Stay Fit Pune - The weight loss center

Lose belly fat in India

How to lose fat

कष्टाची कमाई…

जेव्हा माझे वजन देखील जास्त होते आणि माझे शाळा कॉलेज चे मित्र कधीतरी अचान भेटायचे तेव्हा मला पाहील्यावर साहजिकच ,माझ्या वाढलेल्या पोटाकडे इशारा करीत, त्यांचा पहीला प्रश्न असायचा “अरे काय हे महेश?”

मग ओशाळल्यासारखे होऊन देखील, मी मान वर करुन अभिमानाने, माझ्या पोटाच्या घे-यावरुन हात फिरवुन म्हणायचो “अरे कष्टाची कमाई आहे ही!!!”

मला हे माहीत असायच की माझ्या अशा उत्तराने कुणाचेही समाधान होत नव्हते. किंबहुना माझे समाधान व्हायचे नाही. माझ्या मित्रांकडे पाहुन त्यांचा हेवा वाटायचा. अस वाटायच की आपणदेखील असे होते एकेकाळी. आपण सुध्दा फिट ॲण्ड स्लिम होतो. पण आता जाड, पोट पुढे आलेला, चक्क लठ्ठ झालोय. मी लठ्ठ् कधी झालो हे मला ही समजले नव्हते.

असो..तर विषय असा आहे की त्याकाळी माझे वाढलेले वजन मी कष्टाची कमाई म्हणुन अभिमानाने मिरवायचो, ते नक्की काय होते? पोटाचा घेर, चरबी वाढण्याची कारणे काय आहेत? अशी चरबी वाढल्याने काय दुष्परीणाम (अत्यंत भयानक) होतात? कोणते पदार्थ खाणे आपण टाळावे? व्यायाम काय करावा?

पोटाचा घेर वाढणे म्हणजे नेमके काय?

शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जेव्हा सेवन करण्यात येते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीत होते.
सुरुवातीला चरबीच्या पेशी आकाराने वाढतात. जेव्हा आकाराची मर्यादा संपते, त्यानंतर दुस-या पेशी तयार होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे चरबीच्या पेशी वाढत जातात व स्थूलपणा येतो. जेव्हा वजन कमी होते. त्या वेळेस चरबीच्या पेशींचा आकार कमी होतो. पण संख्या कमी नाही होत.

लठ्ठपणाची मुख्य कारणे काय आहे

 

1.शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरीजपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठवून राहतात व लठ्ठपणास सुरुवात होते. बैठे काम करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त आढळून येतो.
2.आनुवंशिकता हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे
3.थॉयरॉइडच्या आजारामुळे, विशेषत: हायपोथॉयरॉडिझममुळे वजन वाढतेय.

4.इन्सुलिनोमा ज्या रुग्णामधील रक्तातील साखरेचे प्रमाण नेहमी कमी होते
(हायपोग्लायसेमिया) अशा रुग्णांना वारंवार खावे लागते त्यामुळेही वजन वाढते.

5.मानसिक आजार: विशेषत: डिप्रेशन असणा-या रुग्णांना वारंवार जेवण्याची सवय असते. त्यामुळेही वजन वाढते.
6.गरोदरपणा: स्त्रियांमध्ये गरोदरपणात व नंतर 8 ते 10 किलो वजन वाढते व ते नंतर कंट्रोल न केल्यास तसेच राहते.
7.पॉलिसायस्टिक ओव्हरीन डिसीझ.
8.मेडिकेशन-स्टेरॉइड,अँटी डीप्रेसंट,ओ.सी.पी.अशा गोळ्यांमुळे वजन वाढते.

लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास काय दुष्परिणाम होतात

 

ब्लड प्रेशर(रक्तदाबाचा त्रास),डायबेटीस(मधुमेह)जसे आयुष्यभर राहतात तसेच लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास तोही आयुष्यभराचा सोबती होऊन बसतो.

खालील लांबलचक यादी ही दुष्परिणामांची आहे.

१. दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो.

२. थकवा लवकर येणे.

३.दिवसभर सुस्तपणा,कामात उत्साह न वाटणे

४. श्वास घेण्यास त्रास होणे.

५. घोरणे.

६. डायबेटीस

७. हायपरटेन्शन

८. गुडघ्यावर अतिरिक्त भारामुळे गुडघेदुखी

९. कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे.

१०. वंध्यत्व

११. अनियमित मासिक पाळी

१२. पित्ताशयातील खडे

१३. तळहात तळपायाची आग होणे व मुंग्या येणे.

लठ्ठपणातील आहार कसा असावा

काही सोपे उपाय आहेत.ज्यांनी चांगला फायदा होतो.एकाच वेळी पोटभर जेवणे टाळावे.उदा:जर तुम्ही सकाळी व संध्याकाळी मिळून 4 पोळ्या खात असाल तर त्या 4 पोळ्या विभागून खाव्यात. रात्रीचे जेवण थोडे हलके घ्यावे.जेवणानंतर एक तास आडवे पडू नये.

हे पदार्थ टाळावेत

तेलकट, तुपकट, शिळे जेवण, बटाटा,भात, दुधाचे पदार्थ (पनीर,बटर,चीज).

या पदार्थांचे सेवन वाढवावे

सलाड (काकडी,टोमॅटो,बीट,मुळा) *कडधान्ये(मूग,मटकी,चवळी)भाज्यांचे सूप

व्यायाम काय काय करावा

सर्वात सोपा परवडणारा आणि अतिशय परिणामकारक व्यायाम म्हणजे(ब्रिस्क वॉकिंग)म्हणजे वेगाने चालणे, जेणेकरुन घाम आला पाहिजे. रोज कमीत कमी 40 मिनिटे ब्रिस्क वॉक घेतला पाहिजे. घाम येणे म्हणजे शरीरातील चरबी(फॅट)जळणे. जितका जास्त घाम येईल तितके चांगले.शक्य असल्यास जिम जॉइन करण्यास हरकत नाही.पण नियमितता असावी व व्यावसायिक प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. लठ्ठपणा हा ऐकण्यास जितका साधा सरळ वाटतो तितकाच तापदायक. वेळीच उपाय न केल्यास गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसून येतात.
शेवटी आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे.

एवढे सगळे करुन देखील जर तुमच्या कष्टाची कमाई कमी होत नसेल तर माझ्याशी संपर्क साधा.

Weight loss and wellness coach in Pune

मी महेश ठोंबरे, उत्साहवर्धक, सडसडीत,निरोगी जीवनाच्या वाटेवरील तुमचा सांगाती.

Facebook Comments

Comments
ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.