Stay Fit Pune - The weight loss center

धावण्यासाठीच आपण बनलो आहोत !

आपण डार्विनचा उत्क्रांतीवाद जर सत्य मानला तर खालील वाक्य मनुष्य नावाच्या प्राण्याच्या उत्क्रांतीचे व्यवस्थित वर्णन करेल.

आपला जन्मच झालाय धावण्यासाठी.

आज पाश्चात्य जगात अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की मनुष्याच्या शरीराची रचना ज्या पध्दतीने उत्क्रांत होत गेली आहे, जो काही आकार, कंपोझिशन , लांबी रुंदी आपणास मिळाली आहे त्या सर्वांच्या मागचे एकच कारण आहे की मनुष्याने लांब पल्ल्याचे अंतर धावावे.

आपल्या कंबरेचा आकार, पायाची लांबी, आपली शॉक ॲबसॉर्बिंग मणक्याची रचना, आपली त्वचा की ज्यातुन घाम येतो ; ही सारी लक्षणे आपल्याला एकच गोष्ट सांगतात, ती म्हणजे आपण बनलो आहोत ते धावण्यासाठीच.

आणि आज आपण नेमके तेच करीत नाही. काही लोकांसाठी धावणे न करण्याचे कारण त्यांचे बिघडलेले आरोग्य असु शकेल. तर काही लोकांसाठी हे कारण बदललेली जीवनशैली असु शकेल. सातत्याने बसुन काम करणे किंवा तेच ते काम करणे ही आपली निकड असते. बदलत्या काळात आपण अर्थार्जनाची बदललेली समीकरणे स्वीकारलीच पहिजेत. सोबतच आपण आपले मुळ स्वरुप, जीवशास्त्र विसरता कामा नये. कित्येकदा अनेकांना ‘धावण्यासाठीच आपण बनलो आहोत’ या ऊक्तिचा साक्षात्कार झालेलाच नसतो तर काहींना असा साक्षात्कार होऊन देखील निव्वळ आळस व जडत्वाचे शिकार बनुन ते धावणे करीत नाहीत.  व धावणे किंवा कोणताही व्यायाम न केल्याने पुढे त्यांच्या आयुष्यात अशी स्थिती निर्माण होते की, त्याना धड धावताही येत नाही किंवा चालता देखील येत नाही. आपल्या ढब झालेल्या शरीराची अशी अवस्था कोण करुन घेतो बरे? कोण जबाबदार असतो यासाठी? हा विचार ज्याचा त्याने करावा खरतरं!

असो. तर आपला विषय आहे धावणे! मनुष्याच्या विकासामध्ये त्याच्या शरीराच्या विशिष्ट पध्दतीने झालेल्या रचनेचा हेतुच मुळात असा आहे की आपण धावले पाहिजे. आणि यामुळेच इतर कोणत्याही व्यायामाने जेवढे फायदे होत नाहीत तितके फायदे, लाभ रनिंग केल्याने होतात. हे सर्व फायदे मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करील.

यातील आणखी एक गोष्ट म्हणजे हा व्यायाम प्रकार शिकण्यासाठी कसल्याही साधनाची गरज नसते. कसल्याही खास प्रशिक्षणाची गरज नसते. कुणीही, कुठेही , कधीही हा व्यायाम करु शकते. कार्डीयो व्यायाम प्रकारात सर्वात जास्त लाभदायक व्यायाम कोणता असेल तर तो म्हणजे धावणे.

निसर्गात धावणे हा माझा छंद बनला आहे

श्वसनाद्वारे ह्र्दयाला शुध्द आणि नियमित प्राणवायुचा पुरवठा करण्यासोबतच ह्र्दयाच्या ठोक्यांचे नियमन व रक्त वाहिन्यांचे काम सुरळीत करणे या सारख्या फायद्यांपासुन ते कॅलरीज बर्न करणे, ताकद वाढवणे, दम वाढवणे असे अनेक फायदे या व्यायामामुळे होतात. त्या सोबतच मनोबल वृध्दी होणे, ताण-तणाव कमी होणे, ताजतवाणे वाटणे, संकटांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणे , दररोज स्वतःला जिंकण्याची, स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याची वृत्ती विकसित होणे असे अनेक फायदे धावण्याच्या व्यायामाने होतात.

