Stay Fit Pune - The weight loss center

तणावामुळे वाढणारे वजन

ताण-तणाव आणि लठ्ठपणा

तणाव म्हणजे काय?

वेगवेगळ्या संशोधकांनी तणावाविषयी वेगवेगळी मते मांडली आहेत. या अनेक अभ्यासकांच्या सा-या संशोधनाचा सारांश खालील प्रमाणे असु शकतो.

विविध गरजापुर्ण करताना आपले शरीर ज्या पध्दतीने त्या गरजांना प्रतिसाद देते व तो प्रतिसाद देताना शरीर व मन या दोहोंवर जो काही परिणाम होतो त्यास तणाव असे म्हणतात. या गरजा आपल्या परिभाषेतील चांगल्या किंवा वाईट अशा दोन्ही प्रकारच्या अनुभवातुन आलेल्या असु शकतात. ज्या वेळी आपण तणावग्रस्त होतो त्यावेळी आपले शरीर आपोआप आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये विशिष्ट रसायन तयार करुन सोडते. ज्या वेळी अशी रसायन निर्मिती शारीरीक कष्ट किंवा आव्हानातुन तयार होतात त्यावेळी आपल्या शरीरास व एकुणच आरोग्यास त्याचा खुप लाभ होत असतो. याच्या विरुध्द म्हणजे भावनिक गुंत्यातुन ज्यावेळी आपण तणावग्रस्त होत असतो त्यावेळी मात्र या तणावाचे दुष्परीणाम आपल्यावर होत असतात.

 

या छोट्याशा लेखामध्ये आपण तणावाची कारणे, त्याचे परिणाम, चांगला व वाईट तणाव या सर्वांविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.

तणावाची कारणे

तणावाग्रस्त माणसाचे वजन वाढते. पुण्यामध्ये वजन कमी करण्यासाठी

अगदी छोट्यात छोट्या गोष्टीपासुन ते अगदी मोठमोठ्या समस्यांमुळे आपण तणाव ग्रस्त होऊ शकतो. यातील दोन मुख्य भेद किंवा प्रकार म्हणजे शारिरीक भय व दुसरा प्रकार म्ह्णजे भावनिक गुंत्यामुळे निर्माण झालेला तणाव. भावनिक गुंता मुख्यत्वेकरुन नातेसंबंध, कुटुंबाची काळजी, नोकरी व्यवसायाची काळजी यातुन आलेला असतो. यातील काही असे आहेत.

अस्तित्व टिकवुन ठेवण्यातुन निर्माण झालेला तणाव

गंभीर भयावह परीस्थीती जेव्हा निर्माण होते उदा एखादा अपघात, किंवा भांडण किंवा एखाद्या दरीमध्ये पडण्याचे भय तेव्हा आपल्या नकळत आपोआपच त्या परिस्थीतीमधुन आपणास बाहेर काढण्यासाठी आपल्या खुप जास्त उर्जेची हिंमतीची निर्मिती होते. या अचानक निर्माण झालेल्या ऊर्जेच्या आधारावर आपण त्या परिस्थीला सामोरे जातो किंवा त्यामधुन स्वःतची सुखरुप सुटका तरी करुन घेत असतो. सुटका करुन घेणे व संघर्ष करुन घेणे या दोन्ही साठी समान म्हणजेच खुपच जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. अस्तित्व टिकवुन ठेवण्यासाठी जो तणाव निर्माण होत असतो तो आपल्यासाठी खुपच चांगला आहे.

आंतरिक तणाव

कित्येकदा आपण अशा अनेक गोष्टींची काळजी करत असतो की ज्या गोष्टींवर आपले काहीच नियंत्रण नसते. व यातील मजेशीर गोष्ट अशी की या गोष्टीवर आपले काहीच नियंत्रण नाही हे देखील आपणास माहित असते. तरीदेखील आपण अशा गोष्टींसाठी तणावाने अगदी ग्रासुन जातो. यात असे ही म्हणता येईल की या तणाव आपण स्वःतहुन मागुन घेतलेला तणाव असतो. कित्येकदा अशी वेळ येते की अशा प्रकारे तणाव ग्रस्त होणारा माणुस स्वःत संधी शोधत असतो अशा प्रकारची तणाव निर्माण करणारी परिस्थीती शोधुन त्या परिस्थीतीमध्ये स्वःतला जाणीवपुर्वक अडकवुन घेतो व तणावग्रस्त होतो.

