Stay Fit Pune - The weight loss center

Weight loss and wellness coach in Pune

My Marathon Story

वजन कमी करणे

मी माझ्या कुटुंबीयासमवेत (वजन कमी करण्यापुर्वी)

आरोग्य की धनसंपत्ती?

 

माझ्याकडे तुमच्या साठी एक भन्नाट नोकरी व्यवसायाची संधी आहे. यात तुम्हाला अमर्याद बॅंक बॅलेंस मिळेल. पण तुम्हाला यासाठी दिवसाची सुरुवात लवकर करुन, कामावर पोहोचावे लागेल, खाण्यासाठी वेळ मिळाला तर खाल्ले नाहीतर उपाशी पोटी, वेळीअवेळी जेवण करुन कष्ट करावे लागतील. रात्री उशिरापर्यंत काम करुन उशिरा झोपावे लागेल आणि दुस-या दिवशी पुन्हा तीच स्पर्धा करावी करावी लागेल. एवढे करुन तुमचे बॅंकेतील खाते नक्कीच वजनदार होईल. तर, ह्या अशा संधी साठी किती लोक तयार होतील?

दुसरीकडे तुम्हाला जर मी अशी संधी दिली की ज्यात तुम्ही एक आरोग्य संपन्न, स्फुर्ती आणि तेजाने भरलेले जीवन जगाल, की ज्यात कामावर जाण्याआधी तुम्ही चांगला २० एक मिनिटे मॉर्निंग वॉक कराल, थोडासा व्यायाम कराल, संतुलित आहार तो देखील ठराविक कालावधी नंतर घ्याल. हे सगळे करुन तुम्ही स्वतःला एक अतिशय चांगली जीवनपध्दतीच भेट म्हणुन द्याल.

तर मित्रांनो, वरील दोन्ही संधींपैकी कोणती संधी तुम्ही निवडाल? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतलाच माझा खालील अनुभव वाचल्यावर द्या.

मी काय निवडले?

ह्या संधी सर्वांसमोरच नेहमीच असतात. माझ्यासमोर  ही होत्या. त्यावेळी मी, पहीला पर्याय निवडला. अर्थातच यामुळे अपेक्षेप्रमाणे माझे बॅंक अकाऊंट वजनदार झाले. पहीले ४-५ वर्षे व्यवसायाची, उमेदीचा कैफ ईथपर्यंत होता की प्रसंगी मी रात्रीचे काम आणि दिवसादेखील काम ह्या पातळीपर्यंत आलो. भुक लागेल तेव्हा वेळ असेल तर जे मिळेल ते, प्रसंगी वडापाव देखील खाऊन मी माझे बॅंक खात्याचे वजन वाढवण्याचे काम करीत राहिलो. आणि परीणाम असा झाला की बॅंक खात्याच्या वजन वाढवण्याच्या नादात मी, स्वतचे वजन ८५ किलो पर्यंत नेले. मी देखील वजनदार झालो.

मी प्रमाणापेक्षा जास्त वजनदार झालोय, हे मला माझ्या तीन वर्षाच्या मुलासोबत टेनिस खेळताना समजले. मोजुन तीन ते चारच मिनिटे मी त्याच्याशी खेळु शकलो आणि माझ्या हृद्याचे ठोके इतके वाढले की मला धापा लागु लागल्या. दिवसा माझ्यासमोर मला तारे चमकताना दिसले. माझ्या शरीरामध्ये मध्ये काहीतरी मोठा बिघाड झालेला आहे हे मला सांगण्यासाठी कुणाही डॉक्टर आवश्यकता नव्हती.

मला झालेला हा साक्षात्कार, मला स्वस्थ बसु देत नव्हता. माझ्या स्वःतच्या निष्काळजीपणाची किंमत माझ्या कुटुंबास मोजावी लागली तर? डोक्यात अक्षरक्षः मुंग्या आल्या व मग मी मनाशी ठाम निश्चय केला की मला सगळे काही ठिक , पुर्ववत करायचे आहे.

