
विश्वास बसणार नाही इतके वजन कमी केलेल्या प्राध्यापकांची यशोगाथा
पुर्वी म्हणजे जेव्हा मी वजनदार होतो तेव्हा, मी टिव्ही वर कधी स्वेट स्लिम बेल्ट ची जाहीरात बघायचो तेव्हा त्या मध्ये जे मॉडेल्स दाखवले जायचे व त्यांचे बीफोर आणि आफ्टर असे फोटो, पाहुन अक्षरशः हसु यायचे. अस वाटायच की यामध्ये दाखवल्या जाणा-या व्यक्ति दोन वेगवेगळ्या आहेत, किंवा कंप्युटर वर फोटो मध्ये काहीतरी गडबद करुन बीफोर च्या फोटोमध्ये त्या माणसाचे अथवा स्त्रीचे पोट मुद्दामहुन मोठे करुन दाखवले आहे.
त्यावेळी अशा बीफोर व आफ्टर फोटो वर विश्वास ठेवावा वाटतच नसायचे. त्यातील दोन फोटो पराकोटीचे विरुध्द टोकाचे असायचे. किंबहुन अजुनही कित्येक लोकांना असे वाटतेच. जेव्हा कधी कधी एखादा क्लब मेम्बर बोलुन दाखवतो तेव्हा समजते की माझा स्वःतच बीफोर आणि आफटर फोटो विश्वास ठेवण्यासारखा नाहीये. पण तेच सत्य आहे.
आज मी तुम्हाला अशाच पराकोटीच्या अविश्वसनीय परंतु सत्य,, माझ्या डोळ्यासमोर स्वःत मध्ये बदल घडवलेल्या माणसाविषयीची थोडक्यात माहीती देणार आहे.
अहमदनगर मधील एका प्रसिध्द इंजिनियरींग कॉलेज मधील प्राध्यापक, श्री चंद्रकात काळविट सरांची ही यशोगाथा आहे. इंजिनियरींग कॉलेज मध्ये शिकविण्यासाठी स्वःत आधी इंजिनियर व्हावे लागते. पण चंद्रकांत सर नुसते इंजिनियर नाहीत तर एक संवेदनशील शिक्षक देखील आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताच्या शक्य तितक्या गोष्टी करणे त्यांच्या सवयीचेच. त्यांचे ह्स्ताक्षर देखील फारच सुंदर आहे. तुम्ही ते या लेखाच्या खालील फोटो मध्ये पाहु शकता.
एक प्राध्यापक असल्याने त्यांचा अधिकाधिक वेळ स्वःत अभ्यास करण्यात व व नंतर विद्यार्थ्यांना शिकविण्यात जायचा. अर्थातच या शारीरीक श्रम कमी असलेल्या (पण शिकणे व शिकवणे यात बौध्दीक दमछाक खुप होत असते बरका !) कामामुळे, त्यांची एकुण दिनचर्याच बिघडली. त्यांच्या उंची व वयाच्या मानाने त्यांचे वजन ६८ किलो असावयास हवे होते. पण गंमत बघा. ज्या वेळी माझी व सरांची भेट झाली त्यावेळी त्यांचे वजन तब्बल १०३ किलोग्राम्स इतके होते. त्यांच्या वाढलेल्या वजनाविषयी त्यांना कल्पना आमची भेट होण्यापुर्वीच आलेली होती. व वजन कमी करण्यासाठी म्हणुन त्यांनी स्वःत नाना प्रकार देखील केले होते. त्यांच्या स्वःतच्याच शब्दात वाचा ते काय म्हणतात ते
अशाप्रकारे विविध प्रयत्न करुन देखील त्यांचे वजन काही कमी होत नव्हते. आमची म्हणजे मी व पल्लवी आणि काळविट सर यांची भेट एका दुकानात झाली. बॅग घेण्यासाठी सर त्यांच्या मित्रांसोबत दुकानात आले होते. ओळख नव्हती पहिली. पण त्यांचे एकुण शरीरमान पाहुन, माझ्या बॅगेतुन एक फ्लायर काढुन मी त्यांना देऊ केले व त्यांना वजन कमी करणे किती महत्वाचे आहे हे पटवुन सांगितले. सरांनी स्वःत अनेकदा प्रयत्न करुन देखील काहीही उपयोग होत नव्हता. हे त्यांना ही ठाऊक होतेच. सरांनी हेल्द अनॅलिसिस साठी आमच्या नगर मधील क्लब मध्ये येण्याचे आमंत्रण स्वीकारले. व त्याप्रमाणे ते पुढच्याच कामाच्या दिवशी क्लब मध्ये आले देखील!
सर आले, मी त्यांच्यासाठी खास प्रोग्राम बनवला. व सहा दिवसांच्या ट्रायल प्रोग्राम मध्ये त्यांनी मनलावुन भाग घेतला. माझ्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन केले. व परिणाम सातव्या दिवशी दिसलाच. दिड किलोग्रामच्या आसपास त्यांचे वजन कमी झालेले त्यांनी पाहिले, व पुढे आमचा प्रोग्राम असाच सुरु ठेवायचा निर्णय घेतला.
पुढच्या १० महिन्यांमध्ये सरांनी स्वःतच्या लाईफस्टाईलमध्ये, माझ्या सुचनांनुसार बदल केला. व त्यांच्या या परिश्रमाचे फळ खुपच आनंद देणारे होते. आनंद नुसता त्यांनाच नाही तर मला देखील खुपच झाला. परिणाम म्हणजे रिझल्ट काय आला होता दहा महिन्यांनंतर ?
काळविट सरांनी चक्क ३५ किलो वजन कमी केले होते.
ही गोष्ट आहे, जानेवारी २०१६ ची.
मी वेबसाईट व ब्लॉग सुरु केल्यावर सरांशी एकदा संपर्क झाला. सरांना मी त्यांचा अनुभव लिहुन द्यायला सांगितले व त्यांनीही त्यांच्या स्वतच्या हस्ताक्षरामध्ये अनुभव लिहुन पाठवला. हा अनुभव वाचताना, मला आणखी एक गोष्ट समजली व ती ही की, सरांनी २०१६ मधील त्यांचे वजन (३५ किलो वेट लॉस केल्यानंतरचे) अगदी आजपर्यंत तसेच टिकवुन ठेवले आहे.
आमच्या सारख्या वेट लॉस तज्ञाची गरज कुणालाही पडु नये. पडलीच तर ती अगदी काही महिन्यांकरीताच असावी. व आम्ही केलेल्या मार्गदर्शनाच्या जोरावर, लोकांनी स्वःतच्या जीवनशैली मध्ये जर सुधारणा केली तर पुन्हा त्यांचे वजन वाढणारच नाही.
काळविट सरांच्या या अप्रतिम यशाला सलाम. त्यांच्या तत्परतेला आणि झोकुन देऊन ध्येय गाठण्याच्या वृत्तीला सलाम. त्यांच्या सतत चांगले जगण्याच्या जाणीवपुर्वक प्रयत्नास देखील सलाम.
काळविट सरांची वेट लॉस स्टोरी तुम्हाला कशी वाटली, हे आवर्जुन सांगा.
कळावे
तुमचे निरामय आयुष्याचे सांगाती
महेश व पल्लवी ठोंबरे
9923062525