Stay Fit Pune - The weight loss center

calcium in weight loss journey pune

कशासाठी ? तर पोटासाठी !! नक्की का?

जिवन करी जिवित्वा, अन्न हे पुर्ण ब्रह्म ।

आपण सगळेच जगत आहोत. सगळेच याचा अर्थ यच्चयावत सगळे. जे जे म्हणुन सजीव आहेत व सांप्रत म्हणजे मी हे लिहित असताना व तुम्ही वाचत असताना, जिवंत आहेत ते सगळे. यात नुसत्या मनुष्याचाच समावेश नाहीये. तर चराचराचा समावेश आहे. समर्थांच्या मते जीवित्व म्हणजे हे सगळेच जीव. या सगळ्या जीवांच्या जगण्याला “जीवन”  करण्याचे म्हणजे अधिक अर्थपुर्ण व उच्च पातळीवरील ‘जगणे’ करण्याचे काम अन्न करते. म्हणुन अन्न हे पुर्ण ब्रह्म आहे.

याचाच अर्थ आपण जे अन्न खातो ते अन्न काही नुसते पोटासाठी, पोट भरण्यासाठी केलेले काम नाही. समर्थ पुढे हेच म्हणतात.

उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म॥

आणि नेमकी हीच गोष्ट आहे की जी मनुष्यास, इतर प्राणीमात्रापासुन, एका उदात्त अर्थाने वेगळी ओळख देते. नाहीतर, अश्मयुगी मानवाचे देखील जगणेच होते, जीवन थोडीच होते, बरोबर ना?

आपले जीवन अधिक उन्नत करण्यासाठी, जेवण करताना, हरिनाम घ्यावे. खरच हरिनाम घेतल्याने आपल्या जीवनास अर्थ प्राप्त होईल, आपले जीवन अधिक उन्नत होईल असा ठाम विश्वास हल्लीच्या काळात फार कमी लोकांकडे आहे. बहुतांश लोकांना जेवताना हरिनाम सोडा, पण एकतर मोबाईल तरी हवा असतो, व्हॉट्सॲप, फेसबुक पाहण्यासाठी किंवा, टिव्ही तरी हवा असतो, सिनेमा, बातम्या पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी!

जेवण करताना (आणि खरतर नेहमीच) प्रामुख्याने, आपले चित्त स्थिर असणे खुप आवश्यक असते. समर्थांना कदाचित भविष्य काळ माहित होता की काय म्हणुनच त्यांनी सांगुन ठेवले, हरिनाम घ्या मुखाने, जेणे करुन चित्त एकाच सावळ्या हरि पाशी एकवटुन, इतस्ततः भटकणार नाही. अगदी सोपा उपाय की जो अगदी आजकाल च्या धकाधकीच्या काळात देखील लागु पडतो.

चित्त स्थिर असण्याचा आणखी एक फायदा असतो. तो म्हणजे आपले चयापचय देखील सुधारते. व आपण जे काही अन्न सेवन करतो त्या अन्नातील पोषकतत्वे आपले शरीर, अधिक कार्यक्षमतेने करते. आपणास कोणकोणत्या पोषकतत्वांची आवशयकता आहे, हे तुम्ही याच वेबसाईटवरील माझ्या काही सुरुवातीच्या लेखांमध्ये वाचा.

आपल्या शरीराची ही क्षमता आहे, की ज्याद्वारे शरीर अन्नद्रव्यातुन, पोषकतत्वे शोषुन घेते ते खरे तर एक चक्र आहे. एका यंत्रासारखे हे काम अविरत सुरुच असते. या यंत्रामध्ये अन्नद्रव्यांचे रुपांतर ऊर्जा निर्मिती व नंतर उपयोग (उन्नत असे जीवन जगण्यासाठी) यासाठी केला जातो.

नेमके हेच, चक्र कसे काम करते, ते अधिक प्रभावीपणे कसे करता येईल याचे प्रत्यक्ष शिक्षण-प्रशिक्षण आम्ही आमच्या क्लब मेंबर्सना देत असतो. आम्ही केलेल्या सुचनांनुसार त्यांनी जर बदल केले जीवनशैलीमध्ये तर अगदी एक दोन महिन्यांमध्येच आश्चर्यकारक परिणाम, सुधारलेल्या फिटनेस लेव्हल मध्ये, कमी झालेल्या चरबीमध्ये दिसुन येते.

इथुन मागे आपण वेगवेगळ्या पोषक तत्वांविषयी बरीच माहिती घेतली. ही पोषकतत्वे, आपण आहारामधुन कशी मिळवु शकतो याविषयी देखील आपण खुप सविस्तर लिहिले व वाचले आहे. आता आपण आपल्या शरीराच्या चलवलनासाठी, व्यवस्थित पोषणासाठी खुप महत्वाच्या असलेल्या आणखी काही सुक्ष्म पोषक घटकांविषयी माहिती घेणार आहोत.

ही सगळी माहिती कशासाठी घ्यायची आहे? तर याचे उत्तर पोटासाठी असे नसुन, उन्नत जीवन जगता येण्यासाठी घ्यायची आहे हे देखील लक्षात ठेवा.

