Stay Fit Pune - The weight loss center

फिरुनी नवा जन्मलो मी – माझी सक्सेस स्टोरी

२०१८ हे वर्ष माझ्यासाठी खुपच महत्वाचे ठरले. व्यवसायामध्ये नवनवीन मैलाचे दगड गाठत असताना, मी माझ्या आवडीनिवडी, छंद जोपासण्याला देखील सुरुवात केली. मला भटकंतीची भारी आवड आहे. त्यातल्या त्यात बाईक वर मित्रांसोबत उंडारणे, वेगवेगळ्या घाटवाटा, लांबलांबचे तीर्थक्षेत्रे, जंगले, अभयारण्ये, किल्ले हे सगळे माझ्या नेहमीच्या टु-डु लिस्ट मधील पराक्रम. आणि कामधंद्यातुन वेळ मिळाला की लगेच आमची मित्रंमंडळी आणि मी वाट फुटेल तिकडे आमच्या गाड्या दामटत असतो.

माझ्या मित्रांसोबत एका मोटरसायकल राईड दरम्यानचा फोटो

मला फोटोग्राफी म्हणजे मोबाईल फोटोग्राफीचे सुध्दा आवड आहे. फिरणे, विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, सगळ्याचा मनमुराद आनंद घेणे आणि घेतलेला आनंद सोशल मीडीयावर मित्रांसोबत शेयर करणे देखील मला खुप आवडते.
पण साधारणपणे जुलै ऑगस्ट २०१८ मध्ये मला, माझ्या मध्ये झालेला एक बदल जाणवला. माझ्या फेसबुक अकाऊंट वरील फोटो पाहत असताना मला अचानक समजले की मी माझे फोटो फेसबुक वर शेयर करताना, फक्त छाती पासुन वरील शरीराचा भागच फक्त असतील असे फोटो टाकायचो. अगदीच एखादा फोटो पुर्ण असेल तर मी क्रॉप करुन मला पाहिजे तोच भाग फक्त पोस्ट करायचो. तुम्ही माझी फेसबुक टाईम लाईन पाहु शकता. मी असे का करायचो? याचे कारण होते, माझ्या पोटावरील वाढलेली चरबी, वाढलेले पोट. मला हे समजण्याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे माझ्या कार्यक्षमतेवर झालेला परिणाम.
मी जेव्हा नोकरीस सुरुवात केली तेव्हा माझ्या शिकविण्याच्या पध्दतीमुळे, इंस्टीट्युट मध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक बनलो. आणि त्यातच माझे वय देखील विद्यार्थ्यांच्या पेक्षा फार जास्त नव्हते तेव्हा (२०११). याचे कारण होते, माझ्यातील प्रचंड ऊर्जा. आणि ही ऊर्जा, उत्साहच माझ्यातील चांगल्या शिक्षकाचे मुख्य शस्त्र होते. पुढे मी स्वःत, माझे स्वःतचे ट्रेनिंग सेंटर सुरु केले. ऊर्जा, उत्साह असल्यामुळेच, मी नोकरी सोडुन, व्यवसाय करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि तोच उत्साह व ऊर्जा यामुळे अल्पावधीतच मी कामोठे परिसरामध्ये, नावलौकीक मिळवला. एमएससीआयटी सारख्या नामांकित अभ्यासक्रमामध्ये शेकडो विद्यार्थी माझ्याकडे शिकु लागले. आणि मागील तीन चार वर्षात हजारो विद्यार्थी माझ्या कडे शिकुन गेले, मोठे झाले. जेव्हा कधी माझे विद्यार्थी मला भेटतात व त्यांचे कुशल मंगल सांगतात तेव्हा भरुन पावल्याचे समाधान मला मिळते.