तुम्हाला अजुनही धावण्याची सवय नसेल आणि तुम्ही लागलीच पाच दहा किमी धावलात तर ते तुमच्या साठी अपायकारक ठरेल. पण एकदा का तुम्हाला याची सवय लागली की मग तुम्ही एका वेगळ्याच स्वातंत्र्यांचा अनुभव कराल. एका वेगळ्याच अनुभवाचे धनी तुम्ही कायमचे व्हाल. आणि हे स्वातंत्र्य, आनंद तुम्हाला कधीही कुठेही कितीही पैसे मोजुन मिळणार नाही. आणि एकदा का तुम्हाला हे जमले तर तुम्हाला दुस-या म्हणजे बाहेरुन कुणाच्याही प्रोत्साहनाची गरजच नाहीये. तुझे आहे तुजपाशी!

धावण्याचे शारीरीक तसेच मानसिक आरोग्यासाठी होणारे लाभ अनेक आहेत.

कमीत कमीत ३० मिनिटं धावण्याने ताण-तणाव कमी होतो व मन हलके होऊन प्रसन्न होते.

तुम्ही किती वेगाने पळता आहात हे दुय्यम आहे. तुम्ही पळता आहात हे महत्वाचे. अगदी चालण्याच्या गतीने जरी तुम्ही धावलात रोज अर्धा तास तरी एखाद्या आठवड्यामध्येच तुम्हाला तुमच्या मनोदशेमध्ये झालेला सकारात्मक बदल अनुभवण्यास मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemant Vavale (@hemant_vavale) on

धावण्याने गुडघ्यांचे आरोग्य कायमचे सुधारते. आपली हाडे मजबुत होण्यासाठी धावण्याने मदत होत असते.

धावण्याने गाढ झोपेचा अनुभव मिळतो. आपल्या शरीराला थकव्याची गरज असते. आपले स्नायु व सारेच अवयव प्रकृतीच्या नियमानुसार काम करीत नाहीत आजकाल. त्यामुळे त्यांचे झीजणे होत नाही. झीज होत नसल्याने, झालेली झीज भरुन देखील निघण्याची, आपोआप रीकव्हरी करण्याची आपली उपजत क्षमता आपण गमावुन बसलो आहोत. आपल्या ज्या क्षमता आपण वापरण्याचे बंद करु त्या क्षमता कालौघात नष्ट होतील असे उत्क्रांतीवाद म्हणतोय तर मग आपण आपली एक खुप मोठी क्षमता गमावण्याच्या मार्गावर आहोत की असे कधीकधी वाटते. त्यामुळे नुसती गाढ झोप मिळावी म्हणुनच नाही तर आपल्या शरीराचे संचालन व्यवस्थित व्हावे, निसर्गाने या कारणासाठी आपल्या शरीराची रचना जशी केली आहे तशी वापरली जावी म्हणुन धावावे.

धावण्याचा एक फायदा म्हणजे लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता वाढते. सकाळी सकाळी अर्धा तास धावण्याच्या व्यायामाचा परीणाम दिवसभराच्या कामामध्ये अचुकता येण्यामध्ये, मन सर्वकाळ प्रसन्न राहण्यामध्ये, ताजेतवाने राहण्यामध्ये, शरीराचे पोस्चर सुधारण्यामध्ये होतो. विशेषतः तरुणांना याचा जास्त लाभ होऊ शकतो असे संशोधनातुन समजते.

धावण्याने हृद्य विकार तुमच्यापासुन चार हात लांबच राहतात. हल्ली आपण पाहतोय की अगदी तरणी-ताठी पोर देखील अचानक ह्र्दय विकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतात. वयस्कर लोकांचे तर विचारुच नका. खरेतर औषधी-विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे प्राण वाचवणे सोपे जरी झाले असले तरी निरामय आरोग्य जगण्यासाठी कसल्याही औषधाची किंवा विज्ञानाची वा तण्त्रज्ञानाची आवश्यकता नसते. यासाठी हवे असते मनाची ताकद. मनाची ताकदच तुमच्या हृदयाला ताकद देईल, जर तुम्ही रोज उठुन धावण्यास आरंभ केला तर.

