Stay Fit Pune - The weight loss center

मन की शरीर? दोन्हीपैकी महत्वाचे काय?

आपले मन व शरीरस्वास्थ यामध्ये काही सबंध आहे का? आपल्या मनाचे स्वाथ्याचा परीणाम आपल्या शरीर स्वास्थ्यावर होत असतो की आपल्या शरीर स्वास्थ्याचा परीणाम आपल्या मनाच्या आरोग्यावर होत असतो?

आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या पैकी बहुतांश लोकांना हे माहित आहे की आपले शरीर स्वास्थ्य म्हणजेच आपली फिटनेस हेच आपली सर्वात महत्वाची व अगदी सर्वोच्च प्राथमिकता हवी. ही संकल्पना आपल्या कडे फार वेगाने जरी रुजत नसली तरी रुजते आहे हे मात्र नक्की. कित्येकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीस नवीन संकल्प किंवा वाढदिवसाच्या दिवशी व्यायाम व फिटनेस चा संकल्प केला जातो. अशापध्दतीने व्यायामास दैंनदिन जीवनाचा भाग करणारे अनेक जण आपण पाहत असतो.

पण यातील किमान ५०% तरी काही दिवसांमध्येच किंवा काही आठवड्यांमध्येच व्यायाम, आहार, विहाराचे रुटीन सोडुन देतात व पुनः त्याच ग्लानी आलेल्या जीवनशैली कडे झुकतात. त्यांच्या फिटनेस गोल्स पासुन ते दुर जातात. सुरुवातीस अगदी जोशात व्यायाम, जिम, डायट हे सर्व करुन देखील असे लोक यशस्वी होताना दिसत नाहीत. याचे कारण काय असेल?

या लेखामध्ये मी याच मुद्द्यावर अधिक प्रकाश टाकणार आहे. माझ्या मतानुसार, या अपयशी होणा-या लोकांना नेमका एक कळीचा मुद्दाच समजलेला नसतो. व तो महत्वाचा मुद्दा आहे शरीर आणि मन यातील परस्पर संबंध.

चला तर मग आपण आपल्या जीवनाविषयीचा एक अत्यंत महत्वाचा, अंगभुत, पायाभुत नियम समजुन घेऊयात. आणि हा आपल्या येणा-या पुढच्या पिढ्यांना देखील सांगुयात.

ते तत्व आहे

आपले शरीर व मन परस्परावलंबी, परस्परपुरक आहेत

भलेही हे तत्व आपणास माहित असो व नसो पण हे तत्व काम मात्र अहोरात्र करीत असते. इथुन मागे ही याच एका तत्वाने आपले जीवन ठरवले आहे व पुढे ही आपल्या जीवनाची दिशा हे एकच तत्व ठरवेल. हे आपल्यावर अवलंबुन आहे की, जर आपण हे तत्व समजुन घेतले तर याचा उपयोग करुन आपण आपल्या शरीर व मन यातील संबंध सुधारुन त्यामध्ये अधिक सौहार्द, सजगता, सरलता आणु शकतो.

ॲनॅटॉमी ऑफ स्पिरीट या एका प्रसिध्द पुस्तकामध्ये लेखिका चरीत्रद्वारे शरीर निर्मीती होते त्याबद्दल काय बोलते ते पहा

आपणा जसे जसे आपले जीवन व्यतीत करतो तस तसे आपली शरीर प्रकृती हेच आपल्या चारीत्र्याचा आरसा होऊन जातो…..आपल्या मनातील प्रत्येक विचार, आपल्या शरीरामध्ये काहीनाकाही जैविक क्रिया-प्रक्रियेस जन्म देत असतो……आपले विचारच आपल्यातील जैविक प्रतिक्रियांना जन्म देत असतात व या प्रतिक्रिया आपल्या पेशीय मेमरी मध्ये साठवुन ठेवल्या जातात. व त्यातुनच आपले जैविक शरीर विणले जात असते.

एक फ्रेंच तत्ववेत्ता अगदी मोजक्या शब्दांमध्ये हे सारे सांगतो. तो म्हणतो “I think, therefore I am..” म्हणजे मी विचार करतो (मी आहे असा) म्हणुनच मी आहे!

आपले मन हे आपल्या असण्याचे कारण आहे. त्यामुळे आपल्याला समजलेले हे तत्व वापरुन आपण निरोगी, निरामय आयुष्य कसे जगावे हे सर्वस्वी आपल्याच हातामध्ये आहे.

