Stay Fit Pune - The weight loss center

व्यायामाचा कंटाळा असा घालवावा!

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मागील आठवड्यात खेळपटु आणि व्यायामपटुंसाठीची लेख माला मी लिहिली. अनेकांनी सदर लेख आवडल्याचे मला सांगितले. अशातच मला कित्येक लोकांनी एक विशेष प्रश्न विचारला. म्हणजे हा प्रश्न तस पाहता प्रश्न नाहीये. ही एक समान समस्या आहे, अगदी आपल्या सर्वांचीच अशी समस्या असु शकते.

काय आहे बर ही समस्या? चला समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात. अनेकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना मी इथे सोप्या भाषेत, प्रातिनिधीक स्वरुपात मांडणार आहे.

“मी एकदम उत्साहामध्ये व्यायामाला सुरुवात करतो पण तो उत्साह अगदी काही आठवडेच टिकतो व मी पुन्हा आळसावुन जातो व व्यायामाकडे दुर्लक्ष करतो! मी काय करु? ”
“मी व्यायामाला सुरुवात केली की सुरुवातीच्या पाच एक मिनिटांमध्येच मला कंटाळा येतो व पुढे व्यायाम करावासा वाटतच नाही, मी काय करु?”
“जिम मध्ये वजने उचलण्याचा मला कंटाळा येतो. मी काय करु?”
“व्यायाम करायचा आहे म्ह्णुन मला पहाटे लवकर जाग येते पण प्रत्यक्ष व्यायाम करायला घरातुन बाहेर पडायचा कंटाळा येतो व व्यायाम करीतच नाही! मी काय करु?”
“व्यायाम करताना मला चक्कर येईल की काय या भीतीने मी व्यायाम करण्याचे नेहमीच टाळते, मी काय करु?”
“मला व्यायामाची खुपच आवड आहे पण मुले लहान असल्याने व्यायामासाठी वेळ मी काढु शकत नाही, मी काय करु?”

कित्येकांच्या समस्या, प्रश्न वरकरणी जरी वेगवेगळे वाटत असले तरी हे आहेत एकच. तुम्हा सर्वांसाठी मी ही समस्या आणखी योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.

“व्यायाम माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत नाही, सवयीचा भाग बनत नाही ! मी काय करु?”

यामागील कारणे जरी वेगवेगळी दिसत असली तरी मुळ समस्या हीच आहे की व्यायाम आपल्या नित्याच्या सवयीचा भाग होत नाही. व्यायामाला सवयीचा भाग का बरे करावे? कारण ज्या गोष्टी सवयीच्या असतात त्या करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. त्या आपोआप होत असतात. बरोबर ना?

उदा – आपण रोज सकाळी दात घासतो. का घासतो बरे आपण दात? दात घासणे किती महत्वाचे आहे व त्याचे महत्व पटले म्हणुन घासणारे फार कमी असतील पण दात घासण्याची सवय आपणास अगदी लहान वयापासुनच लावण्यात आलेली असते. त्यामुळे ते करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आपणास पडत नाही. हे काम आपोआप होत असते. अगदी त्याच प्रमाणे व्यायामाची सवय देखील आपणास जडली तर?

तर काय मज्जाच की.  पण असे करणे शक्य आहे का? नवीन सवयी लावता येऊ शकतात का?

हे शक्य आहे. नवीन सवयी आपण अगदी म्हातारे झालो तरी देखील लावता येतात. फक्त त्याचे तंत्र समजुन घेतले पाहिजे. हे तंत्र समजुन घेण्यापुर्वी आपण सवय व त्यासंबंधित थोडी अधिक माहिती पाहुयात.

स्टेफन कव्ही नावाच्या एका पाश्चात्य लेखकाने फार छान शब्दांमध्ये या विषयी लिहिले आहे.

Habit is the intersection of knowledge (what to do), skill (how to do), and desire (want to do)

आपणास काय करायचे आहे(ज्ञान) व ते कसे करायचे (कौशल्य) या दोन्हींचा मिलाप म्हणजे सवय होय. म्हणजे एखादी सवय स्वःतला लावायची असेल तर या दोन्ही गोष्टीं आपणास माहित हव्यात. काय (का) करायचे आहे व ते कसे करायचे. या दोन गोष्टी समजल्या की मग सवय लावणे सोपी गोष्ट आहे.