माझ्या बाबतीत तर सध्या असे झाले आहे की मला कंटाळा आला असेल तर मी धावण्यासाठी मैदान गाठतो. मी जेव्हा धावण्याचा व्यायाम करण्यास सुरुवात केली तेव्हा मैदानावर गेलो की मला कंटाळा यायचा. आता परिस्थीती अगदी उलट झाली आहे. जेव्हा जेव्हा ताण-तणाव असतो, कंटाळवाणे वाटते, आळस वाढतो तेव्हा तेव्हा मी पायात बुट घालुन मैदान गाठतो व धावतो. मी या वर्षी धावण्यास सुरुवात केली. म्हणजे वयाच्या ४०व्या वर्षी. सध्या मी दररोज किमान ४० मिनिटे धावतो. खरतर मी सुरुवात केली ती थोडी उशिराच. पण या धावण्याच्या सवयीमुळे मला एक गोष्ट समजली ती म्हणजे उशिर असे काही नसते. जेवढे कमी वय असताना तुम्ही धावाल तेवढे जास्त लाभ तुम्हाला होतील, व हे लाभ केवळ शरीर प्रकृती सुधारण्याचेच नाहीत. हे लाभ जीवन नितांत सुंदर जगण्याचे, यशस्वी होण्याचे, वैचारीक परिपक्वता येण्याचे, तरल व सरल होण्याचे आहेत.

धावण्याचा आणखी एक जबरदस्त लाभ मला झाला, तो म्हणजे माझे वजन कमालीचे कमी झाले. ९२ किलो वरुन मी आता ७५ किलो वर आहे. अर्थात नुसत्या धावण्याने हे वजन कमी झालेले नाही. त्यासाठी कॅलरी मॅनेजमेंट देखील केले आहे. आणि कॅलरी मॅनेजमेंट मधील सर्वात महत्वाची गोष्ट असते कॅलरीज बर्न करणे. धावण्याने जेवढ्या कॅलरीज बर्न होतात तेवढ्या अन्य कोणत्याही व्यायाम प्रकारात होत नाहीत हा माझा अनुभव आहे.

सर्वात उजवीकडे मी आहे

महेश ठोंबरे माझा अगदी जुना मित्र आहे. मागील वर्षी काहीतरी कामानिमित्त सकाळी सकाळी आमचे फोनवर बोलणे झाले . मला फोनवर बोलता येत नव्हते नीट कारण मला सर्दी झालेली होती. महेशला हे समजल्यावर त्याने मला रनिंग करण्याचा सल्ला दिला. त्या वेळी मी त्याचा सल्ला ऐकला नाही. पण जेव्हा पासुन मी धावणे सुरु केले आहे तेव्हा पासुन मी एकदाही आजारी पडलेलो नाही. सर्दी पडसे, थंडी ताप असले आजारांना आता स्थान नाही आयुष्यात. हा स्वानुभव आहे. धावण्याने रोगप्रतिकारक शक्ति वाढते, हे मी अनुभवले आहे.

या वर्षी माझे १३०० किमी अंतर धावुन झाले आहे आतापर्यंत

मी रोज रनिंग करतो म्हणुन महेशने मला या विषयावर माहिती एखादा लेख लिहायला सांगितला. खरतर हा माझा अतिशय आवडता विषय झालेला असल्याने मी यावर खुप काही लिहु शकतो. त्यामुळे मी एकच लेख लिहुन थांबणार नाही. अजुन एक लेख मी सवड काढुन लिहीन ज्यामध्ये धावावे कसे, सुरुवात कशी करावी, श्वसन कसे करावे, कंटाळ्याला कसे जिंकावे, या विषयी माझ्या अनुभवावरुन लिहिन.

महेश ने मला या व्यासपीठावर लिखाण करण्याची संधी दिल्याबद्द्दल त्याचे मनापासुन आभार.

आपला

हेमंत ववले,

निसर्गशाळा, पुणे

Owner of this enterprise is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfOTU1MTQ1Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzk1NTE0NSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.