
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी…
भारतीय तत्वज्ञानातील एका प्रवाहामध्ये, समाज म्हणजे एक त्रिकोण अशी कल्पना केली आहे. त्रिकोणाला तीन कोन असतात. त्यातील एक कोन म्हणजे समाजाला मुलभुत पायाभुत सुविधा देणारी लक्ष्मी विराजमान्न आहे. दुसरा कोन म्हणजे समाजाला सक्षम आणि बलवान करणारी रणचंडी भवानी आणि तिसरा कोन (तो ही सर्वोच्च कोन किंवा बिंदु) म्हणजे समाजाला ज्ञान कल्पकता अध्यात्म आदी देणारी महासरस्वती.
या तीनही शक्ती पृथ्वीतलावरील प्रत्येक मनुष्यमात्रामध्ये सुध्दा असतात. महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती. परंतु या देवतांनी आपल्यावर प्रसन्न होण्याकरता आपण त्यांची आराधना केली पाहीजे. आपले दुर्दैव हेच आहे की आपण या तीन महादेवींपैकी आपले आयुष्य फक्त महालक्ष्मीची आराधना करण्यातच घालवतो. महालक्ष्मीची आराधना याचा अर्थ इथे प्रत्यक्ष पुजा असा घेऊ नये. या ठिकाणी मी आराधना शब्द अर्थार्जनासाठी, पैसे कमावण्यासाठी केलेला खटाटोप या अर्थाने वापरीत आहे. तर अनेक जण फक्त लक्ष्मी ची आराधना करतात. आणि महाकाली व महासरस्वतीला विसरुन जातात.
असो, आज मी माझ्या विषयीच बोलणार आहे.
मी लहान असताना, शाळेमध्ये आमची एक सीनीयर विद्यार्थीनीने स्टेजवर छान असा एकपात्री प्रयोग केला होता. मला तो पुर्ण आठवत नाही. त्यातील फक्त शेवटच्या काव्यपंक्ति आठवताहेत. या ओळींनी कायम स्वरुपी माझ्या मनात घर केले.
स्त्री जन्मा ही तुझी कहानी
हृद्यी अमृत नयनी पाणी ॥
त्या विद्यार्थीनीने, अतिशय समर्पक अशा आविर्भावांनी व अभिनयाने उच्चारलेल्या या ओळी, तिच्या चेह-यासहीत माझ्या अजुनही लक्षात आहेत.
त्यावेळी मी सहावीत असेन कदाचित. मी देखील एक स्त्री आहे याची पुसटशी जाणीव देखील त्यावेळी नव्हती. आणि तिच्या त्या प्रयोगामुळे ती जाणीव झाली असे सुध्दा नाही. पण जसजशी मी मोठी होऊ लागले तसतशे माझ्या मनाच्या कोणत्यातरी अज्ञात कोप-यामध्ये त्या ओळी, तीच आमची सीनीयर विद्यार्थीनी पुनःपुन्हा गाते आहे की काय असा भास मला व्हायचा. माझ्या शरीरात जसे बदल होत होते तसे माझ्या जाणिवा आणि माझ्या संवेदना देखील बदलत होत्या.
माझ्या सोबतीच्या, शेजारच्या मैत्रिणी, शाळेतील मैत्रिणी, पुढे कॉलेजमधील मैत्रिणी आणि या सगळ्या सोबत आम्ही समाजामध्ये हळुहळु स्त्री म्हणुन स्वतचे अतित्व तयार करु लागलो. असे अस्तित्व तयार करावे लागणे ही गरज नव्हती. स्त्री म्हणुन स्वःतचे अस्तित्व, स्वतची ओळख निर्माण करणे ही एक अत्यंत स्वाभाविक अशी गोष्ट होती. यात कुठे ही कुणाचीही जबरदस्ती नव्हती. उलट मला तर आता असे ही म्हणावेस वाटतय की स्त्रीच्याअ आयुष्यातील ती एक अवस्था आहे. व नेमक्या त्याच वेळी, आयुष्यभर आपल्यासोबत राहणा-या स्त्रीत्वाचे बीज पेरले जातात. जीवशास्त्र या अवस्थेला पौगंडावस्था म्हणते. पौगंडावस्था जशी शरीरातील बदलांची असते तशीच मनातील कोलाहलाची, स्थित्यंतरांची देखील असते.

एका आलिशान पंचतारांकीत हॉटेल मध्ये ट्रेनिंग देण्यासाठी गेलेले असतानाचा फोटो.
आपल्या समाजामध्ये देवीदेवताची पुजा करताना, देवी आहे म्हणुन तिला कमी लेखायचे आणि देव आहे म्हणुन त्याला जास्त मान द्यायचा असा प्रकार किमान मी तरी पाहिला नाहीये. आमच्या शाळेमध्ये , वर्गामध्ये दर आठवड्याला पुजा केली जायची. सर्व विद्यार्थी मिळुन ५०-५० पैसे गोळा करुन, हार-फुले, उदबत्ती, खडीसाखर नारळ इत्यादी वर्गणी काढुन विकत आणायचो. प्रत्येक देवतेचा एक वार असतो. माझ्या वर्गामध्ये नेहमीच सरस्वतीच्या वाराच्या दिवशीच सरस्वतीची पुजा केली जायची. त्यावेळी वर्गातील मुले कधीही देवीच्या ऐवजी देवाची पुजा केली पाहीजे असा दुराग्रह करीत नव्हती. याचाच अर्थ देवी असो वा देव असो, आमच्या बालमनांवर त्यांतील लिंगभेदामुळे त्यांचे देवत्व मुल्य कधीही कमी झाले नव्हते.
अर्थात जसे वय वाढु लागले तसे समाजातील काही अभद्र चालीरीती समोर येऊ लागल्या. मला प्रत्यक्ष कधीही लिंगभेदाचा अनुभव आलेला नाही. माझ्या आईवडीलांनी मला अगदी मुलाप्रमाणेच वाढवले. मुलाप्रमाणे म्हणण्यात देखील लिंगभेद आहेच. पण पालनपोषणामध्ये कसलाही भेदभाव केला नाही हे सांगण्यासाठी आणि इतरास समजेल असाच शब्द वापरावा लागतो. बालपण, शाळा कॉलेजचा काळ, घरची हौस मौज याबाबतीत माझ्या सगळ्याच इच्छा पुर्ण झाल्या. लग्नानंतर देखील महेश सारखा नवरा मिळणे म्हणजे भारीच.