आता योग्य सवयी का लावल्या पाहिजेत हे समजुन घेण्याचा प्रयत्न करुयात. स्टेफन कव्ही यांच्याच शब्दामध्ये पाहु

The quality of our thoughts determine our actions and our actions develop our habit. Our habit create our character and our character forges our destiny.

आपल्या विचारांचा दर्जानुसार आपले कर्म ठरते आणि आपल्या नेहमीच्या कर्माने, प्रयत्नाने आपल्याला सवयी जडतात. आपल्या सवयींवरुन आपले चारित्र्य तयार होते व आपले चारित्र्य ठरवते की आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्की काय करणार आहोत, आपले ध्येय कोणते असणार आहे.

या सर्वावरुन आपणास निर्विवाद पणे एक गोष्ट मान्य करावी लागेल ती म्हणजे सवय/सवयीच मनुष्याला जीवनात उच्च अथवा नीच स्थानी पोहोचवतात.

त्यामुळेच व्यायाम करण्याची सवय देखील अशीच एक सवय आहे की ज्यामुळे आपल्या एकंदरीत आयुष्यातच आमुलाग्र परिवर्तन होते. व्यायाम केल्याने काय काय फायदे होतात या बाबतीत मी जास्त काही लिहिणार नाही कारण ती माहिती तुम्हाला इंटरनेट, फेसबुक, पुस्तकांत अगदी सहज उपलब्ध होईल. ती महत्वाची आहेच. आणि मी गृहीत धरतो की तुम्ही हा लेख वाचताय याचा अर्थ तुम्हाला व्यायामाचे महत्व समजले आहे.

तर आता आपण मुळ मुद्द्याकडे वळुयात. व्यायामाला आपल्या सवयीचा भाग कसे बनवायचे?

  • स्वःतकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला

मी काहीही करु शकत नाही. माझ्याच्याने काही हे होणार नाही. माझ्या कडे वेळच नसतो. मी फार बिझी आहे अशा अनेक प्रकारची कारणे आपण स्वःतलाच नेहमी सांगुन स्वःतचीच समजुन काढीत असतो. स्वःतचीच समजुन काढतो असे म्हणायचे कारण असे की तुम्ही व्यायाम न केल्याने दुनियेला काहीही फरक पडणार नसतो. फरक पडणार आहे तो फक्त आणि फक्त तुम्हालाच. त्यामुळे स्वःतकडे पाहताना एक अगतिक, लाचार व्यक्ति म्हणुन पाहणे त्वरीत बंद करा. “मी एक ॲथलीट आहे, मी एक फिटनेस फ्रीक आहे” असे वारंवार स्वःतस सांगा. व स्वःतकडे ॲथलीट म्हणुन पाहण्यास सुरुवात करा. असे केल्याने तुमचे विचार देखील एखाद्या ॲथलीट सारखेच होतील. म्हणुनच म्हणतो दृष्टीकोन बदला.

Geeta Shirke

Geeta Shirke – वजन कमी करण्यापुर्वी

गीता नावाची एक गृहीणी माझ्या क्लबची सदस्य झाली. तिला दोन मुले आहेत. ज्यावेळी त्यांनी आमचा क्लब जॉईन केला तेव्हा आणि आत्ताही त्यांची मुले शाळेत जातात. मुलांचे, घरच्यांचे सगळे करुन त्यांना व्यायामासाठी वेळच नसायचा. सुरुवातीस त्यांचा हेतु वजन कमी करणे असाच होता. अपेक्षे इतके वजन कमी केल्यानंतर मात्र त्यांना काळजी लागुन राहीली की वजन आहे तसेच राहील का नाही. व्यायाम सुरु करावा लागेल, मग घरचे काम, मुलांची आवराआवर कशी काय करणार, अशा अडचणी त्यांना दिसु लागल्या.  माझ्या सोबतच्या चर्चेतुन त्यांना नेमके दृष्टीकोन बदलण्याची गोष्ट समजली. आणि त्यांनी योग्य पध्दतीने व्यायामास सुरुवात केली. आज स्थिती अशी आहे की त्यांच्यासाठी व्यायाम हा सवयीचा भाग झालेला आहे. व ही सवय नुसती त्यांच्या एकट्याच्याच उपयोगाची नसुन, त्यांच्या मुलांना देखील आरोग्या प्रती, व्यायामाप्रती आवड निर्माण झालेली आहे. आपण काय सांगत असतो त्यावरुन मुले फार कमी शिकतात. मुले शिकतात जास्त आपण काय करतो ते पाहुन. बरोबर ना?

