Stay Fit Pune - The weight loss center

मन व आरोग्यासाठी नवरात्रीचा उपवास

पावसाळा संपतोय आणि हिवाळ्याची चाहुल लागण्यास सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर महिना तस पाहिल तर संक्रमणाचा काळ आहे. वातावरणात आमुलाग्र बदल या महिन्यात अनुभवण्यास येतो. दिवसा भरपुर ऊन आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी. ऑक्टोबर महिना संपता संपता आपण हिवाळ्यात प्रवेश करतो देखील. हवामानात झालेला हा बदल काय आपल्या शरीरावर काहिच परिणाम करणार नाही? तर नक्कीच हा बदल आपल्या आरोग्यावर देखील प्रतिकुल परिणाम करतोच.

या बदलांना सामोरे जाताना आपण सर्व प्रथम सामोरे जातो ते नवरात्रीच्या उपवासाला. खरतर हवामानातील बदलांच्या मुळे आपल्या शरीराचे तापमानापेक्षा कमी तापमान बाहेरचे असल्याने, आपले शरीर अधिक चांगल्या पध्दतीने चयापचय करते. यातुन अधिक ऊर्जा शरीरास मिळावी हा हेतु असतो. जेणेकरुन थम्डीमध्ये देखील आपण ऊर्जावान राहु शकतो. खरेतर अशा वेळी आपण आपला आहार वाढवला पाहिजे, जेणे करुन येणार अधिक थंडीचा काळ आपण अधिक आरोग्यपुर्ण व निरामय राहु शकु!

मग का बरे आपल्या पुर्वजांनी हिवाळ्याच्या तोंडाशीच नऊ दिवसांच्या उपवासाची प्रथा सुरु केली असेल?

चला तर मग जाणुन घेऊया, नवरात्रीच्या उपवासा संबंधी अधिक रोचक व वैज्ञानिक माहिती.

आयुर्वेद म्हणते की हिवाळ्यात जठराग्नी अधिक प्रज्वलित होतो व त्यामुळे भुक जास्त लागते. याचा अर्थ आपल्या पुर्वजांस देखील हिवाळ्यातील ‘जास्त भुक लागण्याविषयी’ ठावुक होतेच. तरी देखील त्यांनी नवरात्रीचा उपवास करण्याची प्रथा का बनवली असेल, असा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे.

यात पुढे अधिक लिहिण्यापुर्वी, आपण काही मिथके म्हणजे गैरसमजुती काय आहेत ते पाहु व त्या गैरसमजुतींना कायमचे हद्दपार करुन टाकु.

उपवास शब्दाचा अर्थ काय आहे, हे या लेखात पुढे लिहिले आहेच. ते तुम्ही वाचाच. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे उपवास शब्दाचा अर्थ काय नाहीये हे समजुन घेणे. उपवास शब्दाचा प्राकृत म्हणजे मराठी अपभ्रंश उपास असा झाला. व शब्दशः उपाशी राहणे म्हणजे उपवास करणे अशी अंधश्रध्दा रुढ झाली. त्यामुळे वाचकांनी अगदी जाणीवपुर्वक स्वःतस वारंवार हे सांगणे गरजेचे झाले आहे की उपवास म्हणजे “उपाशी राहणे नाही”.

आता आपण मुळ प्रश्नाकडे येऊयात. का आपल्या पुर्वजांनी अशा पध्दतीचा उपवास सुरु केला असेल बरे?

तर याचे कारण अगदी स्पष्ट आहे. सुरुवातीस म्हंटल्याप्रमाणे हा कालावधी संक्रमणाचा कालावधी आहे. ऋतुमानामध्ये होणा-या बदलांसाठी आपल्या शरीरास तयार करण्यासाठी तसेच मातृस्वरुपिणी शक्तिस्वरुपिणी विद्यास्वरुपिणी नवदुर्गांच्या चरीत्र कथन व श्रवणातुन, शक्तिच्या साधनेला आरंभ, पुढच्या किमान तीन चार महिन्यांसाठी, हे सगळे करण्यासाठी या उपवासाची योजना आपल्या पुर्वजांनी करुन ठेवली आहे, असे मला वाटते.

