
स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचे व कमी न होण्याचे एक कारण – थायरॉईड
मागील आठवड्यात एका मैत्रिणीचा फोन आला. गप्पा मारता मारता तिला विचारले की अग तु फेसबुक वर आहेस की नाही. बाकी सगळ्या वर्गमैत्रिणींचे काय कसे सुरु आहे हे सगळे समजते फेसबुक मुळे, तु दिसत नाहीस अजिबात! हा प्रश्न विचारताना थोडे दचकलेच होते आधी मी. कारण अनेकांना सोशल मीडीया अनेक कारणांमुळे आवडत नाही जसे सुरक्षा, सतर्कता आणि उगाच वेळ वाया जातो त्यामुळे होतो असे वाटणारे आणि यामुळे सोशल मीडीयापासुन दुर असणारे अनेक जण आहेत. प्रश्न विचारला होता खरा पण उत्तर काय येईल हे माहित नव्हते. पण आलेले उत्तर ऐकुण आश्चर्यच झाले.
मनुष्य प्राणी हा सामाजिक प्राणी आहे. त्याला दुस-यांशी गप्पा आवडतात, आपल्या आयुष्यात काय काय सुरु आहे हे सांगायला आवडते आणि विशेष म्हणजे स्वतःचे कौतुक व्हावे असे ही नेहमी वाटते. ही मानवी स्वभावातील अगदी सामान्य व नैसर्गिक बाब आहे. सोशल मीडीया म्हणजे हेच आहे. पण जेव्हा ती म्हणाली की अग स्वतःचे फोटो पोस्ट करण्यासाठी फोटोमध्ये चांगले दिसले तर पाहिजे ना!
“म्ह्णजे?”, मी म्हणाले.”अग तु तर छानच आहेस ग! सुंदर आहेस. मग फोटोत छान नाही कशी दिसणार बरे तु?”
ती बोलती झाली,“पल्लवी, छान होते, सुंदर होते मी! आता नाही हं! माझे वजन इतके वाढले आहे की मला स्वतःचे फोटो सोशल मीडीयाच काय पण व्हॉट्सॲप देखील मी माझे फोटो कुणाला पाठवत नाही”, ती उत्तरली.
मला आठवतय , माझी ही मैत्रिण खुप हुशार होती, अजुनही आहे. शिक्षण पुर्ण केल्यावर एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरी मिळाली. यथावकाश लग्न झाले. नवरा देखील व्यावसायिक असल्याने. एकंदरीत सगळे मजेत सुरु होते तिचे. पुढे दोन मुले झाली. नोकरी अजुनही सुरु आहेच.
मी तिच्याशी आणखी जास्त गप्पा मारुन तिची लाईफस्टाईल समजुन घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या नोकरी मध्ये व घरात देखील तिला प्रचंड ताण-तणावाला सामोरे जावे लागते. बहुधा सगळ्या स्त्रियांना मग त्या नोकरी व्यवसाय करणा-या असोत वा नसोत. पुरुषांच्या तुलनेमध्ये ताण-तणाव स्त्रियांना जास्तच असतो. आणि याचाच परिणाम होतो स्त्रियांना थायरॉईड सारख्या समस्येला तोंड द्यावे लागते. थायरॉईड हा वरकरणी एखादा आजार असवा असा नाही. पण यामुळे रुग्णास अनेक शारीरीक व्याधीं जडतात. स्त्रीच्या शरीरार हार्मोनल चे बदल पुरुषांच्या तुलनेत जास्त होत असतात, त्यात ही आयोडीन च्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षा जास्त आढळतो.
या आजाराचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला हायपोथायरॉईड व दुसरा हायपर थायरॉईड. या दोन्हींची लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
हायपोथायरॉईड ची लक्षणे
अशक्त पणा व थकवा, वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढणे, थंडी अजिबात सहन न होणे, केस शुष्क किंवा अगदी तमल मऊ नाजुक होणे, विस्मरण, चीडचीड वाढणे , टेंशन असणे, हृद्याचे ठोके, कोलेस्टेरॉल वाढणे, बध्दकोष्टता, इत्यादी
हायपर थायरॉईडची लक्षणे
वजन कमी होणे, उकाडा सहन न होणे, सतत पोट बिघडणे, हातापायांना कंप सुटणे, घाबरणे, चीडचीड वाढणे, झोप न येणे, थकवा, इत्यादी.
रक्ताची चाचणी झाल्यानंतरच या प्रकारच्या थायरॉईडच्या लक्षणांचे संकेत मिळतात. पण वरील लक्षणांवरुन देखील प्रत्यक्ष रुग्ण किंवा जवळचे कुणी प्राथमिक अंदाज घेऊन लागलीच योग्य त्या तपासण्या करुन घेऊ शकतात.
आपल्या गळ्याच्या समोरच्या भागात ज्या ग्रंथी असतात त्यांना थायरॉईड म्हटलं जातं. यातून एक प्रकारचे हार्मोन्स निघतात ज्यांना थायरॉईड हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनमुळे आपल्या शरीराच्या अवयवांच्या क्रिया नियंत्रित होतात.
यावर उपाय म्हणजे, कॅफीन आणि शर्करेचं (साखरेच) प्रमाण एकदम कमी करा. याशिवाय, शरीरात शर्करेचं प्रमाण वाढवणार्या इतर पदार्थांचं प्रमाणही कमी करा. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवा. शरीरात प्रोटिनच थायरॉईड हार्मोन्सला ढकलून टिश्यूजपर्यंत पोहचवतात. खाण्यात प्रोटिनचं प्रमाण वाढवल्यानं थायरॉईडची कार्यप्रणाली सामान्य केली जाऊ शकते.
वजन कमी करण्याच्या नादात अनेकदा रुग्ण फॅट सोडून देतात यामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडलं जातं. अशा वेळी शरीराची गरज पूर्ण करणारे फॅट घेणे गरजेचे असते. हे फॅट हेल्दी असतील याची जरुर काळजी घ्या.
थायरॉइडची अनेक लक्षणं पोषक पदार्थांच्या सेवनानं दूर होऊ शकतात. या आजारात महिलांमध्ये विशेषतः आयर्नची कमतरता भासते. अशा वेळी त्यांना आयर्नसोबतच इतर पोषक पदार्थही मोठ्या प्रमाणात घ्यायला हवेत. स्वस्थ राहण्यासाठी संतुलित भोजन जरूर करा.
आमच्या कडे, माझ्या मैत्रिणी प्रमाणेच अनेल स्त्रिया, या आजाराने त्रस्त असलेल्या मला भेटल्या. अनेकांना आमच्या विशिष्ट आहार व विहारच्या मार्गदर्शनामुळे खुपच जास्त चांगले परिणाम मिळाले आहेत. अर्थातच माझ्या मैत्रिणीला देखील मी हाच सल्ला दिला. आहारामध्ये प्रोटीन्स चे प्रमाण वाढवणे खुप महत्वाचे आहे. तुम्हाला जर हा आजार असेल तर तुम्हीही आहाराच्या सल्ल्यानुसार जीवनशैली मध्ये बदल केले तर नक्कीच फायदा होईल.
माझ्या मैत्रिणीच्या निमित्ताने स्त्रियांच्या बाबतीतील हा विषय पुन्हा एकदा समोर आला. या विषयी सविस्तर तरीही मुद्देसुद लिखाण, समजण्यास सोपे असलेले केले पाहिजे असे मला वाटले म्हणुन मी हा लेख लिहिला.
आशा आहे तुम्हाला माझा हा लेख नक्कीच आवडला असेल. अवश्य शेयर करा तुमच्या जवळच्या स्त्रियांशी जेणेकरुन त्यांना देखील मदत होईल.
तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
पल्लवी ठोंबरे
Fitness coaches from Pune.
Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.