गीता शिर्के – वजन कमी केल्यानंतर व्यायाम करताना

त्यामुळे स्वःत कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला, आंतरबाह्य परिवर्तन आपोआप होईल.

  • ध्येय निश्चिती करा

व्यायामामध्ये ध्येये निश्चिती खुप महत्वाची आहे. ध्येय मोजमाप करता येईल असे असावे. उदा – पहिल्या महिन्यात दररोज पाच डिप्स, किंवा अन्य व्यायामप्रकार पण ते अगदी थोडेच.  पहिल्याच दिवशी किंवा पहिल्याच महिन्यात खुप मोठे ध्येय ठरवु नये. छोटे व सहज गाठता येईल असे ध्येय ठरवणे, ते गाठणे, पुन्हा नवीन, थोडे मोठे ध्येय ठरवणे, ते गाठणे असे उत्तरोत्तर आपली ध्येये वाढवीत रहावी. हे अगदी सोपे आहे. तुमचा व्यायामप्रकार कोणताही असो. तुमच्या त्या त्या व्यायाम प्रकारात तुम्ही अशी छोटी छोटी ध्येये, तुमच्या मार्गदर्शकाच्या मदतीने ठरवा.

Today’s exercise batch personalised coaching

Posted by Stay Fit Pune – Hadapsar on Wednesday, May 15, 2019

मला आठवतय, मी जेव्हा माझी पहिली मॅरेथॉन पळालो, तेव्हा अनेकांनी माझे अभिनंदन केले. कौतुक केले. व सोबत “मला नाही जमणार असे २२ किमी पळायला तुझ्यासारखे” म्हणुन पळ काढण्याचा प्रयत्न देखील केला. तेव्हा मी त्यांना सांगायचो की मी २२ किमी काय एका दिवसात नाही पळालो. मला २२ किमी चे ध्येय गाठण्यासाठी सुरुवात अगदी १ किमी च्या ध्येयाने करावी लागली होती. सुरुवातीस एक किमी, मग दोन किमी त्यानंतर ५ किमी , असे हळु हळु मी माझे ध्येय मोठे करीत गेलो होतो.

  • व्यायामासाठी वेळेचे नियोजन करा

हे जरा नीट समजुन घेतले पाहिजे. यात व्यायामासाठी वेळेचे नियोजन करा असे म्हंटले आहे. याचा अर्थ असा की व्यायामाला केंद्रस्थानी ठेवुन तुम्ही तुमच्या राहिलेल्या वेळेचे नियोजन केले पाहिजे.

अनेक पट्टीचे व्यायामपटु पहाटे, सुर्य उगवण्यापुर्वीच, ज्यावेळी बाकीचे सगळे लोक पहाटेच्या साखर झोपेत असतात, त्याच वेळी घाम गाळीत असतात. या वेळेचा एक फायदा असा की, तुमच्या अशा करण्याने तुमच्या मुलांना देखील सकाळी लवकर उठण्याची सवय लागेल. व दैनंदिन धावपळ जेव्हा लोकांची सुरु होते तेव्हा तुम्ही सर्वांपेक्षा एक पाऊल पुढे असता. नुसते तुम्हीच पुढे असता असे नाही तर तुमचे सगळे कुटुम्बच तुमच्यामुळे एक पाऊल जगाच्या पुढे असते. त्यामुळे आपल्या साठी महत्वाच्या गोष्टींसाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. तुम्ही एखादा महिनाभर जरी रोज व्यायाम केला तरी तुम्हाला समजेल की व्यायाम हा फक्त तुमच्या एकट्यासाठी महत्वाचा आहे असे नाही. याने फक्त शारीरीक लाभ होतात असे नाही तर दिवसभर तुमचा मुड देखील चांगला राहतो. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंदमय होते, तुम्ही जे काम करता ते देखील जास्त परिणामकारक होते. व्यायामामध्ये आपण जरी कॅलरीज जाळत असतो तरी त्यातुन जीवन जगण्यासाठी, सतत पुढे पुढे जाण्यासाठी, सतत आनंदी राहण्यासाठी दररोज नवीन ऊर्जा आपणास मिळते. व्यायाम म्हणजे चैतन्याची अविरत वाहणारी एक नदीच आहे.

