Stay Fit Pune - The weight loss center

या सोप्या गोष्टी करतील तुमचे वजन कमी !

आपल्या पैकी अनेकांना, आपले वाढलेले वजन कमी करावयाचे आहे. काहींना आरोग्यासाठी करायचे असते तर काहींना चांगले दिसण्यासाठी करायचे आहे. हल्ली डॉक्टरांकडे गेले व मधुमेह किंवा लाईफस्टाईल डीसीज सारखे काही आजार निदर्शनास आले की डॉक्टर पहिला सल्ला देतात तो म्हणजे वजन कमी करा. आणि मग वजन कमी करण्यासाठी अनेकविध पध्दती, उपाय वापरले जातात. डायट, व्यायाम हे दोन सर्वात महत्वाचे घटक आहेत वजन आटोक्यात आणण्यासाठी. तुम्ही कोणतीही डायट पध्दत जरी वापरली, कोणताही व्यायाम करीत असला तरी, आज या लेखामध्ये मी ज्या युक्त्या तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही जर आत्मसात केल्या तर तुमच्या वजन कमी करण्याच्या एकुण प्रक्रियेला खुप चांगली गती मिळेल. मी या ज्या गोष्टी सांगणार आहे त्या काही फार अवघड आहेत असे नाही. अगदी सोप्या सोप्या या युक्त्या तुम्ही जर अमलात आणल्या तर तुमच्या जीवनशैली मध्ये आमुलाग्र बदल होऊन, आयुष्य भरासाठी तुम्हाला याचा फायदा होईल.

आपले वजन वाढण्यामागे सर्वात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आपण खातो ते अन्न! काय खातो, किती खातो यावर अवलंबुन असते आपणास जड वाटते की हलके वाटते. आपण जे काही करीत असतो किंवा करीत नसतो त्यामुळे आपल्या वजनात कमी जास्त पणा येतो. आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी जर अधिक काळ तशाच राहिल्या तर मग आपल्या त्वचेच्या आतील बाजुने चरबीचे थर जमायला सुरुवात होते. आधीही मी एका लेखामध्ये सांगितले आहे, ते पुन्हा सांगतो. साधारणपणॅ आपण आपली आपल्या शरीराची भुक भागवण्यासाठी खायला पाहिजे पण असे न होता, आपण आपल्य मनाची भुक भागवण्यासाठी खात असतो. तृप्त होणे ही मनाची अवस्था आहे. शरीराची नाही. त्यामुळे डायट म्हणजे संतुलित आहार व नियमित विहार हे तुम्ही करीत असाल तर खालील जे काही सल्ले मी देत आहे ते तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये खुपच जास्त मदत करतील.

फोनवर बोलताना चालणे

इथे हालचाल शब्दाचा अर्थ शब्दशः हालचाल असाच घ्यायचा आहे. व्यायाम व डायट तुम्ही करीत आहात असे गृहीत धरुनच मी हे सल्ले तुम्हाला देत आहे. इथे हालचाल याचा अर्थ व्यायाम असा घ्यायचा नाही. व्यायामाचा तुमचा जो अर्धा एक तास आहे त्याव्यतिरिक्त तुन्म्ही दिवसभरात जे काही करीत असता ते करत असताना शकतो हालचाल करा. याचे एक उदाहरण असे आहे की, फोनवर बोलताना शक्यतो चालत चालत बोलणे. यामुळे तुमचे बोलणे देखील होईल व चालणे देखील होईल. हे चालणे जे करायचे आहे ते तुम्ही ऑफीसमध्येच करु शकता. व्हरांड्यात करु शकता, जवळच्या मैदानात करु शकता. पण रस्त्याने करु नका. आणि जरुरी नाही की हे चालणे खुप जास्त असावे. जेवढा वेळ फोन वर बोलत आहत तेवढाच वेळ तुम्ही चालत राहुन बोलत रहा.

चालत चालत मिटींग करणे

गम्मतशीर असते अशी मिटींग मित्रांनो. यामध्ये तुमच्या एकट्याचेच चालणे होत नाही तर तुम्ही ज्या ऑफीस मध्ये काम करता त्या ऑफीस मध्ये असेच योग्य विहाराचे वातावरण तयार होऊन तुम्हाला व सर्वांनाच याचा लाभ होईल.

उभे रहा

तुमचे जास्तीत जास्त काम जर बसुन करावयाचे असेल तर किमान प्रत्येक २५ मिनिटांनी एकदा तरी आहे त्याच जागेवर उठुन उभे रहा. मान मोकळी करा, हात-पाय मोकळे करा. थोडे इकडे तिकडे पहा.

भुक लागल्यावर अवश्य खा, पण सांभाळुन

वजन कमी करायचे म्हणजे कमी खायचे किंवा उपाशी राहायचे असे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पक्के लक्षात ठेवा की, भुक लागली असेल तर लागलीच काहीतरी खाल्ले पाहिजे. हे खाताना जास्तीत फायबर, योग्य प्रमाणात प्रोटीन्स जर शरीराल देता आले तर बरे होईल. उपाशी राहिल्याने भुक वाढत जाऊन, जेवतेवेळी आपण नेहमीपेक्षा जास्त आणि प्रमाणापेक्षा जास्त खातो व त्याचा परिणाम वजन वाढण्यातच होतो.

