Stay Fit Pune - The weight loss center

नवीन वर्षाचा संकल्प करताय? मग हे वाचाच…

नमस्कार,

आलाय की नाही अद्याप नवीन वर्षामध्ये? की अजुन ही आपण आहात २०१८ मध्येच?

अस खरच होत का की कुणीतरी अजुनही मागच्या वर्षात म्हणजेच भुतकाळातच राहीले आहे व काळ मात्र पुढे पुढे निघुन चाललाय? असे होते कधी होते का की आपण अजुनही आपल्या जुन्या विश्वामध्येच राहतो पण काळ मात्र पुढे पुढे सरकतो आहे? असे कधी होते का की आपली सुख दुःखे अजुनही जुन्या काळाशीच सुसंगत आहेत व वर्तमान मात्र सदैव गतिमान असुन सदैव बदलते आहे?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे बहुधा “हो” अशीच आहेत. ब-याच लोकांच्या बाबतीत असे होते की ते अजुन ही भुतकाळात असतात. भुतकाळातच रमणे, भुतकाळातच आपली सुखेदुःखे शोधण्यात त्यांना समाधान वाटते. प्रत्यक्षात वर्तमान मात्र गमावित असतात. हो अगदी ९२ टक्के लोकांच्या बाबतीत हे असेच होत असते. व राहिलेले ८ टक्के लोकच फक्त बदलत्या काळाच्या गती व घनतेसोबत स्वःतला बदलतात व काळासोबत चालतात.

मग असे स्वःत मध्ये बदल घडवणे म्हणजे नक्की काय बरे?

असे बदल घडवणे व काळाच्या गतीसोबतच चालणे व नवीन वर्षाचे संकल्प याचा काही संबंध आहे का?

होय संबंध नक्कीच आहे. आपण नवीन वर्षाचे असोत की साधारणपणे कोणतेही नवीन संकल्प करण्यामागे मुळ कारण असते ते म्हणजे आपण त्या ८ टक्के लोकांमध्ये असतो. ही ८ टक्के माणसे भुतकाळाकडून योग्य तो धडा शिकुन तर घेतातच पण ही माणसे भुतकाळात कधी ही रममाण होत नाहीत. यांची नजर भविष्याकडे असते. नजर जरी भविष्याकडे असली तरीही ही माणसे जगतात मात्र वर्तमानात. वर्तमानात जगण्यासाठी भुतकाळाचा अनुभव व भविष्याचे वेध असे दोन्हीही आवश्यक असते.

भुतकाळापासुन शिकणे म्हणजेच अनुभव. व या शिकलेल्या म्हणजेच अनुभवलेल्या गोष्टींचा उपयोग भविष्याचे नियोजन करण्यासाठी करणे नजर भविष्याकडे असणे होय.

मी तुम्हाला आज काही युक्त्या सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही स्वःतला या ८ टक्के लोकांमध्ये मोजु शकण्यात यशस्वी व्हाल. खालील युकत्यांचे काटेकोर पणे पालन केले तर तुम्ही भुतकाळातुन शिकणारे, वर्तमानात जगणारे , भविष्याकडे नजर असणारे असे काळाच्या मानगुटीवर स्वार होणारे असामान्य व्यक्तिमत्व नक्कीच बनणार यात शंका नाही. चला तर पाहुयात हे कसे करायचे ते.

१. भुतकाळाकडे बघण्याचा दृष्टीकोण

आपल्या भुतकाळाकडे आपण ति-हाईतासारखे जेव्हा पाहु शकु तेव्हा आणि फक्त तेव्हाच आपण भुतकाळापासुन शिकु शकतो. जेव्हा आपला अहंकार आपण भुतकाळाशी जोडतो तेव्हा दाट शक्यता असते की आपण भुतकाळामध्येच रममाण होऊ, नव्हे ९२ टक्के लोकांच्या बाबतीत अगदी हेच होत असते. आणि एकदा का आपण हा अलिप्तपणा म्हणजेच स्वःतला भुतकाळापासुन वेगळे करायला शिकु तेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो.

