Stay Fit Pune - The weight loss center

Stay Fit n Happy during periods

महिन्यातील ते चार दिवस

आजची स्त्री, मग ती कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणारी असो, ही पुर्वीच्या चाको-यांमधुन बाहेर आलेली आहे. कालाय तस्मैय नमः या उक्तीप्रमाणे, स्त्रीयांचे दैनंदिन रुटीन बदलले आहे. अगदी किशोरवयातील बालिका ते वयोवृध्द आजी, ह्या सा-या स्त्रीशक्तीने कालमानाप्रमाणे नवीन कार्यपध्दतीचा अंगिकार केला आहे. पण ह्या बदलांना सामोरे जाताना काय आपण आपल्या मुलभुत समस्यांच्या समाधानासाठी अजुनही जुनेच उपाय वापरतो का?

आशिया खंडातील पावर बीझनेस वुमन – २०१६ सालातील फोर्ब्सने प्रकाशित केलेली यादी

आपल्या घरात घरकाम करणारी एखादी कामवाली बाई, ते एखाद्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये संचालक पदी काम करणारी स्त्री, दोघीदेखील आधुनिक स्त्रियाच आहेत. दोघींच्या स्त्री-धर्म प्रवण समस्या एकच आहेत. व त्या समस्यांचे समाधान देखील एकच आहे.

मी, अभ्यास करुन, सर्च , रीसर्च करुन व काही तज्ञ डॉक्टरांशी केलेल्या चर्चेच्या आधारे स्त्रियांची मासिक पाळी कमी कष्टदायी, कमी वेदनेची, कमी थकव्याची व अधिक ऊर्जा, अधिक सक्रियता, अधिक आनंदाची कशी करता येईल या विषयी लिहित आहे.

मासिक पाळी (Menstrual Cycle) , महिन्यातील सर्वात अवघड दिवस असतात. या दरम्यान शरीरातून विषारी घटक बाहेर पडल्यामुळे शरीरात काही व्हिटॅमिन आणि मिनरल्सची कमतरता होते. ज्यामुळे स्त्रियांना अशक्तपणा, चक्कर येणं, पोट आणि कंबरदुखी, हातापायांना मुंग्या येणं, स्तनांना सूज, एसिडिटी, चेह:यावर मुरमं आणि थकवा जाणवतो. काही स्त्रियांमध्ये ताण, चिडचिडेपणा किंवा राग येण्याची समस्याही दिसून येते. त्या खूप लवकर भावुक होतात.

वयात येणा-या मुलींसाठी मासिक पाळी खुपच जास्त कष्टप्रद असते. अशक्तपणा, रक्तस्त्राव, भीती, स्त्रीत्वाची नवीनच ओळख, इतरांचा आपल्याशी वागण्या बोलण्यात झालेला बदल अशा वेगवेगळ्या स्तरांवर वयात येणा-या मुलींसाठी हे चार दिवस अधिकच वेदना देणारे असतात. अशा वेळेस मुलींना मानसिक व भावनिक आधाराची गरज असते. होते नेमके उलटेच. वेदना कमी करण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचे सेवन मुलींना करावयास लावले जाते, की जे भविष्यासाठी खुपच हानिकारक असते.

नुसते किशोरवयीन मुलीच नाही, तर तरुणी, नोकरदार महीला, व्यवसाय सांभाळणा-या स्त्रिया, अगदी कोणत्याही वयाची स्त्री असो, या सर्वांना उपयोगी होईल व मासिक पाळी सुखकर होईल यासाठी नेमके काय करु नये व काय करावे हे आपण आता पाहु.

हे करु नका

 • बेकरी प्रॉडक्ट्स खाणे टाळा. यात पाव (पावभाजी सुध्दा), ब्रेड, खारी, टोस्ट, केक, पेस्ट्री इत्यादी
 • मासिक पाळीच्या किमान दोन दिवस आधी व दोन दिवस नंतर साखर शरीरात जास्त होईल अशी मिठाई खाणे टाळा
 • उपवास नको
 • कोल्ड्रिंक देखील पिऊ नये. चहा, कॉफी देखील शक्यतो टाळावे. अगदीच सवय असेल तर दिवसातुन एखादा चहा ठिक आहे

हे अवश्य करा 

 • तुमच्या आवडीचे शक्यतो ड्रायफ्रुट मिक्स असलेली चॉकलेट्स जास्तीत जास्त खावीत
 • गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोटाचा भाग शेकवल्याने पाळीच्या दिवसांत आराम पडतो.
 • दररोज सकाळी अनशापोटी जर बडीशेपचं खाल्ली तर मासिक पाळी योग्य वेळेवर आणि सामान्य होते.

 

कायम लक्षात ठेवण्यासारखे काही

 • एकदाच भरपूर खाण्याऐवजी थोड्या थोड्या प्रमाणात ५-६ वेळा खा. त्याने तुम्हाला ताकद मिळेल आणि तुम्ही फिट राहाल.
 • जास्तीत जास्त पाणी प्या. त्याने शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण टिकून राहिल आणि शरीर डीहायडे्रट होणार नाही. ब:याचदा स्त्रिया मासिक पाळीच्या वेळेस वारंवार बाथरूमला जावं लागू नये म्हणून कमी पाणी पितात जे चुकीचं आहे.
 • ७-८ तास भरपूर द्ब्राोप घ्या.
 • आपल्या आवडीच्या गोष्टीमध्ये मन रमवा आणि आनंदी राहा.

