
स्वप्नपुर्तीकडे वाटचाल…
माझ्या आणि सोबतीच्या सर्वांच्या स्वप्नपुर्ती कडे वाटचाल
बदलत्या काळाने आपल्या समोर ज्याप्रमाणे नवीन संधी, नवी क्षितिजे , नवी शिखरे जरी दिली असली तरी, त्या सोबतच काही भयावह असे धोके देखील दिले आहेत. मी ज्या वेळी समाजामध्ये बघतो, त्या त्या वेळी मला नेहमी दिसते की या संधीचे सोने करुन घेणारी माणसे असंख्य आहेत. पण या संधी सोबतच फ्री मध्ये येणारे हे धोके जर वेळीच ताडता नाही आले तर आपण जीवन जगण्यातील “राम” घालवुन बसतो. आणि या अनेक लोकांच्या बाबतीत नेमके तेच होत असते. पैसा, प्रतिष्टा, भौतिक सुखाची सर्व साधन असुन देखील हे लोक आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही.
माझ्या करीयरच्या सुरुवातीस, मला माझ्या हाताने पॅम्पलेट्स वाटावे लागायचे. मी मुळात खुप चांगला आर्थिक व सामाजिक वारसा असलेल्या घरातुन असल्याने व त्यातही स्वःत पुर्वी राजकारणात सक्रिय असल्याने, माझ्या मनामध्ये कुठे तरी एक खंत असायची. अशी रस्त्यावर उभे राहुन पत्रके वाटणे, लोकांना माझा आधीचा आणि नंतरचा फोटो दाखवणे, त्यांना कनविंस करण्याचा प्रयत्न करणे हे व्यवसायासाठी गरजेचे असले तरी, अंतर्मनातुन याची लाज वाटायची. माझा व्यवसाय यशस्वी झाला, मी समृध्द झालो. आता मी माझ्या करीयच्या सुरुवातीचे दिवस आठवतो तेव्हा मला पॅम्पलेट वाटण्याचे काम आठवते. व त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट मला आठवते ती विलास भोजणे यांची. मी मागे वळुन जेव्हा विलास भोजणे यांच्या कडे पाहतो तेव्हा मला जाणवते, की माझे रस्त्या रस्त्यावर , शहरा शहरात उभे राहुन पत्रके वाटणे व्यर्थ नाही गेले. उलट माझ्या अशा पत्रके वाटण्यामुळे मी कुणाच्या तरी आयुष्यात आमुलाग्र असा बदल घडवुन आणु शकलो. मला आणखी एक शिकवण मिळाली. ती अशी की, कोणतेही काम हलके नसते. आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल, ते कितीही छोटे असुद्यात, हे प्रत्येक पाऊल खुप महत्वाचे आणि आपल्याला ध्येयाच्या आणखी जास्त जवळ घेऊन जाणारे असते.
विलास भोजणे एक सिव्हिल इंजिनियर. नगर जिल्ह्यात, नगर शहरात राहणारे. शालेय शिक्षण संपल्यावर कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. मित्राम्च्या संगतीने व्यायामाची आवड निर्माण झाली. विशेषतः धावणे, म्हणजे रनिंग हा तर विलास चा छंदच झाला. त्या काळात फक्त पुण्यात “पुणे मॅरेथॉन” व्हायची, पण विलास भोजणे पुणे मॅरेथॉन मध्ये भाग घेण्यासाठी आवर्जुन सहा महिने आधीच सराव करायचे व मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचे
शिक्षण पुर्ण झाल्यावर, साहजिकच नोकरी करणे क्रमप्राप्तच. कंस्ट्रक्शन क्षेत्रात असल्याने असल्याने , वेगवेगळ्या साईटस वर व्हिजिट्स, खाणे पिण्याच्या सवयी बदलणे, रात्रंदिवस काम करणे, अपुरी झोप अशा सर्व गोष्टी त्यांच्या ही बाबतीत घडत गेल्या. साईट सुपरवायजर पासुन प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये मदत करण्यापर्यंत विलास त्यांच्या कामामध्ये निष्णात झाले. नोकरीत स्थिर झाल्यावर, लग्न देखील आपोआप घडणारी घटना, त्यांच्याही आयुष्यात घडली. जबाबदा-या आणखी वाढल्या जेव्हा मुले झाली. वय वर्षे ३९ पर्यंत, विलास जबाबदा-यांच्या ओझ्या मध्ये इतके वाहुन गेले की, त्यांना त्यांच्या भुतकाळातील धावणे, व्यायाम करणे इत्यादींचा विसरच पडला. तो विसर मनाला पडला आणि त्याचे प्रतिसाद त्याच्या शरीरावर दिसु लागले. प्रमानापेक्षा जास्त वजन वाढले. पित्त, डोकेदुखी, पोट साफ न होणे,जड वाटणे,कंटाळा येणे, दुपारी जेवणानंतर सुस्ती येणे अशा सगळ्या गोष्टींनी त्यांच्या शरीरामध्ये घर केले.

