
पुन्हा तरुण होता येते काय! (होय, मी म्हातारा झालो होतो)
गेलेले धन, संपत्ती, पैसा, अडका मनुष्य पुन्हा प्रयत्न करुन माघारी मिळवु शकतो, पण एकदा गेलेले तारुण्य माघारी मिळवता येत नाही कदापि ! संस्कृत मधील ते सुभाषित खालील प्रमाणे आहे.
अर्था भवन्ति गच्छंति च पुनः पुनः ।
पनः कदापि नायाति गंत तु नवयौवनम ॥
पण आज मी खात्रीपुर्वक सांगु शकतो की सुभाषित, किमान सध्याच्या काळात तरी खोटे ठरवण्याची क्षमता प्रत्येक व्यक्ति मध्ये आहे. हो, गेलेले तारुण्य पुन्हा माघारी मिळविता येते. हे मी स्वानुभव व माझ्या क्लब मेंबर्सचे अनुभव यांच्या आधारे, एवढ्या खात्रीशीरपणे सांगु शकतो.
लहाणपणी शाळेत असताना एक धडा शिकताना, ऐकलेले, वाचलेले एक वाक्य माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहे. तेव्हा मी कोणत्या इयत्तेमध्ये होतो हे आता नीटसे आठवत नाहीये. पण ते वाक्य मात्र अजुनही मी विसरलो नाहीये. लेखक कोण हे देखील मला आठवत नाही. ते वाक्य असे
तारुण्याची तीन ‘त’ कार म्हणजे – तेजस्विता, तपस्विता व तपत्परता
तारुण्याविषयी माझी संकल्पना, त्या बालवयातच तयार झाली. तारुण्य म्हणजे तेजस्वी दिसणे, तारुण्य म्हणजे सतत उद्योगात राहणे, सतत कामात व्यग्र असणे, सतत एखाद्या तपस्व्यासारखी कर्म साधना करणे , तारुण्य म्हणजे नेहमी तत्पर असणे. या अर्थाने म्हणजे ख-या अर्थाने आपण तरुण तेव्हाच होऊ जेव्हा आपल्या मध्ये या तीन गोष्टी असतील. या तीन गोष्टी किंवा व्यक्तित्वाचे हे तीन पैलु वरकरणी जरी वेगवेगळे दिसत असले तरी ते आहेत एकमेकांशी संलग्न. एक असेल तर दुसरे असते व तसेच तिसरे. एकाच्याही अभावाने आपण आपले तारुण्य गमावुन बसतो.
वैद्यकिय किंवा जीवशास्त्रीय भाषेत सांगायचे झाले तर, तारुण्य म्हणजे या शरीराची प्रजननाची क्षमता. रसिक भाषेत सांगायचे झाले तर एखाद्याची प्रणय म्हणजे शरीरसुख घेण्याची व देण्याची क्षमता.
माझ्या ‘तारुण्य’ या संकल्पने मध्ये वरील दोन्ही गोष्टींचा समावेश देखील आपोआपच होतो.

या दोन भिन्न व्यक्ति नाहीयेत. हे आहेत अवधुत सरनाईक, आमचे क्लब मेंबर
सर्वात प्रथम मी वरील सुभाषिताला, खोटे कसे ठरवतो आहे, हे पाहु!
