श्रीदेवी दररोजच मरते आहे

काल मीडीया, सोशल मीडीया इत्यादीवर श्रीदेवीच्या आकस्मिक मरणाची बातमी ट्रेंडींग होती. कोणतीही व्यक्ति वृध्दापकाळाने मरत असेल तर जनमानसावर त्याचा इतका परीणाम होत नाही. पण वयाच्या ५४ व्या वर्षी, म्हणजे अजुन म्हातारपण देखील तिने पाहील नव्हत, अशा अवेळी तिला मरण येण, सर्वांनाच चटका लावुन गेल. वेगवेगळ्या हिंदी सिनेमांतुन तिने काम करुन स्वतच्या अभिनयाची आणि सौंदर्याची छाप जगावर सोडुन अजरामर झाली.

मला आठवतय , माझ्या लहानपणी व्हीसीआर वर आमच्या गावामध्ये एका लग्नाच्या रात्री श्रीदेवीचे दोन चित्रपट एका पाठोपाठ पाहीले. त्यातील एक गाणे मला अजुनसुध्दा आठवत आहे. “बिजली की राणी”.. माझ्या कॉलेजच्या दिवसात मला समजले की ते बिजली की रानी नसुन, “बिजली गिराने मै हु आयी,…..” असे होते. त्या गाण्याचे ते चुकीचे बोल आणि ती श्रीदेवीची चुलबुली छबी आजसुध्दा मनात घर करुन आहे. एकापेक्षा एक सरस चित्रपट आणि सरस अभिनय करुन तिने निर्विवाद पणे स्वतला महान केले होते.

साधारण २०१२ च्या आसपास, भारताची मेरील स्ट्रीप किंवा भारताची औड्रे हेप्बर्न अशी तिची दखल अमेरीकन आणि युरोपियन मीडीयाने घेतली तेव्हा मी तिचा कमबॅक सिनेमा इंग्लिश विंग्लीश सुद्धा पाहीला. अभिनयातील नाविन्य, काळानुसार बदललेल्या अभिनयाची अभिनय आणि प्रेक्षकांच्या आवडी निवडीची परीभाषा श्रीदेवीने व्यवस्थित समजुन घेतली. तिच्या अभिनयामध्ये परीपक्वता आलेली होती आणि सोबतच तिच्यातील ती चुलबुली श्रीदेवी देखील संपुर्ण सिनेमा प्रेक्षकांच्या मनाचा ताबा सोडत नाही.

ज्यावेळी तिने इंग्लिश विंग्लीश हा सिनेमा केला त्यावेळी ती साधारणपणे तिच्या पन्नाशी मध्ये असेल. पण ज्यापध्दतीने तिने स्वतःला ह्या रुपेरी पडद्यावर सादर केले होते ते पाहुन मला सहजच एक प्रश्न पडला, की कस काय एक स्त्री, की जी दोन मुलींची आई आहे, पन्नाशीच्या घरात आहे, ती स्वतःस इतके फिट ठेवु शकते? एक फिटनेस एक्सपर्ट म्हनुण मी माझ्या पध्दतीने तिच्या त्या कमनीय चिरतारुण्याच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मला त्यानिमित्ताने दोन प्रश्न पडले, व त्यांची मी माझ्या परीने शोधलेली उत्तरे देखील इथे देत आहे.

एखादी स्त्री किंवा माणुस खरच त्याच्या वयाच्या ५० व्या वर्षी देखील तिशी सारखीच फिट राहु शकते काय?

उत्तर – पन्नासच काय , पण वयाच्या अगदी ७० व्या वर्षापर्यंत मनुष्य अगदी तिशीतल्या प्रमाणे जरी नाही दिसला तरी ॲक्टीव्ह आणि काटक राहु शकतो. श्रीदेवीच्या बाबतीत एक गोष्ट मुद्दाम नमुद करावी वाटते की तिने निरोगी आणि ॲटीव्ह राहण्यापेक्षा दिसण्यावर जास्त भर दिला होता. त्यामुळे निसर्गनियमांच्या विरुध्द जाऊन, चेहरा व शरीरावरील सुरकुत्या लपवण्यासाठी किंवा घालवण्यासाठी तिला सतत सतत प्लास्टीक सर्जरी करावी लागत होती. म्हणजेच तिचे चिरतरुण दिसणे हा निव्वळ एक आभास होता. ती चिरतरुण नव्हती फक्त दिसत होती.

