Stay Fit Pune - The weight loss center

चांगले आयुष्य जगायचेय ? मग आधी स्वतःचा विचार करा..

अनेक अशा खुळचट संकल्पनांना आपण आपलेसे करुन घेतलेले असते. अशा संकल्पना आपल्यासाठी आणि आपल्या नात्यांसाठी देखील खुप घातक असतात तरीही आपण कधीही त्यांच्याकडे तितक्याशा गांभीर्याने पाहिलेले नसते. अशा संकल्पनांमधीलच एक आहे स्वतःला म्हणजे प्रथम पुरुषी एक वचनी, अशा ‘मला’ जर मी प्राधान्य देत असेल माझ्या एकंदरीत आयुष्यात, जीवनयापनात, तर मी स्वार्थी आहे. मी माझा विचार प्राधान्य क्रमाने केला तर मी स्वार्थी, अशा प्रकारची विचारसरणी म्हणजे स्वार्थी विचारसरणी होय, असा गैरसमज नव्हे सपशेल चुकीचा सिद्धांत आपण करुन घेतलाय. एकच असत्य जर हजारदा उच्चारले तर ते काही काळाने सत्य वाटु लागते अशी काहीशी अवस्था झाली आहे या तत्वाच्या बाबतीत देखील.

वास्तव मात्र याच्या एकदम विपरीत आहे. खरेतर जीवन यापन करताना, स्वतःला प्राधान्य क्रमवारीमध्ये, सर्वात वरच्या स्थानी ठेवणे, ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील सर्वोत्तम गोष्ट आहे की, तुम्ही करु शकता.

आपले आप्तजनांना तेव्हाच लाभ होतो जेव्हा आपण स्वतः आपल्या पुर्ण क्षमतेने सक्रिय असतो. आपण आपल्या पुर्ण क्षमतेने काम करीत असतो तेव्हा केवळ आपले कुटुंबियच नाही, तर आपले ग्राहक, आपले व्यावसायिक भागीदार, साथीदार, स्टेकहोल्डर्स देखील आपणामुळे लाभान्वीत होत असतात. हे एवढे असे सगळे असुन देखील, आपल्या मनाचे कंडीशनींगच अशा पधतीने केले गेले आहे की, असा म्हणजे स्वतःचा विचार आधी करणे म्हणजे स्वार्थीपणा मानला जातो. व आपण  ही अशा चुकीच्या धारणांना सहजच बळी पडत असतो.

या धारणा समाजमान्यता बनल्या आहेत. व सहजासह्जी यांच्या बंधनातुन स्वतःची सुटका करुन घेणे सोपे नाही. पण जत्र खरोखर आपणास माझे म्हणने, मनापासुन पटले असेल व यातुन स्वतःची सुटका करुन घ्यायची असेल तर मी तुम्हाला काही युक्त्या सांगतो की ज्यांचा फायदा मलादेखील झालेला आहे.

  • इतरांशी तुलना करणे थांबवा

खरतर याच्याकडे बघ, तिच्याकडे बघ, तो बघ कसा प्रगती करतोय, ती बघ कशी वागते, अशा असंख्य अनावश्यक सुचनांचा अक्षरशः भडीमार आपल्यावर अगदी लहानपणापासुनच झालेला असल्यामुळे, नकळतच आपण स्वतःची तुलना इतरांशी, विशेष करुन जे आपल्यापेक्षा जास्त सरस आहेत अशा लोकांशी करीत असतो. हे असे केल्याने, आपण आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे असा वेळ, आपले लक्ष आपणा स्वतःवर केंद्रीत करण्याचे सोडुन दुस-यावर करीत असतो. खरतर, प्रत्येकजणच इथे संघर्षरत आहे. आपणास जे काही दिसते, जग तसे अजिबात नसते. आपण ज्यांना आपणापेक्षा जास्त यशस्वी म्हणतो किंवा मानतो, त्या लोकांना आयुष्यात कोणकोणत्या समस्या आहेत, कोणकोणत्या आव्हानांना तोंड द्यवे लागत आहे, कोणकोणत्या वाईट सवयी आहेत हे आपणास खरेच, जसे आहे तसे माहित असते का? तर नाही. वस्तुस्थिती जशी दिसते तशी प्रत्यक्षात असतेच असे नाही. प्रत्येक जण स्वतंत्र प्रतिभा, व गुणदोष घेऊन आलेले आहे.

त्यामुळे आपला फोकस, दुस-यांवरुन, आपणा स्वतःवर शिफ्ट करणे , आपल्यासाठी फायद्याचे आहे. गुणदोष शोधायचेच आहेत तर आपले शोधले पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या प्रतिभांचा शोध घेऊन, त्यांना फुलवण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहणे आपल्या फायद्याचे आहे.

