
व्यायामाची सवय कशी लावता येईल?
एक गोष्ट पक्की आहे की व्यायामास सुरुवात करणे अगदी सोपे आहे. व्यायामास सुरुवात करणे अजिबात अवघड नाही. आपल्यापैकी अनेकांनी व्यायामाला सुरुवात एक पेक्षा जास्त वेळा नक्कीच केलेली आहे इतके ते सोपे आहे! , बरोबर ना?
खरी अडचण येते व्यायामाचे सातत्य टिकविण्याची. आपल्यापैकी अनेकजण आरंभवीर असतात, अगदी मी देखील असा आरंभवीर च होतो. सुरुवातीचा जोश जसजसा कमी होतो तसतसे आपणास व्यायामापेक्षा आयुष्यातील अन्य गोष्टी जास्त महत्वाच्या वाटु लागतात किंवा व्यायामातुन आपणास हवे तसे परिणाम जर लवकर प्राप्त झाले नाही तरीदेखील आपण पहाटे मैदानावर धावण्याऐवजी सकाळी उशिरापर्यंत अंथरुणामध्ये साखर झोप घेणे पसंत करतो.
पण असे ही अनेक लोक आपल्या अवतीभवती आपण पाहत असतो की जे सातत्याने व्यायाम करीत असतात. एकवेळ सकाळची आंघोळ ते पाण्याऐवजी घामाने करतील पण व्यायाम चुकत नाही त्यांचा अजिबात. काय असेल अशा लोकांच्या या सवयीचे रहस्य?
नुकतेच एक सर्वेक्षण झाले. त्यामध्ये सातत्याने व्यायाम करणा-या (म्हणजे किमान १३ वर्षे) अनेकांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातील एक प्रश्न असा होता की तुम्हाला जर असे विचारले की तुम्हाला व्यायाम करण्याची आणि ते ही सातत्याने करण्याची प्रेरणा कशातुन मिळते. तुमच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या प्राधान्य क्रमाने तुम्ही सांगु शकता का?
त्यांची उत्तरे ऐकुन आपण कदाचित चकित होऊन जाऊ. कारण वजन कमी करणे किंवा सिक्स पॅक्स ॲब्स करणे, डोले-शोले करणे अशा प्रेरणा त्यांच्या नाहीतच. त्यांच्या प्रेरणांचा संबंध जास्त करुन आनंदी व निरोगी राहण्यावर आहे.
खाली त्यांच्या प्रेरणा प्राधान्य क्रमाने दिल्या आहेत.
१. निरामय, निरोगी जीवन जगणे
२. उत्साह व ऊर्जा मिळविणे
३. व्यायामातुन आनंद मिळविणे
४. व्यायामाला प्राधान्य देणे
५. चांगली, गाढ झोप मिळणे
६. सतर्क राहणे
७. निवांत पणाचा उपभोग घेता येणे
८. शरीराच्या वजनावर नियंत्रण ठेवणे
९. नीटनेटके दिसणे
पहा मित्र-मैत्रिणींनो, या सर्व गोष्टींमध्ये शरीराचे वजन व दिसणे यांना अगदी खालचे स्थान आहे प्राधान्य क्रमामध्ये.
तुमचा प्राधान्य क्रम जर ठरला असेल किंवा तुम्हाला त्याचा अनुभव येत असेल तर तुम्ही देखील फिटनेस फ्रीक होऊ शकता. तुम्ही देखील व्यायाम तुमच्या सवयीचा करु शकता.
मी दहा अशा सुचना, युक्त्या तुम्हाला सांगणार आहे आज की ज्यामुळे तुम्हाला व्यायाम करण्याची सवय नक्कीच लागेल. या युक्त्यांचा वापर करणे मात्र तुमच्या हातात आहे. व तो तसा वापर करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या प्रेरणा, तुमचे मोटीव्हेशन्स काय काय असावयास पाहिजे हे पक्के ठाऊक हवे.
-
आपल्या व्यायामामध्ये वैविध्य आणा.
व्यायाम करण्यासाठी जिम मध्येच गेले पाहिजे किंवा महागडी सायकलच घेतली पाहिजे असे काही नसते.
