Stay Fit Pune - The weight loss center

weight loss in pune

चांगले आयुष्य जगायचय? मग गाढ झोपा… (भाग २)

आपली झोप कशी झाली म्हणजे चांगली झाली की नाही झाली हे आपले आपणासच समजते, झोपेतुन जागे झाल्यावर. सकाळी झोपेतुन जागे झाल्यावर कधी कधी वाटते की झोप झालीच नाही. भलेही आपण सगळी रात्र अंथरुणावर असु किंवा झोपेत देखील असु. पण आपणास असे वाटते की झोप झाली नाही. असा अनुभव अनेकांना आला असेल, बरोबर ना?


गाढ झोपेविषयीचा पहिला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा


आणि अनेकदा असेही होते की अगदी थोडाच वेळ अंथरुणावर पडलेलो असलो तरी, झोपेतुन जागे झाल्यावर एकदम नवीन उत्साह आपल्यात संचारतो. असा अनुभव देखील आपण घेतला असेलच. हे असे अनुभव घेण्यासाठी किंवा येण्यासाठी बाकी कसल्याही निकषांची गरज नसते. तुम्ही श्रीमंत असा अथवा गरीब असा. निसर्गनियमानुसार तुम्हाला झोप लागतेच. यातील निसर्गनियम हा शब्द लक्षात ठेवा याविषयी आपण पुढे वाचुयात.

पण असे वेगवेगळे अनुभव का बरे येत असतील आपणास? हो एकच व्यक्तिला असे वेगवेगळे अनुभव येऊ शकतात आणि सर्वांनाच असे अनुभव येतात. म्हणजेच काय झोपेतुन जे काही मिळवायचे असते ते मिळविण्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकालाच आहे.

यातील पहिला जो अनुभव आहे, तो म्हणजे झोप पुर्ण न झाल्यासारखे वाटणे! यात होते काय बरे की ज्यामुळे आपणास असे वाटते. खरे तर शरीराला जेवढ्या आरामाची आवश्यकता असते तेवढा आराम अंथरुणावर पडल्यामुळे मिळालेला असतो. तरीदेखील थकवा काही गेलेला नसतो.

दुसरा अनुभव असा आहे की, झोपेतुन जागे झाले की असे वाटते की जणु एक नवीन ऊर्जेचा भांडारच आपल्याला मिळाले आहे. आणि यालाच म्हणतात गाढ झोप. ही झोप नुसती आपल्याला शरीराची गरज भागवते असे नाही तर अशी झोप आपल्या मनाची गरज देखील भागवते. काय असते आपल्या मनाची गरज?

weight loss in pune

नवीन नवीन जेव्हा स्मार्टफोन बाजारात आले तेव्हा अनेकांनी ते विकत घेतले. या स्मार्टफोनचा उपयोग खुपच जास्त आहे. यात अनेक ॲप्स आपण इन्स्टॉल केले. पण त्या काळात म्हणजे जेव्हा हे फोन बाजारात आले तेव्हा यातील मेमरी म्हणजे रॅंडम ॲक्सेस मेमरी जी होती ते मर्यादीत होती. म्हणजे २५० एम बी इतकी. या कमी मेमरी मुळे या फोन मध्ये ॲप वापरण्यावर मर्यादा येत. जर चुकुन आपण जास्त ॲप्स एकाच वेळी उघडले तर थोड्याच वेळात हे स्मार्ट फोन मंद व्हायचे म्हणजे त्यांची कार्यक्षमता कमी व्हायची. आणि परिणाम स्वरुप ते हॅंग व्हायचे. खुप वेळ स्क्रीन वर काहीच दिसायचे नाही. आपलेही अगदी असेच होत असते. आपले मन देखील असेच आहे मेमरी सारखे. याला मर्यादा आहेत. त्या मर्यादेपेक्षा जास्त काथ्याकुट केला की मग त्याचे काम करणे मंदावते. स्मार्ट फोन असा हॅंग झाला की आपण काय करायचो आठवतय का?

आपण फोन रीस्टार्ट करायचो. रेस्टार्ट केल्यामुळे मेमरी संपुर्ण पणे मोकळी होते व मग आपण पुन्हा जे काम करायचे आहे ते करु शकतो. निसर्गाने मनुष्याच्या नव्हे संपुर्ण सजीव सृष्टीसाठी असे आपोआप रीस्टार्ट होण्याची व्यवस्था करुन ठेवली आहे. व य व्यवस्थेलाच गाढ झोप म्हणतात. गाढ झोपेत असताना आपणास सगळ्या विश्वाचा विसर पडलेला असतो. कौटुंबिक, व्यावसायिक अथवा सामाजिक कितीही मोठ्या समस्या असल्या तरी गाढ झोपेमध्ये या सर्वांपासुन आपणास मुक्ती मिळते. जीव शास्त्रीय भाषेत याला सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची निर्मिती म्हणतात. आपल्या मेंदु मध्ये या हार्मोनची निर्मिती झाली की आपणास झोप लागते, गाढ झोप लागते. दिवसभराच्या कामामुळे जेवढा काही ताण आलेला असतो तो सर्व ताण या हार्मोन मुळे संपुन जातो. त्यामुळे गाढ झोप झालेली असेल तर तुमचा सगळा थकवा निघुन जाऊन तुम्हाला एकदम ताजेतवाने असल्याचा अनुभव येतो. आणि ज्यांची झोप झालेली नसते त्यांची मात्र ‘गाढ’ झोप झालेली नसते.

