तारुण्यातच होत असलेला म्हातारपणीचा आजार – गुडघेदुखी !

“अरे सहलीला गेला होतास ना? मग ट्रेकला जाऊन आल्यावर पाय दुखण्याची तक्रार करतात तशी काय करतोयेस?”, मी माझ्या मित्राला फोनव्र विचारले.

निमित्त होते आमच्या गेट-टुगेदरचे. पुढच्या काही दिवसांतच शालेय वर्ग-मित्रांचे एक दरवर्षी सारखेच गेटटुगेदर ठरवण्यासाठी आम्ही चार-पाच भेटणार होतो. त्यातीलच एकाशी फोनवर बोलताना त्याने पाय दुखताहेत असे कारण सांगुन भेटायला येण्याचे टाळले.

खरतर त्याचे आणि माझे वय अगदी सारखेच, एखाद दोन महिन्यांचा काय तो फरक असेल फार तर. त्याच्या शिवायच आम्ही बाकीचे मित्र भेटलो व गेट-टुगेदर चा कार्यक्रम ठरवला देखील. पण ‘त्या’ मित्राच्या पाय दुखण्याच्या तक्रारीला मात्र मी विसरलो नव्हतो. म्हणुन मी त्याला फोन केला व समजुन घेण्याचा प्रयतन केला की नक्की काय होतय ते.

त्याच्याशी बोलल्यावर समजले की त्याला पाय दुखी असा त्रास नसुन गुडघे दुखी असा त्रास आहे. मित्र म्हणुन मी त्याला काही सल्ले देखील दिले व शेवटी डॉक्टरांना भेटण्यास देखील सांगितले.

आमच्या क्लब मेंबर्स मध्ये देखील अनेक लोकांना गुडघे दुखीच त्रास असतो. म्हणजे जेव्हा ते आमचा क्लब जॉईन करतात तेव्हा असतो. व मेंबरशिप संपेपर्यंत त्यांचा त्रास संपलेला असतो. ही अतिशयोक्ति नाहीये मित्रांनो. गुडघे कोणत्याही कारणाने दुखत असु द्या, योग्य आहार व विहार हाच उपाय आहे गुडघे दुखीवर, नव्हे नव्हे बहुतांश आजारांवर.

गुडघे दुखण्याच्या तक्रारी साधारतः आपण वयोवृद्ध माणसांकडुन जास्त ऐकतो. आणि ते नैसर्गिक देखील आहेच. वाढत्या वयाबरोबर गुडघे दुखी होणार हे निश्चितच. पण वय वाढलेले नाहीये, म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षापासुनच जर आपण योग्य आहार-विहार सांभाळले तर म्हातारपणात देखील गुडघे दुखणार नाहीत.

पहा ना, आपणास चालायचे असेल, धावायचे असेल, उभे रहायचे असेल , बसायचे असेल, सायकल चालवायची असेल तर सर्वात जास्त भार पेलावा लागतो तो गुडघ्यांनाचा. सर्वात जास्त ताण येतो तो गुडघ्यांवरच. सर्वात जास्त झीज कशाची होत असेल तर ती गुडघ्यांचीच होते. त्यामुळे आपल्या शरीराच्या योग्य चलन-वलनासाठी गुडघ्यांनी नीट काम करणे गरजेचे आहे.

सर्वात आधी आपण गुडघे काम कसे करतात, त्यांची रचना कशी असते हे पाहुयात.

खालील व्हिडीयो पहा. इंग्रजी मध्ये जरी असला तरी त्यातुन गुडघ्याची रचना कशी आहे, ते कसे काम करतात याविषयी बरीच माहीती मिळेल.

या व्हिडीयो मध्ये अनेक गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत. मी ज्या गुडघे दुखी विषयी बोलतो आहे त्या विषयी देखील या व्हिडीयो मध्ये माहिती दिली आहे शेवट्या काही सेकंदाम्मध्ये.

गुडघे का दुखतात?

जस आधी म्हंटल्याप्रमाणे, आपल्या सा-याच्या सा-या शरीराचा भार म्हणजे वजन गुडघ्यांवरच असते. त्यामुळे इतर कोणत्याही अवयवयांची जेवढी झीज होत नाही तेवढी किंबहुना त्यापेक्षा जास्त झीज गुडघ्यांची होत असते. आपल्या पायाची दोन मुख्ये हाडे एक म्हणजे मांडी व दुसरे नडगी. ही दोन हाडे ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला अवयवाल गुडघा असे आपण म्हणतो. ही दोन वेगवेगळी असलेली हाडे आहेत. थोडा विचार करा, ही दोन हाडे आपल्या चालण्याने, उभे राहण्याने एकमेकांवर घासुन, घर्षणाने उगाळुन होणार नाहीत काय? उगाळुन जाऊन जाऊन आपल्या हाडांची लांबी देखील कमी होऊ शकते ना? पण आजवर असे झालेले आपण कधी ऐकले नाही. याचे करण असे की, दोन्ही हाडांच्या टोकांवर एक विशिष्ट आवरण असते. ते मऊ असते व बसलेले हादरे शोषुन घेण्याचे काम करते. त्या आवरणामुळेच दोन्ही हाडे एकमेकांवर घासत देखील नाहीत. वाढत्या वयात झाले तर आपण समजु शकतो. अगदी तरुण असलेल्या माझ्या मित्रासारख्यांना अशा आजाराला तोंड द्यावे लागत आहे, हे नवल जरी असले तरी आजकाल अगदी सामान्य गोष्ट झालेली आहे ही.

असे कशामुळे होते?

