
आरोग्य आणि यश
आपल्या संस्कृतीने आपल्याला चार क्षेत्रा मध्ये पुरुषार्थ करण्याची कायम प्रेरणा दिलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ही ती चार ध्येये, जी प्रत्येक माणसाने गाठली पाहिजेत. खुप खोलवर विचार करुन आपल्या पुर्वजांनी हे चार पुरुषार्थ ठरवले आहेत.

धर्म अर्थ काम व मोक्ष
व्यक्ति या पातळीवर आपण, मन, बुध्दी आणि शरीर या तीन आयामांमधुन व्यक्त होत असतो. व हे तीन आयाम म्हणजेच आपल्या पुढच्या सगळ्या प्रवासातील आपले सोबती आणि आपले इंधन असतात. कोणताही पुरुषार्थ करायचा म्हंटले की आपले मन ,बुध्दी आणि शरीर निरोगी आणि सशक्त असणे गरजेचे असते. मन आणि बुध्दी निरोगी व बलवान होण्यासाठी आपणास एका सशक्त व निरोगी शरीराची आवश्यकता आहे. याचाच अर्थ असा की, आपल्या जीवनाच्या कोणत्याही मार्गावर आपले सर्वात महत्वाचे साधन जर कोणते असेल तर ते आहे आपले शरीर. आपले शरीरच आपल्या सगळ्या सुखाचे व दुखाचे कारण आहे. जर शरीर जर्जर, रोगट असेल तर आपले मन, बुध्दी देखील तसेच होतात. आणि शरीर बलवान, निरोगी, निरामय असेल तर आपले मन व बुध्दी देखील तसेच तेजस्वी आणि समृध्द होतात. रोगट शरीर मनास व बुध्दीस रोगट करते. व रोगट मनबुध्दी दुर्गुणांना आमंत्रण देते. दुर्गुण एकदा का चिकटले की आपण एका ही पुरुषार्थामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. सकंटांना घाबरणे, निर्णय न घेणे, निर्णय लांबणीवर ढकलणे, आत्ताचे काम आत्ता न करणे, सतत चाल ढकल करणे, संकुचित आणि मत्सरी स्वभाव होणे, अशा अनेक नको त्या गोष्टींचा जन्म दुर्बल आणि रोगट शरीराद्वारे होत असतो.

संकटांना घाबरुन नवीन संधी सोडणे
दुर्बल किंवा वजनदार शरीराचा तुमच्या कार्यक्षमतेवर आणि परिणामी यशावर अगदीच विपरीत परीणाम होतो.वर उल्लेख केलेल्या दुर्गुणांसोबतच शारीरीक स्तरावर थकवा, धाप लागणे, रोग प्रतिकार शक्ति कमी होणे, ऋतु बदलले की लगेच सर्दी पडसे, थंडी ताप येणे, सांधे दुखणे, त्वचा काळवंडणे, एकुणच काय तर तारुण्यात, ही वार्धक्याची लक्षणे आपले शरीर आपणास दाखवु लागते.

Fat to Fit with Mahesh & Pallavi Thombare
या सर्वांची कारणे आहेत, आपण आपल्या शरीराची न घेतलेली काळजी. शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि पुष्टीसाठी सकस आहार, तोही प्रोटीन्स, मिनरल्स, विटामिन्स, फायबर योग्य प्रमाणात शरीराला आपण देत नाही. फिट किंवा तंदुरुस्त राहायचे म्हणजे, सिक्स पॅक ॲब्स पाहिजेच असे नाही. डोले शोले दिसले पाहिजे असे ही नाही. फिट किंवा तंदुरुस्त म्हणजे आपले शरीर नेहमी तेजस्वी, तपस्वी आणि तत्पर दिसले आणि असले पाहीजे. व यासाठी पोषक, संतुलित आहार सर्वात महत्वाचा आहे. व्यायाम दुय्यम गोष्ट आहे. सर्वात आधी आहे आहार! यासाठी आमचा एक फॉर्मुला आहे. तो म्हणजे ८० % न्युट्रीशन आणि २० % व्यायाम. आणि हाच एकमेव मार्ग आहे सुदृढ, निरोगी आणि सशक्त होण्याचा.
बुध्दी तुमच्या व्यवसाय, नोकरी, करीयरची दिशा, वाढ, इत्यादी ठरवते. तर मन बुध्दीने घेतलेल्या निर्णयांना खंबीरपणे पाठींबा देते. बुध्दी आणि मन जर एकत्रित, एकमेकांच्या सहकार्याने काम करतील तर, आपले यश पक्के समजावे. पण बुध्दी आणि मन यांनी चांगले काम करण्यासाठी आपण त्यांना एक सशक्त शरीर देतोय का? तर बहुधा याचे उत्तर “नाही” असेच असते. आजकालच्या शर्यतीच्या काळात, आपण स्वःत साठी सेंद्रीय धनधान्य तर पिकवु शकत नाही! आणि बाजारात जे मिळते ते शुध्द आणि सेंद्रीयच आहे याची खात्री तरी कशी देता येईल? मोजुन मापुन कडधान्ये, इतकीच खाल्ली पाहिजे, चिकन, मास मच्छी इतके खाल्ले पाहिजे, मिनरल्स साठी हे खाल्ले पाहिजे , तर विटामिन्स साठी ते खाल्ले पाहिजे, असे सर्व आपण आजच्या काळात करु शकतो? खरे तर असे सर्व केलेच पाहिजे. पण या शर्यतीच्या काळात आपण आपला वेळ या कामासाठी घालवणे पसंत करीत नाही. जे समोर ताटात वाढलेले मिळते, ते आपण खातो आणि कामाला लागतो. त्यामुळे भेसळ, अशुध्द, रसायनाने प्रदुषित झालेले, निकृष्ट दर्जाचे अन्न आपण खातो. तर याला पर्याय काय आहे?
याला पर्याय आहे आमच्या कडे. होय आम्ही देऊ आपणास योग्य असा पर्याय. व आम्ही दिएलेल्या पर्यायामुळे तुम्हाला तुमच्यात होणारे बदल तातडीने जाणवतील.

Meal replacement & Nutrition diet coach – Mahesh Thombare
आयुष्यात जर खुप काही कमवायचे असेल? नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करायची असेल, आपली सर्व स्वप्ने पुर्ण करायची असेल, धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या दिशेन पहिले पाऊल टाकायचे असेल तर, त्या वाटेची सुरुवात आमच्या येथुन होते हे निश्चित.
तुमच्या स्वप्नांना साकार करायचे असेल, तर तुमचे शरीर निरोगी झाले पाहिजे. वजन जास्त असेल तर ते कमी केले पाहिजे. व वजन कमी असेल तर ते वाढवले पाहीजे. शरीरास पोषणमुल्ये असलेले अन्न द्रव्य दिले पाहिजे. व थोडा व्यायाम ही केला पाहीजे.

winners in life
वरील सर्व गोष्टींसाठी मी, महेश ठोंबरे तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करु शकतो.
माझ्याशी संपर्कासाठी इथे क्लिक करा…
धन्यवाद,
महेश ठोंबरे,
तुमचा निरोगी, निरामय जीवनाचा सांगाती
9923062525
Sagar
Pan hey Kay product ahe ani te kontya goshtivar ahe