Is your child healthy?

मुलांचे आरोग्य, लठ्ठपणा आणि योग्य आहार

 

तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या प्रभावामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या नानाविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातील एक लठ्ठपणा. मैदानी खेळाच्या जागी टीव्ही, कम्प्युटर, सात्विक खाण्याऐवजी फास्टफूडचा मारा या सर्वांचा हा परिणाम आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणाच्या समस्येच्या कारणांची, उपचारांबद्दल माहीती समजुन घ्या खालील लेखामध्ये.

लठ्ठपणा हा एक प्रकारचे कुपोषणच आहे. आपल्या देशांमधील महानगरांमध्ये ही सर्वात प्रमुख समस्या होत आहे. गुटगुटीत बाळ म्हणजे सुदृढ हे समीकरणच काही वर्षांत बदलले आहे. लठ्ठपणा हा कोणत्याही वयात वाईटच.पण लहान वयातील लठ्ठपणाचे परिणाम हे अधिक घातक असतात. लहानपणी स्थूल असलेली मुले मोठेपणीही स्थूल राहण्याची शक्यता अधिक असते. या मुलांना हृदयविकार, मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहानपणी मुलांमधील वाढत्या चरबीचे प्रमाण अधिक असते. भारतात आता लहान मुलांमधील लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढते आहे, त्याकडे वेळीच लक्ष वेधायला हवे.

दुष्परिणाम

1. ही मुले अतिस्थूल असल्याने ती अनेकदा हेटाळणीचा विषय बनतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खच्ची होतो.

2. शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक आजार, नैराश्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

3. सांध्याचे विविध विकारही त्यांच्यात तुलनेने लवकर आढळतात.

4. त्वचाविकारांच्या व्याधीही या मुलांमध्ये अधिक असतात.

5. लठ्ठपणा जसजसा वाढत जातो, तसतशी या मुलांमधील सततची खा-खाही वाढते त्यामुळे अपचन, अॅसिडीटीच्या तक्रारीही वाढत जातात.

6. टीव्ही समोर वा कंम्युटरसमोर बसून आपण किती खातोय, याचे भान या मुलांना राहत नाही.

7. दृष्टीदोष, खूप घाम येणे,निराश वाटणे या तक्रारींचे प्रमाणही अधिक असते

उपचार कोणते?

लठ्ठपणा टाळण्यासाठी शाळकरी मुलांना दिवसातून एकदा तरी कमीत कमी एक तास व्यायामाची सवय लावली पाहिजे.

या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, त्यासाठी पालकांसह शिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

आपल्या मुलाचे वजन, त्यांच्या आहाराची पद्धती याबद्दल सजग राहणे गरजेचे आहे.

Child weight loss

Child weight loss plan

शस्त्रक्रिया करून मुलांचे वजन आटोक्यात आणण्याऐवजी आहार व व्यायामाची जोड देऊन मुलांच्या शारिरिक क्षमता वाढवण्यावर भर द्यायला हवा.

चॉकलेट, गोळ्या, केक, बिस्किटे , चिप्स इत्यादींचे सेवन कमी करून फळे, भाज्या यांचा आहारात अधिकाधिक समावेश असणे गरजेचे आहे.

आपले मूल घराबाहेर असताना काय खाते, याचेही मूल्यमापन पालकांनी वेळीच करायला हवे.

कोणत्याही प्रकारच्या औषधांनी मुलांची वजने आटोक्यात आणण्याचा प्रकार त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे या बाह्यउपचारांनी मुलांच्या वजनाचा प्रश्न सोडवताना त्यांच्या प्रकृतीची हेळसांड होणार नाही, याची काळजी घ्या.

मुलांचे वजन वेगाने वाढू लागले असेल, तर ते नैसर्गिक आहे का याची खातरजमा डॉक्टरांकडून करून घ्या.

मुलांचे वजन जर अनैसर्गिक पणे वाढत असेल, किंवा वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढले असेल आणि नाना उपाय करुन देखील जर वजन कमी होत नसेल तर, इथे क्लिक करुन, वजन उंची टाकुन आपल्या मुलांचा बी एम आय इडेक्स काय आहे हे जाणुन घेऊन आम्हाला फोन करा.

Facebook Comments

One thought on “Is your child healthy?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.