एप्रिल २०१८ मधील माझा फोटॉ

पण मागील काही महिन्यांमध्ये, माझ्या मध्ये तो उत्साह , ती ऊर्जा, नवनवीन टारगेट ठरवणे, व ती गाठणे या सा-या बाबतीत एक ग्लानी आल्यासारखे मला जाणवु लागले. सुरुवातीस मला वाटायचे की व्यवसाय चांगला सुरु आहे, नाव, पैसा सगळे मिळत आहे, एक प्रकारे सेटल झाल्यामुळे माझ्या ॲटीट्युड मध्ये बदल झाला असेल मला वाटले. पण ही शिथिलता माझ्या काही कामाची नव्हती. मला कंप्युटर क्षेत्रात अजुन नवनवीन ध्येये गाठायची आहेत, नवनवीन यशाची शिखरे पादाक्रांत करायची आहेत. त्यामुळे मी सप्टेंबर २०१८ मध्ये, सगळा आळस सोडुन, पुन्हा नव्या उमेदीने कामाला सुरुवात करायचे ठरवले. व मी कामाला लागलो सुध्दा.
एक नवीन व्यवसाय देखील मी आधीच सुरु केला होता. सीसीटीव्ही चा. त्याकडे देखील मी जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली. या नवीन कामामध्ये मला खुप फिरण्याचे काम होते. नवनवीन लोकांना भेटणे, त्यांना प्रेजेंटेशन देणे, निगोशियेशन करणे, इत्यादी गोष्टी मी खुप जोमात सुरु केल्या. या कामामध्ये व्यक्तिमत्व प्रभावी असणे खुप महत्वाचे असते हे देखील मला समजायला लागले.पण मी जेवढे जास्त काम करायचो तेवढा जास्त मी थकायचो. एखाद्या अगदी पाच पाच माळ्यावरील ऑफीस मध्ये जिन्याने चढणारा मी, लिफ्टच्या दारापुढे, लिफ्टची वाट पहायला लागलो.

दोघींच्या मध्ये जो लठ्ठ माणुस दिसतोय, तो मीच आहे

एकदा असेच दुस-या मजल्यावरील एका ऑफीसात मिटींगला जायचे होते, त्या बिल्डींग मधील लिफ्ट बिघडली होती, आणि मला जिन्याने जावे लागले. गेल्या गेल्या मिटींग सुरु झाली.पण मी विंनती करुन त्यांच्या कडुन चक्क ५ मिनिटे मागुन घेतली. कारण होते, जिन्या चढल्यामुळे, लागलेया धापा काही अजुन थांबल्या नव्हत्या, आणि मला बोलता देखील येईनासे झाले.
विशिष्ट प्रकारचे फोटोच फेसबुकवर पोस्ट करणे, धापा लागणे, थकवा येणे या सगळ्यामुळे मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलो.
“माझे वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेय.”
व याचाच परिणाम होता की ज्यामुळे माझी कार्यक्षमता कमे झाली. मिटींग्स मध्ये वाढलेल्या पोटाला सतत आत ओढुन घेऊन बोलावे लागत होते. उभे राहताना देखील तसेच, फोटो काढताना देखील तसेच. सतत आपल्या वाढलेल्या पोटाला लववण्याचा अयशस्वी प्रयत्न मी करीत होतो. ऑफीस मध्ये आधी मी सलग तीन चार तास बसुन काम करु शकायचो, एकेका तासाचे लेक्चर सहज घ्यायचे, आता मला ते जमत नव्हते. इच्छाशक्ती असुन देखील जमत नव्हते, कारण होते, माझे वाढलेले वजन.
एकदा नात्यातील एका कार्यक्रमामध्ये मी आई वडीलांसोबत गेलो होतो. तिकडे मला एक खुपच आकर्षक आणि उत्साहाने भरलेले एक व्यक्ति भेटले. त्यांना लांबुन पाहुन मी चौकशी केली ते कोण आहेत अशी, तर रे महेश ठोंबरे, आमचेच नातेवाईक असल्याचे समजले. आवर्जुन त्यांना भेटायला गेलो. गप्पा मारता मारता त्यांच्या विषयी अनेक भन्नाट गोष्टी समजल्या. माझ्या पेक्षा वयाने किमान १०-१२ वर्षांनी जास्त असतील ते, पण उभे राह्ण्याची स्टाईल, बोलणे, हसणे, चेह-यावरील तेज हे सगळे माझ्यासारख्याला लाजवेल असे आहे. मला त्यांच्यासारखेच व्हायचे असे मी मनोमन ठरवले. व दोन तीन दिवसांनी आवर्जुन वेळ काढुन त्यांना भेटायला गेलो, त्यांच्या पुण्यातील फिटनेस क्लब मध्ये.

