Stay Fit Pune - The weight loss center

how to stand and lose weight in Pune

तुम्ही कसे उभे राहता? पहा आणि वाचा…

उभे कसे राहावे?

आज सकाळी मी जिम मध्ये वर्क आऊट करण्यासाठी गेलो. माझा नेहमीचा हलका व्यायाम असतो तो मी करतो रोज. तसे मला जिम मध्ये व्यायामासाठी येणारे खुप जण दिसतात आणि त्यांच्या व्यायाम करताना काय काय चुका होतात त्या देखील दिसतात. जिममधील व्यायामाचे सगळे प्रकार मला माहित आहेतच सोबत कोणत्याही साधनांशिवाय तंदुरुस्तीसाठी दररोज काय व कसा व्यायाम करावा हे देखील मला माहित आहे व त्यात मी निष्णात आहे. अर्थात हा माझा दुराभिमान नसुन अनुभव आहे म्हणुनच मी एवढ्या आत्मविश्वासाने म्हणु शकतो की मी निष्णात आहे.

तर आज सकाळी मी माझा नेहमीचा व्यायाम करीत असताना, चार अगदी तरुण, १८ – १९ वर्षांचे तरुण जिम मध्ये व्यायामासाठी आले. ते नेहमीच वेळेच्या बाबतीत माझ्या मागे पुढे असतात. पाच दहा मिनिटे इकडे तिकडे. माझ व्यायाम सुरु असताना अचानक माझे त्य ग्रुप कडे लक्ष गेले. ते आज बायसेप चा व्यायाम करीत होतो. आळीपाळीने ते सेट मारीत होते. त्यातील एक जण सेट मारुन उभा राहिला. त्याच्या उभ्या राहण्याच्या पद्धतीकडे पाहुन, न राहवुन मी त्याच्या जवळ गेलो. त्याच्या खांद्यावर हात ठेऊन, मैत्रीच्या स्वरात त्याला उभे कसे रहावे हे दोन मिनिटांत समजावुन सांगितले. माझी त्याची ओळख नव्हती तरी त्याने माझा अनाहुत सल्ला आनंदाने स्वीकारला व मी सांगितले तसे उभे राहण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला. अगदी मी व्यायाम संपवुन घरी जाण्यासाठी निघालो व सहज त्याच्या कडे लक्ष गेले असता तो सरळ म्हणजे मी सांगितले तसा उभा असलेला मला दिसला. साहजिकच मला बरे वाटले.

या प्रसंगामुळेच मला याबाबतीत ही सविस्तर लिहावेसे वाटले. आशा करतो की माझा हा लेख देखील तुम्हाला अवश्य आवडेल व यामुळे कुणाच्या ना कुणाच्या तरी उभे राहण्याच्या पध्दतीमध्ये फरक सकारात्मक फरक पडेल.

आपल्याकडे प्रभावी पालकत्व नावाची गोष्ट अगदी हल्ली हल्ली अस्तित्वात आणि मुख्य प्रवाहात आलेली दिसते आहे. पुर्वीच्या पालकांकडुन त्यांच्या पाल्यांना या व अशा बाबतीत सर्वच शिक्षण प्रशिक्षण अगदी नकळत होत असे. मुळात पालकांच्या एकुण राहणीमानामध्ये व्यंग असे काही नसायचेच तर तोच ताठरपणा पुढच्या पिढ्यांमध्ये देखील दिसुन यायचा. हा पुर्वीचा काळ म्हणजे किमान ७०-८० वर्षांपुर्वीचा काळ म्हणावा लागेल. त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले व शिक्षणाची गंगा गावागावात वस्ती वस्तीवर पोहोचु लागली. त्यावेळचे शिक्षण देखील मोठे करारी होते. दररोज नेमाने सुर्यनमस्कार घालणारे, वाचन लेखन करणारे जुने शिक्षक आता पहायला मिळणार नाहीत. हल्ली जे शिक्षक असतात त्यांचा कणा त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये केलेल्या अभ्यासानेच वाकलेला असतो तर ते काय विद्यार्थ्यांसमोर आदर्श म्हणुन उभे राहणार.

