आपली संस्कृती – संक्रांतीचे आहारशास्त्र

भारत हा कृषिप्रधान कृषि संस्कृती जपणारा व संवर्धित करणारा देश आहे. या कृषि संस्कृतीची पाळेमुळे कुठेतरी ज्ञान-विज्ञानात आहेत. हे ज्ञान विज्ञान जसे वनस्पती शास्त्राशी निगडीत आहेत तसेच ते खगोल शास्त्राशी देखील जोडले गेले आहे.

संक्रांत हा एक शेती आणि सूर्य-अयनाशी संबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वीवरून पाहिले असता, सूर्याच्या उगवण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. (अयन=चलन/ढळणे). हा सण भारत सरकारने राष्ट्रीय सण म्हणून घोषित केला आहे.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणा-या लोकांना आजकाल अनेकदा भारतीय सण-उत्सवांदरम्यान घाबरवण्याचे काम अनावधानाने सुरु आहे. भारतीय संस्कृतीशी संलग्न असे त्या त्या सणवाराला केलेले व खाल्लेले अन्न, पदार्थ कधीही अपायकारक होऊ शकत नाहीत. अर्थात ते भारतातील त्या त्या स्थानिक प्रथा परंपरांशी जोडलेले असले पाहिजे एवढेच.

संक्रांतीला देखील असेच काहीसे होत असते. तिळ व गुळ यांचा उपयोग करुन बनवलेली व्यंजने या ऋतुमध्ये खाल्लीच पाहिजे व ती खाण्यासाठी सुरुवात आज पासुनच केली पाहिजे यात संशय नसावा. चला तर मग आपण आज आपल्या सणाविषयी व त्याच्या आहारशास्त्राशी असलेल्या संबंधाविषयी जाणुन घेण्याचा प्रयत्न करुयात.

मकरसंक्रांत शिशिर ऋतूत येते. सूर्य मकरास ओलांडून उत्तरेकडे येण्यास सुरुवात करतो. या ऋतूत कडाक्याची थंडी असते. बाह्य थंडीमुळे शरीरात जठराग्नी प्रदीप्त झालेला असतो. अग्नी म्हणजे अन्न पचवायची ताकद. आहाराचे शरीरांस पोषक पदार्थामध्ये रूपांतर करण्याची शक्ती. अशा या प्रज्वलित अग्नीचे संरक्षण होण्यासाठी अधिकाधिक ऊर्जा देणारा आहार घ्यावा लागतो आणि हा आहार पचवण्यासाठी इतर ऋतूंपेक्षा अधिक व्यायामदेखील करावा लागतो. या ऋतूतील आहार उष्ण वीर्याचा व अधिक उष्मांक देणारा असावा हे सुचवते ‘भोगी आणि संक्रांत.’

तिळगुळाची गव्हाची पोळी करण्यापेक्षा बाजरी किंवा ज्वारीची भाकरी करुन खाणे व कुटुंबियांना आनंदाने खाऊ घालणे हे खरे अपेक्षित आहे.

भोगीच्या दिवशी आपण बाजरीची तीळ घातलेली, लोण्याने माखलेली भाकरी खातो. हरभरा, मटार, गाजर, घेवडा, शेवग्याच्या शेंगा, वांगी यांची तिळकूट घातलेली मिश्रभाजी दालचिनी, लवंग, मिरे घालून खातो; जेणेकरून ती पचायला हलकी होते. याबरोबरीने मूगडाळ-तांदळाची खिचडीदेखील खातात.

याच ऋतुमध्ये आपल्या रानावनात बोराच्या झाडांची बोरे पिकण्यास सुरुवात होते. आजकाल ती रान बोरांची झाडे राहिली नाहीत. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी अवश्य रान बोरं खावीत, घरच्यांना खाऊ घालावीत पुढील काही दिवस. यातुन पित्ताचे विकार दुर होण्यास मदत होते.

तीळ का आहारात घ्यावे?

तीळ कफ-पित्तनाशक असून केसांच्या वाढीसाठी, मजबुतीसाठी उत्तम असतात. रोज कोमट तीळतेलाने गुळण्या केल्यास दातांचे आरोग्य उत्तम राहते. थंडीत लघवीचे निसर्गत: कमी झालेले प्रमाण वाढवते.ज्या स्त्रियांना मासिक पाळीत कमी रक्तस्राव होतो, त्यांनी तिळाचे पदार्थ प्रमाणात खावे.तेलाची व्याख्या करताना ‘तिलोद्भवतलम्’ अशी केली आहे. अर्थात तिळापासून उत्पन्न होते तेल. तिळाच्या तेलाने थंड ऋतूत नित्य अभ्यंग करण्यास सांगितले आहे. अभ्यंगाने त्वचा तर कोमल होते, पण श्रमवार्धक्यही दूर होते. शरीर धष्टपुष्ट होते. दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. झोप उत्तम लागते आणि आयुष्य वाढते.

तिळाचे तेल कधी फ्रिजमध्ये ठेवावे लागले असे कधीही ऐकिवात नाही. कारण त्यांत सिसॅमॉल व सिसॅमिन ही नैसर्गिक संरक्षके असतात. याच्या जोडीला यात लिग्नन असल्याने रक्तदाब योग्य राहण्यास मदत होते. तिळाच्या तेलाने नित्य अभ्यंग करणे आवश्यक आहे.

बाजरीचीच भाकरी का आहारात घ्यावी इथुन पुढे?

