
एका उपसंपादकाची एक यशोगाथा…
वजन वाढण्याची प्रक्रिया इतकी संथ आणि छुपी असते की आपण कधी धोक्याची पातळी ओलांडतो हे आपणास कळत देखील नाही. आज मी तुम्हाला अशीच एक स्टोरी सांगणार आहे.
ज्या व्यक्तिच्या बाबतीत हे घडले ते, एका नामांकीत, अग्रणी मराठी वर्तमानपत्राच्या कार्यालायात उपसंपादक म्हणुन काम करीत आहेत. अर्थात उपसंपादक म्हणजे कामाचा ताण जास्त असणारच. तो ही रात्र पाळीमध्ये. म्हणजे नेमका ज्या वेळी शरीराला आरामाची गरज असते त्याच वेळी यांचे चरम मानसिक तणावाचे काम सुरु असते. गेले १३ वर्षे हे गृहस्थ अशाच पध्दतीने काम करीत आहेत. करीयरच्या सुरुवातीच्या दिवसात अशा अवेळी कामाचा आणि अवेळी खाण्यापिण्याचे आव्हान त्यांनी सहजगत्या पेलले. लग्न होऊन जबाबदा-या वाढल्या. त्यामुळे कामाचा सपाटा देखील वाढला. कामामध्ये आणखी अचुकता आणि वैविध्य आणणे, वाचकांच्या तसेच वरीष्ट सहका-यांच्या पसंतीस उतरेल अशा पध्दतीने निष्पक्षपाती वार्तांकन, तेही वर्तमानपत्राच्या पहिल्या पानासाठी करण्यासाठी त्यांना आणखीनच जास्त मानसिक तणावास सामोरे जावे लागत होते. यात, रात्रीच्या वेळी कटींग कटींग चहा विसरुन कसे चालेल. कितीही झाले तरी आपल्या देशात चहा जागरणाचा एक सच्चा सोबती आजही मानला जातो. आधीच जेवणाच्या वेळांमध्ये झालेला बदल, वाढत्या जबाबदा-या, अनेक कटींग चहा आणि प्रचंड मानसिक तणाव ह्या सा-याला सामोरे जात, आपली स्वतची ओळख निर्माण करण्याचे देखील विसरुन चालणार नव्हते. पुढे अपत्य झाले. संसाराच्या जबाबदा-या आणखी जास्त वाढल्या.
चांगले आणि परिणामकारक काम करीत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी बढत्या मिळत गेल्या. एक क्षेत्रीय पत्रकार ते उपसंपादक असा टप्पा करुन सर्वोच्च यशाचे शिखर गाठण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहेच. या सगळ्या प्रवासात १३ वर्षे गेली.
एके दिवशी नव्हे एके रात्री, कारण त्यांचे काम रात्रपाळीचे आहे. तर एके रात्री, असाच एक कटींग चहा मारुन ते ऑफीस मध्ये त्यांच्या दुस-या मजल्यावरच्या केबिन मध्ये गेले. खुर्चीमध्ये बसल्या बसल्या त्यांना अचानक घाम फुटला. डोळ्यासमोर अंधारी आली. आजुबाजुला कुणीही नव्हते. व कुणाला हाक मारण्याइतकी उर्जादेखील शरीरात नसल्याचे त्यांना जाणवत होते. काय होत आहे हे कळत नव्हते. आजुबाजुचे आवाज येणे बंद झाले. अशा अवस्थेत ते अंदाजे २-३ मिनिटे असतील. पुन्हा जागे होत असल्यासारखे जाणवले. शरीरात ऊर्जा येत आहे आणि घाम येणे देखील थांबले होते. अर्धी बाटली पाणी घटाघटा पिऊन, ते आठवु लागले काय झाले ते. पण काहीच कळायला मार्ग नव्हता. घरी निघताना एका सहका-याला काय झाले ते सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्याने हसण्यावारी नेत एक वाक्य बोलले. ते वाक्य होते किती फुगलायेस बघ जरा. “किती फुगलायेस बघ” हेच वाक्य आणि ते दोन तीन मिनिटे आठवत पार्कींगकडे निघाले.
दुस-या दिवशी नेहमीप्रमाणेच उठायला उशिर झाला. बायकोला रात्री घडलेले सर्व सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेच त्यांच्या गावाकडील भावाशी फोनवरुन संपर्क साधला. भावाशी सविस्तर चर्चा केली. दर दोन तीन महिन्यांनी ऑफीस मार्फत आरोग्य तपासण्या होत असतात. आणि शेवटची तपासणी मागच्याच आठवड्यात झालेली होती. व त्या तपासणीमध्ये सर्वकाही नार्मल होते. तरीही भावाने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगितले तसेच भावाने हेल्थ चेकअप करण्यासाठी माझ्या (महेश ठोंबरे) कडे जाण्याचा सल्ला देखील दिला. लागलीच उपसंपादक साहेब, कसाबसा नाश्ता करुन. डॉक्टर व त्यानंतर माझ्याकडे आले. डॉक्टरांनी वेगवेगळ्या टेस्ट करायला सांगितल्या. त्या टेस्ट चे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे पुढे दोन दिवसांनी आम्हाला समजले.
माझ्याकडे आल्यावर त्वरीत मी माझ्या नेहमीच्या पध्दती प्रमाणे, सर्वात आधी जीवनशैली विषयी माहिती घेतली. नंतर आहार काय व कसा घेतात याविषयी सर्व माहिती घेतली. व नंतर कंल्पीट बॉडी अनॅलिसिस केल.
पहिली गोष्ट माझ्या निदर्शनास आली ती ही की त्यांचे वजन त्यांच्या वय आणि उंचीच्या प्रमाणात जे असायला हवे त्यापेक्षा तब्बल १६ किलोग्रॅम जास्त होते. पोट आणि मानेवरील चरबी हे देखील काळजीचे कारण होतेच. वयाच्या ४३व्या वर्षी, त्यांचे शरीर ५६ वर्षे वयाच्या माणसासारखे काम करीत होते. म्हणजे ५६ वर्षाच्या माणसाची जशी चयापचय क्रिया असते, थकवा, किंवा एनर्जी लेव्हल असते अगदी तसा अनुभव हे उपसंपादक , त्यांच्या वयाच्या फक्त ४३ व्या वर्षीच घेत होते. लगेचच त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली वजन कमी करण्याची तयारी दाखवली. पहिल्या १९ दिवसातच जवळ जवळ ४ किलो वजन कमी करण्यात त्यांना यश आले. आजपर्यंत (मागचा अंदाजे दिड महिना) त्यांनी ७ किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आहे. जीवनशैली मध्ये कामाच्या वेळा बदलणे तर शक्य नाहीये, तरीही मी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांचा निरामय आयुष्याच्या दिशेने प्रवास सुरु झालेला असुन लवकरच ते त्यांच्या वय आणि आणि उंचीला साजेसे वजन मिळवतील.
पुढे जाऊन आमच्या फिटनेस प्रोग्राममध्ये देखील समाविष्ट होणार असुन पुणे मॅरेथॉन माझ्या सोबतच पळण्याचे ध्येय त्यांनी ठेवले आहे.
टिप – त्यांना आलेला अनुभव व त्याच्यात झालेले स्थित्यंतर त्यांच्याच शब्दात खाली वाचा.
उदय पराडकर
लयचभारी दादा