प्रत्यक्ष मासिक पाळीच्या चार दिवसात काय करायचे?

 • मासिक पाळीच्या वेळेस आहाराबरोबरच स्वच्छतेवरही लक्ष देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कसल्याच प्रकारचं बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ नये. दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी पॅड जरूर बदला.
 • जास्त वजन उचलू नका. या काळात जास्त धावपळ करण्याऐवजी आराम करा.
 • आपल्यासोबत कायम पॅड्स ठेवा. कधी कधी स्ट्रेस किंवा धावपïळीमुळे वेळेआधीही मासिकपाळी होते. म्हणून आपल्यासोबत कायम एक्स्ट्रा पॅड कॅरी करा.
 • जर वेदना जास्तच होत असेल तर दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या.

मासिक पाळी आनंदाची होण्यासाठी आहारामध्ये काय असाव ?

Diet for menstrual cycle

सकस आणि संतुलित आहार करील तुमचे जीवन मधुर

 • आपल्या डाएटमध्ये फायबर फूड सामील करणं खूप गरजेचं आहे. कारण हे शरीरातील पाण्याचा अभाव भरून काढतात. रवा, जर्दाळु, कडधान्य, संतरा, काकडी, मका, गाजर, बदाम, आलूबुखारा इत्यादींचा आहारात समावेश करा. हे?शरीराचे कार्बोहायडे्रट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सची पूर्तता करतात.
 • कॅल्शिअमयुक्त आहार घ्या. कॅल्शिअममुळे नर्व्हस सिस्टम चांगली राहाते आणि शरीरात रक्तसंचारही सुरळितपणे होतो. एका स्त्रीच्या शरीरात दररोज १२०० एमजी कॅल्शिअमची पूर्तता द्ब्रााली पाहिजे. स्त्रियांचा असा समज आहे की फक्त दूध प्यायल्याने शरीरामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण भरून निघतं. पण फक्त दूध प्यायल्याने शरीरामध्ये कॅल्शिअमचं प्रमाण भरून निघत नाही. दिवसभरात २० कप दूध प्यायल्याने २२०० एमजी कॅल्शिअमची पूर्तता होते, पण इतकं दूध पिणं शक्य नसतं. म्हणून आपल्या आहारात पनीर, दूध, दही, ब्रोकली, बींस, बदाम, हिरव्या पालेभाज्या सामील करा. त्यामुळे देखील हाडे मजबूत होतात आणि शरीराला ताकद मिळते.
 • आयरनचं सेवन करा, कारण मासिक पाळी दरम्यान स्त्रियांच्या शरीरातून सरासरी १ ते २ कप रक्तस्त्राव होतो. रक्तामध्ये आयरन कमी द्ब्रााल्यामुळे डोकेदुखी, उलटी, मळमळणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. म्हणून आयरनच्या पूर्ततेसाठी पालक, भोपळयाचे बीज, बीन्स, मटण इत्यादींचा आहारात समावेश करा. यामुळे रक्तामध्ये आयरनचं प्रमाण वाढतं ज्यामुळे अॅनिमियो होण्याचा धोका वाढतो.
 • आहारात प्रथिने घ्या. प्रथिनांमुळे मासिक पाळीच्या वेळेस शरीराला उर्जा मिळते. डाळी, दूध, अंडी, बीन्स, बदाम आणि पनीरमध्ये भरपूर प्रथिने असतात.
 • व्हिटॅमिन घ्यायला विसरू नका. व्हिटॅमिन सीयुक्त आहाराचं सेवन करा. त्यासाठी लिंबू, हिरवी मिरची, अंकुरित धान्य इत्यादींचं सेवन करा. व्हिटॅमिन बीमुळे आपला मूड चांगला राहातो. याची पूर्तता आपल्याला बटाटा, केळी, रवा इत्यादींपासून होते. अनेक लोक बटाटा आणि केळी फॅटी आहार म्हणून खात नाहीत पण हे याचे चांगले घटक आहेत, ज्यामुळे हाडे मजबूत बनतात.
 • दररोज १ लहान डार्क चॉकलेटचा तुकडा जरूर खा. चॉकलेटमुळे शरीरात सिरोटोनिन हारमोनची वाढ होते ज्यामुळे मूड चांगला राहातो.
 • आपल्या आहारात मॅग्निशिअमचा समावेश जरूर करा. हे तुमच्या आहारात दररोज ३६० एमजी असायला हवंय आणि हे पाळी सुरू होण्याच्या ३ दिवसांआधीपासून घ्यायला सुरूवात करा.  हिरव्या पालेभाज्या, काजू, बदाम, दुग्धजन्य पदार्थ–यातून मिळते.
 • शक्य असल्यास मासे खाणे, मुख्यत्वे करुन त्या चार दिवसात.

वरील माहीती जास्तीत जास्त महीलांपर्यंत पोहोचवा.

कळावे,

पल्लवी ठोंबरे – 9765702525

टिप – महिलांसाठी वजन कमी करणे, वाढवणे संदर्भात जर कोणत्याही मैत्रिणीस मदत हवी असेल तर निसंकोंच मला फोन करा किंवा इथे क्लिक करुन तुमची समस्या मला कळवा

 

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.