२. भविष्य बघणे

भविष्य पाहणे हे कदाचित तुम्हाला ज्योतिषामधील भविष्य पाहणे असे वाटु शकते. पण तसे नाहीये. आपले भविष्य आपणच पहायचे. हो अगदी बरोबर वाचले तुम्ही. आपणच आपले भविष्य पाहणे. कसे पहायचे आपले भविष्य मग? अगदी सोपे आहे ते. आपणास जी काही ध्येये गाठायची असतील येत्या वर्षात किंवा काळात, त्या ध्येयाचे तुकडे करणे म्हणजे ध्येय दिर्घकालीन ध्येय आपण अल्पकालीन अनेक ध्येयांमध्ये बदलणे. व ही छोटी छोटी अल्पकालीन ध्येय पुर्ण करताना स्वःतस पाहणे. उदा- माझे दिर्घकालीन म्हणजे येत्या वर्षाच्या शेवटापर्यंतचे ध्येय जर तंदुरुस्त होणे असे असेल तर सर्वात आधी मी स्वःत या वर्षाच्या शेवटी कसा दिसत असेल याची कल्पना करुन ते ध्येय चित्र मनावर बिंबवणे. मी माझे भविष्य असे पाहतोय की मी २०१९ च्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये ४२ किमी ची शर्यत धावुन पुर्ण केलेली आहे, फिनिशींग लाईन च्या आसपास माझ्या स्वागतासाठी माझे परिवारातील सदस्य, मित्र परिवार उभे आहेत. व मी दोन्ही हात वर करुन फिनिशींग लाईन पार केलेली आहे. आता माझे हे दिर्घकालीन ध्येय मी छोट्या छोट्या अल्पकालीन ध्येयांमध्ये परावर्तित करणार. जसे दैनंदिन ध्येये, आठवड्याची ध्येये, महिन्याची ध्येये. सहा महिन्याची ध्येये. असे.

दैनंदिन ध्येये ठरवताना मी फिटनेस साठी किती वेळ द्यायचा हे ठरवले पाहीजे. उपलब्ध २४ तासापैकी मी किती वेळ देणार हे ठरवले पाहीजे. मला हे दिसते आहे की मी दररोज फिटनेस साठी एक तास देतोय. या एक तासाच्या शेवटी घामाघुम होऊन, घोट घोट पाणी पित टॉवेल ने अंग, घाम पुसणारा मी मला दिसतोय.

आठवड्याच्या ध्येयांमध्ये मला ठरवावे लागेल की मी मी रनिंग किती वेळा आणि किती किमी करणार. आठवड्यातुन दोन दिवस रनिंग करताना मी मला पाहु शकलो पाहिजे. मी आठवड्यातुन दोनदा रनिंग करतोय भविष्यात असे स्वःत ला भविष्यात पाहणे जमले पाहीजे. तसेच मसल बिल्डींग, सायकलिंग, ॲब्स आदी साठी ठरवुन मी भविष्यातील मी पाहु शकलो पाहीजे. तसेच महिन्यांची ध्येये आपण भविष्यात गाठताना, आपण स्वःतस पाहु शकलो पाहिजे. अशा छोट्या छोट्या ध्येयांच्या पुर्णतेमध्ये माझे मोठे ध्येय साकार झालेले मला दिसले पाहिजे. त्यामुळे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भविष्य पाहणे.

३. पाहिलेले भविष्य जगणे

power of now

भविष्य पाहण्यात खुप ताकत असते. आपण जर आपले भविष्य खरोखरी पाहु शकलो तर ते भविष्य नुसते भविष्य न राहता, जीवनशैली बनुन जाते. आपोआपच ही सृष्टी, आपण स्वःत आपल्या नकळत हे भविष्य खरे करण्यासाठी धडपड करतो.

या अगदी सोप्या , करता येण्यासारख्या युक्त्या आहेत की ज्या तुम्ही फक्त आरोग्य, तंदुरुस्ती या साठीच मर्यादीत न ठेवता, आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रातील ध्येय गाठण्यासाठी वापरु शकता. त्यामुळे जर तुम्हाला खरच २०१९ मध्ये यायचे असेल, नवनवीन संकल्प करुन त्यांची पुर्ती करायची असेल तर वरील त्रिसुत्री अवश्य वापरा.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.