Stay Fit Pune - The weight loss center

नैसर्गिक पध्दतीने डीटॉक्सिफिकेशन कसे करावे?

नैसर्गिक पध्दतीने डीटॉक्सिफिकेशन कसे करावे?

मागील लेखामध्ये आपण टॉक्सिफिकेशन म्हणजे काय , शरीरात विषारी द्रव्यांचे कशाप्रकारे प्रवेश करतात हे आपण पाहीले. आता आपण नैसर्गिक दृष्ट्या व कोणताही अपाय न होता डीटॉक्सिफिकेशन कसे करावे हे पाहु.

डीटॉक्सिफिकेशनच्या पध्दती पाहण्यापुर्वी आपण एकदा हे देखील समजुन घेण्याचा प्रयत्न करु की खरच डीटॉक्सिफिकेशन गरजेचे का आहे?

आपले शरीर पुर्णतः निरोगी असताना, आपले यकृत (लिव्हर) देखील व्यवस्थित पणे कार्य करीत असते. तसेच अतिशय चोख पणे टॉक्सिन्संना ओळखते व शरीरातुन हद्दपार करते. परंतु जर यकृत काही कारणांमुळे नीट काम करीत नसेल, पचन संस्था नीट काम करीत नसेल तर शरीरातुन टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे काम मंद गतीने होत असते. टॉक्सिन जितका जास्त वेळ शरीरात राहतात तितका जास्त धोका आपल्या शरीरास संभवतो.

आपल्या शरीरात अनावश्यक विषारी पदार्थांचा साठा झालेला आहे की नाही हे कसे ओळखावे?
 • बी एम आय प्रमाणात नसणे. आपला बी एम आय इथे तपासा.
 • प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलेले असणे
 • विनाकारण थकवा येणे
 • नको ते विचार करीत बसणे
 • विनाकारण डोकेदुखी
 • आपला मुड बदलणे
 • शरीर तसेच श्वासाचा दुर्गंध येणे
 • नेहमीचे अपचन
 • त्वचा काळवंडणे
 • विविध सुगंधी वासांविषयी अत्याधिक संवेदनशील होणे.

यात एक आनंदाची बाब अशी सुध्दा आहे की आपल्या शरीरातील यकृत हा अवयव जरी खराब झाला असेल तरी, योग्य काळजी घेऊन आपण त्यास पुन्हा नीट कार्यरत करण्यासाठी दुरुस्त करु शकतो. आणि यकृत जर नीट झाले तर शरीर नवीन चैतन्याने पुन्हा भारुन जाऊ शकते. यासाठी त्यास योग्य पोषक मुल्ये देणे आणि ज्यातुन टॉक्सिन्स शरीरात जातात अशा गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

यकृतास त्याच्या रोजच्या कामातुन वेळोवेळी आराम देणे, आणि टॉक्सिन्स शरीरातुन काढुण टाकणे हे जर आपण करु शकलो तर आपण आपल्या ह्या अतिशय महत्वाच्या शरीरावयास पुनरपि ताजेतवाने आणि कार्यक्षम करु शकतो. परीणाम आणखी चांगले आणण्यासाठी, याच्या सोबतच जर तुम्ही आहार आणि व काही आयौर्वेदीक औषधे (डॉक्टरांच्या सल्ल्याने) घ्यावी लागतील.टॉक्सिन्स पासुन सुट्टी आणि पोषक आहार व आयुर्वेदीक औषधे ह्यांच्या दुहेरी तंत्राने परीणाम लवकरच दिसतात.

शरीरातील अनावश्यक द्रव्ये शरीराच्या बाहेर काढण्याच्या कामामध्ये आपली आतडी खुप महत्वाचे काम करतात. आतड्यांनी हे काम नीट पार पाडण्यासाठी आपली आतडी दोन अति महत्वाच्या पोषक तत्वांवर अवलंबुन असतात. एक – फायबर व दुसरे पाणी. योग्य प्रमाणात फायबर युक्त आहार आणि भरपुर पाणी शरीरातील अनावश्यक व विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी खुप महत्वाचे असतात. याचे संतुलन जर बिघडले तर डीटॉक्सिफिकेशन ची क्रिया मंदावते सोबतच, अपचनासारख्या समस्यांना आपणास सामोरे जावे लागते.

डीटॉक्सिफिकेशन जर आपण घडवुन आणणार असु तर त्याचा हेतु, शरीराचे आरोग्य पुनर्स्थापित करणे तसेच आतड्यांना पुर्ववत काम करण्यास लावणे हा असावा.

आपल्या आहारात खालील प्रमाणे बदल जर आपण केले तर ..