माझे कुटुंब…धाकट्या पिहुच्या जन्मापुर्वीचा फोटो
आम्ही दोघे आणि आमची आमची दोन मुले,असे आम्ही चौघे शहरात राह्तो. सासु सासरे, चुलत सासरे महिन्यातुन नाही म्हंटले तरी ८-१० दिवस तरी जाऊन येऊन असतात. सुट्टीच्या दिवशी आम्ही जातो गावी आमच्या. सयुंक्त कुटुंब पध्दती मध्ये जरा जास्तच जबाबदा-या असतात. मोठ्या जाऊ बाईंची मदत असतेच लागेल तेव्हा. छोटी जाऊ म्हणजे लहान बहीणच.

आमच्या क्लब मधील एल क्षण – मी, महेश सोबत
मी अनेकदा गावी असते. तेव्हा महेश एकटेच शहरामध्ये असतात. यामुळे आणि तंदुरुस्त राहण्याच्या त्यांच्या आवडीमुळे, महेश स्वतःसाठी आणि सर्वांसाठी चांगला स्वयंपाक देखील करायला शिकले. घरातील कामाचे आम्ही कधीही वाटप केले नाही. मी स्त्री आहे म्हणुन अमुक तमुक मीच केले पाहीजे असा समज महेशचा कधीही नव्हता आणि नाहीये.
आम्ही एकमेकांना समजुन घेत नाही. कारण समजुन घेण्याची गरजच पडत नाही. आम्ही दोघे मिळुन व्यवसाय सांभाळतो. आमच्या क्लबचे व्यवस्थित संचालन, क्लब मेंबर्संना काऊंसेलिंग, त्यांचा फॉलोअप, नवीन क्लब सुरु करण्यासाठीचे प्रयत्न, जाहिरात (तशी आम्हाला आता जाहिरातीची गरज नाहीये) अशा सगळ्या कामांमध्ये आम्ही दोघेही सहभागी असतो. कधीकधी महेशला माझ्या नुसत्या “असण्याचीच” गरज असते. महेशची देहबोली मला आणि माझी महेशला अलबत्ता समजतेच. आम्हाला प्रसंगी बोलण्याची ही गरज भासत नाही. इतक्या आमच्या तारा जुळल्या आहेत.

माझ्या क्लबमधील महिला सदस्यांसोबत मी
आणि या सगळ्यात माझ्या पती कडुन अथवा माझ्या नातेवाईकांकडुन कधीही मला माझ्या स्त्रीत्वाची जाणीव करुन दिली गेली नाही. म्हणजे तु स्त्री आहेस, असे कशाला करते, तसे कशाला करतेस वगेरे वगेरे…
आहेना भारी?
होय, ही स्त्री जन्माचीच कहानी आहे…इथे हृद्यी अमृत आहे व नयनी आनंदाश्रु आहेत.
एवढे सगळे असुन देखील महेश नेहमी माझ्यातील अंगभुत स्रीत्वास अभिव्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. सोन्या चांदीचे अनेक दागदागिने असुन सुध्दा, महेश मुळे मला समजले की आपला खरा दागिना म्हणजे आपले आरोग्य आहे. आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण आपल्या अन्य जबाबदा-यांना न्याय देऊ शकतो. मी स्वःत गेली किमान चार वर्षे अनेक स्त्रियांना हा कानमंत्र नुसता देऊन थांबले नाही तर त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक, शारीरीक आणि मानसिक बदल घडवुन आणण्यास कारणीभुत झाले.

महेश व मी – एका आंतरराष्ट्रीय परीषदेमध्ये आमचा सहभाग
बल, शक्ति, आरोग्य ही आमची सवय आहे. ही आमची जीवनशैली झालेली आहे. आमच्या क्लबच्या माध्यमातुन आम्हाला आमच्या सर्व हौशी, विदेश पर्यटन, उंची कपडे, इत्यादी सर्व आम्ही मिळवतो आहोतच. आणि मागच्या काही महिन्यांपासुन वेळात वेळ काढुन वाचन आणि लेखन देखील आमच्या हातुन होऊ लागले आहे.

अंदाजे एक वर्षापुर्वीचा माझा फोटो…माझी छोटी मुलगी त्यावेळी ६ महिन्यांची होती
म्हणजेच काय तर वर सांगितलेल्या त्रिकोणाचे तीनही कोनांमध्ये, आमच्या आयुष्यात महालक्ष्मी, महादुर्गा आणि महासरस्वती विराजमान झालेल्या आहेत.
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…