आज आपण कॅल्शियम विषयी माहिती घेऊयात.

बहुतेक आपला सर्वांनाच हे माहित आहे. की कॅल्शियम हाडांच्या बळकटीसाठी, दातांच्या आरोग्यासाठी खुप महत्वाचे आहे. पण कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये हाडांच्या बळकटी इतकेच आणखी एक खुप महत्वाचे काम करते. या विषयी मात्र आपणास फारशी माहिती नसते. काय आहे कॅल्शियमचे ही तितकीच महत्वाची कामे?

  • शरीरातील सर्व रक्तवाहिन्या, नसांमधुन रक्ताच्या गाठी न होऊ देता, रक्तसंचार सुरळीतपणे होण्यासाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचा घटक आहे.
  • शरीरामध्ये पुरेसे कॅल्शियम असेल तर आपले शरीर आपोआपच, वजन नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते
  • कॅल्शियम जर पुरेशा प्रमाणात शरीरामध्ये तयार होत असेल तर, ज्यांना वाढलेले वजन कमी करायचे आहे, व त्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यासाठी, कॅल्शियम, चरबीला शरीराबाहेर घालवण्याच्या कामाला गती देते. Calcium helps remove fats from body, when you are looking forward to losing weight.
  • कॅल्शियम स्नायुसंवर्धनामध्ये देखील संप्रेरक म्हणुन काम करते. कॅल्शियम कमी झाल्यास, स्नायुंचे दुखणे सुध्दा सुरु होते.
  • आपले शरीर पेशींचे बनले आहे. व या प्रत्येक पेशीच्या बळकटीसाठी कॅल्शियम खुप महत्वाचे आहे

अनेकदा आपण आहारामधुन कॅल्शियम घेतो देखील, पण विटामिन डी च्या कमतरतेमुळे, पोटात, आहारातुन गेलेल्या कॅल्शियमचे शोषण शरीर करु शकत नाही. त्यामुळे विटामिन डी देखील महत्वाचे आहे. शरीरामध्ये विटामिन डी आपोआप तयार करण्याचा एक कारखानादेखील आहे. हा कारखाना म्हणजे आपली त्वचा. सुर्य तळपत असताना, जर आपण सुर्यप्रकाशात गेलो(कमीतकमी कपड्यांमध्ये) तर आपली त्वचा आवश्यक तेवढे विटामिन डी आपसुकच तयार करते. पण आपण खरोखरीच अशाप्रकारे सुर्यप्रकाशात जातो का?

आणखी एक समस्या आहे शाकाहारी माणसांमध्ये. मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारामध्ये कमी प्रोटीन्स, कमी कॅल्शियम असते. त्यामुळे शाकाहारी माणसांचे आरोग्य , मांसाहारी मनुष्याच्या तुलनेमध्ये जास्त दोलायमान असते. त्यांची प्रतिकारशक्ति देखील कमी असु शकते.

आपल्याकडे विशेषतः महिलांच्या विटामिन डी व कॅल्शियम च्या समस्या अगदी सामान्य आहे. दर चार पैकी एका महिलेला ही समस्या आहे. गरोदरपणा, रजोनिवृत्ती च्या काळात प्रामुख्याने कॅल्शियमचे संतुलन बिघडते. व पुरुषांमध्ये उतारवयामध्ये हे अधिक जाणवते. पण धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, ही कमतरता पुरुषांमध्ये देखील तरुणपणात, अगदी बाल्यावस्थेमध्ये सुध्दा आढळुन येते.

भारतीय पुरुषांसाठी वयाच्या ६५ वर्षांपर्यंत किमान १००० मिग्रॅ इतके, तर रजोनिवृत्ती पुर्वी, स्त्रियांना साधारण १२०० मिग्रॅ पर्यंत व गरोदर पण, बाळाला पाजणा-या स्त्रियांसाठी १५०० मिग्रॅ इतके कॅल्शियम ची गरज असते.

आहारातुन कॅल्शियम आपण घेऊ शकतोच. उदा – एक ग्लास दुधामधुन आपणास १२९ मिग्रॅ इतके कॅल्शियम मिळते.तेवढ्याच दह्यामध्ये १०० मिग्रॅ इतके,तर हिरव्या पालेभाज्यांमधुन देखील साधारण इतक्याच प्रमाणात कॅल्शियम मिळते.

आपण आपल्या आहारामध्ये इतके वैविध्य , हल्लीच्या काळात नक्कीच आणु शकत नाही. खरतर निरोगी व निरामय आरोग्यासाठी हे वैविध्य आणलेच पाहिजे. तरीही आपण याबाबतीत कमी पडतो. मग करणार काय? शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी काय भरुन काढणार?

अगदी सोपे आहे. आमच्याशी संपर्क साधा. खालील फॉर्म भरुन पाठवा आम्ही तुम्हाला फोन करतो.

आपले

महेश व पल्लवी ठोंबरे

9923062525

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNTc0ODI0Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzU3NDgyNCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

 

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.