Stay Fit Pune - The weight loss center

how to stand

तारुण्याचे तीन ‘त’कार : उभे कसे राहावे – भाग २

मागच्या लेखामध्ये आपण पाहिले की आपण जर नीट उभे राहिलो नाही तर त्याचे दिर्घकालीन दुषपरिणाम काय व कसे होतात. आज आपण पाहुयात नीट उभे राहणे म्हणजे नक्की काय ते?
अगदी आपल्या मराठ मोळ्या भाषेत सांगायचे तर माणसाने सरळ उभे राहावे. स्त्री आणि पुरुष दोघांनी देखील सरळच उभे राहावे. सरळ उभे राहायचे म्हणजे नक्की काय?

टाचा आणि चौडे

साधारण पणे उभे राहण्याच्या आदर्श स्थिती मध्ये टाचा आणि पायाची बोटे एकाच सरळ रेषेत असणे गरजेचे असते. पण आपल्या इतक्या वर्षांच्या सवयीमुळे आपण त्या स्थिती ला पोहोचु शकणार नाही. म्हणुन किमान एक गोष्ट लक्षात ठेवली व त्याप्र्माणे कृती केली तर देखील त्याचा तुम्हाला फायदाच होईल. ती म्हणजे आपले चौडे फाकवु नयेत. पायाची बोटे वा चौडे नेहमी एकमेकांना अशा कोनात असावेत जेणेकरुन दोन्ही पायाचे चौडे एकमेकांस समांतर राहतील. अगदी समांतर नाही जमले तरी किमान सतत जाणीव पुर्वक याअ गोष्टी कडे लक्ष जरी ठेवले तरी हळु हळु आपण उत्तम स्थिती मद्ये उभे राहण्यास सुरुवात करु. खालील चित्र पहा.

how to stand right

how to stand right

तुमची उंची आणि उभे राहताना पायातील अंतर

आपल्या उंचीच्या प्रमाणात, आपले वजन सहज पणे पेलले जाईल इतके अंतर दोन्ही पायांमध्ये असले तरच आपण कितीही वेळ सहज उभे राहु शकतो. जर आपल्या पायातील अंतर कमी जास्त (जास्त होत नाही सहसा, अतंर कमीच होते.) असेल तर थोड्या वेळाने आपण दोन्ही पैकी कोणत्यातरी एका पायावर जास्त भार देऊन उभे राह्तो. असे एकाच पायावर जास्त भार देऊन उभे राहण्याची सवय एकदा का जडली की ती आयुष्यभर सुटत नाही. त्यामुळे सदैव सावधान असावे. अशा प्रकारे दोन्ही पायांमध्ये आपापल्या उंचीनुसार विशिष्ट अंतर घेऊन उभे राहण्याची सवय देखील एकदा लागली की आयुष्यभर साथ सोडत नाही. त्यामुळे हे आपण ठरवावे लागेल आपण कोणती सवय लावुन घ्यायची ते. दोन्ही पायात समान अंतर ठेऊन उभे राहिल्याने आरोग्यावर व रक्ताभिसरणावर, चयापचयावर खुप चांगला परिणाम तर होतोच पण त्याहीपेक्षा जास्त चांगला परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वाच्या अभिव्यक्ति मध्ये होत असते. व्यक्तिमत्व आणि उभे राहण्याची पध्दत या विषयी जास्त माहिती याच लेखात पुढे वाचावयास मिळेल.

