Stay Fit Pune - The weight loss center

overeating and weight gain

लग्न सराई, आमरस खाऊन झाले असेल तर हे वाचा…

उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नसराई, लग्नाचे वाढदिवस अशी बरीच कारणे होती ज्यामुळे आपणास कोणत्या कोणत्या प्रसंगी आपल्या नेमहीच्या आहारापेक्षा जास्त खावे लागले असेल. आणि असे प्रसंग मागील दोन महिन्यांत खुप झाले असतील. तुमचेच काय माझे देखील मागील दोन महिन्यात नेहमीपेक्षा जास्त खाणे झालेले आहे. त्यातच हा आंब्यांचा मोसम. मग तर काय विचारुच नका. एकुणच काय तर आपल्या संतुलित आणि सकस आहाराची पुरती वाट मागील दोन महिन्यांमध्ये लागली असणार यात काही संशय नाही.

महिन्यातुन एखाद दुस-या वेळी जास्त खाणे झाले तर फार काही बिघडत नाही. एखाद्या वेळेस जास्त खाल्ल्याने लगेच आपले वजन वाढत नाही, त्यामुळे जास्त काळजी नसावी. वजन वाढणे ही एक खुपच मंद आणि ह्ळुवार होणारी प्रक्रीया आहे.ही प्रक्रिया इतकी छुपी आहे की आपल्या अगदी न कळत आपले वजन वाढलेले असते. आपले वाढलेले वजन किंवा पोटाचा घेर आपल्याला समजण्या पुर्वी आपल्या मित्रांना समजतो. वजन वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये मुख्य तीन गोष्टींचा समावेश असतो. एक चयापचय, दुसरा कॅलरीज, आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळ. या तीन ही गोष्टी व्यवस्थित समजुन घेतल्या तर आपणास जास्त खाण्याचा आपल्या वजन वाढण्याच्या प्रक्रियेवर कसा परीणाम होतो हे समजेल. तसेच यावरील उपाययोजना काय असु शकतात हे देखील आपणास समजेल.

चयापचय

चयापचय म्हणजे आपल्या शरीराचे इंजिन

चयापचय म्हणजे आपल्या शरीराचे इंजिन

आपण जे अन्न खातो त्या अन्ना मध्ये कॅलरीज असतात. कॅलरी म्हणजे एखाद्या अन्नपदार्थामध्ये शरीराच्या चलवलनासाठी लागणारी ऊर्जा किती असु शकते याचा निर्देशांक आहे. आपणास दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. एखाद्या व्यक्तिस अशक्तपणा येऊन कधी कधी चक्कर येते. याचा अर्थ काय तर त्याच्या शरीरामध्ये अजुन पुढे काम करण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जाच नसते. काम म्हणजे शब्दशः काम असा अर्थ नसुन साधारण बसणे उठणे उभे राहणे चालणे हे देखील कामच आहे. तर ऊर्जा संपल्यावर आपले शरीर कामच करु शकत नाही. म्हणुन दिवस भर काम करण्यासाठी आपणास ऊर्जेची गरज असते. आणि ही ऊर्जा शरीराला मिळण्यासाठी आपले शरीर चयापचय या क्रियेचा उपयोग करते. साधारण माणसास दिवसभराच्या कामासाठी अंदाजे २००० कॅलरीज जाळुन मिळेल एवढी ऊर्जा लागते. स्त्री आणि पुरुषांमध्ये याचे प्रमाण थोड्या फार फरकाचे आहे. तर आपण खालेल्ल्या अन्नातील कॅलरीजला जाळुन(इंधनासारखे) त्यापासुन ऊर्जा तयार करण्याच्या क्रियेला चयापचय म्हणतात. इंग्रजी मध्ये याला मेटॅबॉलिज्म असे म्हणतात.

कॅलरीज

नक्की किती कॅलरीज आपल्याला गरज असते?

नक्की किती कॅलरीज आपल्याला गरज असते?

आपल्या शरीराच्या दैनंदिन कामासाठी लागणा-या ऊर्जेची निर्मिती झाल्यावर, जर काही कॅलरीज शिल्लक राहिल्या तर त्यामुळे वजन वाढण्याची प्रक्रिया आपोआप सुरु होते. आपण हे अंन्न खातो त्यामध्ये दोन प्रकार असु शकतात. एक म्हणजे कमी कॅलरी असलेले अन्न व दुसरे म्हणजे जास्त कॅलरी असलेले अन्न. कमी कॅलरी असलेले अन्न जर जास्त खाल्ले तर वजन वाढण्याची शक्यता कमी असते. उदा गाजर कमी कॅलरी वाले अन्न व केक जास्त कॅलरी वाले अन्न. जेव्हा आपण जास्त आपल्याला आवश्यक (म्हणजे आपण जेवढ्या कॅलरीज जाळतो तेवढ्याच) तेवढ्या कॅलरीज पेक्षा जास्त कॅलरीज शरीरामध्ये पाठवतो तेव्हा वजन वाढते. म्हणजे थोडक्यात असे की साधारण पणे एक किलो चरबी तयार होण्यासाठी अंदाजे ७००० कॅलरीज शरीरात जास्त साठवल्या गेल्या पाहिजेत. व आपले  वाढलेले वजन हे मुख्यतः चरबीचेच असते.

वेळ

याचा अर्थ असा की तुम्ही जर दिवसाला ७००० कॅलरीज जास्त खाल्यातरच तुमचे वजन वाढते. पण आपण एकाच दिवशी ७००० कॅलरीज चे अन्न खात नाही. अगदी कितीही पोटभर जेवलो तरीही आपण ७००० कॅलरीज चे अन्न खात नाही. समजा तुम्ही एखाद्या दिवशी ३००० कॅलरीजचे अन्न खाल्ले, व तुमची कॅलरीज जाळुन ऊर्जा तयार करण्याची क्षमता २००० कॅलरीजची आहे तर त्या दिवशी तुम्ही १००० कॅलरीज अतिरिक्त साठवुन ठेवल्या असा अर्थ होतो. अशा पध्दतीने तुम्ही जर अशी १००० कॅलरीजची बचत सतत ७ दिवस केली तर तुमचे वजन एक ते दिड किलो ने वाढणार ने निश्चित समजा,

वजन वाढु नये म्हणुन काही उपाय

(हे उपाय अशांसाठीच आहेत ज्यांचे वजन नॉर्मल आहे)

अनावधानाने तुमच्याकडुन जर अशा समारंभात, पार्ट्यांमध्ये जर जास्त खाणे झाले असेल तर, वजन वाढु नये म्हणुन तुम्ही काही उपाय करु शकता. व्यायाम किंवा शारीरेक श्रम केल्याने आपण जास्त कॅलरीज जाळतो. दुसरा पर्याय असा की ज्या दिवशी तुम्ही जास्त खाल्ले आहे, त्याच्या दुस-या तिस-या, चौथ्या दिवशी कमी कॅलरीज असलेले अन्न खाणे. उदा – तुम्ही अनावधानाने एखाद्या दिवशी २५०० कॅलरीज असलेले अन्न खाल्ले तर त्याच्या दुस-या दिवशे तुम्ही १५०० कॅलरी मिळतील एवढेच अन्न खावे.

या विषयी अधिक माहिती हवी असल्यास किंवा कसली शंका असल्यास अवश्य मला विचारा.

वाढलेले वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे या साठी तज्ञ सल्ला मिळवायचा असेल तर खालील फॉर्म द्वारे  भरुन अवश्य माझ्याशी संपर्क साधा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMzU0MTExIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzM1NDExMSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.