Stay Fit Pune - The weight loss center

weight loss success story in pune

विशाल ची वेट लॉस सक्सेस स्टोरी

एक काळ होता आपल्या जीवनात आणि जेवनात देखील कमालीचे समाधान होते. जीवन आणि जेवण हे दोन्ही खरतर अगदी थोडासाच फरक असलेले शब्द आहेत. फरक जरी असला तरी जेवणावरच आपले जीवन अवलंबुन आहे यात मात्र कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. हा जो काळ होता त्याबेळी जेवणात सुख व समाधान होते. व त्यामुळेच जीवनात देखील सुख आणि समाधानाची वाणवा अजिबात नव्हती. आपले जेवण सुखाचे झाले पाहिजे, असे आपण करु शकलो तर आपले जीवन देखील सुखाचे होईल यात शंका नाही. पण हे होणार कसे ?

आमच्या एका क्लब मेंबरचे वजन कमी झाल्याचे पाहुन एक दिवस विशाल आमच्या क्लब मध्ये आला. विशाल च्या चेह-यावर शंका स्पष्ट दिसत होती. आणि क्लब मध्ये मला भेटायला आला जरी असला तरी त्याला या भेटीतुन फार काही निष्पन्न होईल असे वाटत ही नसावे, हे मी ओळखले होते. नंतर जशी ओळख वाढली तसे मला खात्री झाली की माझा अंदाज अगदी बरोबर होता.

विशाल ने मला भेटण्यापुर्वी प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले वजन कमी करण्याचे अनेक प्रयत्न , अनेक प्रयोग, अनेक उपाय , अनेक पध्दती, अनेक डायट करुन पाहिले होते व त्यातील एकात ही त्याला म्हणावे असे यश आले नव्हते.

नेहमीप्रमाणे मी विशाल चे बॉडी फॅट विश्लेषण केले. व त्यानंतर एक आठवड्याचा ट्रायल प्रोग्राम सुरु करण्याचा सल्ला दिला. एकाच आठवड्यात आपल्यामध्ये, शरीरामध्ये चांगले बदल होतात. पण ते फक्त इतके असतात की ते फक्त स्वतःलाच समजतात. इतरांना हे बदल दिसत नाहीत. पण जो माणुस आमचा हा प्रोग्राम करतो त्याला स्वतःच्या एनर्जी लेवल वाढल्याचे खुपच जाणवते, ते ही फक्त एकाच आठवड्यात. मला याची खात्री असल्याने मी विशाल ला फक्त एकच आठवड्याचा प्रोग्राम आधी सजेस्ट केला. त्याला असे सुचवण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याच्या मनातील शंका. आधी केलेल्या प्रयत्नातुन अपेक्षित यश न आल्याने विशाल एवढा उत्साही नव्हता.

मी विशाल साठी प्रोग्राम बनविताना आणखी एक विशेष बाब समजुन घेतली, ती म्हणजे विशाल ची जीवनशैली. या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात म्हंटल्या विशाल देखील बिघडलेल्य जीवनशैलीचा शिकार झालेला मला दिसला. विशालच काय तर बहुतांश लोक , या सतत स्पर्धेच्या, बाजारु , अविरत अशा जीवनमानाच्या प्रभावाखाली इतके जास्त आलेलो असतो की, आपण कधी त्याचे बळी होऊ हे आपले आपणासच समजत नाही.

वयाच्या २८ व्या वर्षी हृद्यविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यु, वयाच्या ३० व्या वर्षी आयटी अभियंत्याचा मृत्यु, आजारपणाला कम्टाळुन सॉफ्टवेयर इंजिनीयर ची आत्महत्या. अशा घटना, बातम्या वाचणे टिव्ही व्र पाहणे आपणास काही नवीन राहिले नाही. या घटनांमधील ‘अकाली मृत्यु’  हे जसे एक साम्य आहे तशी अनेक साम्ये असतात, त्याकडे कुणाचेही फारसे लक्ष जात नाही. जसे चांगल्या कंपनीत , गलेलठ्ठ पगाराची नोकरी, चांगल्या लोकेशनला फ्लॅट, चारचाकी गाडी, वीकएंड ला भरपुर मस्ती किंवा भरपुर आराम आणि वीकडे ला मात्र अक्षरशः ढोरासारखे राब राब राबणे, टारगेट्स, डेड लाईन चे प्रेशर, वर्क प्रेशर, बढतीचे प्रेशर, पगारवाढीचे टेन्शन, कंपनीचे अचानक कामावरुन कमी करण्याचे टेंशन, जागतिक स्लो डाऊन चे टेंशन, सहका-यांमधील स्पर्धा, वरिष्टांचा दबाव असे सगळे जीवघेणे प्रकार अगदी सर्वांच्या बाबतीत सुरु आहेत.