  • व्यायामात आनंद व वेगळेपण आणा

काहीतरी वेगळेपणा, काहीतरी नवीन करणे, शोधणे हे मानवी स्वभाचा एक भाग आहे. हे वेगळेपण आपण जर व्यायामामध्ये देखील आणु शकलो तर व्यायाम अधिक मजेशीर होईल.  उदा – माझा एक मित्र आहे. त्याला रनिंगची आवड निर्माण झाली. ट्रेकिंगची आवड तर आधीपासुनच होती.  पण रनिंग ला सुरुवात केल्यापासुन त्याने कोणत्याही किल्ल्याचा बालेकिल्ला गाठण्यासाठी शेवटी धावणे हा नवीन प्रयोग केला. कधी तो नदी काठाने धावतो तर कधी खुल्या मैदानामध्ये. एकदा तर चक्क राजगड-तोरणा यांना जोडणा-या डोंगरावरुन तो राजगड वरुन तोरण्यावर धावत गेला.

गडाने फेटा बांधायला सुरुवात केलीये!माझ्या आज सकाळच्या पर्वत पळी (mountain रनिंग) दरम्यानचे एक दृश्य . ओळखले का कोणता किल्ला आहे ते?…….#runforlife #runnersofinstagram #punerunners #puneathlete #Athlete #running #runningterritory #runningworld #mountainrun #nature #clouds #peak #pinnacles #pinnacle #fortsofindia #fort #marathiinsta #marathi #pune #Sahyadri #WesternGhats #run #runinnature #runningmotivation #runninginspiration #runningman #runstagram

Posted by Hemant Vavale on Sunday, May 12, 2019

तुम्ही देखील तुमच्या व्यायामामध्ये असे नव-नवीन प्रकार आणु शकता. यासाठी युट्युब पहा, योग्य लोकांना इंस्टाग्राम वर फॉलो करा व तुमच्या साठी योग्य काय आहे ते तुमचे तुम्हीच शोधुन काढा.

  • प्रसंगी दुस-यांची मद्त घ्या

अप्रत्यक्षपणे दुस-यांची मदत घेण्याची एक सोपी पध्दत म्हणजे सोशल मीडीयावर आपल्या व्यायामाचे फोटो, व्हिडीयो महिन्यातुन एकदा तरी टाकणे. आपल्या अश फोटो, व्हिडीयोवर लोक आपले कौतुक करतात. असे केल्याने आपणावर एक जबाबदारी येते की आपण जे काही पोस्ट केले आहे त्याप्रमाणे वागत राहण्याची. याला सोशल कमिटमेंट म्हणतात.

प्रत्यक्षरित्या दुस-यांची मदत देखील कधीकधी घेणे गरजेचे असते. एखाद्या जिम मध्ये जाणे. किंवा एखादा रनिंग करणारा, सायकलिंग करणारा आपल्याच परिसरातील समविचारी लोकांचा समुदाय बनवणे. अशा समुदायामधुन आपणास नेहमीच प्रेरणा मिळत राहते.

ही माझी गॅंग व्यायामातील

चला तर मग आपण आपल्या स्वःतविषयीचा दृष्टीकोन बदलुयात, छोट्या ध्येयापासुन सुरुवात करुयात, सोशल मिडीयावर आपल्या व्यायाम ॲक्टीव्हिटीचे फोटो, व्हिडीतो टाकुयात, व्यायामाची आणि जीवनाची मजा वेगवेगळ्या प्रकारे घेऊयात, व एकमेकांना आपापली ध्येये गाठण्यात मदत करुन, व्यायामाला आपल्या सवयीचा भाग करुयात.

माझा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर अवश्य शेयर करा जेणे करुन अनेकांना या विषयी माहिती मिळेल.

धन्यवाद

आपले महेश व पल्लवी ठोंबरे

9923062525

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNTA0NzcwIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzUwNDc3MCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.