
श्रावणात उपवास कसा करावा ?
नमस्कार
पहिल्या लेखामध्ये आपण हे पाहिले की कशा प्रकारे चुकीच्या पध्दतीने केलेला उपवास आपणास अपाय करु शकतो. तरी देखील थोडक्यात व मोजक्या शब्दात चुकीच्या उपवासाचे दुष्परीणाम काय असतात ते खाली पाहु
- अशक्तपणा किंवा थकवा
- रक्तातील साखर कमी होऊन चक्कर येणे
- झोप कमी होणे
- कंटाळवाणे दिसणे व होणे
- स्टॅमिना कमी होणे
व अशा प्रकारे आपण आपल्याच शरीरास अपाय करुन घेत असु तर आपले लक्ष परमेश्वराच्या चरणांत कसे राहील बरे? सक्षम, सुदृध शरीर परमेश्वराचे खरे मंदीर आहे हे लक्षात असु द्या!
उपवासाचे धार्मिक महत्व कमी न होता, उपासनेला पुरक असा उपवास कसा करता येईल हे आपण आता पाहुयात. या ही पुढे जाऊन मी तर असे ही म्हणेन की या उपवासांना तुम्ही वजन कमी करण्याची एक संधी म्ह्णुन देखील पाहु शकता. अर्थात त्यासाठी तुम्हाला योग्य आहार नियोजन करणे गरजेचे आहे.

चुकीच्या पध्दतीने केलेल्या उपवासामुळे वाढते वजन
श्रावणातील उपवास करताना खालील काही गोष्टींची नीट काळजी घेतली तर त्याचा नक्कीच फायदा आपणास होईल.
उपवासाने आपण आपल्या शरीराचे डीटॉक्सिफिकेशन देखील करु शकतो. डीटॉक्सिफिकेशन ला आपण शुचिता असे ही म्ह्णु शकतो.
- किमान दोन अडीच तासांच्या अंतराने पोटात काही ना काही गेले पाहीजे
- आपण जे उपवासाचे असलेले पदार्थ खातो ते असे असावेत की ज्यामध्ये आपल्याला आवश्यक प्रोटीन्स , कार्बोहायड्रेट्स, इतर पोषक द्रव्ये मिळतील.
- पाणी नेहमीपेक्षा खुप जास्त प्यावे
- सकाळी नाश्ता ते रात्री जेवण यामध्ये किमान तीन वेळा तरी आपण काहीतरी खाल्ले पाहिजे
- उपवास असो वा नसो, लक्षात ठेवा, पोट भर कधीही खाऊ नये. आणि उपवासामध्ये देखील तोच नियम आहे.
- खिचडी आवडते म्हणुन खायला काहीच हरकत नाही. पण खिचडी खाऊन जर पोट सुटणार असेल तुम्ही खिचडी खाल्ली पाहिजे की नाही हे तुम्हीच ठरवा. खिचडी का खाऊ नये हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
- खिचडी खायची नसेल तर काय खावे? तर राजगिरा, राजगि-याचे थालीपीठ , राजगि-याचे लाडु, गुळ शेंगदाण्याचे लाडु, ताक , फळे, फळांचा ज्युस, नारळाचे पाणी, दुध व यापैकी सगळेच पर्याय संपले असतील तर थोड्या प्रमाणात रताळी किंवा बटाटे व त्यांचे पदार्थ यांचा उपयोग आहारामध्ये आपण आणु शकतो.
- वरील सर्व उपवासांच्या पदार्थांचा तुमच्या वय, उंची व वजनानुसार वापर तुमच्या उपवासाच्या दिवशीच्या आहारामध्ये आला तरच तुमचा शरीराचा उपवास तुम्हाला शुचिर्भुत करेल.
श्रावण मासी हर्ष मानसी ॥
श्रावण महिन्यात मनाला प्रसन्न वाटेल असे आपले शरीर झाले पाहिजे. उपवासाचे आपले शरीर जर्जर होत असेल तर आपल्याला प्रसन्न कसे काय वाटणार बरे?
तुम्हाला श्रावणाच्या मंगलमय शुभेच्छा .
धन्यवाद
आपले निरामय आयुष्याचे सांगाती
महेश व पल्लवी ठोंबरे
पुणे
टिप – या व्यतिरिक्त जर कुणास पर्सनल डायट प्लान हवा असेल तर अवश्य आमच्याशी संपर्क साधा.