हिवाळा सुरु जरी होणार असला तरी तो काही एका रात्रीतुन सुरु होत नाही. त्यासाठी काही काळ जावा लागतो. भुक वाढल्याची जाणीव होईस्तोवर, या उपवासाच्या माध्यमातुन आपण आपल्या शरीराला, ठराविक अंतराने, योग्य व पोषक आहार घेण्याची सवय लावलेली असते. यालाच वैद्यकिय भाषेत अक्लमटायझेशन असे म्हणतात.

आता आपण उपवास म्हणजे काय ते पाहुयात. उपवास या शब्दाची फोड उप+वास अशी होते. “उप” या शब्दाचा अर्थ आहे “समीप” म्हणजे “जवळ” व वास या शब्दाचे मुळ आहे “वस”. वसणे याअ अर्थाने. वास म्हणजे राहणे. तर दोन्ही शब्द जोडुन अर्थ काय होतो? “जवळ राहणे”…

परंपरागत अर्थ असा आहे की देवाच्या अधिक नित्य जवळ राहणे, जाणे म्हणजे उपवास होय. दैनंदिन जीवनातील व्यवधान निर्माण करणाया अनेक बाह्य गोष्टींना बाजुला सारुन एकच लक्ष्य ठेवणे त्यासाठी जे जे करणे असेल ते ते करुन देवाच्या अधिकाधिक जवळ राहणे म्हणजे उपवास होय. उपवासाचा खरा अर्थ हा आहे.

पण आपल्याकडे एक अजब अर्थ तयार झालेला दिसतो. तो म्हणजे काहीही न खाता किंवा खिचडी खाऊन किंवा कमी खाऊन, बाह्य अवडंबरे करुन राहणे म्हणजे उत्तम उपवास. जर हे खरे मानले तर आज मितीला आपल्या देशात नव्हे जगभरात अन्नान्न करुन, पाठ आणि पोट एक झालेले अनेक गरीब आहेत ज्यांना धड एक वेळेस देखील खायला मिळत नाही. मग त्यांचा ही उपवासच होईल की सध्याच्या उपवासाच्या अर्थाने. उपवास म्हणजे देवाच्या जवळ राहणे.

पण हल्लीच्या काळात खरच आपण काम धंदे सोडुन दिवसभर देवघरात, हरीनामाचा जप करु शकु का? आणि हो जर असे केले तर उत्तमच. अशा जपाचे अनेक फायदे आहेत जे आपल्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी खुपच महत्वाचे योगदान देत असतात. आपण ज्यावेळी आपले मन म्हणजेच चित्त देवाच्या ठिकाणी एकाग्र करीत असतो त्या वेळी या अर्थाने आपण चित्त एकाग्र करण्याचा अभ्यासच करीत असतो.

आपल्या देशात सध्या शरीराच्या सुंदरतेसाठी, सुदृढतेसाठी अनेक लोक प्रयत्न करीत असतात. पण एक गोष्ट सगळेच विसरतात ती ही की आपले शरीर केवळ एक साधन आहे. मुळ प्रेरणा आपले मन च देत असते आपल्या शरीरास काम करण्याची. आपले मन जितके जास्त निरोगी असेल तितके जास्त आपले शरीर कार्यक्षम होऊन आपण आपल्या ध्येयाच्या अधिक जवळ पोहोचु.

महाकाली महादुर्गा महासरस्वती

तर उपवासाच्या दिवसांमध्ये, शरीराच्या शुचिते सोबतच मनाच्या शुचितेसाठी आपण काय करु शकतो का याचा आपण थोडा विचार करुयात.

आपले मन नेहमी प्रसन्न राहील यासाठी आपण काही गोष्टी करण्यास सुरुवात केली पाहीजे.