आपला मुलगा लहान असल्यापासुन पालकाचे त्याच्यावर बारिक लक्ष असणे खुप गरजेचे आहे. व लहान असतानाच त्याला योग्य सवयी लावणे खुप गरजेचे आहे. लहान पणी ज्या गोष्टीचा मनावर संस्कार होतो त्या सवयी आयुष्यभर सोबत राहतात. मला आठवते आहे की मी साधारण पाचवीला असेल तेव्हा शाळेमध्ये आम्हाला दररोज वर्तमानपत्र वाचणे कसे महत्वाचे आहे हे सांगितले जायचे. त्यानुसार आमच्या घरी येत असलेला पेपर मी देखील दररोज वाचायचा प्रयतन करायचो. त्यातील बातम्या समजायच्या नाहीत कधीच पण त्यावेळी मी एक छोटा लेख वाचलेला मला आठवतोय. पुर्ण लेख आता आठवणार नाहीच, पण त्या लेखाचे शीर्षक मात्र मला चांगलेच आठवते आहे. ते शीर्षक  होते, “भारत म्हणजे थुंकणारांचा देश”. शीर्षकाच्या खाली जे काही लिहिले होते, त्याचा निष्कर्ष असा की “ (सार्वजनिक ठिकाणी किंवा कुठेही) थुंकणे सभ्य माणसाचे लक्षण नाही”. त्या वयात मनावर कोरला गेलेला हा संस्कार आजही माझ्या सोबत आहे, व माझ्या मुलांच्या जडणघडणीमध्ये मी या मुल्याचा वापर जाणीवपुर्वक करीत असतो.

मुळ मुद्द्यावर येऊ आपण आता. उभे कसे राहावे? हा वरवर अत्यंत साधा व सोपा प्रश्न वाटत असला तरी, कोण कसा/ कशी उभे राहतात त्यावरुन त्या व्यक्तिच्या आत्मविश्वासाचा, मनोबलाचा, शारीरीक क्षमतेचा, यशाचा, अपयशाचा चटकन कयास लावता येऊ शकतो. जसे उभे राहणे कसे असावे तसेच चालणे, बोलणे, हसणे इत्यादी गोष्टीदेखील व्यक्तिमत्वाच्या अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. छत्रपती संभाजी राजांना शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रम व कर्तृत्वाची आठवण करुन देताना समर्थ रामदास म्हणतात शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी करणे, कैसे !!

इतका थोर महिमा आहे आपल्या शरीराच्या भाषेचा. होय यालाच इंग्रजी मध्ये बॉडी लॅंग्वेज म्हणतात. आपण त्याला मराठीमध्ये देहबोली म्हणतो. देहबोली व्यक्त होत असते आपल्या उठण्या, बसण्या, उभे राह्ण्या, चालण्या, हात वारे करण्यातुन.

वरील पैकी प्रत्येक विषयावर खुप काही लिहिताअ येईल. पण आतापुरते माअझे लिखाण मी, फक्त उभे कसे राहावे या एकाच विषयावर केंद्रीत करुन मर्यादीत ठेवणार आहे.. भविष्यात पुन्हा वेळ मिळाला तर नक्कीच बाकीच्या विषयांवर देखील सविस्तर लिहीन.

how to stand and lose weight in Pune

how to stand and lose weight in Pune

आधी आपण योग्य नीट उभे न राहण्याने काय दुष्परिणाम होतात ते पाहुयात.