View this post on Instagram
Work Hard #80%nutrition #20%exercise #results #resultcoach #10_year_challenge
आपल्या सैन्य अधिका-यांच्या प्रशिक्षणामध्ये देखील एकच व्यायाम प्रकार नसतो. अनेक प्रकारचे व्यायाम त्यांच्याकडुन करवुन घेतले जातात. तसेच हल्ली आपण पाहतो प्रसिध्द खेळाडु देखील त्यांच्या व्यायामामध्ये वैविध्य आणत असतातच. यामुळे तोच तो पणा नाहीसा होतो व उभारी मिळते
-
जवळच्या एखाद्या माणसाला शब्द द्या.
व्यायामाला सुरुवात करताना शक्य झाल्यास एखाद्या ग्रुपला जॉईन व्हा. ठरलेल्या वेळी मी पोहोचणार आहे व्यायामासाठी असा शब्द तुमच्या साथीदारांना द्या. याचा खुप चांगला परिणाम, आपले सातत्य टिकविण्यासाठी होत असतो. कधी कधी आपणास कंटाळा जरी आला तरी आपल्यामुळे त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये, त्यांच्या व्यायामावर दुष्परिणाम होऊ नये म्हणुन आपण आपला कंटाळा बाजुला ठेवुन व्यायामास जातो. अर्थात केवळ एक युक्ति आहे. काही लोक एकट्याने व्यायाम करणेच पसंत करतात. तुम्हाला शोधावे लागेल तुमच्या साठी दोन्ही पैकी योग्य काय आहे ते.
-
व्यायाम सर्वात महत्वाची गोष्ट आहे, सर्वात जास्त प्राधान्याची गोष्ट आहे असे दृढ निश्चय करा.
असे करण्याचा आणखी एक फायदा आहे. मित्र-परिवारामध्ये तुमची ओळख फिटनेस फ्रीक म्हणुन वाढायला लागते. त्यामुळे “जाऊ दे रे, आज एक दिवस नाही केला व्यायाम बिघडणार नाही” असे सल्ले येण्याचे बंद होते.
-
उठल्याबरोबर पहिले काम व्यायाम हेच असले पाहिजे.
दिवसाची सुरुवातच जर तुमची घामाघुम होऊ लागली तर तुम्हाला दिवसभर आवश्यक असेल तेवढी ऊर्जा व उत्साह सकाळच्या व्यायामातुन मिळतो. खरतर ब-यच जणांना सकाळचा व्यायाम करणे अशक्यप्राय वाटते. पहिले कारण असते साखर झोपेची, अंथरुणाची ऊब. व अनेकाम्च्या बाबतीत आणखी एक कारण असु शकते सकाळची कामांची धावपळ. या कामांमध्ये मुलांची शाळेची तयारी इत्यादी गोष्टी असतात. पण प्रयत्न करुन पहा, मुले झोपेतुन जागी होण्यापुर्वीच तुमचा व्यायाम झालेला असेल तर! गौरी म्हणुन पुण्यातील एक प्रसिध्द फिटनेस कोच आहे. गौरीला देखील सकाळची कामे हीच अडचण वाटायची. आणि पहाटे लवकर उठणे तिला जमणार नाही असे देखील तिला वाटायचे. पण सध्या ती म्हणते “पहाटे लवकर उठणे व व्यायाम करणे मला नुसतेच जमते असे नाही तर त्यामुळे माझी सर्व कामे देखील लवकर व नेटकी होतात”
-
व्यायाम केल्याशिवाय घरी जाऊच नका
ज्यांना सकाळी अगदीच शक्य नाही असे असल त्यांनी संध्याकाळी कामावरुन घरी येतानाच व्यायाम केला पाहिजे. घरी पोहोचु मग कपडे बदलु व मग व्यायाम करु असे एखाद दोन दिवस तुम्ही कराल. पण नेहमी नाही होणार असे. त्यामुळे तुमचा व्यायाम जिम मधील असेल तर घराच्या वाटेवरच एखादा जिम शोधा व व्यायाम करा. चालणे, धावणे असा व्यायाम असेल तर वाटेतच एखाद्या बागेत अथवा मैदानावर थांबा व करा व्यायाम.
-
….तरीही व्यायाम कराच.