तुमचे गुडघे आणि पोट-या/पिंड-या

उभे राहताना आपल्या शरीरातील जवळजवळ सर्वच अवयव काम करीत असतात. म्हणजे आपली बुध्दी देखील या कामामध्ये नकळत काम करीत असतेच. तरीही ज्या अवयवांवर सर्वात जात भार म्हणजे वजन येते ते अवयव म्हणजे आपल्या पायाच्या पोट-या व गुडघे. आपण कित्येक माणसे पाहतो की ज्यांचे पाय गुडघ्यापासुन खाली म्हणजे दोन्ही पोट-या काहीशा फाकलेल्या असतात. याला सर्रास फेंगड्या पायाचा माणुस असे उपहासिक संबोधन वापरले जाते. अगदी लहान असल्यापासुन त्यांना चुकीचे उभे राहण्याची सवय लागलेली असते त्यामुळे हीच सवय आयुष्यभर राहते व अगदी वयाच्या १८ व्या वर्ष्याच्या आसपासच त्या मुलांच्या पोट-यांच्या भागात दोन्ही पाय फाकलेले दिसतात. तुमच्या मुलांना तुम्ही अशा सवयी पासुन आत्ताच वाचवु शकता. हा झाला एक भाग. तुमचे वजन जर तुमच्या वय व उंचीच्या प्रमाणात असेल तर तुम्ही उभे राहताना गुडघे व पोट-या शक्यतो सरळ राहतील असा प्रयत्न करा. तुम्ही जर तुमचे वजन तुमच्या टाचांवर देऊन उभे राहीलात तर तुमचा उभे राहण्याचा कोन चुकतो. तसेच उभे राहताना आपले वजन फक्त चौड्यांवर असले तरी आपला उभे राहण्याचा कोन चुकतो. व हा चुकलेला कोन समजण्यासाठी आपण आपल्या पोट-या व गुडघे यांच्या कडे पाहुन समजुन घेऊ शकतो. खालील चित्रातील तिस-या व दुस-या क्रमांकाच्या व्यक्तिचा उभे राहण्याचा कोन चुकलेला आहे. हा कोन काटकोन असावयास हवा.
जास्त वेळ उभे राहुन जर तुमचे गुडघे दुखत असतील तर याची दोन कारणे असु शकतात. पहिले म्हणजे तुमचा जमिनीसोबतचा चुकलेला कोन आणि दुसरे कारण असु शकते तुमचे वजन वाढलेले आहे. वाढलेले वजन व चुकलेला कोन हि दोन्ही कारणे देखील असु शकतात. या प्रकारात तुम्हाला वयाच्या ३० व्या वर्षीच व्हेरीकोस व्हेन नावाची व्याधी होऊ शकते.

how to stand and lose weight in Pune

how to stand

कंबर

उभे राहताना तुमची कंबर म्हणजे पोटाकडील बाजु (समोरची बाजु) व तुमच्या पायाचा अंगठा जिथुन सुरु होतो ती जागा, (म्हणजे चौडा) शक्यतो एका सरळ रेषेत असायला हवेत. ही आदर्श स्थिती झाली. असे उभे राहिल्याने तुमच्या धडाचे म्हणजे कंबरेपासुन वरच्या भागाचे वजन नुसते कंबरेवरच न येता पायावर देखील समान पध्दतीने विभागले जाते. यामुळे कंबरेच्या व्याधी होत नाहीत. मुख्य म्हणजे कंबरेच्या मणक्यांमध्ये गॅप निर्माण होणे ही आजकाल तारुण्यात येणारी व्याधी बहुतांश या चुकीच्या उभे राहण्याच्या पध्दतीमुळे निर्माण होत असते.
उभे राहील्यावर जर तुमच्या कंबरे वर तुमचा भार/वजन येत असेल तर याला दोन कारणे असु शकतात. पहिले कारण तुमचा उभे राहण्याचा कोन चुकलेला आहे. व दुसरे कारण असु शकते तुमच्या पोटाचा घेर प्रमाणापेक्षा जास्त वाढलेला आहे. व ही दोन्ही कारणे असतील तर याचा परिणाम नुसताच कंबर दुखण्याइतकाच न राहता पुढे जाऊन गुडघे दुखणे, त्यात ठिसुळपणा येणे असा ही होऊ शकतो.

