Stay Fit Pune - The weight loss center

होय ! पुन्हा तरुण होता येते .

एकीकडे आपण सर्वच जण सुखाच्या शोधात दररोजची लढाई लढतो आहोत. ही लढाई लढण्यासाठी आपणाकडील सर्वात महत्वाचे जे हत्यार आहे ते म्हणजे आपले शरीर होय. जीवनाच्या सुर्यास्ताच्या एखाद्या संध्याकाळी, जर आपण मागे वळुन आपल्याच जीवनाकडे पाहु शकलो तर, आपणास आपल्या मनामध्ये पुर्णत्वाची भावना, सगळ काही भरुन पावल्याची, कृतज्ञतेची, कृतार्थतेची भावना आलीच पाहिजे. व ही भावना आणण्यासाठीच आपण आपला हा दररोजचा संघर्ष करीत असतो. या संघर्ष खरेतर दुस-या कुणातरी विरुध्द अजिबात नसतो. व असाच कुणाच्या विरुध्द न केलेला संघर्षच आपणास त्या सुर्यास्ताच्या संध्याकाळी, आनंदी करुन जातो.

हा सगळा संघर्ष जरी कुणाच्या विरोधात नसला तरी ही संघर्ष मात्र आहेच. कारण इथे संघर्षाच्या  दोन्ही बाजुला आपणच असतो. आपलीच दोन रुपे , एकमेकांशी सतत संघर्षरत असतात. या दोन रुपांमधील एक आहे, तेजस्वी, तप्तर व तपस्वी मी व दुसर रुप आहे म्लान, जडत्व अंगी असलेला, व आळशी मी.

हा जो दुसरा मी आहे ना, तो खुपच बदमाश आहे. अहोरात्र तो, पहिल्या मी ला, हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असतो की, अरे किती धावपळ करतोस! बास झाले! निवांत हो! आराम कर! उद्याचा कसला विचार करतोय? जसा जन्म आहे तसा मृत्यु देखील आहेच! त्यामुळे उगाच काळजी करुन, जीवाचा आटापिटा करुन, श्रम आणि वेळ वाया घालवु नकोस! आराम कर! आत्ताचा क्षण मजेत जग! उद्याचं उद्या पाहु! आणि असे रोज रोज सांगुन हा बदमाश ‘मी’ , काळजी घेत असतो की, ‘उद्या’ नावाची गोष्ट कधीच उगवणार नाही. आणि भाबडा, पहिला मी मात्र त्या बदमाश मी च्या भरवशा वर त्या ‘उद्या’ नावाच्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत बसतो. पण ‘उद्या’ कधीही येत नाही. जो पर्यंत पहिला ‘मी’ कसलीच बंडखोरी करीत नाही, तोपर्यंत खरतर संघर्ष सुरु झालेला नसतोच. किंबहुना, माझ्यामध्येच असे दोन भिन्न ‘मी’ आहेत याची जाणिव देखील झालेली नसते.

पण एक दिवस येतोच की जेव्हा, पहिला मी, खडबडुन जागा होतो व बदमाश ‘मी’ ला जाब विचारतो! पण उपयोग काहीच होत नाही कारण बदमाश ‘मी’ आत्तापर्यंतची लढाई आधीच जिंकलेली असते. व भाबड्या मी मात्र, आपण हरलो आहोत हे समजत देखील नाही.

तुमच्या आयुष्यातील कोणतीही गोष्ट असुद्या, मग ते करीयर असो, व्यवसाय असो, कौटुंबिक नातेसंबंध असो व व्यक्तिगत निरामय, निरोगी आयुष्य जगण्याची कामना असो. या सगळ्यांमध्ये आपल्याच आतील हे दोन ‘मी’ सदैव संघर्ष करीत असतात. य संघर्षामध्ये, वर म्हंटल्याप्रमाणे आपले म्हणजे भाबड्या ‘मी’ चे सर्वात महत्वाचे व एकमेव हत्यार म्हणजे आपले शरीर होय.

बदमाश ‘मी’ चे ध्येय असते, तुम्हाला लवकरात लवकर म्हातारं करण्याच. आणि आपल्यातील तो भाबडा ‘मी’ आहे तो मात्र तीन गोष्टींसाठी सतत प्रयत्न करीत असतो. त्या तीन गोष्टी आहेत, तेजस्विता, तपस्वीता व तत्पतरता! ही तीन ही तारुण्याची लक्षणे आहेत. याचा अर्थ या तीन ही गोष्टी आपल्या आतमध्ये आधीच्याच आहेत. फक्त त्या बदमाश ‘मी’ मुळे या तारुण्याच्या तीन ‘त’कारांवर आवरण चढलेले असते एवढेच.

आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असले, की लोक म्हणतात तुमच्या कडे खुपच जबरदस्त इच्छा शक्ति हवी. तुमच्या कडे आत्मविश्वास हवा. तुमच्याकडे यांव पाहिजे, त्यांव पाहिजे. हे लोक म्हणतात ना, खरतर ते लोक म्हणतच नसतात, लोकांच्या मुखाने आपल्यातील तो बदमाश ‘मी’ च बोलत असतो.

खरतर काहीतरी मोठे म्हणजे तरी नक्की काय असते मित्रांनो! असे जगात काहीच नसते. आपण कोणते काम करतो, त्यापेक्षा ते काम कसे करतो यावर ठरते ते काम मोठे आहे की छोटे. त्यामुळे मोठे आणि छोटे वस्तुतः काहीच नसते! मोठे व छोटे हे सापेक्ष आहे.

जेव्हा आपल्यातील तरुण जागा होतो तेव्हा, आपणाकडुन जे काही होते, ते इतरांस (म्हणजे ज्यांच्यावर त्या बदमाश ‘मी’ चा अम्मल आहे त्यांस) मोठे वाटते. प्रत्यक्षात जर आपल्यातील तरुण ‘मी’ (मग तुमचे वय कितीही असो) जर कामास लागला तर कोणतेही काम मोठे राहत नाही.

पण हे करणार कसे?

उदाहरण दाखल आपण एक ध्येय घेऊ. ते म्हणजे शरीराने तंदुरुस्त होण्याचे. तर तंदुरुस्त होण्यासाठी आधी आपणास निरोगी व्हावे लागेल. व एकदा आपण निरोगी झालो की मग आपण आपला पुढचा प्रवास तंदुरुस्तीच्या दिशेने सुरु करु शकतो.

आमच्या क्लब मध्ये अनेक जण निरोगी होण्यासाठी (म्हणजेच अतिरीक्त वजन कमी करण्यासाठी) येतात. आमच्याकडील विविध पध्दती, तंत्रे, सल्ले, मार्गदर्शन, प्रत्यक्ष प्रशिक्षण या कार्यक्रमांद्वारे आम्ही त्यांना त्यांच्या ध्येयाचा पहिला टप्पा म्हणजे निरोगी होण्यासाठी मदत करतो. आमच्या कडील १००% ग्राहक त्यांचे हे पहिले ध्येय गाठतातच (च वर विशेष जोर). इथपर्यंत ठिक आहे. सोपे आहे. पण पुढचा प्रवास मात्र आपल्यातील तरुण ‘मी’ जागा केल्याशिवाय करता येत नाही. या प्रवासामध्ये नेहमी तत्पर राहावे लागते. नव्हे नव्हे, आपण आपोआप तत्पर होऊनच जातो.

माझे प्रत्यक्ष उदाहरण देतो मी. मी जेव्हा माझे वजन कमी केले तेव्हा माझ्या पुढे टारगेटा होते ते कमी केलेले वजन आहे तसेच ठेवण्याचे. आम्ही याला मेंटेनंस स्टेज म्हणतो. या मेंटेनंस स्टेज मध्ये सुरुवातीस खुप काटेकोर पणे आपल्यातील त्या बदमाश ‘मी’ शांत करावे लागते. व हे करणे म्हणजेच पुन्हा शरीराने देखील तरुण होणे होय.

Weight loss result in Pune

मग त्या बदमाश ‘मी’ ला शांत कसे करणार व तरुण ‘मी’ ला जागे कसे ठेवणार? प्रश्न दोन जरी वाटत असले तरी आहे मुळात एकच. चला तर स्वानुभवावरुन तुम्हाला काही टिप्स/नियम सांगतो ज्यावरुन तुम्ही पुन्हा एकदा मनाने तसेच शरीराने देखील तरुण व्हाल.

  • स्वतःचे निरीक्षण करा

हि खुप महत्वाची गोष्ट आहे. यालाच आपण सतर्क राहणे म्हणु शकतो. आपल्यातील तो बदमाश ‘मी’ ला वेळोवेळी काय म्हणत असतो ते पाहणे व समजुन घेणे की असे नकारात्मक बोलणारा तो खरा ‘मी’ नव्हे. खरा ‘मी’ तरुण आहे. खरा ‘मी’ तत्पर आहे. त्याला कंटाळा नाही, त्याला आळस नाही.