बाजरी अति उष्ण असल्याने शरीरात रुक्षता (कोरडेपणा) वाढण्याचा संभाव्य धोका असतो म्हणून स्नेहयुक्त तीळ आणि स्निग्ध लोणी यांची जोड देऊन शरीराची स्निग्धता व मार्दवता टिकवून ठेवली जाते. बाजरीत प्रथिने ११ ग्रॅम, लोह तीन ग्रॅम, कॅल्शियम आठ मिलिग्रॅम, फॉलिक अ‍ॅसिड ८५ मायक्रोग्रॅम, कबरेदके ७२.८ ग्रॅम असून शरीरास ५७८ किलो कॅलरी उष्मांक पुरवते.

तीळ व बाजरीची भाकरी सोबत भोगीची भाजी

भोगीची भाजी म्हणजे नक्की काय?

‘न खाई भोगी तो सदा रोगी’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो.

भोगीच्या भाजीत त्या हवामानात येणारे हरभरा, मटार, गाजर, घेवडा, वांगी, शेवग्याच्या शेंगा यांची तिळकूट, दालचिनी, लवंग व मिरे घालून भाजी करतात. त्याचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व जाणून घेऊ या.

हरभरा

भाजलेले व तळलेले हरभरे कफ-पित्तनाशक असतात तर भिजवलेले हरभरे बलदायक व रुचकर असतात. हरभऱ्यात १७.१ ग्रॅम प्रथिने, २.७ ग्रॅम खनिजे, ६१.२ ग्रॅम कबरेदके आणि ५.३ ग्रॅम स्नेह असतो.

मटार

मटार शिजवून खाल्ले तर बलदायकअसतात. मात्र कच्च्या मटारांनी जुलाबाची शक्यता जास्त असते. यामध्ये २३ ग्रॅम प्रथिने, ५४ ग्रॅम कबरेदक आणि एक ग्रॅम स्नेह असतो.

गाजर-

गाजर उष्ण असून भूक वाढवण्यास मदत करतात. वातनाशक असतात. कफाचे आजार, मूळव्याध, ग्रहणी या विकारांत उपयुक्त आहेत. गाजर वाफेवर शिजवावे. छोटी गाजरे जास्त उपयुक्त ठरतात. गाजराने सूत्रकृमी मरतात, मासिक पाळीत रक्तस्राव व्यवस्थित होत नसल्यास गाजराचा वापर करावा. गर्भिणींनी टाळावा. गाजरे लघवीचे प्रमाण वाढवतात. गाजरात अ जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक आहे.

घेवडा

घेवडा वातनाशक असतो, मधुमेह, किडनीचे आजार असणाऱ्यांसाठी उत्तम. लघवीचे प्रमाण वाढवतो. यामध्ये २५ ग्रॅम प्रथिने, ४० ग्रॅम कबरेदके आणि एक ग्रॅम स्नेह असतो.

वांगी

छोटी वांगी कफ-पित्तनाशक असतात तर मोठी वांगी पचायला जड व पित्तकारक असतात. या ऋतूत मोठय़ा वांग्यांचे भरीतही उत्तम पचते. वांग्यातून २५ किलो कॅलरी ऊर्जा, ५.८८ ग्रॅम कबरेदके आणि नऊ मिलिग्रॅम कॅल्शियम मिळते.

शेवग्याच्या शेंगा :

या उष्ण असून कफ-वातनाशक आहेत, डोळ्यांना हितकर, कृमिनाशक असून लघवीचे प्रमाण वाढवतात. यांच्या बियांमध्ये ३६ र्निगध स्वच्छ तेल असते. जे स्निग्धता टिकवून ठेवते.

भोगीची भाजी कशी करावी?

साहित्य : वांगी – तीन, वर्णे – अर्धी वाटी, ताजे मटार – अर्धी वाटी, हिरवे हरभरे – अर्धी वाटी, भिजवलेले कच्चे शेंगदाणे – अर्धी वाटी, चिरलेली गाजरं – दोन, चिरलेला कांदा झ्र् एक, तीळ – एक टेबल स्पून, खोवलेलं ओलं खोबरं – अर्धी वाटी, चिरलेली कोथिंबीर – पाव वाटी, तिखट – दोन चमचे, मीठ – चवीनुसार, हळद, हिंग – प्रत्येकी अर्धा चमचा, तेल – पाव वाटी, गूळ – दोन चमचे, गरम मसाला पावडर – एक चमचा

कृती – वांगी, गाजरं चिरून घ्या. सर्व भाज्या एकत्र करा. भांडय़ात तेल तापवा, त्यात कांदा परतून घ्या. हिंग, हळद घाला. भाज्या घालून छान परतून घ्या. तिखट, मीठ, गरम मसाला पावडर, तीळ, खोबरं घालून छान एकजीव करा. गूळ घाला. गरजेनुसार पाणी घालून शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.भोगीच्या दिवशी ही भाजी करतात.बाजरीची भाकरी, चटणी, मेथीच्या भाजीसोबत ही भाजी नैवेद्यासाठी करतात.

आमचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अवश्य शेयर/फॉरवर्ड करा!

कळावे

आपलेच

Mahesh and Pallavi Thombare

Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyMjMxOCIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE0MTYzIiwiYWN0aW9ucyI6IjMxNyIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3Vwc3lzdGljLTQyZDcua3hjZG4uY29tXC9fYXNzZXRzXC9mb3Jtc1wvaW1nXC9wcmV2aWV3XC9iYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld19pZCI6IjExXzI5OTQzOCIsInZpZXdfaHRtbF9pZCI6ImNzcEZvcm1TaGVsbF8xMV8yOTk0MzgiLCJjb25uZWN0X2hhc2giOiIyYWY3ZjdhMzgzMGFjYmNhOWM0MzNmNzkyNDdjOTJjMSJ9

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.