lose weight in Pune

How to stand

पोट व छाती

तुमचे आरोग्य चांगले आहे की नाही हे तपसण्याची हा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही व्यवस्थित काटकोनामध्ये उभे राहिल्यास, गुडघे, पोट-या, कंबर अगदी व्यवस्थित असेल तर तुमच्या नाकाचे टोक आणि तुमचे पोट एका सरळ रेषेत असावयास हवे. असे जर असेल तर समजा की तुमचे वजन किंवा पोट वाढलेले नाही. छाती थोडी पुढे असु शकते. नव्हे असायलाच पाहिजे. म्हणजे तुमच्या पोटापेक्षा तुमच्या छातीचा आकार जास्त असावयास हवा हे लक्षात ठेवा. असे पुर्वी होते व आता नाही असे जर तुमच्या बाबतीत झाले असेल तर तुम्हाला माझ्या सारख्या एखाद्या तज्ञाची गरज आहे. तज्ञ मार्गदर्शक तुमचे पोटाचा घेर कमी कमी करण्यात तुमची मदत करेल. व एकदा पोटाचा घेर कमी झाला की मग स्नायु संवर्धनासाठी तुम्ही व्यायाम आणि योग्य आहार करुन आदर्श शरीरयष्टी प्राप्त करुन घेऊ शकता. आपण अगदी सहज जरी उभे राहिलो तरी छाती पोटाच्या थोडी पुढे दिसलीच पाहिजे. अगदी मिलिटरी सावधान स्टाईलमध्ये छाती फुगवुन उभे राहण्याची देखील आवश्यकता नसते.

how to stand right

how to stand right

खांदे, मान व डोके

अर्थातच हे सगळेच काटकोनामध्ये असावयास हवेत. आणि आपल्या शरीराचे वर सांगितलेले सर्व अवयव जर व्यवस्थित पणे काम करीत असतील तर खांदे मान व डोके देखील सरळ राहतेच. क्वचितच सवयींमुळे यात बिघाड होऊ शकतो. आपला आत्मविश्वास वाढवणारे उभे राहणे शिकायचे असेल तर छाती जसे आपण पुढे करुन उभे राहतो तसेच आपल्या खांद्याच्या बाबतीत देखील आपण काळजी घेतली पाहिजे. खांदे पडलेले नसावेत. आपला खांदा आणि मान या मध्ये साधारण काटकोन व्हायला पाहिजे. सोबतचे चित्र पहा. खांदा जर आपण सरळ आणि ताठ ठेवले तर आपोआप आपली छाती देखील पुढे येते. मान सरळ असेल तरच डोके देखील सरळ असते. व असे केल्यामुळे रक्ताभिसरण खुप चांगले होते. याचा परिणाम प्रतिक्षिप्त क्रिया, हजरजबाबी पणा, सर्जनशीलता, कलात्मकता, या गोष्टींमध्ये होतो.

how to stand properly

how to stand properly

हल्ली मोबाईल फोन मुळे मान व डोक्याच्या बाबतीत सर्रास सर्वांच्य चुका होतात. फोन च्या स्क्रीन वर काय आहे हे वाचण्यासाठी मान वाकडी करुन खाली बघण्यापेक्षा फोन आपल्या डोळ्यांच्या रेषेत आणुन बघणे कधीही सोयीचे. ज्यांना खुप जास्त वेळ फोन वर काम करण्यात घालवावा लागतो त्यांनी अशी सवय लावुन घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सरल उभे राहिल्यामुळे काय फायदे होतात?

१. स्मरणशक्ती व नवीन शिकण्याची क्षमता वाढते
२. समोरच्या व्यक्तिला तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसतो
३. तुमचा मुड नेहमी चांगला राहतो.
४. श्वसनक्रिया तसेच रक्ताभिसरण चांगले होते.
५. मानेचे व पाठीचे दुखणे कमी होते
६. पौरुषत्वाचा सतत विकास होतो.
७. तुम्ही उंच व सडपातळ दिसता.

how to stand

benefits of good posture

या व्यतिरिक्त सरळ उभे राहण्याचे खुप जास्त मनिवैज्ञानिक फायदे आहेत. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही नेहमी ताजेतवाने राहता. तारुण्याचे तीन “त” कार तुमच्या मध्ये ओसंडुन वाहताना दिसतात. हे तीन ‘त’कार म्हणजे तेजस्विता, तपस्विता व तत्परता.

माझा हा लेख तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर अवश्य शेयर करा जेणेकरुन याचा फायदा अनेकांना होईल.

कळावे,
महेश ठोंबरे
तुमचा निरामय निरोगी जीवनाचा सांगाती
9923062525

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.