Stay Fit Pune - The weight loss center

side effects of cold drink

कोल्ड्रिंक पिताय ?…… सावधान !

समाजमाध्यमे- समाज मने जोडण्याचे प्रभावी साधन

समाजमाध्यमे- समाज मने जोडण्याचे प्रभावी साधन

व्हॉट्सॲप, फेसबुक सारखी माध्यमे म्हणजे माहितीचा अखंडपणे वाहणारा, कधीही न थांबणारा प्रवाह आहे. तसे पाहिले तर कुणीही या प्रवाहाचा मालक अथवा चालक नाही. डेटा मोजण्याच्या परिमाणामध्येच बोलायचे झाले तर दररोज सरासरी एक जीबी माहिती प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यापर्यंत पोहोचत असते. माहिती तरी किती प्रकारची असते! असंख्य प्रकारचे साहित्य, कथा, लेख, कादंब-या, आरोग्य, इतिहास, चालु घडामोडी, देश विदेश, स्वदेश, स्वदेशी, देशी , विदेशी अशी  नाना प्रकारची माहिती दररोज आपल्याकडे येत असते. आपल्या एक मतप्रवाह असाही आहे की जो म्हणतो भारतात एकेकाळी कधीतरी ज्ञान विज्ञानावर एका विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी होती. व त्यामुळे भारत एक मागास देश बनला. अर्थात मी या मताचा नक्कीच नाहीये. याचे कारण देखील मी सांगतो.  सध्या ज्या ज्या व्यक्तिकडे स्मार्टफोन आहे, किमान त्याच्या साठी तरी ज्ञानविज्ञानाची सहस्त्र द्वारे आता खुली झाली आहेत. आणि या करोडो लोकांपैकी किती लोक या ज्ञान विज्ञानाचा उपयोग स्वःतचे जीवनमान अधिक सुकर करण्यासाठी आणि समाजामध्ये सौहार्द निर्माण करण्यासाठी वापरतात? प्रश्न मोठा आहे. असो.

मुळात वरील प्रश्न किंवा त्याचे उत्तर देणे हा या लेखाचा हेतु नाहीये. मी मात्र व्हॉट्सॲप फेसबुक कडे सतत सतत नवनवीन कल्पना आणि महत्वाची माहितीचा स्त्रोत म्हणुनच पाहतो. अर्थात व्हॉस्टॅप फेसबुककध्ये जे काही दिसते ते सर्वच्या सर्वच आपल्या कामाचे किंवा आपल्या रुचीचे असतेच असे नाही. समाजमाध्यमे वापरताना आपली स्वतची एक गाळण तयार करणे आवश्यक असते.

मी ही समाजमाध्यमे वापरताना अशी गाळण नेहमीच वापरीत आलो आहे. याच गाळणीतुन मला काल व्हॉट्सॲप वर आलेला एक अत्यंत महत्वपुर्ण मेसेज मी तुमच्या सोबत शेयर करणार आहे.

हा मेसेज मी इथे जसाच्या तसा देत आहे. तो खालील प्रमाणे.

//

Pesticide Percentage (%) in cold drinks released from IMA (Indian Medical Association) recently

1     Thums up      7.2%

2     Coke              9.4%   

3     7 UP             12.5%   

4     Mirinda         20.7%   

5     Pepsi            10.9%  

6     Fanta              29.1%    

7    Sprite                 5.3%

8    Frooti               24.5%

9    Maaza              19.3%

//

माझे(महेश ठोंबरे) मत –

तुम्ही कोल्ड्रिंक्स आवडीने पिता? मग सावधान…

भारत सरकारने बंदी घातलेली किटकनाशके खुप मोठ्या प्रमाणामध्ये थंडपेयांमध्ये नुकत्याच घेतलेल्या एका चाचणी मध्ये आढळुन आली. उदाहरणार्थ – Heptachlor.

सेंटर फॉर सायंस ॲन्ड एनव्हायर्नमेंट

सेंटर फॉर सायंस ॲन्ड एनव्हायर्नमेंट, या संस्थेने ऑगस्ट २००६ मध्ये केलेल्या एका सर्वे मध्ये भारतातील ११ राज्यातील कोकाकोला आणि पेप्सिको सारख्या एकुण २५ उत्पादन प्रकल्पांमध्ये एक सर्व्हे केला होता. त्यानुसार वरील सर्व थंडपेयांमध्ये किटकनाशकांचे प्रमाण, खुपच जास्त आढळुन आले. हि किटकनाशके अतिप्रमाणात शरीरात गेल्याने कर्करोगाचा धोका संभवतो. कर्करोगासोबत अन्य अनेक आजारांचे माहेरघर आपले शरीर आपोआप बनुन जाते.