त्यामुळे आपण दररोज झोपताना एक संकल्प करुनच झोपले पाहिजे की आपणास गाढ झोपी जायचे आहे.

आता आपण निसर्गनियम पाहु! काय म्हणतो निसर्गनियम झोपेच्या बाबतीत. अगदी साधा आहे हा नियम. दिवस मावळुन अंधार पडला की थोड्याच वेळात आपण झोपले पाहिजे. निसर्गाने आपल्या शरीराची आणि मनाची रचनाच अशी केली आहे की आपसुकच आपण झोपी जाऊ. पण जर आपण निसर्गनियमांना डावलले तर मात्र तुम्हाला झोप येणारच नाही उशिरापर्यंत. निसर्गनियमांना डावलने म्हणजे काय?

आपल्या डोळ्यांची रचना अशी आहे की ते दिवसा प्रकाश पाहण्यासाठी बनलेले आहेत. रात्रीच्या वेळी जर आपण खुप जस्त वेळ प्रकाश उत्सर्जित करणा-या साधनांकडे पाहिले तर आपण निसर्ग नियम डावलले असे समजावे. ही साधने कोणती आहेत? टिव्ही, मोबाईल, कंप्युटर, सिनेमा स्क्रीन, इत्यादी. ही सारी आधुनिक साधने की जी आपले जीवन सुखकर करण्यासाठी शोधली गेली तीच साधने आज आपल्यामुळेच आपली वैरी झाली आहेत. या साधनांचा वापर थांबवला पाहिजे सपशेल असे नाही. पण यांच्या वापरावर मर्यादा असाव्यात. असे रात्रीच्या वेळी प्रकाश पाहणे किंवा प्रकाश निर्माण करणे यालाच प्रकाश प्रदुषण म्हणतात. हे टाळणे कमी करणे आपल्याच हातात आहे. किमान आपापल्या घरातील क्रुत्रिम प्रकाश साधनांच्या वापरावर आपण नियंत्रण आणु शकतो. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही करु शकता.

आता सोबतच आणखी काय काय करता येईल गाढ झोप येण्यासाठी ते आपण थोडक्यात पाहु.

बेडरुम मध्ये टीव्ही, संगणक किंवा मोबाईल ठेवू नका

ऐकायला, वाचायला जरी हे सोपे वाटत असले तरी करण्यासाठी अजिबात सोपे नाही. झोपण्यासाठी बेडवर जाण्यापुर्वीच आपापले फोन, त्यातील इंटरनेट कनेक्शन म्हणजे डाटा कनेक्शन बंद करुन हॉल मध्ये अथवा झोपण्याच्या जागे पासुन दुर ठेवा. काही नियम जे स्वतःला जमतील असे करुन देखील तुम्ही तुमची मोबाईल ला त्या दिवसापुरता राम राम करण्याची वेळ ठरवु शकता. हे करुन पहा काही दिवस आणि आम्हाला तुमचे अनुभव सांगा.

झोपण्यापुर्वी म्हणजे बेडवर आडवे होण्यापुर्वी पाय स्वच्छ धुवा

असे केल्याने गाढ झोप लागण्याला मदत होते. दोन तीन मिनिटे जर पाय कोमट पाण्यात ठेवले तर आणखी चांगले परिणाम येतील.

रात्रीचे जेवण हलके घ्या

रात्रीच्या जेवणात शक्यतो जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतील असे अन्न खाऊ नका किंवा कमी खा. उदा चपात्या जर तुम्ही नेहमी ३ खात असाल तर एकच खा. भात देखील नेहमी खाता त्यापेक्षा निम्माच खा. व काकडी, गाजर, टोमॅटो, बीट इत्यादींनी चपाती, भात यांची उणीव भरुन काढा. नुसते सलाडच खाल्ले तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील खुप चांगली मदत होईल.

दिवसा शक्यतो नैसर्गिक प्रकाशात किमान तीन तास तरी घालवा

वर सांगितलेला निसर्गनियम आठवतोय ना? तर आपल्या शरीराची रचनाच अशी आहे की जर दिवसभर आपण कमी प्रकाशात काम केले तर रात्री आपल्या झोपेवर याचा परिणाम होईल. कॉट्रास्ट इफेक्ट म्हणतात तो हाच.

बेडवर पडुन देखील झोप येत नसेल तर

पहिली गोष्ट मोबाईलला हात लावु नका. दुसरी गोष्ट एखादे पुस्तक घेऊन वाचणास सुरुवात करा. वाचनाची आवड असो अथवा नसो, असे केल्याने थोड्याच वेळात तुम्ही झोपी जाल यात शंका नाही.

लक्षात ठेवा. चांगली गाढ झोप आपल्या एकुणच अस्तित्वासाठीच अति महत्वाची गोष्ट आहे. चांगल्या झोपेमुळे आरोग्य तर सुधारतेच उलट अनेक व्याधी, आजारांपासुन आपले संरक्षण देखील होते. त्यामुळे निरामय जीवनयापन करण्यासाठी आहार, व्यायाम आणि झोप ही तीन मुलभुत घटक आहेत.

वाचत रहा माझे लेखन व प्रतिक्रिया अवश्य द्या. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी , खालील फॉर्म भरुन पाठवा!

कळावे

आपले

महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMCIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDc4IiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMTUwMzgiLCJ2aWV3X2h0bWxfaWQiOiJjc3BGb3JtU2hlbGxfMTFfMTUwMzgiLCJjb25uZWN0X2hhc2giOiJhNjlkNTRkYjhhNGQ0M2JhYTdlZjlkNDk4NjVmZGFlOSJ9

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.