Stay Fit Pune - The weight loss center

आपली त्वचा म्हणजे आपली ब्रॅंड ॲंबेसेडर

आपण काय आहोत, कसे आहोत हे समजण्यासाठी लोकांनी आपणाशी बोलावे लागते, आपल्यासोबत वेळ घालवावा लागतो. आपला स्वभाव, आपल्या सवयी यामुळे आपल्या विषयीची मते जग बनवित असते. ही मते बनण्याची सुरुवात होते ती आपली देहबोली पाहुन. आपण बसतो कसे, उभे कसे राह्तो, चालतो कसे यावरुन आपल्याविषयीची मते बनण्यास सुरुवात होत असते. या विषयी, आपल्या वेबसाईटवर मी आधीच लेख लिहिले आहेत. तुम्ही इथे क्लिक करुन वाचु शकता. आपली देहबोली हा झाला पहीला टप्पा!

आपण बोलतो कसे, आपली विचारसरणी, विचार करण्याची पध्दत, आपली निर्णय क्षमता, आपली निर्णय तत्परता, आपली स्वतःची मते बनविण्याची पध्दत  या सा-या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाविषयी दुस-याच्या मनात कायमची मते बनविण्यासाठी कारणीभुत असतात. त्यातही आपण किती संवेदनशील आहोत, दुस-यांना समजुन घेतो की नाही घेत, एक कल्ली आहोत का अशा अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. हा झाला तिसरा टप्पा!

पहीला व तिसरा टप्पा यांमध्ये दुसरा टप्पा आहे.  तो म्हणजे आपण दिसतो कसे?  तिस-या टप्प्यामध्ये आपल्या विषयी मते जरी ठाम होत असली तरी, दुस-या टप्प्यामध्येच ही मते बनण्यास सुरुवात होत असते. आपण दिसतो कसे यामध्ये देखील आपण सडपातळ आहोत की वजनदार हे जास्त महत्वाचे नसते. दुस-या टप्प्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे आपली त्वचा!

आपण काय आहोत, कसे आहोत या विषयी आपण स्वतः बोलण्या अगोदरच, आपल्या सवयी पाहण्या अगोदरच, आपली त्वचा खुप काही सांगुन जाते. आपली त्वचा आपल्या विषयी अनेक गोष्टी सांगत असते. त्यातील एक म्हणजे आपले वय! आपले वय किती असावे या विषयीचे ज्ञान , आपल्याकडे पाहणा-यास, आपणाशी बोलण्यापुर्वीच झालेले असते.

त्यामुळे निव्वळ सुंदर आकर्षक दिसणे हा निरोगी त्वचेचा हेतु नसावा असे मला नेहमीच वाटत आले आहे. अर्थातच सुंदर, आकर्षक तर दिसलेच पाहिजे. पण त्याही पेक्षा महत्वाचे आहे, आपले व्यक्तिमत्व, जसे आहे, तसे नितळ, तजेलदार , समोरच्याला दिसणे. व त्यासठी आपण आपले व्यक्तिमत्व तसे बनवावे लागेल. हे करीत असताना, केवळ बाजारातील एखादी क्रीम चेह-यास लावुन हे होणार नाही. यासाठी एकुणच आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल (जर आवश्यकता असेल तर) करावा लागेल व हा बदल करणे म्हणजेच काय तर जीवनशैली मध्ये आमुलाग्र बदल.

आमच्या एकुणच कार्यक्रमाचा जोर असतो जीवनशैलीमधेय सकारात्मक बदल करण्यावर!

आपली त्वचा, म्हणजे आपली ब्रॅंड ॲम्बेसेडर आहे. आपणास पाहुनच लोक आपल्या विषयी मते बनविण्यास सुरुवात करतात. त्यामुळेच आपल्या त्वचेची, विशेषतः चेह-याच्या त्वचेची देखील विशेष काळजी घेणे जरुरीचे आहे.

ही काळजी घेताना दोन प्रकारे घेतली गेली पाहिजे. पहिली म्हणजे आंतरीक काळजी व दुसरी बाह्य सोपस्कार. यविषयी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.

आंतरिक काळजी म्हणजे एकूनच आपल्या शरीराकडे, चयापचयाकडे व्यवस्थित लक्ष देऊन ते सुधारणे. यामध्ये आहार-विहार या दोन्हींचा व्यवथित संगम होण अपेक्षित आहे. बाह्य सोपस्कार म्हणजे चेहरा धुवणे, क्लिंझींग करणे, इत्यादी.