एका सर्वसामान्य कुटुंबातील विशाल देखील या धकाधकीच्या जीवनशैलीचा भाग आपोआप बनला. एसटी महामंडळात वडील नोकरीला होते. कष्टातुन त्यांनी तीन ही मुलांना उच्च शिक्षण दिले. शिक्षण व गुणवत्ता यांच्या जोरावर विशाल ला देखील लागलीच नोकरी मिळाली. एक अकाऊंटंट म्हणुन तो काम करु लागला. अर्थातच याच कामात त्यास दिवसातील ८ ते १० तास चक्क बसुन काम करावे लागले. सतत बसुन बसुन काम केल्याने जडत्व जसे अंगी आले तसेच मनालाही आले. बदल म्हणुन विरंगळा म्हणुन सुरु झालेला फास्ट फुड खाण विशालच्या सवयीच झाल.

विशाल च्या बाबतीत धकाधकीची, रॅट रेसची तीव्रता जरी जास्त नसली तरी, जीवनमान, जीवनशैली बिघडण्याइतपत प्रभाव या सा-यांचा झालेला होताच. परिणामी नको ते खाणे, नको त्या वेळी खाणे, नको तसे खाणे, नको त्या वातावरणात खाणे, नको त्या मनस्थिती मध्ये खाणे असे प्रकार त्याच्या आयुष्यात कधी अलगद , हळुवार, नकळत पणे सुरु झाले. व याचे परिणाम समजले त्या वेळी जेव्हा लोकांकडुन वाढलेल्या वजनाविषयी, वाढलेल्या पोटाविषयी थट्टा होऊ लागली. विशाल चे वजन त्याच्या वय व ऊम्चीच्या मानाने ६८ किलो असावयास हवे, पण जेव्हा बिघडलेल्या जीवनशैलीच्या झोपेतुन जागा तेव्हा ते वजन होते ८८ किलो. बापरे !

झोपेतुन खडबडुन जागा झालेल्या एखाद्या माणसासारखेच विशाल ने पटापट जे काही उपाय सापडतील ते करण्यास सुरुवात केली. जे जे सुचेल, जे जे कोणी सांगेल, जे जे युट्युब वर दिसेल, जे जे फेसबुक वर सापडेल, जे जे इतर कुणीतरी केले असेल ते ते सर्वच विशाल ने करण्याचा सपाटा लावला.

परिणाम काय झाला? तर पैसा गेला, वेळ गेला, मनात अनेक शंका उत्पन्न झाल्या, आत्मविश्वास डळमळला, आणि वजन कमी करण्याच्या फंदात पुन्हा कधी ही पडुच नये इतपत मानसिकता नकारात्मक झाली. कधीतरी आमच्या एक क्लब मेंबरकडे पाहुन , शंकातुर मनाने आमच्या आलेल्या विशाल ने , आमच्या क्लब मध्ये जे पाऊल टाकले तेच त्याच्यासाठी निरामय जीवनाकडील वाटचालीचे पहिले पाऊल ठरले.

आठ दिवसांच्या ट्रायल प्रोग्राम नंतर, विशाल चे वजन दिड किलोने कमी झाले. उत्साह वाढला. व आंतरीक बदल नक्कीच जाणवला असणार. विशाल ने प्रोग्राम पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांमध्ये विशाल ने चक्क दहा किलो वजन कमी केले. आमच्या या प्रोग्रामचा हेतु असतोच मुळी तुमच्या जेवणाच्या माध्यमातुन तुमच्या जीवनात सुख व समाधान आणणे.जेवण समाधानाचे, घरचे, पौष्टीक, आनंदाच्या वातावरणात सोबतीला योग्य पोषक तत्वे तुम्हाला कसे मिळतील हे तुमच्या एकुण जीवनशैलीचा, तुमच्या शरीरयष्टी चा अभ्यास करुन आम्ही मार्गदर्शन करीत असतो.

weight loss success story in pune

विशालचे पुढचे ध्येय आहे त्याच्या आदर्श, प्रमाणित म्हणजे ६८ किलो वजनाचा टप्पा गाठण्याचे. आणि जशी मला खात्री आहे तशीच त्यालाही आता खात्री आहेच की तो ६८ किलो चे ध्येय नक्कीच गाठु शकेल. शंका संपल्या, जीवनशैली दुरुस्त झाली, व्यायाम नियमित सुरु झाला, कामामध्ये अधिक उर्जा व उत्साह जाणवु लागला, थकवा कमी कमी होत गेला. दिवसभर ताजेतवाने वाटु लागले, असे अनेक फायदे होतात वजन कमी करण्याने व जीवनशैली बदलल्याने!

विशाल च्या पुढील वाटचालीस आमच्या कडुन हार्दिक शुभेच्छा.

Mahesh and Pallavi Thombare

Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMCIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDc4IiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMTc0MjIyIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzE3NDIyMiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2OWQ1NGRiOGE0ZDQzYmFhN2VmOWQ0OTg2NWZkYWU5In0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.