अर्थात, ह्या सर्व्हेला बरीच वर्षे झाली आहेत. त्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनामध्ये किटकनाशकांच्या वापराच्या बाबतीत थोड्या मर्यादा सांभाळल्या आहेत. तरीही मुळातच कोल्ड्रिंक सारख्या शीतपेयास, आहे तसेच ठेवायचे असेल तर त्यात किटकनाशके टाकणे गरजेचे असतेच. शासनाने निर्धारीत केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त किटकनाशके वापरता येत नाहीत. असे जरी असले तरी, एक गोष्ट आपण समजुन घेतली पाहिजे, ती हि की शीतपेयांमध्ये किटकनाशके असतातच. त्यामुळे कोल्ड्रिंक्स पिणे आरोग्यास हानिकारकच आहे.

असाच खुप पुर्वी मला आणखी एक मेसेज व्हॉट्सॲप वर आला होता. तो देखील मी इथे देत आहे.

//

आपण खातो ते अन्न किती सुरक्षित

 • रासायनिक खते-कीटकनाशकांचा वापर धोकादायक

  भारतातील अन्नधान्याचा विचार केला असता भारत देशाने अन्नधान्य उत्पादन क्षेत्रात अत्यंत प्रगती केलेली आहे. भारतात अन्नधान्याचे प्रचंड उत्पादन होत असते; परंतु धान्य पिकवताना शेतामध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अमर्याद वापर केला जातो. कोणत्याही प्रमाणाशिवाय कीटकनाशके व खतांचा वापर केला जातो. यामुळे या कीटकनाशकांचा, रसायनांचा प्रवेश अन्नधान्यांच्या माध्यमातून आपल्या शरीरात होत असतो. हॉटेलमध्ये किंवा बाहेर उघड्यावर, चौपटीवर खाण्याची संस्कृती भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे. दररोज हजारो लोक उघड्यावरील अन्नपदार्थ खात असतात. हे अन्नपदार्थ बनविणा‍-यांचे आरोग्य, त्यांचे स्वयंपाकघर त्यात वापरले जाणारे पदार्थ याची तपासणी करणारी यंत्रणाच आपल्याकडे नाही. लग्न, इतर समारंभ यात सतत जेवणाच्या पंगती उठत असतात. सकाळच्या चहासोबत बेकरीचे पदार्थ भारतामध्ये आवडीने खाल्ले जातात. आपल्या देशांत भाजीपाला उघड्याने रस्त्याच्या कडेला विकला जातो तर चपला बूट एसी दुकानात विकले जातात. ही शोकांतिका आहे.

 • चवीमुळे गाड्यांवर, अस्वच्छ खाणे विषबाधेस कारण

  हॉटेलमध्ये, गाड्यावर खाताना पदार्थांची फक्त चव पाहिली जाते ते कसे बनवले जातात ते नाही. स्वयंपाकघर अस्वच्छ कर्मचारी तसेच अस्वच्छ भांडी असतात. शिवाय स्वयंपाक बनवणारे, दारू पिऊन तंबाखू चघळत, अपु-या जागेत घामाच्या धारात पदार्थ बनवणे सुरू असते. अन्नधान्य -भाज्यांची सफाई, धुलाई न करताच त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मग आपल्याला अन्न विषबाधेमुळे लोकांना त्रास झाला. अशा बातम्या महिन्यातून एकदा तरी वाचाव्या लागतात. रुग्ण डॉक्टरकडे आल्यावर स्वत:च सांगतो की मी काल-परवा बाहेर गाड्यांवर खाल्ले होते त्यामुळे जुलाब होत आहे, उलटी होत आहे, पोट दुखत आहे. बाहेर गाड्यांवर वा इतर ठिकाणी कोणत्या तेलात भजे, वडापाव तळतात हे पाहायला हवे.

 • अस्वच्छ, अशुद्ध पिण्याचे पाणी

  याशिवाय पिण्याच्या पाण्याचेही तेच हाल असतात. अनेक ठिकाणी हॉटेलमधील अन्न साठवणीचे ठिकाणही अत्यंत गलिच्छ असते. कित्येक ठिकाणी झुरळे उंदरांचा सुळसुळाट असतो. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे हाल अत्यंत वाईट असतात. पाण्याच्या टाक्या वर्षानुवर्षे धुतल्या जात नाहीत. त्या निर्जंतुक केल्या जात नाहीत. पाणी साठविण्याच्या पद्धती किंवा पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती अत्यंत जुनाट आहेत.