हल्लीच्या सौंदर्य प्रसाधनांच्या वाढत्या जाहिरातबाजीमुळे, सर्व जण, विशेषतः महिला आंतरिक काळजी न घेता, केवळ बाह्य सोपस्कारांवरच अवलंबुन राहतात. असे केल्याने तात्पुरता लाभ होतो खरा पण नुकसान देखील काही कमी होत नाही. त्यामुळे मी खाली काही ठळक मुद्दे मांडत आहे, ज्यामध्ये आंतरिक तसेच बाह्य सोपस्कार देखील ठिक ठाक होऊन तुम्ही तरुण नुसते दिसणारच नाही, तर तरुण व्हाल देखील. जस जसे आपले वय वाढते तसे आपल्या त्वचेच्या विशिष्ट घटकांचे काम करणे प्रभावित होते. त्यामुळेच त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या यायला प्रारंभ होणे अशी लक्षणे दिसु लागतात. हे शरीर नश्वर आहे, त्यामुळे ते जीर्ण होत राहणारच. व जीर्ण होत जाईल तसतसे ते जीर्ण, वृध्द दिसेल देखील, यात शंकाच नाही. आपण त्या त्या वयात, ते ते शारीरीक बदल आनंदाने स्वीकारले देखील पाहिजेत. पण अकाली म्हणजे प्रत्यक्षात म्हातारे नसताना देखील तुमची त्वचा वृध्दांसारखी तर कधी राठ, तर कधी काळवंडलेली , निस्तेज, मलीन दिसत असेल तर , मी जे उपाय सांगतो ते वापरले , अमलात आणले तर तुम्ही १००%, तरुण दिसाल व व्हाल देखील!

क्लिंझींग म्हणजे बाह्य स्वच्छता

तुमच्या त्वचेचा प्रकार समजुन घेऊनच तुम्ही कसल्या प्रकारचा फेसवॉश वापरावा हे ठरवले पाहीजे. मुळात निव्वळ, स्वच्छ, थंड पाण्याने चेहरा दिवसातुन अनेकदा साफ केला तरी पुरेसे आहे. आपल्या त्वचेचा सर्वात बाहेरचा पडदा जो आहे तो स्वच्छ ठेवणे म्हणजे बाह्य स्वच्छता. आणि दिवसातुन एक दोन वेळा तरी आंघोळ ज्याने संपुर्ण शरीराच्या त्वचेची बाह्य काळजी घेतली जाईल.

भरपुर पाणी पिणे

कमीत कमी दोन लिटर ते जास्तीत जास्त ४ लिटर एवढे पाणी तुम्ही दिवसभरातुन प्यायलेच पाहीजे. याने लघवी द्वारे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. सोबतच त्वचेचा तजेला कायम राहण्यासाठी याने खुप मदत होते.

आवश्यक फॅटी ॲसिड्स

आपण प्यायलेले पाणी त्वचेने राखुन धरले पाहिजे यासाठी ओमेगा ३ व ओमेगा ६ अशा फॅटी ॲसिड्सची आवश्यकता असते. असे जर पाणी त्वचेमध्ये शाबित राहु लागले तर अतिनील किरणे, उन्ह आदींचा त्रास तुम्हाला जाणवणार नाही. यातील ओमेगा ६, हा घटक आपणास रोजच्या अन्नातुन मिळत असतो. ओमेगा ३ मिळणे थोडे अवघड आहे की जे विशिष्ट प्रजातीचे मासे यामध्येंच आढळते. बाह्य स्वच्छता बाहेरुन तुम्हाला नितळ करते तर फॅटी ॲसिड्स तुमच्या त्वचेला आतुन भक्कम व तजेलदार बनवतात.

अतिनील किरणांपासुन त्वचेचा बचाव

यासाठी शक्यतो तीव्र उन्हात जाणे टाळा. किंवा आवश्यक तेवढ्या कपड्याने, हेल्मेट ने चेह-याची त्वचा झाका. हे सगळे अगदीच शक्य नसेल तर आयुर्वेदीक बेस असलेले सनस्क्रीन वापरा. असे केल्याने आपण आपली त्वचा जळण्यापासुनच नुसती वाचवित नाही तर अकाली वृध्दत्वाला देखील आळा घालु शकतो. सनस्क्रीन तुम्ही उन्हात बाहेर पडण्यापुर्वी किमान २० मिनिटे तरी लावले पाहिजे.