विलास भोजणे वजन कमी करण्यापुर्वी, वय ३९ वर्षे
वजन जरी वाढले तरी, विलास भोजणेंची धावण्याची आवड काही कमी झाली नव्हती. पण न थकता पळणे खुप अवघड व्हायचे तरी देखील, त्यांनी पळणे थांबवले नव्हते. त्यांच्या धावण्यामुळे, विलास भोजणेंना नगरचा मिल्खा सिंग असे नाव ही पडले. असे जरी असले तरी, विलास भोजणे, समाधानी नव्हते. त्यांना फुल मॅरेथॉन पळायची होती. पण वाढलेल्या वजनामुळे ते शक्य नव्हते.
मी नगर मध्ये माझ्या व्यवसायाची पत्रके वाटण्यासाठी गेलो असता, विलास भोजणेंची आणि माझी ओळख झाली. सुरुवातीला विलास चा माझ्यावर विश्वास बसला नाही. माझे फोटो (आधीचा आणि नंतरचा) पाहिल्यावर मात्र त्यांचा विश्वास बसला.
माझ्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे, मी त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा वजन कमी करण्याचा प्रोग्राम सुरु केला. तीन महिन्यांमध्ये परिणाम स्पष्ट झाले. एकुण १३ वजन कमी केले. नवरा बायको दोघे ही सडसडीत, फिट व स्लिम दिसायला लागले.
त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट त्यांनी मिळवली ती म्हणजे मॅरेथॉन मध्ये भाग घेणे व पुर्ण करणे. होय, वयाच्या ३९ वर्षी त्यांना ५ किमी देखील पळता येत नव्हते. पण आता वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी १० मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. त्यातही २१ किमी एकुण पाच मॅरेथॉन आणि ४२ किमी च्या २ मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन त्या पुर्ण ही केल्या. ही विलास भोजणे साठी खुप मोठी गोष्ट आहे. नुकतेच त्यांनी काही मित्रांच्या सोबतीने, नगर मध्ये मॅरेथॉन संस्कृती सुरु केली. नगर मध्ये १० किमी मॅरेथॉन भरवण्यात यांचा ही वाटा आहे.

टाटा फुल मॅरेथॉन पुर्ण केल्यानंतर विलास भोजणे
कोणते ही काम हलके नसते. तुम्ही केलेल्या कामाचे फळ तुम्हाला मिळतेच. तुम्ही फक्त काम करीत राहावे लागते. सतत काम करणे, व ध्येयाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे जाणे. माझ्या आयुष्यात मी राजकारणात असताना जेवढ्या लोकांचे जीवन मी बदलवु शकलो नाही त्याच्याअ पेक्षा शंभर पटींनी जास्त लोकांच्या आयुष्यात चांगले काहीतरी घडण्यात, माझ्या या (फिटनेस कोचिंग) व्यवसायामुळे मला शक्य झाले.
दिवसेंदिवस माझी माझ्या कामावरील निष्टा अजुन दृढ होत आहे. व आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न जसे मी पाहिले, तसे इतरांना दाखवणे व त्या स्वप्नपुर्ती साठी कल्पकतेने प्रयत्न करणे व इतरांना करायला लावणे, हेच सध्या माझे रुटीन आहे.

मी आणि विलास भोजणे, सहकुटुब अबुदाबी सहली दरम्यान. नंतरच्या काळात भोजणे आणि आमचा घरोबा चांगला झाला.
विलास भोजणेंनी नवीन संधी सोबत फ्री मध्ये मिळालेली चुकीची जीवनशैली झटकुन, निरोगी, निरामय आणि चपळ जीवन जगण्याचा निश्चय केला, व त्यांच्या स्वप्नाची पुर्ती झाली देखील. पण मी विलास भोजणे आणि माझ्या सर्व मित्र, टीम मेंम्बर्स ला सांगत असतो, आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघा..व एकेक पाऊल ध्येयाच्या दिशेने कल्पकतेने टाकीत रहा. यश आपलेच आहे.
कळावे
महेश ठोंबरे,
तुमचा निरामय आयुष्याचा सांगाती…
Bharat
Nice!!