Stay Fit Pune - The weight loss center

उन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे?

व्यायाम करणे, धावणे, खेळणे हा माझा नित्याचा कार्यक्रम आहे. रनिंग साठी मैदानावर जातो मी, आणि तिकडे अनेकजण आता माझ्या ओळखीचे झाले आहेत. मी नेमाने धावतो हे आता सर्वांना समजले आहे. हल्ली हल्ली मला नेहमी दिसणारे चेहरे एकेक करुन हळु हळु कमी होताना दिसत आहेत. एखादा व्यक्ति येत नसेल तर आपण समजु शकतो पण डझनभर लोक कमी झाले आहेत मला नेहमी भेटणारे, गुड मॉर्निंग म्हणणारे. मला कारण  नाही समजले.

काल मी एका कॉर्पोरेट बाहेर गाडी पार्क करताना , त्या डझनभर लोकांतील एका व्यक्तिने मला पाहिले व माझ्या जवळ येऊन हाय हेलो केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर, मी त्यांना विचारले की तुम्ही का बरे येत नाही मैदानावर सध्या धावण्यासाठी रोज. त्यावर ते म्हणाले महेश जी आता कशाला रनिंग करायचे. आता उन्हाळा सुरु झाला. हिवाळ्यात व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो, उन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे!

एवढे बोलत असतानाच त्यांना एक फोन आला व फोनवर हाय म्हणतच ते मला बाय करुन निघुन गेले. मला त्यांच्याशी अजुन बोलायचे होते व त्यांचा गैरसमज दुर करायचा होता पण तेवढा वेळ मिळाला नाही फोन आल्यामुळे. असो पण आता हा लेख वाचुन कदाचित त्यांचा आणि त्यांच्यासारख्या अनेकांचा गैरसमज नक्कीच दुर होईल.

उन्हाळ्यात व्यायाम करुन काय फायदा बरे?

हे समजुन घेण्याआधी, आपण सर्वप्रथम हे जाणून घेतले पाहिजे की उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा असो, व्यायामास सुट्टी कधीच द्यायची नसते. ऋतु कोणताही असो व्यायाम झालाच पाहिजे, अगदी नेहमी इतकाच झाला पाहिजे. व उत्तरोत्तर तो वाढलाच पाहिजे.

उन्हाळा आहे म्हणुन आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजेच. ती कशी घ्यायची हे जाणुन घ्यायचे असेल तर कृपया इथे क्लिक करा व वाचा.

आता आपण वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करुयात.

माझा इतक्या वर्षांचा अनुभव मला असे सांगतो की उन्हाळा हा ऋतु अशा लोकांसाठी खासकरुन उपयोगाचा आहे की ज्यांना त्यांचे वजन कमी करायचे (weight loss) आहे, ज्यांना त्यांच्या पोटाचा वाढलेला घेर कमी करायचा आहे. ज्यांना शेप मध्ये यायचे आहे, ज्यांना आकर्षक दिसण्याची इच्छा आहे, ज्यांना इतरांना इम्प्रेस करायचे आहे, ज्यांना सडसडीत बांधा मिळवायचा आहे.

उन्हाळ्यात हे सर्व मिळविणे, इतर ऋतुंच्या तुलनेमध्ये खुप सोपे आहे. याचे कारण असे की उन्हाळ्यामध्ये साहजिकच तापमान वाढीमुळे आपणास खुप घाम येतो. अगदी एसटी बस मध्ये बसले तरी घाम येतो, लोकल ट्रेन मध्ये घाम येतो, बरोबर ना? घाम येतो याचा अर्थ शरीरातील पाणी कमी होते, काही प्रमाणात कॅलरीज व फॅट्स बर्न होतात. हे अगदी स्वाभाविक पणे होते. शरीरातील पाणी कमी झाल्याने व शरीराचे तापमान योग्य ते राखण्यासाठी आपण आपोआपच जास्त पाणी पितो. जितके जास्त पाणी प्याल तितके आरोग्यासाठी चांगले असते.

A marathoner – 21km finisher

हे असे सगळे असताना जर आपण नेहमीप्रमाणेच व्यायाम केला व पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले तर आपणास घाम ही जास्त येईल, कॅलरीज, फॅट्स ही जास्त जळतील, लवकर जळतील व आपण लवकरात लवकर आपले फ्लॅट स्टमक चे स्वप्न पुर्ण देखील करु शकतो. अर्थातच हे सगळे करीत असताना म्हणजे व्यायाम करीत असताना आपण आरोग्याचे मुळस्थान म्हणजे आपला आहार विसरता कामा नये. आपला आहार उन्हाळ्याला साजेसा व पोषक असावा. त्यात प्रोटीन, विटामिन, न्युट्रीशन आवश्यक तेवढे असलेच पाहिजे. नुसता व्यायाम करुन कोणाचेही वजन कधीही कमी होत नाही. आपला आहार कसा असावा हे समजुन घेण्यासाठी आमच्या वेबसाईट वरील विविध लेख तुमच्या कामी येतील. आमच्या नवनवीन लेखांच्या अपडेट्स साठी 9923062525 या मोबाईल क्रमांकावर ‘लेख नोंदणी’ असा संदेश पाठवा म्हणजे तुम्हाला आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळत राहतील.

मला वाटते आता तुम्हाला समजले असेलच की उन्हाळ्यात व्यायाम केल्याने काय फायदा होतो ते! ज्यांच्या मुळे, ज्यांच्याशी गप्पा मारताना मला या विषयावर लिहिण्याचे सुचले त्यांचा देखील गैरसमज नक्कीच दुर होईल.

लेख आवडल्यास अवश्य शेयर/फॉरवर्ड करा!

कळावे

Mahesh and Pallavi Thombare

Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMzA2Mjg0Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzMwNjI4NCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

आमच्या नवनवीन लेखांच्या अपडेट्स साठी 9923062525 या मोबाईल क्रमांकावर ‘लेख नोंदणी‘ असा संदेश व्हॉट्सॲप वर पाठवा म्हणजे तुम्हाला आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळत राहतील.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.