ॲन्टीऑक्सिडंट्स

ॲन्टीऑक्सिडंट्स आपल्या केवळ त्वचेसाठीच गरजेची नसतात. शरीराच्या प्रत्येक भागाला याची गरज असते. त्वचेसाठी विशेष करुन फायद्याची असणारी ॲन्टीऑक्सिडंट्स पुढील प्रमाणे आहेत.

पल्लवी तिच्या हेल्द ड्रिंंक सोबत

विटामिन सी

विटामिन सी आपणास सफरचंद, धान्य, लिंबु-संत्रे यांतुन मिळते. सुदॄढ वयस्क शरीरासाठी रोज किमान ७५ ग्रॅम विटामिन सी मिळाले पाहीजे.

विटामिन ई

हे आपणास मिळते सुक्या मेव्यामधुन. याचे देखील प्रमाणा दिवसाला किमान्न १५ ग्रॅम इतके आहे.

त्वचा तजेलदार, टवटवीत, सुरकुत्या विरहीत होण्यसाठी तसेच अतिनील सुर्यकिरणांपासुन बचाव करण्याची आपली क्षमता वाढविण्यासाठी या दोन्ही ॲन्टीऑक्सिडंट्स ची गरज असते.

वरील सर्व गोष्टी तुम्ही जर केल्या व सोबतीला आहार-विहार म्हणजे डायट व व्यायाम याकडे लक्ष दिले तर तुम्ही चिरतरुण रहाल यात शंका नाही.

हा लेख तुम्हाला आवडला असल्यास अवश्य प्रतिक्रिया कळवा, शेयर, फॉरवर्ड करा!

टिप – किती किलो सफरचंदे खाल्ल्यावर किती विटामिन सी मिळते व किती सुका मेवा खाल्यावर किती ग्रॅम विटामिन ई मिळेल याचे गणित लक्षात ठेवणे, व शुध्द, स्वच्छ, रसायनमुक्त फळे किंवा सुका मेवा आपणास मिळेलच यात शंका आहे. सोबतच आवश्यक फॅटी ॲसिडस योग्य प्रमाणात मिळणे देखील हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात अवघड आहे. त्यामुळेच वरील पाच गोष्टी म्हणजे बाह्य सोपस्कार व आंतरीक काळजी नीट होण्यासाठी, आमच्याकडे आहे तुमच्या त्वचेच्या परिपुर्ण आंतरीक काळजी व पोषणासाठी एक सप्लीमेंट.

 

तुम्हाला हे सप्लीमेंट हवे असल्यास खालील फॉर्म भरुन पाठवा.

 

कळावे,

Mahesh and Pallavi Thombare

Fitness coaches from Pune.

Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below. 

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6ImZpcnN0X25hbWUiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRmlyc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIxIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoibGFzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ikxhc3QgTmFtZSIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIwIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiQXJlYSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiIiwidmFsdWVfcHJlc2V0IjoiIiwiaHRtbCI6InRleHQiLCJtYW5kYXRvcnkiOiIwIiwibWluX3NpemUiOiIiLCJtYXhfc2l6ZSI6IiIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIiwidm5fb25seV9udW1iZXIiOiIwIiwidm5fb25seV9sZXR0ZXJzIjoiMCIsInZuX3BhdHRlcm4iOiIiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiI2IiwibmFtZSI6Ik1vYmlsZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJNb2JpbGUgbnVtYmVyIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiQWdlIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoicmVzZXQiLCJsYWJlbCI6IlJlc2V0IiwiaHRtbCI6InJlc2V0IiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyODUwMyIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjE5NDgxIiwiYWN0aW9ucyI6IjM0MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwczpcL1wvc3RheWZpdHB1bmUuY29tXC93cC1jb250ZW50XC9wbHVnaW5zXC9jb250YWN0LWZvcm0tYnktc3Vwc3lzdGljXC9hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNTk2ODEyIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzU5NjgxMiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6Ijg4OWFiNzgwNzMxNjAzNGMwZTEwMzlmZGMzMjdlMmZlIn0=

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.