Stay Fit Pune - The weight loss center

आपले शरीर व आपला देश तंदुरुस्त कसा होईल?

नमस्कार

आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक घटक आपल्या निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी महत्वाचे असतात. नुसतेच महत्वाचे नसतात तर प्रत्येक अवयव आपल्या निरामय, रोगमुक्त आरोग्याच्या प्रवासामध्ये, आपल्या शरीराच्या प्रत्येक घटकाचे योगदान असते.

एखाद्या तंदुरुस्त व्यक्तिच्या शरीरातील सर्वच अवयव, प्रत्येक घटक काम करीत असतो. प्रत्येक पेशी तिचे काम करीत असते. प्रत्येक स्नायु त्याचे काम करतो. निरोगी, तंदुरुस्त व्यक्तिची पंचेंद्रिये देखील नीटपणे करीत असतात. या गोष्टीकडे आपण कसे पाहणार आहोत?

तो निरोगी, तंदुरुस्त आहे म्हणुन त्याचे सगळे अवयव ठिकपणे काम करतात, असे आपणास वाटते का? आपणास असे वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. हे आहे नेमके याच्या उलटे. म्हणजे त्या व्यक्तिचे सर्व अवयव तंदुरुस्तीच्या प्रवासामध्ये आपापली भुमिका चोखपणे बजावतात, व ते आपापली भुमिका नीटपणे बजावतात म्हणुनच आपले शरीर निरोगी, निरामय व तंदुरुस्त होत असते.

आज मी तुम्हा सर्वांना हे का सांगत आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? बरोबर ना?

तर याचे उत्तर आहे. आपल्या महान देशाला देखील आपणास निरोगी, तंदुरुस्त, निरामय असे आपणास बनवायचे असेल तर देशातील प्रत्येक घटकाने देशाच्या या निरामय प्रवासासाठी आपापली भुमिका बजावणे खुप गरजेचे आहे.

आपण एक भारतीय म्हणुन आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये दररोजच्या जीवनामध्ये काही ना काही योगदान करीत असतोच. प्रत्येक आपापल्या परीने, आपापले काम करीत असतातच. पण तुम्हाला माहित आहे का की आपल्या देशासाठी, देशाच्या भवितव्यासाठी, त्याच्या विकासासाठी आपण जर सर्वात मोठे काही करु शकत असु तर ते कोणते आहे?

ते काम आहे प्रत्येकाने मतदान करणे.

स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, व लोकसभा अशा विविध निवडणुकांमध्ये आपणास मतदान करण्याची संधी आपल्या संविधानाने दिली आहे.

ही संधी आहे आपल्या देशासाठी संविधानाने ठरवुन दिलेले आपले करण्याची!
ही संधी आहे देशाच्या निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष पणे सहभागी होण्याची!
ही संधी आहे देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आपला सिंहाच्या वाटा उचलण्याची !
ही संधी आहे देशाचा भाग्योदयामध्ये आपले प्रत्यक्ष योगदान देण्याची !
ही संधी आहे आपल्या देशातुन अधिक सक्षम, योग्य प्रतिनीधी निवडुन संसदेत पाठवण्याची !
ही संधी आहे देशाला दिशा देण्या-या, देशाच्या प्रतिनिधींना निवडण्याची !
ही संधी आहे लोकशाही प्रति आपले सर्वोच्च कर्तव्य बजावण्याची !

बर यातील गंमत अशी आहे की ही संधी देशातील प्रत्येक नागरिकास समानाधिकाराने प्राप्त झालेली आहे. ही नुसती संधी नाहीये तर हे आपले आद्य कर्तव्य आहे. आपण वेगवेगळ्या करांच्या माध्यमातुन, देशाच्या तिजोरीत आपला पैसा देत असतो. आपण करांच्या रुपाने दिलेला पैसा योग्य लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये जाणे गरजेचे आहे. तसे झाले तरच त्या पैशाचा सदुपयोग होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर करदाते असाल तर तर तुम्हाला मतदान करुन योग्य लोकांना निवडुण देणे क्रमप्राप्तच आहे.