तुम्ही खुप दमलेले असलात तरी देखील व्यायाम करा. असे केल्याने तुम्हाला नवीन ऊर्जा मिळण्याची शक्यता असते. व्यायाम करताना आपण दिर्घ श्वास घेतो, प्राणवायुचा पुरवठा धमन्यांना अधिक चांगला होतो. यामुळे दिवसभराचा थकवा निघुन जातो हे मात्र नक्की. त्यामुळे थकलेलो जरी असेल तरी व्यायाम करा. यामध्ये तुमचे जोडीदार तुम्हाला खुप मदत करु शकतात. म्हणजेच एकमेकांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण केले पाहीजे.
-
नोंदी ठेवा
आपल्या व्यायामाची, शरीरामधील प्रगतीच्या नोंदी ठेवा. तुम्ही जर रनिंग, सायकलिंग, चालणॅ, ट्रेकिंग, हायकिंग करीत असाल तर हे नोंदी ठेवण्याचे काम आणखी सोपे आहे. खुप सारी मोबाईल ॲप्स सध्या अगदी मोफत मिळतात. त्यांचा वापर करा.
-
प्रगतीवर लक्ष ठेवा
आपल्या प्रगतीच्या लक्षणांवर लक्ष ठेवा. आपले जुने कपडे आपणास व्यवस्थित बसु लागले, किंवा आपण पहिल्यापेक्षा जास्त दमदार झालो, किंवा जास्त वजन उचलु शकत असु तर नक्कीच भारी वाटते. त्यामुळे या लक्षणांवर लक्ष ठेवा. पण फक्त हेच आहेत सुचक तुमच्या प्रगतीचे. तर नाही. आणखीही खुप सुचक आहेत तुमच्या प्रगतीचे, ते खालील प्रमाणे असु शकतात
-
- रात्री गाढ झोप लागणे
- विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्पष्टता येणे
- ऊर्जा सदैव वाढलेली असणे
- एखादे शारीरीक क्षमतेचे काम करताना सहज पणे आपल्याकडुन ते होणे
- बसलेले (आरामात) असतानाचा आपल्या ह्र्द्याच्या ठोक्यांचा वेग कमी होणे
-
सोबतील कुणीतरी घ्या
माझा एक मित्र एक आणखी युक्ति वापरतो. त्याच्या कडे एक कुत्रा आहे पाळलेला. दररोज सकाळी हा मित्र व त्याचा कुत्रा न चुकता मैदानावर जातात. मित्र दररोज धावतो तर त्याच्या कुत्रा कधी मित्रासोबत धावतो तर कधी मैदानान खेळतो. कुत्र्यासाठी आनंदी होत असतो कुत्र्याचा मालक. ज्यांच्या कडे कुत्रा आहे पाळलेला त्यांना समजेल हे. त्यामुळे एखादे वेळी जरी या मित्राला कंटाळा आलेला असेल तरी तो कुत्र्यासाठी का होईना पण मैदानावर जातोच. व स्वतः व्यायाम देखील करतो.
-
स्वतःला पुरस्कार द्या
प्रत्येक ठराविक टप्प्यानंतर स्वतःला बक्षिस द्या. असे क्वचितच होईल की तुमच्या व्यायामाचे कौतुक करुन दुसरे कोणतरी तुम्हाला बक्षिस देईल. त्यामुळे स्वतःच स्वतःल बक्षिस देण्याने तुम्ही तुमचे कौतुक करुन, पाठीवर थाप देता. असे मी सांगणे कदाचित तुम्हाला हास्यास्पद वाटेल पण हे करुन बघा म्हणजे तुम्हाला समजेल यातील मर्म. ठराविक किमी धावुन झाल्यावर स्वतःसाठी नवीन, दर्जेदार शुज तुम्ही घेऊ शकता. किंवा तुमचे तुम्ही ठरवु शकता की पुढच्या टप्प्यासाठी कोणते साधन तुम्हाला गरजेचे आहे व ते विकत घेऊन स्वतःला गिफ्ट द्या.
या वेबसाईटच्या माध्यमातुन, पुणेकरांचना सतत तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आमचा हेतु आहे. विद्येचे माहेर घर असणारे पुणे तंदुरुस्तीसाठी देखील नावारुपास यावे ही अपेक्षा आहे.
चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.
कळावे
आपले
महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525
The weight loss and fitness coach Pune