Stay Fit Pune - The weight loss center

महाकाल ची महारात्री म्हणजे महाशिवरात्री – कसा करावा उपवास

आपला देश व आपली संस्कृती इतकी प्रगल्भ व मानवी जीवनाचा अत्यंत खोलवर अभ्यास आपल्या संस्कृतीने केला आहे की भारतात कदाचित एकही दिवस असा नसेल ज्याचे काहीतरी औचित्य नसेल. प्रत्येक दिवस काहीतरी सण उत्सव , आनंद, स्नेह, जिव्हाळा, उच्च, उन्नत जीवनाची दिशा देणे, प्रेरणा देणे अशा गोष्टी आपल्या नित्य घडत कधी काळी. मी नेहमी म्हणतो सध्याचे उत्सव, सण हे आत्म्यावाचुन शिल्लक राहिलेले निव्वळ सांगाडे आहेत. असो!
महाशिवरात्र हा देखील असाच एक नव्हे नव्हे विशेष उत्सव आहे की जो संपुर्ण देशात आणि परदेशात देखील जिथे जिथे म्हणुन आपल्या संसकृतीच्या पाऊलखुणा आहेत तिथे तिथे उत्साहात साजरा केला जातो. इतर सण दिवस केंद्रस्थानी मानुन साजरे केले जातात. केवळ हाच उत्सव आहे की जो रात्र केंद्रस्थानी मानुन साजरा केला जातो. याच्या मागे आपल्या पुर्वजांनी खुप अभ्यास करुन निश्चित केलेली कारणे आहेत.
महाशिवरात्रीच्या उत्सवाविषयी खुप जास्त विस्ताराने मी आज लिहिणार नाही. पण या उत्सवातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या एका गोष्टीविषयी मी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणी ती गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीचा उपवास.

उपवास म्हणजे नेमके काय आधी हे आपण समजुन घेतले पाहिजे. मी यापुर्वी उपवास या विषयावर लिहिलेले आहे. तुम्ही इथे क्लिक करुन ते वाचु शकता. व अवश्य वाचा असा माझा आग्रह आहे.
निरंकार (काहीही न खाता पिता देवासमीप बसणे) अथवा निर्जल (जल म्हणजे पाणी न घेता साधना करणे) उपवास योगसाधना करणा-या, हठयोग्यांसाठी ठिक आहे. गृहस्थांसाठी मात्र उपवास हा आरोग्यदायी झाला तरच तो फलदायी होतो.

चुकीच्या (रुढ) पध्दतीने केलेला उपवास आपणास अपाय करु शकतो. तरी देखील थोडक्यात व मोजक्या शब्दात चुकीच्या उपवासाचे दुष्परीणाम काय असतात ते खाली पाहु

अशक्तपणा किंवा थकवा
रक्तातील साखर कमी होऊन चक्कर येणे
झोप कमी होणे
कंटाळवाणे दिसणे व होणे
स्टॅमिना कमी होणे
व अशा प्रकारे आपण आपल्याच शरीरास अपाय करुन घेत असु तर आपले लक्ष परमेश्वराच्या चरणांत कसे राहील बरे? सक्षम, सुदृध शरीर परमेश्वराचे खरे मंदीर आहे हे लक्षात असु द्या!

महाशिवरात्रीचा उपवास करताना खालील काही गोष्टींची नीट काळजी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल.

उपवासाने आपण आपल्या शरीराचे डीटॉक्सिफिकेशन देखील करु शकतो. डीटॉक्सिफिकेशन ला आपण शुचिता असे ही म्ह्णु शकतो.

  • किमान दोन अडीच तासांच्या अंतराने पोटात काही ना काही गेले पाहीजे
  • आपण जे उपवासाचे असलेले पदार्थ खातो ते असे असावेत की ज्यामध्ये आपल्याला आवश्यक प्रोटीन्स , कार्बोहायड्रेट्स, इतर पोषक द्रव्ये मिळतील.
  • पाणी नेहमीपेक्षा खुप जास्त प्यावे
  • सकाळी नाश्ता ते रात्री जेवण यामध्ये किमान तीन वेळा तरी आपण काहीतरी खाल्ले पाहिजे
  • उपवास असो वा नसो, लक्षात ठेवा, पोट भर कधीही खाऊ नये. आणि उपवासामध्ये देखील तोच नियम आहे.
    खिचडी आवडते म्हणुन खायला काहीच हरकत नाही. पण खिचडी खाऊन जर पोट सुटणार असेल तुम्ही खिचडी खाल्ली पाहिजे की नाही हे तुम्हीच ठरवा. खिचडी का खाऊ नये हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  • खिचडी खायची नसेल तर काय खावे? तर राजगिरा, राजगि-याचे थालीपीठ , राजगि-याचे लाडु, गुळ शेंगदाण्याचे लाडु, ताक , फळे, फळांचा ज्युस, नारळाचे पाणी, दुध व यापैकी सगळेच पर्याय संपले असतील तर थोड्या प्रमाणात रताळी किंवा बटाटे व त्यांचे पदार्थ यांचा उपयोग आहारामध्ये आपण आणु शकतो.
    वरील सर्व उपवासांच्या पदार्थांचा तुमच्या वय, उंची व वजनानुसार वापर तुमच्या उपवासाच्या दिवशीच्या आहारामध्ये आला तरच तुमचा शरीराचा उपवास तुम्हाला शुचिर्भुत करेल.

भगवान शिव म्हणजे संहाराचा देव, शिव जितके संहारक आहेत तितकेच ते भोळे देखील आहेत असे आपण सारेच मानतो. सोबत शिव शब्दाचा अर्थ आहे सर्वव्यापी. शिव एका अर्थाने अफाट अशा अंतरिक्षाला संबोधुन वापरलेला शब्द आहे. अवकाश म्हणजेच अंतरिक्ष की जे सर्वव्यापी आहे, पिंडात ही आहे व ब्रह्मांडत देखील आहे, त्या अवकाशाचा, अंतरिक्षाचा म्हणजेच शिवाचा अनुभव घेण्याची आजची रात्र आहे. दिवसभर कमी शारीरीक श्रमाची कामे करुन, आपण रात्रभर जागे राहुन शिवतत्वाशी एकरुप होण्यासाठी तयार होऊयात. ही तयारी करताना आहाराच्या बाबतीत वर ज्या सुचना केल्या आहेत त्या पाळल्या तर आपला महाशिवरात्रीचा उपवास अधिक फलदायी होईल.

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

कळावे

Mahesh and Pallavi Thombare
Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyMzk5NSIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE1NDI4IiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3Vwc3lzdGljLTQyZDcua3hjZG4uY29tXC9fYXNzZXRzXC9mb3Jtc1wvaW1nXC9wcmV2aWV3XC9iYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld19pZCI6IjExXzQ3NjQ5NSIsInZpZXdfaHRtbF9pZCI6ImNzcEZvcm1TaGVsbF8xMV80NzY0OTUiLCJjb25uZWN0X2hhc2giOiJkZDliZTFkZWNmMWY0NTE3OGU2N2UzOTI3YzZmMTgxMSJ9

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.