“मी कशी दिसते?” हे महत्वाच की “मी कशी आहे?” हे महत्वाचे ?

खरतर हे दोन्ही प्रश्न एकच आहेत. मी कशी दिसते ? म्हणजे माझ्या मध्ये चुस्ती फुर्ती तेज आहे का? मी सदैव हसतमुख आहे का? इत्यादी गोष्टींचा सरळ सरळ संबंध तुमच्या आरोग्याशी असतो. माझे जर आरोग्य चांगले असेल तरच मी चांगली दिसेल. पण हा रस्ता लांबचा आणि धैर्याचा आहे. यात स्वःतच्या खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे लागते. थोडा थोडा व्यायाम करावा लागतो. सुंदर व तरुण दिसण्यासाठी, चांगले व निरोगी राहावे लागते व चांगले व निरोगी राहणे ही एक जीवनशैली म्हणुनच आपण आपणामध्ये विकसीत करावी लागते. ही जीवनशैली म्हणुन स्विकारताना काहीस निंयंत्रित देखील जगावे लागते. काही बधने देखील स्वतस घालुन घ्यावी लागतात. व ज्यांना ही अशी जीवनशैली स्वीकारण, प्रत्यक्षात उतरवण अवघड जात, त्या व्यक्ति असण्यापेक्षा दिसण्याला महत्व देऊन सुंदर आणि तरुण दिसण्याचा शॉर्टकट शोधुन काढतात. त्यातीलच एक श्रीदेवी होय.

तर मुद्दा असा आहे की श्रीदेवी काल आकस्मिक पणे मृत्युमुखी पडली. याच्याही पेक्षा एक आणखी भयानक सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. श्रीदेवी ने स्वतला सुंदर व तरुण दिसत ठेवण्यासाठी शॉर्टकट चा मार्ग स्वीकारला. पण भारतात आज अशा अनेक स्त्रीया पुरुष आहेत की ज्यांना असण्यापेक्षा दिसणे महत्वाचे वाटते आहे. त्यासोबतच वेळेचा अभाव, धावपळ, स्पर्धा इत्यादीमुळे आपण नेहमीच आपल्या निरोगी “असण्याकडे” नेहमीच दुर्लक्ष करीत आहोत. त्यातल्या त्यात मध्यम वर्गीय, मध्यम वतीन स्त्रीया, माता यांना तर निरोगी असण्यापेक्षा सुंदर दिसण्याचाच प्रचंड दडपण असते. व त्या दडपणापोटी अशास्त्रीय आणि घातक अशा अनेक रासायनिक उत्पादनांचा सर्रास वापर करणा-या असंख्य भगिनी रोजच मरत आहेत.

होय… असण्यापेक्षा दिसण्याला महत्व देणारी श्रीदेवी रोजच मरते आहे.

Facebook Comments

4 thoughts on “श्रीदेवी दररोजच मरते आहे

 1. Dineshkumar

  तीच्या मृत्यूचं कारण अधिकृतपणे जाहिर झालेलं नसताना आपण एवढी घाई का करताय????

 2. Mugdha Panvalkar

  खूप छान लिहिले आहे आणि खरोखरच वास्तव आहे.मी तुमची ही पोस्ट शेअर करते.
  धन्यवाद

 3. Meera Mohan Shete

  अगदी खरे आहे. आरोग्य आणि मानसिक समाधान या गोष्टी जीवनाला सौंदर्य देतात. दिसण्यापेक्षा असणे निश्चितच महत्वाचे.

 4. Pingback: स्त्रीचे सौंदर्य म्हणजे काय? – Stay Fit Stay Happy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.