 • पदार्थांत सोडा, रंग, भेसळीचे पदार्थांचा वापर

  अन्न पदार्थांमध्ये सोडा, प्रिझर्वेटिव्ह, रंग वापरण्याचे काहीही नियम नाहीत किंवा प्रमाण नाही. सध्या सर्व काही रेडिमेड वापरण्याकडे कल आहे. भेसळयुक्त लाल तिखट, भेसळयुक्त हळद, रंग दिलेली बडीसोप, रंग मिसळलेली चहापत्ती हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत. आपल्याकडे काळीमिरीच्या ठिकाणी पपयाच्या बिया मिसळतात. केशरच्या ठिकाणी रंग दिलेल्या मक्याचे केस मिळतात. दिवाळी -दसरा अशा सणांच्या वेळेस खवा हा पूर्णपणे भेसळयुक्तच असतो. अन्न प्रशासनाने भेसळयुक्त खवा जप्त केला. सणासमारंभाच्या काळात वापरण्यात येणारे तेल-तूप-डालडादेखील बहुतांशी भेसळयुक्तच असते.

 • खवा, मिठाई, दुधातही भेसळीने दूध विषारी

  भारतात बहुतांशी दूध हा आहारातील मुख्य घटक आहे. मात्र या दुधातही एका लिटर दुधामागे २ लिटर इतकी पाण्याची भेसळ असते. गायी-म्हशी-शेळ्यांना केमिकलची इंजेक्शन्स देऊन दुधाची मात्रा वाढविली जाते. उन्हाळ्याच्या काळात दुधामध्ये दूधपावडर मिसळून विकले जाते. रेल्वे स्टेशन, बसस्थानक या ठिकाणी उघड्यावर, धुळीत चहा तयार होतो.

 • फळांना रंगाचे वा अतिगोडीसाठी सॅकरीनचे इंजेक्शन

  भेसळीत फळेदेखील सुटत नाहीत, टरबुजास रंगाचे व साखरेच्या द्रवणाचे इंजेक्शन देऊन ते लाल व गोड बनविले जातात. आंबे-केळी-चिक्कू ही अत्यंत विषारी केमिकलद्वारे पिकवले जातात. सफरचंदास वॅक्स लावून त्यास चमकवले जाते.

 • पालेभाज्यांनादेखील हिरवा रंग

  पालेभाज्यांनादेखील हिरवा रंग दिला जातो. हॉटेलमधील प्रत्येक मिठायामध्ये आजकाल साखरेऐवजी सॅकरीन नावाचा विषारी साखरेपेक्षा १००० पट गोड पदार्थ वापरतात.

 • उघड्यावरील मासंविक्री अनारोग्यास निमंत्रण

  मांसाहारामध्येदेखील कोणत्याही जनावरांची तपासणी झालेली नसते, आजारी-अशक्त जनावरे उघड्यावर कापली जातात व उघड्यावर व उघड्यावर रस्त्याच्या कडेला मांस-मासोळी विकली जाते.

 • असुरक्षित अन्नप्रक्रियाने उलटी, जुलाब, साथरोग

  याप्रमाणे अत्यंत असुरक्षितरीत्या अन्नधान्यांचे -खाण्याच्या पदार्थांचे उत्पादन केले जाते, त्याची वाहतूक-त्याची साठवणदेखील असुरक्षित असते.
  सर्वसामान्य नागरिकांसाठी केली जाणारी अन्नप्रक्रियादेखील असुरक्षित पद्धतीची असते. अशा दूषित, रसायनयुक्त आहाराच्या सेवनाने जुलाब उलटी, अतिसार, पचनाचे विकार, कावीळ, कॉलरा, क्षय, विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी, त्वचारोग, टॉयफाईड यासारखे जीवघेणे आजार होतात. कित्येकदा सामूहिक अन्न विषबाधा होणे, संपूर्ण गावात काविळीची साथ येणे, उलटीजुलाबाची साथ येणे असे प्रकार भारतात नित्याचेच आहेत.
  //

अशा पोस्ट फॉरवर्ड होताना दुर्दैवाने ज्या कुणी ते लिहिले आहे त्यांचे नाव मात्र कळत नाही.

या सर्व विषयांवर मी भविष्यात अधिक सरळ , साध्या सोप्या भाषेत लिहिणार आहेच.

एवढी चांगली आणि सर्वांच्या उपयोगाची माहिती मात्र वारंवार फक्त इकडुन तिकडे फॉरवर्ड होत असते. अशा ज्ञानावर्धक माहितीचा उपयोग किती जण प्रत्यक्षात आपले जीवन आरोग्य सुधारण्यासाठी करतात.

मित्रांनो अशा प्रकारच्या पोस्ट अधिकाधिक फॉरवर्ड करा, जेणेकरुन हे ज्ञान अधिकाधिक लोकांना उपलब्ध होईल. अर्थात ज्ञान उपलब्ध असल्याने ते ग्रहण करण्याची शक्यता वाढतेच हा एक आशावाद देखील आहेच.

चला तर मग आधुनिक समाजमाध्यमे समाजाच्या कल्याणासाठी वापरुयात.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.