झोप गरजेची आहे – गाढ झोप

चांगली झोप याचा अर्थ, खुप जास्त वेळाची झोप असा नाही. तर आवश्यक तेवढी पण गाढ झोप असा त्याचा अर्थ आहे. आपल्या शरीराला नेमके माहित असते की आपल्या झोपेची किती गरज आहे. झोप येण्याची व जाग येण्याचे लक्षणे वेळीच ओळखुन आपण योग्य ते, लागलीच केले पाहिजे. यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, रात्रीची झोप वजन कमी करण्यासाठी गरजेची असते. यामागे शास्त्रीय कारणे आहेत. आपल्या शरीराचे चक्र देखील निसर्गचक्राशी मिळते जुळते असते. आपण जर त्यामध्ये बदल केला म्हणजे रात्री उशिरा पर्यंत जागे राहिलो तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. नुसते वजनच वाढते असे नाही, तर अनेक व्याधी देखील यामुळे जडु शकतात. त्यामुळे गाढ झोप मिळेल अशा पध्दतीने दिनचर्या बनवा, निसर्गचक्रला अनुसरुन.

weight loss in pune

तुमच्या साठी योग्य तोच व्यायाम करा

तुम्हाला जर मॅरेथॉन किंवा धावण्याच्या, वजन उलचण्याच्या किंवा बॉडी बिल्डींगच्या स्पर्धांमध्ये पदक मिळवायचे नसेल तर तुम्ही कोणता व्यायाम करताय हे काळजीपुर्वक पहा. असा व्यायाम निवडा की जो तुमच्या प्रकृतीला, वयाला, मनाला साजेसा असेल. खुप जास्त व्यायाम देखील वजन कमी करण्यासाठी अपायकारक असतो.

विषापासुन दुर रहा

विष आपल्या शरीरामध्ये मुख्यत्वे करुन आपण खात असलेल्या अन्नामधुनच प्रवेश करते. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या मागे असाल तर मग तुम्ही विष शरीरात घेणे कमी केले पाहिजे किंवा अजिबात बंद केले पाहिजे. ज्या ज्या पदर्थांमधुन रसायने शरीरात जाणार असतील ते ते पदार्थ वर्ज्य समजावे.

फक्त व्यायामावर भरोसा ठेवु नका

फक्त व्ययाम करुन वजन कमी होत नाही. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. आणि तुम्ही ही अनुभव घेऊ शकता. कित्येकदा असे होते की जास्त व्यायाम करणा-याला वाटते की मी खुप व्यायाम करतो त्यामुळे मी काहीही , कितीही खाल्ले तरीही चालेल. पण असे नसते मित्रांनो. व्यायामामुळे त्वचेच्या आतील चरबी व टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते पण वजन कमी होत नाही. त्यामुळे फक्त व्यायामावर भिस्त ठेवु नका.

हसत-खेळत जगा मित्रानो

याबाबत जास्त काही लिहावे असे नाही. हसत खेळत का जगावे या साठी कसलेही दाखले किंवा शास्त्रीय आधार देण्याची गरज नाही. पण हसत खेळत जगाल तर तुमच्या वजन करण्याच्या प्रोजेक्ट मध्ये हे हसणे-खिदळणे खुप मोलाची मदत करील यात शंका नाही.

When they meet after 5 loooong days…..💁#brothersisterlove👫👫#cutenessloaded#maheartbeats😘😘

Posted by Pallavi Thombare on Monday, November 19, 2018

हसण्याला कारण असलेच पाहिजे असे नाही. आणि विनाकारण हसलेच पाहिजे असेही नाही. गमतीशीर आहेत ना दोन्ही वाक्ये आधीची? हसा, खळखळुन हसा.

मग काय मित्रांनो, फार अवघड गोष्टी नाही ना सांगितल्या मी तुम्हाला? नाही या अजिबात अवघड गोष्टी नाहीयेत. अगदी साध्या सोप्या आहेत. तुम्ही हे सर्व करण्यास सुरुवात करा आणि गम्मत पहा कसे पटापट तुमचे वजन कमी होते ते.

तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

Mahesh & Pallavi

Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyMzk5NyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE1NDMwIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3Vwc3lzdGljLTQyZDcua3hjZG4uY29tXC9fYXNzZXRzXC9mb3Jtc1wvaW1nXC9wcmV2aWV3XC9iYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld19pZCI6IjExXzIyNzY1MSIsInZpZXdfaHRtbF9pZCI6ImNzcEZvcm1TaGVsbF8xMV8yMjc2NTEiLCJjb25uZWN0X2hhc2giOiJkZDliZTFkZWNmMWY0NTE3OGU2N2UzOTI3YzZmMTgxMSJ9

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.