परिस्थीतीजन्य तणाव

आपल्या अवतीभवती च्या परिस्थीमुळे आपल्या शरीरामध्ये जो तणाव निर्माण होतो त्यास परिस्थीजन्य तणाव म्हणता येईल. उदा – कर्कश्श आवाज, गर्दी, दुर्गंधी इत्यादी.  आंतरीक तणाव प्रमाणे याचे नसते. हे टाळता येऊ शकतात जर याकडे थोडे लक्ष दिले तर. हा तणाव देखील आपण कमी करु शकलो तर याचा फायदा आपल्या एकुण तणावाची पातळी कमी होण्यासाठी होऊ शकतो.

थकवा व अतिश्रम

हा तणाव कधीही एका रात्रीमध्ये किंवा दिवसांमध्ये तयार होत नसतो. मोठा काळ आणि चुकीची जीवनशैली हा सर्वात मोठा तणाव निर्माण करते. व याचा परिणाम आपल्या आरोग्यावर खुपच विपरीत होत असतो. आणि हा तणाव काही फक्त प्रौढांनाच असतो असे नाही. शाळकरी मुले देखील याच्या आहारी जाऊ शकतात अतिअभ्यासामुळे. वेळेचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती नसल्यामुळे देखील आपण या तणावाच्या आहारी जाऊ शकतो. कष्ट भरपुर करावे पण वेळेचे नियोजन जमत नसेल तर आराम करुन नव्या जोमाने काम करण्याची उमेद कुठुन येणार? अनेक लोकांस असे वाटते की कष्ट करायलाच पाहिजे आणि आराम हराम आहे. असे वाटणे अर्धेसत्य आहे. कष्ट करायलाच पाहिजे त्यात संशय नाहीच.पण आराम देखील कष्टाइतकाच गरजेचा आहे.

ताण-तणाचा आणि लठ्ठपणा यांचा काय संबंध आहे?

तणावामुळे वाढणारे वजन

ताण-तणावामध्ये आपल्या नकळत आपणाकडुन प्रमाणापेक्षा जास्त अन्न खाल्ले जाते. तणावामध्ये खाण्यामुळे नक्कीच पुढे जास्तीच्या कॅलरींचे रुपांतर चरबी मध्ये होऊन हळुहळु वजन वाढण्यात होते. त्यात ही आणखी लक्षात घेण्यासारखी बाब अशी तणावामध्ये मनुष्याचा नेहमी गोड-धोड, तेलकट, तर्री वाले अन्न पदार्थ खाण्याकडे जास्त ओढा असतो.

तणावामुळे तयार होणारे ते रसायन ज्याला कॉर्टीसोल हार्मोन म्हणतात ते हार्मोन जास्त तयार होते. या हार्मोन मुळे शरीरात चरबीचा साठा पटापट वाढायला लागतो. पुढे जरी तुम्ही वजन कमी करण्याचे उपाय केले व तुम्ही सतत तणावग्रस्त असाल तर तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमाधील सर्वात महत्वाची बाधा म्हणजे हे हार्मोन असेल हे लक्षात ठेवा. तणावामुळे मुख्ह्यत्वे करुन पोटाचा घेर वाढतो.

तणावग्रस्त माणसे झोपतात देखील कमी. कमी झोपेमुळे आणखी विशिष्ट वेगळे हार्मोन्स तयार होतात की ज्यामुळे जास्त भुक लागते. कधी कधी या हार्मोन मुळे तुम्हाला भुक लागल्याचा नुसताच भास देखील होतो.

अशा प्रकारे ताण-तणाव तुमच्या फक्त मानसिक, भावनिक आरोग्याशी खेळतो असे नसुन तो तुमच्या शरीराच्या आरोग्याशी देखील खेळतो व तुम्हास आधीपेक्षा जास्त वजनदार करतो.

माझ्या पुढच्या लेखामध्ये वाचा तणावाला सामोरे कसे जायचे. तणावाचा उपयोग आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी कसा करायचा इत्यादी बरीच माहिती.

आपले

महेश व पल्लवी ठोंबरे

तुमचे निरामय आरोग्याचे सांगाती.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNjYxOTc1Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzY2MTk3NSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

 

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.