शरीर पिंडास शुध्द ठेवण्याचे काम करते किडनी

तुम्हाला हे तर माहीत असेलच की मनुष्याने निसर्गनियमांमध्ये ढवळाढवळ करुन या सृष्टीचे खुप सारे नुकसान केले आहे. आपण अनेक प्रकारे प्रदुषण करतो आहोत, वायु प्रदुषण, जल प्रदुषण, ध्वनि प्रदुषण या सा-यामुळे निसर्गाच्या चक्रावर विपरीत परिणाम झालेला आपण आपल्याच डोळ्यांनी पाहतोय. मनुष्य प्रगतीच्या नावाखाली एवढा आटापिटा करतो आहे की त्याची प्रत्येक कृती निसर्गाला अधिक प्रदुषित करीत आहे. पण मित्रांनो निसर्ग इतक्या लवकर हार मानणारा नक्कीच नाही. निसर्गचक्रामध्येच या प्रदुषणापासुन पुन्हा एकदा सृष्टीला मुक्त करण्याची शक्ति आहे. हे शुध्दीकरणाचे काम निसर्ग नद्या, नाले, पाऊस, झाडे, मुळे, समुद्र यांच्या मार्फत करत आहे. पण प्रदुषण जेवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात शुध्दीकरण होत नाही. परिणामी आपण वाढत्या जल-वायु प्रदुषणाच्या समस्यांना सामोरे जातोय, पावसाचे चक्र बदलतेय, ऊन-थंडी यांची गणिते बदलताहेत.

हे जसे निसर्गात सुरु आहे तसेच आपल्या म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या शरीरात देखील सुरु आहे. निसर्गतः आपण खालेल्या अन्नामधुन हानिकारक द्रव्ये, रसायने शरीरातुन बाहेर काढण्याचे काम आपले मुत्रपिंड करते. आपल्या मुत्रपिंडाची क्षमता जेवढी आहे शुध्दीकरण करण्याची त्यापेक्षा जास्त कामाचा ताण त्यावर आपण द्यायला सुरुवात केली तर कालांतराने मुत्रपिंड निकामी होऊन जाते. क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे काय तर आपण जंक फुड, प्रदुषण, मद्यपान, धुम्रपान या सा-याच्या रुपात शरीरामध्ये एकापाठोपाठ एक असंख्य विषे पेरीत असतो की जे पचवण्याची नैसर्गिक क्षमता आपल्या अवयवांमध्ये नसते ते पचवण्याचे काम आपण आपल्या शरीरास करावयास लावतो. यामुळे साहजिकच मुत्रपिंडावर ताण पडतो व निसर्गचक्राप्रमाणेच शरीराचे नैसर्गिक चक्र देखील बिघडते.

kidney health marathi article

सन २०१७ मध्ये प्रसिध्द झालेल्या एका अहवालामध्ये किडनीचे आजार जीवघेण्या आजारांच्या यादीमध्ये खुपच वरच्या क्रमांकावर पोहोचले आहेत. सन २०१० ते २०१३ दरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या (आजाराने) संख्येत किडनीच्या आजाराने मरण पावलेल्यांची टक्केवारी २.९% इतकी आहे. तीच २००१ ते २०१० दरम्यान त्या टक्केवारीच्या निम्मीच होती. याचाच अर्थ मुत्रपिंडाचे विकार जीवघेणे ठरु लागले आहेत.

भारत जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी १ षष्टांश एवढ्या लोकांस सामावुन घेतो त्यामुळे भारतातील आजारांची व मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी जागतिक स्तरावर अभ्यास व संशोधनासाठी मार्गदर्शक ठरते. या देशात अकाली मृत्युमुखी पडणारांच्या संख्येत किडनीचे रुग्ण आता खुप मोठ्या प्रमाणात आहेत.

किडनी मुख्यत्वे काय करते?

