अनुजैविकांचा आपल्या शरीरस्वास्थ्यासाठी प्रभावी उपयोग
मागील लेखामध्ये आपण पाहिले की प्रतिकुल जिवाणुंची संख्या जर वाढली तर आपले आरोग्य बिघडते. व अनुकुल जिवाणुंची संख्या वाढली तर आपली प्रतिकार शक्ति वाढुन आपण अधिक तंदुरुस्त होतो. आज आपण अनुजैविके (म्हणजेच अनुकुल जिवाणु) आपल्या जठरात कशा पध्दतीने वाढवता येतील जेणेकरुन प्रतिकुल व अनुकूल यांचा समतोल नेहमीच साधला जाईल.
सर्वात प्रथम अनुजैविके या शब्दा विषयी माहिती करुन घेऊयात. खरतर मराठी मध्ये किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषांमध्ये प्रोबायोटिक्स या इंग्रजी शब्दासाठी समान अर्थाचा शब्द अजुन तरी अस्तित्वात असल्याचे मला आढळले नाही. त्यामुळे या संदर्भामध्ये सर्वात आधी मी, माझा मित्र, हेमंत ववले शी बोललो. त्याने देखील यासाठी शोध घेतला पण वापरात असलेला एक शब्द हिंदी, संस्कृत किंवा मराठी मध्ये सापडला नाही. मग त्यानेच मला या लेखमालेसाठी प्रोबायोटिक या शब्दासाठी मराठी मध्ये नवीनच तयार शब्द सांगितला. अनुजैविक . इथे अनु शब्द अनुकूलन, अनुकूल, अनुकरण या अर्थाने त्याने योजला आहे. सर्व प्रथम त्याचे आभार.
आता आपण पाहुयात अनुजैविकांचा योग्य वापर कसा करता येईल ते!
अनुजैविकांचा वापर करायचा म्हणजे नेमके काय करायचे?
अनुजैविके असतील असे अन्न-पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे. बस्स एवढेच आहे. व अनुजैविके असलेले अन्न पदार्थ कोणते आहेत आपल्याकडे की जे सहज उपलब्ध आहेत? चला माहिती घेऊयात.
दही. शक्यतो घरीच लावलेले दही आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा. शक्यतो रात्रीच्या जेवणामध्ये दह्याचा वापर टाळावा. अगदी रात्रीच्या जेवणामध्ये सुध्दा अनुजैविके घ्यायचीच असतील दह्या सारखीच तर ताक बेस्ट आहे. साखरेचा वापर न करता जसे आहे तसे घ्यावे. दही नेहमी सामान्य तापमानाचेच खावे. गरम असेल तर खाऊ नका, ते अपायकारक होऊ शकते. ज्यांना दही जरा जास्तच आवडते त्यांच्यासाठी मस्त प्रकार असे होऊ शकतात. दही भात, रायता, कढी, लस्सी, ताक, इत्यादी. दह्याचे अन्यही बरेच फायदे आहेत, जसे हाडांना बळकटी येते, त्वचा निरोगी होते, विटाबीन बी, अनेक मिनरल्स मिळतात.
पनीर- कच्चे खाले तरी चालेल. यातुन प्रोटीन्स देखील मिळतील. सोबत थोडी चरबी (चरबी सुध्दा आवश्यक आहे बर का आपल्याला)
सोयाबीन ची चटणी – हा नागालॅंड मधील विशेष खाद्यप्रकार आहे. कच्चे सोयाबीन आंबवुन हे केले जाते. याची रेसिपी तुम्हाला खालील व्हिडीयो मध्ये पाहता येईल.
मटार – नुकत्याच झालेल्या एका अभ्यासामध्ये मटार मध्ये (फ्रीजर मध्ये ठेवलेले नाही) देखील अनुजैविके असतात.
लोणची – घरगुती लोणचे. आठवते का पुर्वीच्या काळातील लोणच्याही बरणी आपल्या घरातील. मुरवलेले व चटपटीत कैरीचे लोणचे कसे करायचे हे जाणुन घ्यायचे असेल तर इथे क्लिक करा.
उच्च दर्जाचे डार्क चॉकलेट की ज्यामध्ये साखर कमी असेल.
केळ व सफरचंद यामध्ये देखील अनुजैविके आहेत.
इडली डोसा डोकळा भटुरे
सोयाबीन पासुन बनविलेले दुध
आपल्या आहारामध्ये वरील सर्व किंवा काही पदार्थांचा समावेश आळीपाळीने करावा.
यातील कित्येक पदार्थांमध्ये, जसे दही, कधी कधी फॅट्स चे प्रमाण जास्त असु शकते. किंवा डार्क चॉकलेट देखील आपणास कमी साखर असलेले मिळेलच असे नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ज्याने त्याने अनुजैविके आपापल्या आहारामध्ये समाविष्ट केली पाहिजे.
या व्यतिरिक्त आमच्या कडे अनुजैविकांच्या पुर्ततेसाठी, ते ही योग्य प्रमाणात, साखर व फॅट्स शिवाय, सोबतच अनेकविध मिनरल्स मिळतील अशी उत्पादने आहेत. ज्यांचे वजन आधीच खुप वाढले आहे, ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा वजन कमी करण्यासाठी जे लोक प्रयत्न करीत आहेत अशा सर्वांसाठी आमच्या कडे आहे सिंपली प्रोबायोटिक नावाचे उत्पादन. यामध्ये करोडो अनुजैविके आपण, आपल्या गरजेनुसार आपल्या आहारात घेतो. तुमच्या साठी किती अनुजैविके आवश्यक आहेत हे आम्ही तुमची आरोग्य चाचणी घेऊन ठरवित असतो. तुम्हाला जर हे उत्पादन हवे असेल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा.
तुमचे निरामय आरोग्याचे सांगाती
महेश व पल्लवी ठोंबरे
9923062525
तुम्हाला जर कसली माहिती/मदत हवी असेल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा