….त्यामुळे हे साधन जपलेच पाहीजे.

…म्हणुन हे साधन जपलेच पाहिजे

या सृष्टीमध्ये मानवी शरीर म्हणजेच देह घेऊन आपणास जन्म मिळाला आहे. काही लोकांच्या मते परमेश्वरानेच जशी इतर सृष्टीची निर्मिती केली तशीच मानवाची देखील केली आहे. काही मतप्रवाह असे मानतात की पंचमहाभुतांच्या मिलापामुळे हे शरीर निर्माण झाले आहे. तर आधुनिका विज्ञान म्हणते की एक पेशीय प्राण्यापासुन उत्तरोत्तर प्रगती होत होत, निसर्गाच्या अन्न साखळीमधील सर्वात उच्च प्राणी, स्वामी म्हणुन उत्क्रांत होऊन मनुष्य निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या सांप्रदायांत वेगवेगळे सिध्दांत, ठोकताळे दिसतील. कधी कधी असे ही होईल की या सर्व मतप्रवाहांमध्ये एक वाक्यता अजिबात दिसणार नाही. उलट ते एकमेकांच्या अगदी विरुध्द वाटतील. काही तर्काच्या कसोटी वर बसत नाहीत तर काही विज्ञानाच्या. आणि अगदी उत्क्रांतीवादाबद्दल जरी बोलायचे झाले तरी, तो देखील सत्याच्या म्हणजे प्रयोगाच्या कसोटीवर उतरत नाही, तो केवळ एक सिध्दांत आहे, ज्याला प्रमाण काहीच नाही, केवळ ठोकताळे व निष्कर्ष आहेत.

मतप्रवाह काहीही असु देत. पण सर्वांना एक गोष्ट मात्र पक्की ठाऊक झालेली आहे, ती म्हणजे हे मानवी शरीर अमुल्य आहे. याचे प्रयोजन काय, कार्यकारण भाव काय, आपला जन्म का , आपण मरतो म्ह्णजे काय हे असले अनेक प्रश्न अजुनही करोडो लोकांच्या मनाचा ठाव अजुनही घेत आहेत. अशी अनेक कोडी आहेत की जी विज्ञानाला देखील अद्याप उलगडली गेलेली नाहीत.

पण आपण सर्व जण एका गोष्टीवर मात्र एकमत बनवु शकतो , ते म्हणजे वैश्विक जरामरणाची ही जी कोडी आहेत, ती कोडी सोवण्यासाठी आपणास एक साधन मिळाले आहे, ते म्हणजे आपले शरीर.

स्वामी विवेकानंदांनी मागील शतकामध्ये, न्यु यॉर्क शहरामध्ये एक व्याख्यान दिले. त्या व्याख्यानाचा विषय होता – मानवाचे सत्य व आभासमय रुप!

या व्याख्यानाच्या सुरवातीलाच स्वामीजींनी एक वाक्य उच्चारले, ते असे “वेदांत दर्शनाचा एकमेव उद्देश आहे, एकमेव विषय आहे – एकत्वाचे अन्वेषण. हिंदु मन, तपशीलांत रमत नाही, ते विशेषाकडे लक्ष देत नाही. हिंदु मनाला नेहमी त्यामागील सामान्य तत्वाची नव्हे वैश्विक तत्वाचीच ओढ वाटत असते” गुढ वाटणा-या अशा विषयांकडे आपण भारतीय अनादी काळापासुनच आकर्षिले गेलो आहोत. त्यामुळेच की काय किंवा तत्वांची नीटशी उकल न झाल्याने देखील असे होऊ शकते की, भारतीय चंगळवादापासुन अनेक सहस्त्रके दुर होता. चंगळवाद नव्हता म्हणुन शारीरीक व्याधी देखील फारश्या नव्हत्या. आणि ज्या काही होत्या त्यांवर देखील आयुर्वेदाद्वारे सखोल संशोधनातुन, उपाय शोधले होतेच.

