Stay Fit Pune - The weight loss center

वार्धक्यातील आरोग्य समस्या – आमच झालं आता सगळं

“आमच झालं आता सगळं!”

कित्येकदा घरातील वडीलधारी मंडळींच्या मुखी आपण हा डायलॉग ऐकत असतो. त्यांच्या अशा बोलण्याच्या मागे अनेक कारणे असतात. यातील महत्वाचे कारण असते की त्यांना आजपर्यंत जे काही केले ते भरुन पावलेले असते. या वाक्यात समाधान दिसते. पुर्णता दिसत असते. आयुष्याची सार्थकता दिसत असते. आयुष्याच्या उतारवयात असे वाटणे म्हणजे जिवंतपणाचे लक्षण आहे.

हे अशी वाक्ये आपल्या म्हणजे या पिढीच्या कानावर पडतात याचा अर्थ, आपल्या आई वडीलांस आता त्यांच्या मुलांच्या भवितव्याची फार काळजी व भवितव्यासाठी फार काही करण्याची गरज राहिलेली नसते. ज्या घरात अशी वाक्ये कानावर येतात त्या घरातील सध्याची पिढी कार्यकुशल, जबाबदारीची जा

णीव असणारी असते यात शंका नाही.

साधारण चार वर्षांपुर्वी आमच्या क्लब मध्ये, माझाच एक मित्र आला. त्याच्याकडे पाहुन असे वाटले की याला तर कसल्याच फिटनेस मार्गदर्शनाची गरज नाहिये. एकदम सडसडीत, चपळ व सक्रिय आयुष्य तो जगत आहे हे त्याच्या शरीरयष्टी व चेह-यावरुन स्पष्ट दिसत होते.

पण त्याच्या चेह-यावर एक अनामिक काळजी देखील होती. त्याने मला न सांगताच मी ओळखले की काहीतरी बिनसले आहे. गप्पा टप्पा झाल्या, माझे काय सुरु आहे, तुझे काय सुरु आहे, मुल किती आहेत, शाळेत कुठे कितवी ला आहेत अशा साधारण गप्पा झाल्यावर, त्याने माझ्या आई वडीलांच्या विषयी विचारपुस केली. माझे आईवडील गावी राहतात व अजुनही शेती, व्यवसाय उद्योग, गावकी भावकी हे सगळे तितक्याच जोशात करतात. अशी सगळी माहिती मी त्याला दिली.

मग मी त्याला त्याच्या वडीलांविषयी विचारले. त्याची आई आधीच म्हणजे साधारण पणे ७-८ वर्षापुर्वीच निवर्तल्याचे मला समजले होते. वडीलांना रीटयर होऊन आता तीन वर्षे झाली होती त्याच्या. निवृत्ती

 

नंतर आयुष्यात येणारे बकालपण त्यांच्या आयुष्यात नव्हते. कारण घरी नातवंड, सुना , मुल अस सगळ भरलेल गोकुळच आहे त्यांच्या. तरीही मित्राकडुन समजले की त्याचे वडील चिडचिड करतात ब-याचदा. आरोग्याच्या देखील अनेक समस्या त्यांना सुरु झाल्या आहेत. पुण्यातील नामवंत डॉक्टर व इस्पितळांमध्ये योग्य ते इलाज सुरु आहेत. असे त्याने सांगितले. इलाज होतात, व्याधी दुर होतात. व पुन्हा एखादी नवीन व्याधी डोके वर काढते. व पुन्हा ते दवाखान्याचे दुचक्र सुरु होते. त्यातच त्यांना मधुमेह असल्याचे देखील नुकतेच समजले. त्यामुळे मित्राचे वडील मनाने खचुन जाऊन औषधपाणी घेण्यामध्ये अजिबात रस दाखवित नाहीत. वर ऐकु कमी येऊ लागल्याने देखील चिडचिडेपणा वाढला आहे. खाण्याच्या दाढी देखील काढाव्या लागल्याने खाण्यापिण्याची अनेक पथ्ये त्यांना पाळावी लागायची, ते देखील त्यांच्या अस्वस्थतेचे कारण होते.

माझ्या मित्राची समस्या म्हणजे माझीच समस्या. मी त्याला त्याच्या वडीलांचे वय व वजन विचारले. त्यांचे वजन त्यांच्या वय व उंचीला जास्त होते, पणा इतके जात नव्हते की “वजन” ही काळजी असावी. पण एकंदरीतच परीस्थिती पाहता मला एक समजले की, काकांना (आणि त्यांच्या वयाच्या अनेक वयस्कर व्यक्तिंना) जी मुख्य समस्या आहे ती म्हणजे योग्य पोषण न होणे.