एक महत्वाचा मुद्दा आपण आत्ताच समजुन घेतला आहे. तो म्हणजे आपले मन आपल्या शरीराच्या प्रकृती स्वास्थ्यावर खुप मोठा परीणाम करीत असते.

चला आता आपण नाण्याची दुसरी बाजु समजुन घेऊयात.

ज्याप्रमाणे आपले मन, आपले शरीर स्वास्थ्यावर परीणाम करते तसेच आपल्या मनाच्या आरोग्यावर मनाच्या उत्तम सर्वोत्तम स्थिती साठी , मनावर परीणाम होईल असे काही घटक आहेत का?

हो, आपल्या मानसिक व भावनिक आरोग्यावर परीणाम करणारे दोन घटक आहेत ते खालील प्रमाणे

  • आपण काय खातो ते अन्न
  • आपण शारीरीक दृष्ट्या किती सक्रिय (ॲक्टिव्ह) आहोत

पण वरील दोन्ही गोष्टी आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी महत्वाच्या असतात असेच आजवर आपण वाचत, ऐकत, पाहत आलो आहोत. बरोबर ना?

हो खरे आहे हे!

पण शरीर प्रकृती सुधारणे केवळ हे एकच काम वरील दोन घटक करीत नाहीत. ते मुख्य्त्वे करुन आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर परीणाम करतात. ते आपल्या बौध्दीक व भावनिक आरोग्यावर परीणाम करतात.

अधिक स्पष्ट करुन सांगतो

आपण जैविक दृष्ट्या म्हणजे आपले शरीर स्वास्थ्य कसे असणार आहे या विषयी महत्वाची भुमिका आपले मन घेत असते. त्याप्रमाणेच आपले शरीरस्वास्थ्य जसे असेल तसेच आपले मन देखील बनत असते. उदा – आपण जर स्थुल जीवनशैली म्हणजे कमी शारीरीक श्रम करीत असु तर आपले मन देखील तशाच पध्दतीचे संकेत देत राहणार. निष्क्रीय होत राहणार. तुम्ही जर वजनदार,  आळशी, अनुत्साही असाल तर तुमची विचार करण्याची प्रक्रिया देखील तशीच होऊन जाते.

तुमचे जर मन कार्यक्षम, चंचल असेल तसेच तुमचे मन देखील होते.

या आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजु! त्यातील एक जरी नीटसे काम करीत नसेल तरी एकुणच आपले असणे आनंददायी होणार नाही.

हे चक्र आहे. जसे सायकल चालवताना तिचे पेडल्स आपण मारतो. त्यातील एक पेडल खाली दाबताना, आपोआपच दुसरा पेडल वर येतो. व वर आलेला पुन्हा खाली मारताना पहिला वाला पुन्हा वर येतो. आणि हे चक्र असेच सुरु राहते.

याचाच अर्थ आपले विचार, भावना, विश्वास, हेका हे आपल्या शरीराच्या आरोग्यावर सकारात्मक अथवा नकारात्मक परीणाम करतात.

दुसरीकडे आपण शारीरीक दृष्ट्या कसे आयुष्य जगतोय याचा देखील सकारात्मक अथवा नकारात्मक परीणाम आपल्या मनाच्या आरोग्यावर होत असतो.

याचाच अर्थ मन व शरीर यांचा परस्पर संबंध जरी क्लिष्ट असला तरी तो आहे. व हेच ते तत्व आहे जे आपण समजुन घेतले तर आपण आपल्या जीवनामध्ये आनंद दररोज, क्षणाक्षणाला अनुभवु शकतो. यालाच आपण जीवनशैली, लाईफस्टाईल असे म्हणु शकतो. आणि मी नेमक हेच साध्य करुन, म्हणजे जीवनशैली मध्ये बदल करुनच माझ्या ग्राहकांना मदत करीत असतो.

माझ्या पुढच्या लेखामध्ये वाचा, शारीरीक व्यायाम आदी प्रकारातुन मनस्वास्थ्य कसे प्राप्त करावे.

माझा हा लेख तुम्हाला कसा वाटला, अवश्य खाली कमेंट करुन सांगा. लेख अधिकाधिक शेयर करा, जेणे करुन, जास्तीत जास्त लोकांस निरोगी जीवनाचा हा मुलमंत्र मिळेल.

धन्यवाद

आपला

महेश ठोंबरे

9923062525

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNjQ1MDM2Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzY0NTAzNiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.