Stay Fit Pune - The weight loss center

लठ्ठ होणेच तुमच्या भाग्यात आहे का?  लठ्ठपणा आणि अनुवांशिकता

एखाद्याचे नाक कसे असावे, डोळे कसे असावेत, डोळ्यांचा रंग कोणता असावा अशा सर्व बाह्य व दृश्य शारीरीक गोष्टी ज्या आपल्या बाबतीत आपण स्वःत ठरवु शकत नाही त्या सर्व ठरवल्या जातात आपल्यातील जीन्स मुळे. जीन्स ला मराठी मध्ये आपण वंशाणु म्हणु शकतो. तर ज्या जीन्स मुळे आपण जे काही आहोत तसे आहोत, हे ठरले जाते व त्याप्रमाणेच आपण होत असतो त्या जीन्स चा आकार व गुणधर्म कोण ठरवते बरे?

जीन्स मधील बदल जसे आपल्या शरीररचनेला दिशा देतात त्याच प्रमाणे जीन्स बहुतांशी आपण लठ्ठ होणार की नाही हे देखील ठरवु शकतात. याचाच अर्थ तुमचे आईवडील जर लठ्ठ असतील तर ही शक्यता खुप दाट असते की तुम्ही देखील लठ्ठ व्हाल. दुस-या शब्दात सांगायचे झाले तर असे की, जर तुम्ही लठ्ठ असाल तर तुमची संतती लठ्ठ होण्याची शक्यता खुप दाट असते.

पण याचा अर्थ १००% लठ्ठ पालकांची मुले लठ्ठच होतात असा काही काळ्या दगडावरचा नियम नाहीये बरका! अशी हजारो, लाखो उदाहरणे आहेत

 

की त्या कुटूंबात लठ्ठ पणा वर्षानुवर्षे असुन देखील पुढच्या पिढ्या मात्र चरबी मुक्त आणि साधारण आयुष्य जगताहेत. आणि तुम्ही देखील अनुवांशिक लठ्ठपणाला आव्हान देऊन, लिलया ते पेलु शकता व सडसडीत सुडौल शरीररचना मिळवु शकता.

लठ्ठ वंशाणु असतो का?

हो! माणसाने लठ्ठ असावे की नसावे याचे निर्धारण करणारा एक वंशाणु म्हणजे जीन आहे. व या वंशाणु मध्ये झालेला विशिष्ट बदल २० ते ३० टक्के शक्यता वाढवतो तुमच्या किंवा तुमच्या पुढच्या पिढीच्या लठ्ठ असण्याची. यासोबतच डझनभर आणखी जीन्स असतात जे तुमच्या शरीराच्या वजनाशी निगडीत असतात. उदाहरणार्थ, काही जीन्समुळे तुमचे शरीर आपोआपच शरीरामध्ये जास्तीची चरबी साठवुन ठेवते.

याचा अर्थ आपण असा घ्यायचा का की तुम्ही किंवा तुमची पुढची पिढी लठ्ठच होणार?

ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा हा एक गुंतागुंतीचा आजार आहे. हो लठ्ठपणा आजारच आहे. आणि तो होणार आहे की नाही हे ठरवण्याचे व प्रत्यक्ष माणसाला लठ्ठ करण्याचे काम अनेक घटक करत असतात. जसे अनुवांशिकता, जीवनशैली आणि सभोवतालचे वातावरण.

यामध्ये आपण एक गोष्ट जाणुन घेतली पाहीजे. आनुवांशिकता म्हणजे नक्की काय? एखाद्या सजीवाच्या अशा सर्व सवयी व त्या सवयीतुन त्याने मिळवलेले ज्ञान, स्वतचे अस्तित्व टिकवण्यासाठीचे ज्ञान, पेशी स्वरुपात, एका पिढीकडुन दुस-या पिढीकडे जीन्सच्या रुपातुन संक्रमित होत असते. स्वःतचे जैविक अस्तित्व टिकवण्यासाठी पुढची पिढी देखील संक्रमित झालेले ज्ञानच, स्वयंस्फुर्तीने, म्हणजेच अजाणतेपणी वापरीत असते. व हे असेच पिढ्यानपिढ्या सुरु असते. ही एक साखळी आहे. व आनंदाची गोष्ट अशी की ही साखळी तोडता येते, व नवीन ज्ञान जीन्समध्ये समाहित केले जाऊ शकते, व हे नवीन ज्ञान पुढच्या पिढीला दिले जाऊ शकते.

मग ही साखळी तोडणार कशी?

तर उत्तर अगदी सोपे आहे. जीवनशैली मध्ये सुधारणा. व्यायाम व पोषक आहाराचा दैनंदिन जीवनामध्ये अंगिकार.

आपले आई किंवा वडील लठ्ठ होते किंवा आहेत म्हणुन मी लठ्ठ आहे असे म्हणणारांनी खास हे जाणुन घेतले पाहीजे की लठ्ठपणा जरी आनुवांशिक असला तरी, त्याला गती देण्याचे काम तुमची जीवनशैली करीत असते. अनुवांशिकता बंदुकीमध्ये गोळी लोड करते आणि तुमची जीवनशैली ट्रीगर दाबते. त्यामुळे नुसते अनुवांशिकतेला किंवा आईवडीलांस दोष देऊन चालणार नाही, दोषी तुम्ही सुद्धा तितकेच आहात.

सारांश

कौटुंबिक पार्श्वभुमीचे म्हणजे जीन्स एकटेच तुम्हाला लठ्ठ करीत नाहीत. लठ्ठपणामध्ये जीन्सची भुमिका असतेच, तरीही, तुम्ही कसे आहात, हे तुमची जीवनशैलीच ठरवते. थोडक्यात तुमच्या लठ्ठ असण्याच्या किंवा होण्याच्या प्रक्रियेत ३०% योगदान वंशाणुचे असते तर ७०% तुमच्या जीवनशैलीचे. आणि हे तुमच्या पुढच्या पिढ्यांना देखील लागु होते.

 

तुम्ही काय करु शकता

  • कॅलरी मॅनेजमेंट करणे, पोषक आहार घेणे
  • योग्य मार्गदर्शकाच्या (जो कॅलरी मॅनेजमेंट मध्ये तुमची मदत करेल अशा) सुचनेनुसार योग्य व्यायाम करणे

तुम्हाला अजुन काही शंका असतील तर अवश्य आम्हाला संपर्क करा.

आपले

महेश व पल्लवी – 9923062525

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNjExNzc3Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzYxMTc3NyIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Bottom Line

Family history alone doesn’t seem to be enough to make you obese.

Genetics does play a role, but the truth is who you are is still determined by how you live your life.

So the same advice holds true:

  • Get active. Aim for 2 1/2 hours of moderate-intensity exercise like brisk walking every week. Even doing 10 minutes at a time helps. Weight training, done at least twice a week, will help make your muscles strong.
  • Eat less. Cut calories. Lopping off 500 to 1,000 a day can help you lose 1 to 2 pounds a week.

We have seen many examples of people giving upon weight loss as they think they can’t do it just because its genetic. But the truth is, you can make the difference not only in your life but also in the lives of next generations to come.

We are a weight loss centre in Pune and we deliever 100% results.

We, the healthy and fit family

We, the healthy and fit family

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.