तुम्ही जरी करदाते नसाल, तुम्ही साधारण मध्यमवर्गीय असाल किंवा निम्न मध्यवर्गीय असाल किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरीक, कुटूंबे असाल तरीही तुमच्या साठी मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्ही निवडुण दिलेले खासदार जर दुरदृष्टी नसलेले असतील, त्यांना मिळालेल्या निधीचा उपयोग योग्य विकासकामांसाठी करण्याचे ज्ञान नसेल तरीही सरकारच्या योजनांचा योग्य लाभ तुम्हाला मिळणार नाही.त्यामुळे तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा, तुम्ही शिकलेले असा किंवा अडाणी असा, तुम्ही नोकरी करणारे असा किंवा व्यवसाय करणारे असा, तुम्ही व्हाईट कॉलर नोकरी, व्यवसाय करणारे असा किंवा तुम्ही मोलमजुरी करणारे असा, तुम्ही कोणीही असुद्यात, तुम्हाला, मला , आपणा सर्वांना सदसद विवेकबुद्धीचा वापर करुन, देशहित समोर ठेवुन मतदान करणे खुप गरजेचे आहे. अगदी सर्वांनी मतदान केले पाहिजे. ज्यांना ज्यांना मतदानाचे गांभीर्य आहे त्यांनी, इतरांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे. दिप से दिप जलाकर, आपण मतदार जागृती आपापल्या पातळीवर केली पाहिजे.

आपल्या पुणे परिसरामध्ये येणा-या मंगळवारी प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे. तर काही ठिकाणी २९ तारीख तर काही ठिकाणी अन्य काही तारखांना मतदान होणार आहे.

माझ्या क्लब मधील सर्व सदस्यांना मी विनंती करतो की तुम्ही येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अवश्य मतदान करा. तुमचे मतदान पुण्यात असेल तरी करा, किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, म्हणजे तुमच्या मुळ गावी असेल तरीही सुट्टी घेऊन मतदान करण्यासाठी, ज्या मतदार संघात आपले नाव असेल त्या ठिकाणी जाऊन अवश्य मतदान करा.

कारण जसे निरामय निरोगी शरीरासाठी आपल्या शरीरातील प्रत्येक घटकाने ज्याप्रमाणे आपापले काम करावे लागते तेव्हाच शरीर प्रकृती तंदुरुस्त होते, त्याच प्रमाणे प्रत्येक नागरीकाचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग, आपल्या देशाला देखील तंदुरुस्त करील.

त्यातही ही निवडणुक म्हणजे देशातील इतर सर्व निवडणुकांपेक्षा अतयंत वेगळी म्हणजे लोकसभेची आहे. इथे जे प्रतिनिधी निवडुन येतात ते आपल्या देशाचे भवितव्य ठरवितात. त्यामुळे ते खासदार निवडीचे काम आपण करणे म्हणजे लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या महोत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन आपण, आपले लोकशाहीतील परम कर्तव्य निभावु शकतो.

मी, महेश ठोंबरे, एकेकाळी राजकारणामध्ये सक्रिय होतो , हे तुम्हाला माहित आहेच. स्वच्छ प्रतिमा व स्पष्ट ध्येये ठेवुन मी देखील राजकारणात भाग घेतला होता. मी राजकारणामध्ये असण्याचे कारण, प्रेरणा समाजासाठी काहीतरी ठोस करणे, समाजाची सेवा करणे ही होती. कालांतराने मला ते करण्याचे आणखी प्रभावी साधन मिळाले, ते म्हणजे फिटनेस कोच म्हणुन लोकांना तंदुरुस्त करणे, निरोगी करणे.

मग आपल्या देशाला तंदुरुस्त करण्यासाठी आपण सर्वांनी आपापले काम म्हणजेच मतदान करणे गरजेचे नाही काय?

कळावे,

आपलाच महेश ठोंबरे

9923062525

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.