हल्ली वैद्यकिय संशोधन व सुधारणांमुळे , मनुष्याचे सरासरी आयुष्यमान वाढले असल्याचे आपण पाहतो. हे वाढलेले आयुष्यमान जरी आपणास मिळाले असले तरी बदललेल्या जीवनमानामुळे (lLifestyle) मनुष्याचे वार्धक्यात प्रवेश करायचे वयोमान मात्र कमी झालेले आहे. याचा अर्थ असा की, वार्धक्यातील लक्षणे, वय कमे असताना म्हणजे अगदी चाळीशी मध्येच जाणवु लागतात व दिसु लागतात. ही नुसतीच लक्षणे नसतात. यांच्या कडे दुर्लक्ष केले तर अकाली वृध्दत्व येतेच. आणि हीच सत्य स्थिती आपण समाजामध्ये सध्या पाहत आहोत. या परिस्थीतीला जीवनमानाच्या व्याधी असे गोंडस नाव जरी दिले असले तरी त्या व्याधी शरीरावर, नव्हे तुमच्या एकुण जगण्यावरच अत्यंत प्रतिकुल परिणाम करीत असतात. शरीराच्या स्तरावर या व्याधींच्या मार्फत आपण विविध आजारांना सामोरे जातो. जीवनमानामुळे होणा-या व्याधी, आजार नुसते संकल्पनांमध्येच न राहता ते तुमच्या नकळतच, तुमच्या शरीरात विविध रोगांच्या रुपाने प्रवेश करतात. हे रोग हल्ली इतके सामान्य झाले आहेत की, असे रोग, आजार होणे कुणालाच गैर वाटत नाही. या आजारांमध्ये प्रामुख्याने समावेश होतो तो मधुमेह, रक्तदाब, नैराश्य, वजनवाढ, कर्करोग, मानसिक आजार, थायरॉइड विकार, फॅटी लिव्हर, पीसीओडी, वंध्यत्व, हृदयरोग, पॅरालिसिस, निद्रानाश, श्वसनरोग आणि दमा, नेत्रविकार आणि वाढत्या नंबरचे चष्मे, ध्वनिप्रदूषणामुळे येणारे बहिरेपण, कम्प्युटर सिंड्रोम, मणक्यांचे विकार, हाडांची ठिसुळता व ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, अॅनिमिया असे अनेकविध आजार चुकीच्या जीवनशैलीमुळे येतात. मधुमेह व बीपी हे यात अग्रस्थानी आहेत.
काय आपण तरुण आहोत?
बघा किती गंभीर समस्या आहे ही. वरील आजारांची यादी जी आहे, त्या यादीतील आजार, पुर्वी म्हातारपणातच (च वर विशेष जोर) व्हायचे. एखाद दुसरा अपवाद वगळता, पुर्वी जे आजार झाले की आयुष्याची उतरती कळा सुरु झाली असा अंदाज लोक बांधायचे. पण सध्याच्या भयंकर स्पर्धात्मक युगामध्ये, रॅट रेस मध्ये, वयाने म्हातारे न होता देखील, कमी वयाचे ‘तरुण’ या आजारांना बळी पडत आहेत. तर अशा आजारी असलेलेल्यांना, किंवा अशी लक्षणे ज्यांच्यात दिसु लागली आहेत, अशांना तरुण म्हणणार तरी कसे आपण? तुम्ही वयाची साठी ओलांडली नसेल अद्याप, तर तुम्ही तुम्हाला, स्वतःला हा प्रश्न आवर्जुन विचारा “काय आपण (मी) तरुण आहोत?”
अशाच, अवेळी वृध्द म्हणजे म्हातारे झालेल्या (एकेकाळी मी देखील म्हातारा झालो होतो) लोकांना काय पुन्हा तरुण होता येईल का?
काय पुन्हा अशा लोकांना तारुण्याच्या तीन ‘त’ कारांना आपल्या आयुष्यात आणता येईल का?
काय अशा लोकांना जीवशात्रीय भाषेनुसार, पुन्हा प्रजनन क्षमता वाढविता येईल का?
काय अशा लोकांना पुन्हा एकदा प्रणयसुख, रतिसुख मनमुराद देता-घेता येईल का?
माझे उत्तर आहे ‘हो’.
व याचे जिवंत उदाहरण मी स्वतः आहे!

बदल होऊ शकतो नव्हे होतोच
हे सगळे कसे करता येईल, काय केल्याने आपण पुन्हा तरुण होऊ शकतो, हे मी स्वानुभवावरुन, पुढच्या लेखात लिहिन.
वाचत रहा, माझे लेखन व प्रतिक्रिया अवश्य द्या. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी , खालील फॉर्म भरुन पाठवा!
चला तर मग निरामय निरोगी जीवन जगण्याचा निर्धार करु व व्यायाम आपल्या सवयीची भाग बनवुयात.
कळावे
आपले
महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525
Author is a well-known fitness coach from Pune. He has helped thousands of people with weight loss and weight gain. He runs a fitness club, weight loss centre in Hadapsar and Kothrud, Pune. Please feel free to contact him by submitting details below.