Stay Fit Pune - The weight loss center

रोग प्रतिकारक शक्ति कशी वाढवावी ?

मागील लेखामध्ये आपण रोगप्रतिकारक शक्ति म्हणजे नक्की काय हे पाहिले. आज आपण आपल्यातील ही रोगप्रतिकारक शक्ति वाढवण्यासाठी काय करता येईल हे पाहुयात.

तुम्हाला माहिती आहे का, की जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति खुपच कमी असते. जसे जसे आपले वय वाढते तशी तशी ही रोगप्रतिकारक शक्ति हळुहळु वाढत जाते. ऐन तारुण्यामध्ये ही शक्ति देखील एकदम जोमात असते व आपणास वेगवेगळ्या आजारांपासुन वाचवते. जसे जसे आपले वय आणखी वाढते तस तशी ही शक्ति आपोआप कमी होऊ लागते. हेच कारण आहे की लहान मुले व वयस्करांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण खुपच जास्त असते.

रोग प्रतिकारक शक्ति कमी झाल्याने अनेक आजार आपणास होतात. त्यातच मधुमेह सारखे आजार जडलेले असतील तर अशा व्यक्तिंना खुपच जास्त काळजी घ्यावी लागते. एड्स सारखा आजार देखील रोगप्रतिकारक शक्तिच्या अभावाचेच खुप बोलके उदाहरण आहे. यात हळु हळु आपल्या शरीराचा क्षय होत असतो.

ही अगदी नैसर्गिक क्रिया आहे. यात काहीही अनैसर्गिक नाही. पण तुम्हाला हे माहित आहे का की आपण योग्य काळजी घेतली तर लहान मुले व वयस्कर लोक यांच्यामध्ये देखील रोगप्रतिकारक शक्ति वाढवता येऊ शकते व ती देखील नैसर्गिक पध्दतीने.

चला तर मग समजुन घेऊयात आपण अगदी साध्या सोप्या पध्दतीने रोगप्रतिकारक शक्ति कशी वाढवु शकतो ते.

  • पुरेशी झोप घ्या व ताण-तणावाला व्यवस्थित हाताळा – झोप नीट होत नसेल व ताण-तणावामुळे आपल्या शरीरातील हार्मोन कॉर्टीसोल वाढवितात व त्यामुळे आपल्यातील रोग प्रतिकारक शक्ति कमी होते.
  • व्यसनांपासुन दुर रहा – दमा व न्युमोनिया अशा आजारांविरुध्द काम करणा-या आपल्या रोग प्रतिकारक शक्तिला मुळातुनच नष्ट करण्याचे काम तंबाखु-आधारीत व्यसने करतात.
  • मद्यपान कमी करा अथवा टाळा – अतिरिक्त मद्यपानामुळे देखील रोगप्रतिकारक शक्ति कमी होते व फुफुस्साचे आरोग्य धोक्यात येते.
  • भाज्या, फळे, सुका–मेवा यांचा समावेश आहारामध्ये करा. हे सगळे असे अन्नघटक आहेत की ज्यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तिला अधिक बळ मिळते
  • सुर्यप्रकाश भरपुर घ्या – विटामिन डी सारखा अत्यंत महत्वाचा पोषक घटक यातुन मिळतो. व त्यामुळे अनेक संसर्गजन्य रोगांपासुन आपला बचाव होऊ शकतो. तसेच आपल्या श्वसन नलिकेचे विविध व्याधींपासुन देखील हे आपले रक्षण करतात
  • आहारामध्ये जाणीवपुर्वक लसणाचे प्रमाण वाढवा. यामुळे रोग प्रतिकारक शक्ति चांगलीच वाढत असते. लसुण हे नैसर्गिक ॲन्टीमायक्रोबियल एजेंट आहे. लसुण खाण्याचे देखील एक तंत्र आहे. अन्न, भाजी यामध्ये लसुण, उकळी आल्यानंतरच टाकावे. खुप जास्त उष्म्याने लसणातील पोषक घटक कमी होतात.
  • मशरुमचा वापर जेवणामध्ये करा.
  • नियमित व्यायाम करा

या सगळ्या गोष्टी “हळद लावुन पिवळे होण्याइतक्या” सोप्या व सहज नाहीत. यात वेळ जातो. हे सगळे करणे म्हणजे एकंदरीतच जीवनशैलीमध्ये सुधार, बदल आवश्यक असतो. या कालावधीत जर आजारी पडलात तर वेदनाशामक सोबत ॲन्टीबायोटिक्स देखील डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. शक्य झाल्यास तुम्हाला कोणत्या ॲन्टीबायोटीक ने आराम मिळाला आहे याचे नोंद ठेवा, म्हणजे डॉक्टरांना विचारा की इंजेक्शनमधील समाविष्ट घटक काय आहेत ते.

आमच्या क्लब मधील अनेकांचा अनुभव असा आहे की, क्लब सभासदत्व घेतल्यानंतर काही महिन्यांमध्येच त्यांना त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ति वाढल्याचे जाणवते. वातावरणातील बदलामुळे होणारे अल्प आजारपासुन कायमची मुक्ती आमच्या सदस्यांना अगदी मोफतच मिळत असते. सोबतच योग्य व आदर्श जीवनशैली व तंदुरुस्तीमध्ये रुची असणा-या असंख्य लोकांची संगत देखील त्यांना मिळते.

तुम्हाला जर काही शंका प्रश्न असतील तर अवश्य विचारा.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.