मी काय केले?

मी जिम मध्ये जाऊन व्यायामास सुरुवात केली. जिम जॉईन केल्यापासुन मला थोडे बरे वाटले. हलके हलके वाटायला लागले. हळु हळु चरबी कमी होतेय असे ही जाणवायला लागले. पण माझे वजन काही कमी होत नव्हते. व्यायामामुळे मला अधिल भुक लागुन मी पुर्वी पेक्षा अधिक जास्त जेवण करायला लागलो. परीणामी माझे वजन अधिकच वाढले.

वजन, कुटुंबाची काळजी हे दोन्ही ही वाढत होते. असाच अभ्यास करता करता मला समजले की पोषक आणि संतुलित आहार नसल्यानेच माझे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले आहे. मग मी सुरुवात केली माझ्या स्वतच्या प्रथिन गरजा योग्य प्रमाणात भागवण्यास. त्यासोबतच संतुलित आणि ठराविक अवधीनंतर आहार, तसा जेवायला बसलो की जेवणावर ताव मारण्याचा आपला मराठी बाणा अंगात अजुन ही होताच. तरीही स्वतला सावरत, सांभाळत मी सलग तीन महीने माझ्या प्रथिन आहारावर लक्ष केंद्रीत केले. आणि मला हवा असलेला परीणाम मी तिस-या महीन्यात मिळवला.

परीणाम काय झाला?

मी माझे वजन तब्बल १३ किलोग्राम नी कमी केलेले होते. आता माझ्या मुलासोबत मी टेनिसच काय पण इतर कोणताही खेळ न दमता खेळु शकत होतो.

आहारावरील लक्ष आणि हलकासा थोडा व्यायाम दररोज, ह्या सगळ्याचा परीणाम माझ्या आरोग्यावर होताना मी पाहत होतो. सुरुवातीस पाच मिनिटे दररोज चालणारा मी, तीन महिन्यांनंतर धावायला पळायला लागलो. माझ्यातील दम (स्टॅमिना) इतका वाढला की मला आता मी नुमवी मध्ये असतानाचा, धावण्याच्या शालेय स्पर्धेत भाग घेणारा छोटा महेश ठोंबरेच आहे असे वाटायला लागले. माझी क्षमता दिवसेंदिवस वाढत होती.

जो स्वतःच्या मुलासोबत ३ मिनिटे खेळु शकत नव्हता तो, पाच महिन्यात १० किमी सलग न दमता पळु लागला होता. पुढचा टप्पा २१ किमी चा. माझ्या वरील फोटो कडे पाहुन मला आजही विश्वास बसत नाही की मी खरच २१ किमी पळु शकतो. आणि हो, मी २१ किमी धावलो. सलग २१ किमी न थांबता, न थकता.
weight loss in Pune

माझ्या क्लब मेंबर्स सोबत मी मागच्या आठवड्यातील नगर मॅरेथॉन नंतर

मॅरेथोन मध्ये सहभागी होणे आता माझ्या साठी नवीन नाही. मागच्याच आठवड्यात मी माझ्या क्लब मेंबर्ससोबत नगर जिल्हा मॅरेथॉन मध्ये भाग घेतला.

माझे ध्येय?

हा माझा अनुभव मलाच नेहमी प्रेरणा देत असतो. माझ्या समोर ध्येय आहे स्फुर्तीदायी, सक्रिय, टवटवीत, ताजेतवाने, चपळ आणि जीवनाचा भरभरुन आनंद घेण्याचे.

weight loss in Pune

मी, महेश ठोंबरे, तुमच्या ध्येयवाटेवरील तुमचा सांगाती

आणि तुमचे?

जर तुमचे ही असेच ध्येय असेल तर मी तुम्हाला मदत करु शकतो. अवश्य संपर्क करा.

धन्यवाद

महेश ठोंबरे

Facebook Comments

Comments
ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.