 • आळसावणे व वेदना
  • आळसवणे ही आपल्या शरीराची स्वाभविक स्थिती नाहीये. जेव्हा आपण आळसावतो तेव्हा आपल्या शरीरास, स्नायुंस जास्त काम करावे लागते. यामुळे पाठ दुखी सारख्या कायम स्वरुपी समस्या निर्माण होऊ शकतात.
 • रक्ताभिसण ठिक न होणे
  • आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण योग्य होण्यासाठी शरीराची जी योग्य अवस्था आहे उभे राहण्याची त्यातच आपण उभे राहीले पाहीजे. उदा काही जणांना कमरेतुन पुढे थोडे वाकडे होऊन उभे राहण्याची सवय असते. त्यांच्या या सवयीमुळे रक्तवाहिण्यां सरळ न राहता त्या त्या वेळी वक्राकार होत राहतात. अर्थातच रक्त प्रवाहात याने अडसर येतोच. कारण रक्त वाहिण्यांमधुन रक्त सरळ असतानाचा चांगल्या प्रकारे वाहु शकते हा अगदी साधा नियम आहे.
 • नकारात्मक मुड
  • अमेरिकेमध्ये झालेल्या एका सर्वक्षणामध्ये, सरळ उभे राहणा-या लोकांच्या तुलनेत खांदे खाली झुकवुन किंवा गुडघे मागे वाकवुन, किंवा एकाच पायावर भार देऊण उभे राहणारे लोक जास्त भित्रे असतात हे सिध्द झाले आहे. साहजिकच त्यांचा कल निराशेकडे किंवा नकाराकडे झुकलेला असतो. संकटामध्ये संधी शोधण्यापेक्षा असे लोक त्या संकटांना जास्त घाबरतात, सरळ उभे राहणा-या लोकांच्या तुलनेत.
 • मुंग्या येणे व अवघडणे
  • आपली मनगटे आणि बाहु यांचे चलनवलन तसेच नियमन आपल्या पाठीच्या बरच्या स्नांयु तसेच मानेच्या स्नायुंद्वारे नियंत्रित केले जाते. आपल्या चुकीच्या उभे राहण्याच्या पध्दतीमुळे आपणास कार्पल टनेल सिंड्रोम नावाची व्याधी होऊ शकते. यात हाताला सुज येणे, जळजळ होणे, ताठरपणा येणे, सतत मुंग्या येणे इत्यादी होऊ शकते.
 • प्रेरणांना नाकारणे
  • योग्य पध्दतीमध्ये उभे न राहिल्यामुळे, साहजिकच थोड्याच वेळात उभे राहणारा मनुष्य थकुन जातो. त्यामुळे तो जे काही काम करीत असतो त्यामध्ये त्याचे लक्ष आपोआपच कमी होते. कारण त्याच्या शरीराला पुन्हा पुर्ववत करण्यात त्याच्या नकळतच त्याचे शरीर खुप जास्त शक्ति खर्च करीत असते. साहजिकच त्यामुळे समोरील संधी ओळखण्यात चुकणे, किंवा संधी दिसल्या तरी त्यात काही नवीन नाही अशी भावना होऊन , आहे त्यातच समाधानी राहण्याची वृत्ती बळावते.
 • पचनसंस्थेवर दुष्परिणाम
  • एकाच अवयवावर जास्त ताण येत असेल तर त्यामुळे आपले बाकीचे सगळेच अवयव त्या जास्त ताण असलेल्या अवयवाची झीज भरुन काढण्याचा प्रयत्न आपोआप करतात. याचा परिणाम पचनसंस्थेवर होऊन पचनसंस्थे्चे कायमचे विकार जडु शकतात.
 • थकवा
  • जेव्हा आपण चुकीच्या पध्दतीने उभे राह्तो किंवा बसतो तेव्हा आपल्या नकळतच आपले शरीर आपणास ताजेतवाने ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. शरीर एका मर्यादेपर्यंत हा प्रयतन करते. हा प्रयत्न जास्त होतो तेव्हा मात्र शरीर थकते व त्यामुळे आपणास देखील थकवा येतो. नेहमीच तुम्ही जर अशा चुकीच्या देहबोली मध्ये असाल तर नेहमीच तुमच्या शरीरातील ऊर्जेचा वापर तुमच्या नकळत तुम्हाला सरळ आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी होत असतो. व त्याचा परिणाम शेवटी थकल्यासारखे वाटण्यात होत असतो.
 • ताण/तणाव
  • सतत चे दुखणे, अवघडणे, मुंग्या येणे व त्यासाठी आपल्या शरीराकडुन आपल्या न कळत उपाययोजना करणे, व असे करुन सतत थकवा येणे, त्यातुन प्रचंड शारीरीक तणाव तयार होतो. हा तणाव इतका वाढतो की पुढे तो मानसिक तणावामध्ये रुपांतरीत होत असतो. चुकीची देहबोली तुमच्यातील पौरुषात्वास (याविषयी नजीकच्या काळात सविस्तर लिहिणार आहे.) देखील हानी पोहोचवु शकते.

एकुणच काय तर सरळ उभे राहिलो नाही तर होणारे दिर्घकालीन दुष्परिणाम अनेक आहेत. आता ते जाणवणार नाहीत पण ज्यांना उत्तुंग आयुष्य जगायचे आहे, ज्यांना या जगात काहीतरी सकारात्मक बदल घडवायचा आहे, ज्यांना स्वःतचे तसेच इतरांचे भविष्य उज्वल करायचे आहे, ज्यांना यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करायची आहेत त्यांनी सरळ उभे राहणे खुप गरजेचे आहे.

माझ्या पुढच्या लेखात वाचा सरळ उभे राहणे म्हणजे नेमके काय?

 

कळावे,

महेश ठोंबरे

तुमचा निरामय निरोगी जीवनाचा सांगाती

9923062525

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.