  • समाधानी होऊ नका

समाधानी होणे व राहणे म्हणजे जीवनातील आनंदाला मुकणे होय. समाधानी होणे हे केवळ पैसा किंवा करीयरच्या बाबतीतच आहे असे नाही. काही लोक नोकरीमध्ये समाधानी असतात. कारण महिन्याला ठराविक रक्कम येत असते. व त्याच रकमेमध्ये जगावे कसे हे तुम्ही आपोआप शिकला असता. त्यामुळे आपोआपच नवीन काहीही तुमच्या समोर आले की जे तुमच्या चाकोरी बाहेरील आहे, तुम्ही त्याला स्पष्ट नाकारता. आपले हे जीवन पुन्हा आपणास मिळणार आहे की नाही कुणास ठाऊक? पण आता या क्षणाला जे आपणास मिळाले आहे, काही कमी आहे का? दोन्ही हात आहेत, पाय आहेत, डोके ठिकठाक काम करीत आहे. सदसदविवेक जागा आहे, योग्य-अयोग्य काय सर्व समजते, मग आपण समाधानी का व्हावे बरे? कल्पना करा ज्यांच्याकडे हात नाहीत त्या लोकांनी कितीही ठरवले की काहीतरी नवीन स्वतःच्या हाताने करायचे, ते करु शकतील का कधी? ज्यांना पाय नाहीत, त्यांनी धावायचे अथवा पर्वत शिखर गाठायचे ठरवले तर ते कधी करु का कधी? मतिमंद व्यक्तिने नवीन व्यवसाय किंवा आहे तो व्यवसाय वृध्दी साठी कल्पक विचार करायचे म्हंटले तर त्यांना ते जमेल का? नाही करु शकणार, बरोबर ना? मग आपणाकडे सगळेकाही ठिकठाक व उत्तम आहे. आपण आता जे काही आहोत त्यापेक्षा आपणास अधिक उन्नत होता येईल का? आपल्यातील सर्वोत्तम, व्यक्ति चा शोध घ्यायचा असेल तर समाधानी होणे सोडुन द्या.

  • कौतुक करा – कृतज्ञता बाळगा

आपणाकडे जे काही आहे त्या सर्वांचे मनापासुन कौतुक करा. आपण ज्या शय्येवर झोपतो, जे कपडे परिधान करतो, आपला जीवनसाथी, गाडी, घर , आपण खतो ते अन्न! हे सगळे आपणाकडे आहे याची जाणिव असुद्या. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतः य जगात ज्या नवीन गोष्टी आणल्या आहेत त्यांचे कौतुक करा. नवनिर्माण करणे म्हणजे मनुष्य मात्राचे नैसर्गिक कर्तव्य आहे व तुम्ही या कर्तव्याच्या निर्वाहनामध्ये यशस्वी होत आहात याची जाणिव सदैव राहुद्या. या जाणिवेने पहा तुम्हला किती आनंद होईल ते. तुम्ही निर्माण कर्ते आहात. सृजन करण्याची क्षमता तुमच्या मध्ये आहे ही जाणिव तुम्हाला अधिक जास्त प्रेरीत करील. त्यामुळे तुमच्या कडे असलेल्या छोटछोट्या गोष्टींविषयी सदैव कृतज्ञ रहा व त्यांचे बिनधास्त कौतुक करा.

  • नाती समृध्द करा

जे जे म्हणुन तुम्हाला निराश करते अशा सर्व गोष्टी ओळखा. अशी माणसे ओळखा की ज्यांमुळे तुम्हाला ‘मस्त’ वाटण्यास बाधा येते. आनंदाच अनुभव ज्या व्यक्तिंच्या सहवासात जास्त येतो, अशा व्यक्तिंचा सहवास जास्तीत जास्त मिळेल असा प्रयत्न करा. तुमच्या अयुष्यात अशा किमान दोन तरी व्यक्ति हव्यात की ज्यांच्याकडुन तुम्हाला प्रेरणा मिळते. ज्यांच्याकडे पाहिल्यावर, ज्यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला हलके वाटते, ज्यांचे ऐकल्यवर तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते. अशी माणसे जी तुमचे मोल जाणतात, जी तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम करतात, असी माणसे जी तुम्हाला , तुम्ही जसे आहात तसे स्वीकारतात. आणि गम्मत म्हणजे तुम्ही देखील कुणाच्या तरी ‘त्या’ दोन लोकांच्या यादी मध्ये असाल याची काळजी घ्या. व तसे होण्यासाठी तुम्हाला सुध्दा दुस-यांना ऐकणे शिकावे लागेल. दुस-यांशी, त्यांच्याविषयी बोलावे लागेल, दुस-यांना सतत प्रेरणा द्यावी लागेल. त्यांच्याशी वागताना, ‘मी नाही तु’ असा दृष्टीकोन अंगीकरावा लागेल. व असे केल्याने तुमची नाती समृध्द होतील व जीवनप्रवासासाठी तुम्हाला सहप्रवासी, वाटसरु देखील मिळतील.