Weight loss and wellness coach in Pune

Mahesh Thombare

ती भेट खरतर, २०१८ मधील माझ्यासाठी सर्वात महत्वाची घटना होती. त्यानंतर त्यांनी ज्याप्रकारे माझे कोचिंग, काऊंसेलिंग केले, त्यामुळे मला समजले की माझे वय जरी कमी असले तरी माझे शरीर मात्र एखाद्या ४५-५० वर्षे वय असलेल्या माणसासारखे झाले होते. त्याची कार्यक्षमता पन्नाशीच्या माणसाची बनली होती.

आता काय करायचे?’

जे काही करावे लागेल ते करायलो मी तयार होतो. अर्थात माझी कामे मला व्यायाम करण्यासाठी वेळ देणार नव्हती. सकाळी नेहमीच मला उठायला उशिर होतो कारण माझी बहुतांश कंप्युटर मधील अभ्यास व विशेष संशोधन करणे यासाठी मला रोजच रतरात्री किमान १२ तरी वाजतात झोपायला. त्यामुळेच जेवणाच्या वेळा देखील अनियमित आहेत, व त्यात देखील सुधारणा करणे मला शक्य होणार नव्हते.

मग काय करणार?

महेश सर म्हणाले की काही काळजी करु नकोस. त्यांनी माझी दिनचर्या पाहुन, त्याप्रमाणेच मला आहार-विहाराचा एक प्रोग्राम दिला. मला शंका होती सुरुवातीस, पण माझ्या पुढे पर्याय नव्हता. म्हणुन मी सरांनी सांगितल्याप्रमाणे, माझ्या आहारविहारात थोडासा बदल केला.

परीणाम काय झाला?

जानेवारी मध्ये मी चक्क १० किलो वजन कमी केले होते. १० किलो वजन कमी झाल्यामुळे, इतरांना माझ्यातील बदल स्पष्टच जाणवु लागला. पण माझ्यामध्ये होत असलेले बदल मी अगदी पहिल्या आठवड्यापासुन अनुभवत होतो.
व यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ऊर्जा व उत्साह यांच्या मध्ये प्रचंड प्रमाणात होत असलेली वाढ.
या फिटनेस प्रोग्राममुळे आता मला, पोट लपविण्याची गरज पडत नाही. संपुर्ण फोटो मी सध्या फेसबुकवर पोस्ट करु शकतो. तासनतास ऑफीस मध्ये काम करु शकतो, नवीन सीसीटीव्ही च्या व्यवसायामध्ये अधिक जोमात काम करु शकतो, आणि त्याही पेक्षा महत्वाचे ५-५ मजले सहज जिन्याने चढुन जाऊ शकतो.

फिरुनी नवा जन्मलो मी

या सगळ्यामुळे मी खुपच प्रभावित झालो. महेश सरांनी माझ्या चुकीच्या दिनचर्येमध्ये हळुहळु बदल घडवुन आणला. माझी जीवनशैलीच बदलली आणि गंमत म्हणजे माझ्या नकळत, महेश सरांनी हे घडवुन आणले. लवकर निजे, लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपत्ती मिळे या म्हणीचा अर्थ काय असतो याचा अनुभव मला स्वःतलाच आला.
आता, मी स्वःत देखील माझ्या परिचयाच्या डझनभर लोकांना, फेब्रुवारी महिन्यापासुन आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. आणि ज्यांना मी मार्गदर्शन केले, त्यांच्याही बाबतीत असेच सकारात्मक परिणाम त्यांना व मला ही दिसत आहेत.
एका नवीन रोल मध्ये मी मला पाहतोय सध्या. एक फिटनेस कोच.

फिरुनी नवा जन्मलो मी..

 

आपला,

दिपक सातपुते

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.