पण जस जसे आपण तत्व सोडुन देऊ लागलो तस तसे आपण म्हणजेच भारतीय निरामय जीवनापासुन दुर जात आहोत. याचेच प्रत्यंतर आपणास भारतातील वाढत्या स्थुलपणामध्ये, वाढत्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, वाढत्या हृद्यविकारांमध्ये दिसुन येत आहे.

स्वामीजी याच व्याख्यानामध्ये पुढे म्हणतात की ज्याचे ज्याचे म्हणुन विघटन करता येते ते सारे नश्वर आहे. व ज्याचे ज्याचे विघटन होत नाही ते म्हणजे ईश्वर होय. किती साधी सोपी व सरळ व्याख्या स्वामीजींनी केली पहा जीवनाची, ईश्वराची व अध्यात्माची.

स्वामीजींच्या म्हणण्यानुसार जेजे विघटन होऊ शकते ते म्हणजे नश्वर! आणि आपण म्हणतो की जे नाश पावते ते म्हणजे नश्वर! वस्तुतः आपले शरीर खरेच नाश पावते का? तर नाही. नाश पावुच शकत नाही. आपल्या शरीराचे केवळ विघटन होत असते. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी नश्वर आहे. प्रत्येक पेशीचे विघटन होते. व असंख्यात पेशींनी मिळुनच आपले शरीर बनले आहे. व जेव्हा आपले शरीर म्हणजे शरीरातील सर्व पेशी सर्वप्रथम संघटीत झाल्या तेव्हा ते योग्यच असते. वयाला साजेशे असते. पण जस जसे आपले वय वाढते तस तसे आपण सृष्टीच्या नियमांना डावलण्यास सुरुवात करतो व पेशी विघटनाचे कार्य, की जे मृत्यु नंतर होत असते, त्या कार्यास सुरुवात जिवंतपणीच करतो.

अर्थात आज पुन्हा फिटनेस वगैरे वर लिहायचा माझा बेत नाही, त्यामुळे आवरते घेतो. पण आपण भारतीय म्हणुन, नीट विचार केल्यास आपणास समजेल की आपल्या पुर्वजांनी कित्येक महान सिध्दांत मांडले व या सिध्दांताच्या आधारे आपल्या शेकडो, हजारो पिढ्या निरामय आयुष्य जगल्या देखील.

आज स्वामीजींच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

एकीकडे पाश्चात्य संस्कृतीचा भस्मासुर भारतीयतेला गिळण्यासाठी आ करुन, पुढे पुढे येतो आहे तर दुसरीकडे भारतीय लोक स्वतःच भारतीयत्वाचा विसर पडल्याने, त्या राक्षसाच्या आ केलेल्या मुखात जाण्यासाठी पुढे पुढे त्याच्या कडे जात आहेत.

शरीर एकदाच मिळते, भरपुर उप्भोग करुन घ्या! ऐष करा! हा विचार घातक आहे.

आपण मानतो की नश्वर शरीर केवळ उपभोगाचेच साधन नाही तर ते ईश्वराला (स्वामीजींनी सांगितलेला ईश्वर) मिळविण्याचे देखील एक आणि एकमेव साधन आहे. त्यामुळे हे साधन जपलेच पाहीजे.

कळावे

Mahesh and Pallavi Thombare

Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyMTcyNSIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjEzNjg2IiwiYWN0aW9ucyI6IjMxNSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3Vwc3lzdGljLTQyZDcua3hjZG4uY29tXC9fYXNzZXRzXC9mb3Jtc1wvaW1nXC9wcmV2aWV3XC9iYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld19pZCI6IjExXzIwNjc5OCIsInZpZXdfaHRtbF9pZCI6ImNzcEZvcm1TaGVsbF8xMV8yMDY3OTgiLCJjb25uZWN0X2hhc2giOiI0NzhhZDJhMGM1OWE0NjEyY2VkNDIyYzQ5OTg0YTRhNyJ9

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.