  • मनामध्ये सत्व गुणांचा विकास होईल अशा गोष्टी केल्या पाहिजेत. जसे सकाळ संध्याकाळ छान भावगीते ऐकणे, एखादे किर्तन प्रवचन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे लेक्चर, मनाच्या ताकत ओळखण्यासाठी चे व्हिडीयो युट्युब वर पाहु शकता.
  • ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी आपण मौन व्रताचे पालन करण्याचा प्रयत्न करु शकतो. अगदी ठरवुन दिवसातील किमान तीन-चार तास जरी असे करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा खुप उपयोग होतो.
  • कुणाचीही कोणतीही बहुलुल्य संपत्ती असो किंवा अगदी क्षुल्लक वस्तु किंवा क्षुद्र स्वार्थ असो, मनाने किंवा वाचेने किंवा कायेने दुस-या कुणाच्या कशाचीच अपेक्षा न धरता, आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी व आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे. आपल्याकडे जे आहे त्यातच आनंदी राहणे याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या आयुष्यात प्रगती करु नये. सत-मार्गाने पैसा अवश्य कमवावा व तो खुप सारा कमवावा पण कसलेच मुल्य न देता कुणाचे ही काही ही घेऊ नये.
  • दररोज आपल्या अंगभुत आनंदाचा अनुभव घ्या. आपण आहोत, अजुनही आहोत ही खुप मोठी गोष्ट आहे. आपल्या असण्याचा आनंद साजरा करा व इतरांना देखील आनंदीत करा. Spread the happiness.
  • शक्य झाल्यास दर उपवासाच्या दिवशी आपल्यातील एक दुर्गुण शोधुन काढण्याचा प्रयत्न करा. स्वःत विचार करुन, आठवण्याचा प्रयत्न करा की आपल्या मध्ये काही दुर्गुण आहे का? व असेल तर तो दुर्गुण कुठे तरी लिहुन ठेवा व तो दुर्गुणा दुर करायचा संकल्प दिवसातुन किमान २१ वेळा करा. याचे मानसशास्त्रीय महत्व आहे. यामध्ये आणखी एक युक्ति तुम्ही वापरु शकता. ती म्हणजे आपल्या जवळच्या माणसास प्रेमपुर्वक विचारणे. तुमच्यात काय दुर्गुण आहे याविषयी आपल्या पत्नी,पती, मुले, मुलगी , मित्र , नातेवाईक यापैकी एकास, जो तुमच्या अगदी जवळचा आहे व त्यास तुमचे दोष देखील माहिती आहे अशा माणसाची मदत तुम्ही घेऊ शकता.

वर सांगितलेली पंचसुत्री आपण श्रावणातील मनाच्या उपवासासाठी करा. पुर्वीच्या काळी व्रत  वैकल्यांच्या माध्यमातुन देखील या साया गोष्टी होत होत्याच. सध्या संदर्भ बदलले आहेत. जीवनशैली बदलल्या आहेत. तसेच उपवासाचे अधिष्टान देखील बदलणे गरजेचे आहे असे मला वाटले.

तुम्हाला माझा हा लेख जर आवडला असेल तर अवश्य तुमच्या मित्र मंडळी नातेवाईंकांसोबत शेयर करा.

नवरात्रोत्सवातील नऊ उपवास करतील तुम्हाला अधिक आरोग्य संपन्न !

उपवासाने अशक्तपणा येऊन शरीरावर मनावर विपरीत परीणाम होण्याचे दिवस संपले. या उपवासाच्या निमित्ताने तुम्ही स्वःतला मनाच्या शुचितेसोबतच, अधिक चपळ, चंचल. सडपातळ, आरोग्यसंपन्न असे शरीर देऊ शकता.

खास महिलांसाठीच्या या दिवसांच्या उपवास स्पेशल प्रोग्राम मध्ये भाग घ्या स्वःतच्या शरीरामध्ये मध्ये होणारा आमुलाग्र बदल फक्त दिवसांमध्येच अनुभवा. तुमच्या चेहयावर तेज आलेले असेल, तुमच्या दैनंदिन कामामध्ये उत्साह वाढलेला असेल, तुमच्या असण्याने घरात आणि इतरत्र आनंद दरवळेल.

महिला स्वःत साठी या प्रोग्राममध्ये भाग घेऊ शकतात. पती आपल्या पत्नीला, मुलगा आईला, भाऊ बहिणीला, मित्र मैत्रिणीला आमच्याकडुन ह्या प्रोग्रामची मेंबरशिपभेटम्हणुन देऊ शकतो.
वाट कसली पाहताय मग!

खालील फॉर्म भरुन माहिती पाठवा आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करतील

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNDkxNzQwIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzQ5MTc0MCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.