वाढत्या वयामुळे गुडघे दुखीचा जो त्रास होतो त्याचे मुख्य कारण असते हेच आवरण कमी होणे. हे कमी कमी होत राहणारच. ज्याला आदी आहे त्याला अंत आहेच. त्यामुळे हे होणारच, पण कमी वयातच हा त्रास होणे म्हणजे आपल्या जगण्यामध्येच काहीतरी गडबड, आपणच बनवुन ठेवलेली आहे, असा याचा अर्थ आहे. याचे कारण, ती गडबड म्हणजे दुसरे तिसरे काहीच नसुन आपली चुकलेली जीवनशैली. लाईफस्टाईल. याला लाईफस्टाईल डिसऑर्डर असे ही म्हणता येईल.

आजची बदलत चाललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव व योग्य व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे आढळून येते. या तिन्हीच्या कमतरतेमुळे सध्या कमी वयात आढळून येत असलेला हा देकील एक आजार म्हणजे सांध्याचा विकार. पूर्वी वयाच्या पन्नाशीच्या काळात गाठणारा हा आजार आता तिशीतच युवापिढीला गाठतो.

अलिकडच्या काळात अगदी तरुण वयामध्ये गुडघ्याच्या (ऑस्टिओऑर्थरायटीस, ओए) आजाराचे निदान झालेल्या पेशंटचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. बैठी जीवनशैली व गुडघ्यांना होणाऱ्या दुखापतींमुळे नवतरुणांमध्ये गुडघ्याचा आजार बळावत चालल्याचे दिसून येत आहे. आता अगदी पंचवीस वयापर्यंतचे पेशंट उपचारांसाठी डॉक्टरकडे येतात. ऑस्टिओआर्थरायटीसच्या पेशंटच्या संख्येत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कॉर्पोरेट ऑफिसमधील कामाची जीवनशैली, लिफ्टचा वाढता वापर, कमी अंतरासाठीही मोटारसायकल किंवा मोटार, ऑफिसच् कँटिनमधील तळलेले मसालेदार पदार्थ वीक एंडचे म्हणजे शुक्रवार-शनिवारच्या रात्रीच्या पार्ट्या, सकाळी उशिरा उठण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव असे सर्वसाधारण दिसून येते. हल्ली तरुणांमध्ये व्यायामाचे प्रमाण वाढले असे सांगितले जाते. जिममध्ये जाण्यासाठी महागडी फी भरतात. पण रात्रीच्या जागरणांमुळे सकाळी व्यायामाला दांडी पडते. ऑफिसला जायला उशीर होण्याचे कारण स्वतःच्याच मनाला देत व्यायाम टाळतात. अशी एक नव्हे तर असंख्य कारणे यामागे आहेत.

काय केले पाहिजे?

एकुणच काय तर बिघडलेली जीवनशैली. जीवनशैली म्हणताना यामध्ये मी जसे व्यायाम, ॲक्टीव्ह लाईफस्टाईल या वर भर देतो तसेच योग्य आहारावर देखील मी नेहमीच भर देत असतो. गुडघे दुखीचचा आजार ज्यांना झालेला आहे, त्यांनी त्यांच्या आहारामध्ये एंटीऑक्सिडेंट्स, एंटीइन्फेमेटरी आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड युक्त आहार घेतला पाहिजे. आणि ज्यांना असे वाटते की त्यांना गुडघेदुखीचा त्रास कधीही होऊ नये त्यांनी देखील असा आहार घेतलाच पाहिजे. आपल्या रोजच्या आहारामधुन हे मिळविण्यासाठी तुम्हाला अक्रोड, बदाम (व्यवस्थित एक रात्रभर भिजलेले) व मासे मुद्दामहुन जास्त घेतले पाहिजे. ज्यांचे गुडघे दुखतात फक्त त्यांनीच असा घेतला पाहिजे असे नाही तर आहारामध्ये हे सर्व सर्वांच्याच असले पाहिजे.

आहारामध्ये नियमित पणे वरील गोष्टींचा समावेश करणे ज्यांना शक्य नाहीये त्यांच्यासाठी आमच्या कडे खास उत्पादने आहे. गुडघे दुखी कधीही होऊ नये म्हणुन, झाली असेल तर योग्य पुरक आहाराने ती कमी व नाहीशी करणे असे अनेक फायदे या उत्पादनांचे आहेत. ही उत्पादने पोषणाच्या कमतरता भरुन काढतात. आमच्याकडील ही उत्पदने शुध्द व नैसर्गिक तर आहेतच सोबतच ही उत्पादने तुम्हाला शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी देखील मदत करतील.

सोबतच पोस्चर देखील महत्वाचे आहे. कळत नकळत पोस्चर चा देखील परिणाम गुडघ्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे उभे कसे रहावे, बसावे कसे व उठावे कसे हे देखील खुप महत्वाचे आहे. या साठी माझा स्वतंत्र लेख अवश्य वाचा इथे क्लिक करुन.

आपल्या शरीराचे वाढलेले वजन देखील अत्यंत काळजीचे असे गुडघे दुखीचे कारण असु शकते. नियमित वजन तपासा.

माझ्या ‘त्या’ मित्राला देखील मी  हेच सल्ले दिले. आहार-विहार. त्याला जो त्रास जाणवत होता तो जीवनशैली जन्य विकारच आहे. त्याला बरे वाटेल नक्कीच यात संशय नाहीच. पण आपण यातुन काय धडा शिकणार बरे? उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा, होय ना? जीवनशैली मध्ये बदल करा, निरोगी राहण्यास पुरक जीवनशैली अंगिकारा.

वाचत रहा माझे लेखन व प्रतिक्रिया अवश्य द्या. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी , खालील फॉर्म भरुन पाठवा!

चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.

कळावे

आपले

महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMCIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDc4IiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMzI1NTI0Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzMyNTUyNCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2OWQ1NGRiOGE0ZDQzYmFhN2VmOWQ0OTg2NWZkYWU5In0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.