  • नाही म्हणायला शिका

आयुष्य म्हणजे स्वावलंबन नाही मित्रांनो. खुप चांगले, उन्नत आयुष्य जगायचे असेल तर परस्परावलंबन हेच तत्व अंगिकारावे लागते. व हे करताना एकमेकाना मदत करणे आपण नेहमीच करीत असतो. पण कधी कधी परिस्थीती अशी ही होत असते की, आपण आपली सुख-शांतीच्या बदल्यात इतरांना मदत, केवळ भावनेच्या भरात करतो. मग हे देणे मुल्यांच्या बाबतीत असेल किंबा पैसा, वेळ वा आदर असेल. ज्यांची घेण्याची योग्यता आहे, त्यांनाच दिले पाहिजे. ज्यांची नाहीये, त्यांना दिल्याने आपण आपल्या प्रगतीच आलेख उतरत्या दिशेने काढायला सुरुवात करीत असतो.  आपण जेव्हा दुस-याला स्पष्ट ‘नाही’ असे म्हणतो तेव्हा अनुषंगानेच आपण स्वतःला ‘हो’ असे म्हणत असतो. स्वतःला ‘हो’ म्हणताना, आपण आपल्या जीवनमुल्यांना ‘हो’ म्हणत असतो. व असे ‘हो’ म्हंटल्याने आपोआपच आपण त्या जीवनमुल्यांशी स्वतःला जोडुन घेत असतो. असे केल्याने आपला स्वाभिमान वाढीस लागतो व साहजिकच इतरांना देखील समजते की तुम्ही तुमच्या तत्वांवर ठाम आहात. ते तुमचा आदर करण्यास सुरुवात करतील.

  • नात्यांच्या मर्यादा निश्चित करा

कित्येकदा तुम्हाला दुसरे कुणी ‘असेच’ का बोलले ‘तसेच’ का बोलले म्हणुन ती ती नाती खट्टु होतात असा अनुभव आला असेल. दुस-यांनी आपल्याशी कसे व किती मर्यादेपर्यंत वागावे हे आपण ठरवले पाहिजे. व नात्यांमध्ये अशी स्पष्टता असेल तर मग तुम्हाला किंवा त्या व्यक्तिला ‘असेच का’, ‘तसेच का’ असे मन खट्टु करणारे अनुभव येणार नाहीत. यामुळे खरेतर, नात्यांमध्ये स्वातंत्र्य मिळेल.  या मर्यादा तुमच्या जीवनमुल्यांच्या असतील.  व त्यामुळे इतरांना हे समजेल की, तुमचा आदर त्यांनी का करावा व कसा करावा.

  • आपला आतला आवाज ऐका

आपल्या प्रत्येकामध्ये अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे आपल्या जगण्याला अर्थ आहे. आपल्या आतील या गोष्टीच खरतर आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात. या गोष्टी बाहेर नसतात, त्या आपल्यापासुन वेगळ्या नाहीयेत. या गोष्टी आपल्याच आत आहेत, व आपल्या ‘असण्याचा’ अविभाज्य भाग आहे. आपल्या आयुष्यातील स्वप्नांना पुरे करण्यासाठी आपणास, आपल्या आतला आवाज नेहमीच सांगत असतो, पण आपलेच त्याकडे लक्ष नसते. आपले लक्ष सदैव बाहेर असते. एक किंवा एकापेक्षा अशा गोष्टी असतील की ज्या तुमच्या शी निगडीत आहेत. ज्या तुम्हाला सर्वस्वी आवडतात. ज्या मिळविण्यासाठी तुम्ही वाट्टेल ते करु शकता. ज्या करण्याने तुम्हाला, काहीतरी केल्याचा आनंद मिळतो, ज्या मिळवल्याने तुम्ही आनंदी होता, ज्या केल्याने तुम्हाला पुनपुनः ते करण्याची प्रेरणा मिळते. ते असते तुमचे पॅशन. पॅशन एक किंवा अनेक असु शकतात. आणि आपल्यातील पॅशनच आपल्या आयुष्याला दिशा देत असते.  व याच गोष्टी करण्यासाठी आपल्या आतला आवाज, आपणास खुणावत असतो. आपण फक्त तिकडे लआ दिले पाहिजे, आपल्या आतला आवाज ऐकला पाहिजे.

आपल्या आयुष्यातील सर्वकाही आपल्यापासुन सुरु होते व मग ते आपल्या नात्यांमध्ये पाझरते. त्यामुळेच आपण आपणावर जास्त प्रेम करणे, स्वतःच्या पॅशन जोपासने , स्वतःला वेळ व सर्वात महत्वाचे स्वतःला प्राधान्य देणे म्हणजे आपल्या आयुष्याचा हेतु सफल करण्यासाठीचा प्रवास करणे होय. आपणास इतर लोकांमध्ये जे बदल हवे आहेत, लोकांनी कसे वागले पाहिजे (तुमच्यासोबत व सर्वांनासोबतच), कसे आनंदी राहिले पाहिजे याचा परिपाठच जणु तुम्ही बनुन जाल. आपले आयुष्य आपण जितके जास्त आनंदाने, कौतुकाने व समजुतदार पणाने जगु, तितकाच जास्त आनंद, कौतुक, समजुतदारपणा, सौंदर्य, द्याभाव आपण इतरांच्या आयुष्यात संक्रमित करु शकतो.

त्यामुळे स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःवर प्रेम करा!

चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.

कळावे

आपले

महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.