  • आपल्या ध्येयांचे विभाजन करणे किंवा त्यांस वेगळ्या रुपात पाहणे

माझे खरे ध्येय तंदुरुस्त राहणे हे आहे. पण जेव्हा मी धावण्याचा व्यायाम करतो तेव्हा मला उमगते की धावण्याने (तुम्हाला जो व्यायाम प्रकार आवडतो त्याने) आपणास आनंद मिळविण्यासाठी उद्याची गरजच नाहीये. व्यायाम केल्याने लागलीच मला नवीन ऊर्जा मिळते. मी तरतरीत होतो. त्यामुळे माझे ध्येय उद्या म्हणजे भविष्यात तंदुरुस्त राहणे असे जरी असले तरी माझे दररोजचे ध्येय आहे आनंद मिळविणे. मग यामध्ये हळुहळु मी,  किमी म्हणजे अंतर वाढवणे व वेळ म्हणजे अवधी कमी करणे असे ध्येय ठरवु शकतो.

  • आपण जो काही व्यायाम करतो आहोत त्याच्या नोंदी ठेवणे

आजकाल हे खुप सोपे झाले आहे. विशेषतः धावणे, पोहणे, सायकलिंग, आदी व्यायाम प्रकार सहज गत्या मोबाईल उपकरणाम्च्या सहाय्याने नोंदविता येतात. मी माझे उदाहरण देतो. मी धावण्याच्या व्यायामासाठी स्त्रवा (strava) नावाचे मोबाईल ॲप वापरतो. हे ॲप भारी आहे. सोशल मीडीया प्रमाणेच यामध्ये देखील आपण अनेक लोकांना फॉलो करु शकतो. त्यांना फॉलो करतो याचा अर्थ, त्यानी केलेल्या ॲक्टिव्हिटीज मला दिसतात.  मी एक नियम केला आहे. रोज मी न चुकता, स्त्रवा ॲप उघडुन पाहतोच. भलेही मी स्वतः व्यायाम केला असेल किंवा नसेल, मी ॲप उघडुन पाहतोच. असे केल्याने मला इतरांकडुन प्रेरणा मिळते. तुम्ही जर नोंदी ठेवत असाल अशा ॲप मध्ये व सोशल मीडीया वर देखील तुम्ही तुमच्या अचीव्हमेंट्स शेयर करीत असाल तर, तुम्ही स्वतः अनेकांना प्रेरणा देऊ शकता.

  • खाण्यापिण्याचे भान ठेवणे

आपले वजन कशामुळे वाढते, काय खाल्ल्याने कमी होते, काय खाल्ल्याने स्थिर राहते असे ज्ञान मिळवा. या साठी तुम्हाला मी मदत करु शकतो. मी अवश्य विनामुल्य या बाबतीत तुमची मदत करीन. पाणी भरपुर प्या.

  • नियम एक

    ते चार चे काटेकोर पालन

म्हणजेच आपण आपल्या स्वतःकडेच पाहणे, स्वतःचे निरीक्षण करणे. आपण काय करीत आहोत, ते आपल्या ध्येयाच्या जवळ आपणस घेऊन जाणारे आहे, की लांब नेणारे आहे, याचे निरीक्षण, मुल्यमापन झाले पाहिजे.

या पाच नियमांचे पालन तुम्ही केले तर, मी खात्रीने सांगु शकतो की एक दोन महिन्यांमध्येच तुम्हाला हे असले नियम पाळत बसायची गरजच राहणार नाही. आपोआप तुमचे प्रत्येक काम, तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळच घेऊन जाईल. याचाच अर्थ हे नियम म्हणजेच आपल्या आतील त्या बदमाश ‘मी’ ला शांत करण्यासाठीचे नियम आहेत. व याम्च्यामुळेच आपल्यातील तरुण ‘मी’ देखील आपोआप जागा होऊन, कायमचा जागृत राहील.

आणि मित्रांनो, अशाच पध्दतीने तुम्ही, आयुष्यातील कोणतेही ध्येय सहज गाठु शकता बरका!

आणि त्यावेळेस संघर्ष राहत्च नाही. ना आपल्याच आतला संघर्ष ना, इतर कुणाशी संघर्ष!

वाचत रहा माझे लेखन व प्रतिक्रिया अवश्य द्या. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी , खालील फॉर्म भरुन पाठवा!

चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.

कळावे

आपले

महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNjc5OTU1Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzY3OTk1NSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.