रक्ताचे शुद्धीकरण

शरीरातील पाण्याचे संतुलन

आम्ल आणि क्षारांचे संतुलन

रक्तदाबावर नियंत्रण

रक्तकणांच्या निर्मितीत सहाय्य

मजबूत हाडे

एवढी सगळी कामे आपल्या अपरोक्ष किडनी मध्ये अहोरात्र होत असतात. आपण जागे असो वा झोपलेलो असो किडनी अविरत पणे काम करीत असतेच. अगदी थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक मिनिटाला आपल्या किडनीमध्ये कमीत कमीत एक लिटर रक्त शुध्द होण्यासाठी येत असते. आपल्या शरीरात असणा-या एकुण रक्ताच्या वीस टक्के रक्त प्रत्येक मिनिटाला किडनी मध्ये येत असते. २४ तासांमध्ये किमान १७०० लिटर शुध्द करण्याची क्षमता आपल्या किडनी मध्ये आहे. आपला श्वासोच्छवास जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे आहे आपल्या किडनीचे काम. त्यामुळे किडनीचे आरोग्य सांभाळणे खुप महत्वाचे आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाहीये.

आता आपण काही मोजक्या गोष्टी पाहुयात की ज्याने किडनीचे आरोग्य उत्तम राहिल.
आपल्या रक्तदाब्वावर लक्ष ठेवा. रक्त दाब वाढत असल्यास तातडीने वैदकिय सल्ला घ्या.
मधुमेह असेल तर तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल.
तुम्ही जर औषधे घेत असाल (कोनत्याही आजारासाठी) तर लक्षात ठेवा डॉक्टरांनी ज्या प्रमाणात डोस घ्यायला सांगितले आहेत अगदी तसेच घ्या.
योग्य आहार व विहार – संतुलित आहार खुपच महत्वाचा आहे. यामध्ये प्रोटीन, विटामिन, न्युट्रीशन चा पुरवठा सतत आपल्या शरीरास आपण देत आहोत का याची काळजी घ्या. यासंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही लेखाच्या शेवटी असलेला फॉर्म भरुन पाठवा म्हणजे आम्ही तुमची मदत करु शकतो.
आहारातील मीठाचे प्रमाण मर्यादीत ठेवा. आपल्याला दिवसभरामध्ये फक्त २३०० मिलीग्राम इतक्याच मीठाची आवश्यकता असते. यापेक्षा जास्त मीठ जर आपल्या शरीरात गेले तर याचा दुष्परीणाम आपल्या किडनीच्या आरोग्यावर होतो
भरपुर पाणी प्या. तुमची लघवी जर नितळ पारदर्शी असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत आहात असे समजा. जर तुमच्या लघवीचा रंग पिवळा असेल तर तुम्हाला जास्त पाणी प्यावे लागेल.
दारु पिणे टाळा

 

वरील उपाय आहेत की ज्याने आपण आपल्या किडनीचे आरोग्य सांभाळु शकतो. सोबतच निसर्गनियम देखील लक्षात ठेवा. अखाद्य खाणे, अपेय पिणे म्हणजे शरीरास प्रदुषित करणेच, विषयुक्त करणेच होय. किडनी खराब झाल्यावर उपचारावर लाखो रुपये घालवण्यापेक्षा किडनी खराब होऊच नये म्हणुन, आपले आरोग्य उत्तम रहावे म्हणुन, आपण फिट रहावे म्हणुन विषयुक्त जंक फुड खाणे, शीतपेये पिणे, मद्यपान करणे बंद करा. सोबतच योग्य पौष्टिक आहार घ्या.

आमचा हा लेख आवडला असेल तर अवश्य शेयर करा.

कळावे

Mahesh and Pallavi Thombare

mobile/Whatsapp – 9923062525

Fitness coaches from Pune.

Author of this article is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyMjM3MSIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE0MjAzIiwiYWN0aW9ucyI6IjMxNyIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3Vwc3lzdGljLTQyZDcua3hjZG4uY29tXC9fYXNzZXRzXC9mb3Jtc1wvaW1nXC9wcmV2aWV3XC9iYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld19pZCI6IjExXzU5MTA2NSIsInZpZXdfaHRtbF9pZCI6ImNzcEZvcm1TaGVsbF8xMV81OTEwNjUiLCJjb25uZWN0X2hhc2giOiJhMzhmZDhjNzBmZDRjYzRhMmZhMTM0NTVjZTg1Yjc0ZiJ9

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.