 

आपण यकृत आणि आतड्यांच्या नैसर्गिक डीटॉक्सिफिकेशन  च्या क्षमतेला आपण पुन्हा स्थापित करु शकतो.  मी महेश ठोंबरे, तुमचा निरामय आयुष्याचा सांगाती, आज इथे तुम्हाला २१ दिवसाचा पाच सुत्री कार्यक्रम देत आहे. ज्याचा परीणाम तुम्हाला अगदी पहील्या दिवसापासुन दिसायला लागेल. बर मी जी पंचसुत्री देत आहे ती करण्यासाठी तुम्हाला कुठे ही अधिक वेळ, अधिक व्यायाम, किंवा पैसे घालवावे लागणार नाही. आपण निरोगी असो किंवा नसो, सर्वांनी हा २१ दिवसाचा डीटॉक्सिफिकेशन चा कार्यक्रम वर्षातुन एकदा तरी करावाच.

 

 • भरपुर पाणी प्या.

शरीराच्या योग्य संचालनासाठी आपणास किमान ३ लिटर, साधारण निरोगी आरोग्य असण्या-यास, पाणी रोज लागते. इतके नसेल तर, शरीरातील विषद्रव्ये व अनावश्यक पदार्थ मलमुत्रद्वारे तसेच घामाद्वारे बाहेर फेकले जाऊच शकत नाहीत. आणि जर शरीरात टॉक्सिन्स चा भरपुर साठा झालेला असेल तर मात्र पाणी याच्या दुप्पट प्यावे लागेल. आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन तयार होऊ नयेत म्हणुन भरपुर पाणी प्यावे, तसेच जर टॉक्सिन्स चा भरपुर साठा झाला असेल तर तो बाहेर काढण्यासाठी देखील भरपुर पाणी प्यावे.

 • कॅफेन चा शरीरातील प्रवेश थांबवा

चहा कॉफी बंद करणे. हे थोडे अवघड वाटत जरी असले तरी अशक्य नाही. सुरुवातीचे काही दिवस डोकेदुखी किंवा अस्वस्थता अशा समस्या समोर येतील, पण जर आपण भरपुर पाणी पित असाल तर थोड्याच दिवसात ही लक्षणे बंद होतील. व डीटॉक्सिफिकेशन चे परीणाम दिसायला लागतील

 • मद्यपान थांबवा अथवा कमी करा

दारु का पिऊ नये, याची अनेक कारणे आहेत. कौटुंबिक, आर्थिक अस्वास्थ्यासोबत स्वतःला हळु हळु मृत्युच्या दरीत ढकलुन देणारे हे व्यसन संवेदनशील असणा-या प्रत्येकाने बंदच केले पाहीजे. दारु मुळे सर्वात जास्त अपाय होतो तो यकृताला. शरीरातील सर्व पाणी दारु शोषुन घेते. व डीहायड्रेशन साठी लागणारे पाणी शरीरास मिळत नाही. हॅंगओव्हर, डोकेदुखी जी दारु पिल्याच्या दुस-या दिवशी जाणवते ती डीहायड्रेशन मुळेच होते.

 • मीठाचा वापर कमी करा

ज्या प्रमाणे दारु डीहायड्रेशन करते त्या प्रमाणे मीठ देखील तेच काम करते. आपण अनेकदा न कळतच अनेक पदार्थांच्या माध्यमातुन शरीराला आवश्यक प्रमाणापेक्ष जास्त मीठ घेतो. त्यामुळे मीठ ज्यात जास्त असेल असे सर्व पदार्थ खाणे थांबवा.

 • फास्टफुड व जंक फुड (प्रीपॅकेज्ड व प्री प्रोसेस्ड फुड) पुर्णपणे थांबवा

या प्रकारच्या खाद्य पदार्थांमध्ये मीठ जास्त असते, तसेच चवीसाठी (फ्लेवर) व पदार्थ टिकवण्यासाठी (प्रीजर्व्हेटीव्ह) रसायनाचा वापर केला जातो. आपल्या डीटॉक्सिफिकेशन च्या प्रोग्राममध्ये या प्रकारच्या खाद्यान्नास अज्जिबात स्थान नाही.

आपल्या ह्या डीटॉक्सिफिकेशन प्रोग्रामचा मुख्य हेतु आपल्या शरीरातील अवयवांना त्यांचे नैसर्गिक शुध्दीकरणाचे काम आणखी चांगले करण्यासाठी चालना देणे आहे. हे केल्यामुळे शरीरात साठुन राहीलेले टॉक्सिन्स पचनसंस्थेद्वारे शरीराबाहेर फेकले जातील. यकृत, आतडे, फुफ्फुस, किडनी आणि त्वचा हे सगळे अवयव ठिक राहण्यासाठी आणि बिघडले असतील तर दुरुस्त होण्यासाठी आपला हा डीटॉक्सिफिकेशन चा प्रोग्राम कुणीही वापरु शकतो.

 

तुमच्या ह्या २१ दिवसाच्या चॅलेंजचे परीणाम काय होतात मला अवश्य कळवा.

Facebook Comments

Comments
 • reply
  आशुतोष
  March 16, 2018

  मनापासुन आभार महेश सर. अत्यंत साधा सरळ उपाय सांगितला तुम्ही. मी आजपासुनच हे चॅलेंज स्वीकारले.
  पुन्ह एकदा धन्यवाद

 • reply
  Nilesh Umesh Bhati
  March 17, 2018

  Good for health

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.