदर, सुडौल आणि आकर्षक दिसावी म्हणुन तुम्हाला तिच्यामध्ये बदल घडवायचा आहे. त्यावर त्यांचे उत्तर खरच खुप भारी होते. ते म्हणाले “कालच नी महेश ठोंबरे यांचा मधुमेहा विषयीचा लेख वाचला. आमच्या पैकी कुणालाही अजुन ही मधुमेह झालेला नाहीये, पण तो होऊ नये आणि ख-या अर्थाने आयुष्याचा आनंद माझ्या बायकोने घेण्यासाठीच मी तिच्या साठी तुमच्या क्लबची मेंबरशिप तिला गिफ्ट करणार आहे.”
आनंदाचे भरते
वा वा! एकीकडे महेशच्या लेखामुळे लोकांच्या मनात निरामय आयुष्य जगण्याची इच्छा उत्पन्न होते आहे पाहुन आणि दुसरीकडे, स्त्रियांच्या आरोग्या विषयी पुरुष इतके संवेदनशील होत आहेत, ह्या दोन्ही मुळे मला खुप म्हणजे खुपच आनंद झाला.
गोड शेवट!!
त्यानंतर, त्यांना सगळी माहिती देऊन, नावनोंदणीच्या फॉर्मॅलिटीज पुर्ण करुन घेतल्या. पुढे दोन दिवसांनी ते त्यांच्या पत्नीसह क्लब मध्ये आले. क्लबमध्ये येईपर्यंत त्यांनी आपल्या बायकोला सांगितले नव्हते की ते कुठे जाताहेत. क्लब मध्ये आल्यावर आणि हा काय प्रकार आहे हे समजल्यावर त्यांची बायको आश्चर्य आणि आनंद अशा मिश्रीत भावनांच्या हिंदोळ्या दिसली. पहिल्या दिवशी हेल्द चेक, पुर्ण बॉडी अनॅलिसिस केल्यानंतर, पर्सनल कोचिंग आणि गोल सेटींग वगैरे सगळे झाले. निघताना दोघेही अतिशय आनंदी होते.
पिक्चर अभी बाकी है, मेरे दोस्त!!
आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा
Akshata K
bharee story..inspiring
Ganesh Vitkar
Nice