जसे आपले वय वाढते तसे आपल्या शरीरातील चयापचय म्हणजेच मेटॅबॉलिज्म कमकुवत होत जाते. मेटॅबॉलिज्म कमकुवत होणे म्हणजे रोगांना आमंत्रण होय. नुसतेच रोगांना आमंत्रण नसुन याचा माणसाच्या मानसिक आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत असतो. व अशाच गंभीर परिणामांची सुरुवातीची लक्षण, माझ्या मित्राच्या वडीलांच्या बाबतीत दिसु लागली होती.

वय वाढल्यावर विना आमंत्रणाचे येणा-या आजारांची यादी खुपच मोठी आहे. आणि त्यातच जर मेटॅबॉलिज्म जर ठिक नसेल तर हे सगळे गंभीर रुप धारण करु शकतात.

या यादीतील अगदी मोजकेच आजार, रोग जे वयोमानामुळे होतात ते इथे देत आहे.

 • दात पडणे व खाता न येणे – अपचन-कुपोषण ही साखळी.
 • कमी दिसणे -त्यामुळे अपघात-अंथरूण धरणे.
 • ऐकायला कमी येणे-चिडचिडेपणा व संशयीपणा-मानसिक तणाव.
 • स्मृतीभ्रंश (अल्झायमरचा आजार)
 • पडल्यामुळे हात-पाय मोडणे.
 • वय वाढल्यामुळे होणा-या गाठी, कर्करोग, इ. समस्या,
 • पुरुषांमध्ये प्रोटेस्ट नावाच्या ग्रंथींची वाढ- त्यामुळे लघवीला त्रास व वागणुकीतले बदल.
 • स्त्रियांमध्ये स्त्री-संप्रेरकांच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक – मानसिक त्रास.
 • स्त्रियांमध्ये गर्भाशय बाहेर पडणे.
 • रक्तदाब वाढणे -त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव- अर्धांगवायू, इ.
 • अति रक्तदाबामुळे आणि रक्तवाहिन्या जाड झाल्याने हृदयविकार जडणे.
 • झोपेचे प्रमाण कमी होणे आणि मानसिक त्रास.
 • सांधेदुखी – विशेषत: गुडघ्यांना आणि घोटयांना
 • जांघेत हार्निया होणे.
 • मधुमेह
 • स्थूलता
 • श्वसनाचा त्रास, दमा, श्वासनळीदाह, इ.
 • लकवा
 • हृदयरोग
 • मेंदूमधील रक्तस्त्रावामुळे अर्धांगवायू, पक्षाघात
 • मेंदूचे इतर आजार – स्मरणशक्ती कमी होणे
 • श्वसनसंस्थेचे आजार, खोकले, इ.
 • सांधेदुखी, सांध्याची हालचाल मर्यादित होत जाणे.
 • हाडे कमकुवत होत गेल्याने थोडया मारानेही अस्थिभंग होणे. (विशेषत: मनगट व खुब्याचे अस्थिभंग)
 • डोळयात मोतीबिंदू, लांबचे दिसणे पण जवळचे न दिसणे, कानांची श्रवणशक्ती कमी होणे.
 • अनेक प्रकारचे कर्करोग.

माझ्या मित्राला जेव्हा त्याच्या वडीलांच्या आरोग्याबाबत काळजी वाटली. व जेव्हा त्याने वडीलांस औषधोपचाराकडे नीट लक्ष देण्यास, औषधे गोळ्या वेळवेळच्या घेण्याचा आग्रह केला तेव्हा त्या्च्या वडीलांनी एकच उत्तर दिले. व जेव्हा जेव्हा माझा मित्र वडीलांशी याच विषयावर बोलतो तेव्हा तेव्हा त्यांचे हेच उत्तर असते. ते म्ह्णजे –

“माझ संपल सगळं आता, तु नको काळजी करुस !”

वडीलांचे हे उत्तर नेहमी ऐकुन माझ्या मित्राची काळजी मात्र दिवसेंदिवस वाढत्तच होती. वडीलांस कसे समजावुन सांगावे, हे त्याला समजत नव्हते. मित्र म्हणुन माझ्याशी मन मोकळे करुन काही करता येते का हे पाहण्यासाठी तो माझ्या कडे आला होता.

Facebook Comments

ADD COMMENT

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.